आनंद अंतिमतः दुःखाचे कारण बनतो

21
2014
Oct
बंगलोर, भारत
 

आनंद हा नेहमी तुम्हाला क्रियाशील ठेवतो; तो तुम्हाला धावायला लावतो, 
सर्वप्रथम आनंद तुम्हाला त्याच्या दिशेने धावायला लावतो आणि नंतर तो 
तुम्हाला त्याच्यापासून दूर धावायला लावतो. दुसरीकडे आहे योग जो तुम्हाला 
स्थिर ठेवतो. तो तुमच्या जीवनात स्थैर्य आणतो.
 ज्या व्यक्तीचा  देह, मन आणि भावना हे सर्व भक्कम आणि स्थिर 
असतात ती व्यक्ती योगी होय. हे अतिशय महत्वाचे आहे. जर तुमच्या 
भावना या वर आणि खाली होत आहेत तर याचे कारण आहे की तुम्ही 
कशाच्या तरी दिशेने धावत आहात. आणि ज्याच्याकडे तुम्ही धावत आहात 
ते काय आहे? तर तो आहे आनंद आणि एकदा का तुम्ही तिथे पोचलात तर 
तोच आनंद तुम्हाला त्याच्यापासून दूर धावायला भाग पडतो.

 तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहाल तर तुम्हाला दिसेल की ज्याच्या कशाच्या 
दिशेने तुम्ही धावत होतात, ते, कोणत्या ना कोणत्या क्षणी, तुम्हाला 
त्याच्यापासून दूर लोटते कारण ते हाताळणे तुम्हाला शक्य राहात नाही. 
म्हणून सगळे लोक जे कोणत्या ना कोणत्या क्षणी अनुभवतात 
'मला आता पळून जायचे आहे', कारण तुम्हाला त्यात मजा येते आहे 
हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये मजा येत असते 
तेव्हा तुम्हाला त्यागोष्टीपासून दूर पळून जावे असे नक्कीच वाटेल. म्हणून 
जर तुम्ही तुमची आनंद शोधण्याची मनोवृत्ती बदलाल आणि केवळ स्थिर
व्हाल तर कोणतीही गोष्ट अति होणार नाही.
  'मी इथे दुसऱ्यांना आराम देण्यासाठी आहे, स्वतःचे सुख शोधण्यासाठी नाही', 
असे तुम्हाला वाटले पाहिजे. या एका दृष्टिकोनामुळे 'अरे बाप रे, हे तर 
अति झाले, मला इथून पळून जावेसे वाटते' या प्रवृत्तीला अटकाव पडेल. 
केवळ आनंद उपभोगणे यामुळे तुम्हाला वाटेल, 'हे अति होते आहे'.
 जेव्हा तुम्ही स्थिर असता, तेव्हा तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही देऊ 
करता. सूर्य कधी म्हणत नाही, 'माझा प्रकाश आता अति झाला आहे 
आणि आता मला पळून जावेसे वाटते'. सोने कधी म्हणत नाही, 
'माझे चमकणे जरा अतिच झाले आहे', कारण ते त्यांच्या स्वभावात 
स्थिर आहेत, योग म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वभावात स्थिर पावणे होय.

प्रश्न व उत्तरे. सर्व प्रश्न व उत्तरे विस्तारित करा.


प्रश्न : गुरुदेव, सिमरन (मंत्र घोष) आणि ध्यान यामध्ये काय फरक 
आहे?

श्री श्री:सिमरन ही ध्यानाची सुरुवात आहे आणि समाधी ही ध्यानाचा अंत. 
सिमरन म्हणजे स्मरणे. पहा ना, जर तुम्हाला कोणी आवडत असेल 
आणि तुम्ही त्याची आठवण काढली तर काही भावना दाटून येतात, 
हो ना. जेव्हा भावना ओसंडून जाऊ लागतात तेव्हा मन शांत होते. 
मनातील क्षोभ शांत होतो. जेव्हा भावना ओसंडून वाहतात आणि मनाला 
शांत करतात, ते असते ध्यान.