ध्यान म्हणजे मन नसणे

जुलै २९, २०११ 

 (प्रिय वाचक जुलै २९ ला गुरुजींनी दिलेले उरलेले ज्ञान तुम्हाला थोड्याच वेळात उपलब्ध करून दिले जाईल)

प्रश्न : प्रिय गुरुजी, जेंव्हा तुम्ही असे म्हणता की मी शरीरापासून वेगळा आहे ते मला समजते, पण जेंव्हा तूम्ही म्हणता की मी मनापेक्षा वेगळा आहे ते मला समजत नाही.  मी माझ्या मनापासून कसा वेगळा आहे?
श्री श्री रवि शंकर: ओकेआता तू तुझे विचार आहेस की विचार तुझे आहेत? मन म्हणजे विचार. विचार येतात आणि जातात. तर खूप विचार येतात आणि खूप विचार जातात. खूप तुम्हाला पटतात आणि खूप नाही पटत. आणि जे विचार पटतात तेच तुम्हाला काही काळाने पटत नाहीत. नाही का? तुम्ही बसा   आणि तुमचे विचार लिहून काढा. नंतर तुमच्या असे लक्षात येईल की, ' ओह, मी तोच माणूस आहे का ज्याने हा विचार केला?'  तुम्ही आश्चर्य कराल, बरोबर? तर, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या विचारांपासून वेगळे आहात. विचार येतात आणि जातात पण ते तुमच्या मध्ये येतात आणि तुमच्या मधेच जातात. ते आकाशातील ढगांसारखे आहे. पण जेंव्हा खूप विचार असतात, ते इतके ढगाळ असते, तुम्हाला असे वाटते की, 'ओह, आकाश म्हणजे ढग'. पण जर तुम्हाला स्वच्छ आकाश म्हणजे माहित असेल, मोकळ्या आकाशाचे काही क्षण, तर तुम्ही पाहाल, 'ओह आकाश हे ढगांच्या पलीकडे आहे, फक्त ढग नाही' आणि तीच साधनेमधील सुंदरता आहे. अगदी पहिल्या सुदर्शन क्रियेमध्ये काय होते? अगदी पहिल्यांदा तुम्ही कशाही शिवाय काही क्षण अनुभवता. काही क्षण; त्याने तुमची ढगाळलेली सजगता जागृत केली. तुम्ही ढग म्हणजेच आकाश असा विचार करता, पण तुम्हाला छोटे भोक मिळाले, आणि तुम्ही काळ्या ढगांच्या मागचे निळे आकाश तुम्ही बघू शकलात, बरोबर? हा तुमचा अनुभव नाही का? आता तुम्ही मागे वळून बघा की पहिले शिबीर करण्याच्या आधी, पहिले ध्यान किंवा सुदर्शन क्रिया करायच्या आधी तुम्ही काय होता? तुम्ही त्या आधी काय होता? तुम्ही आता काय आहात? तुमच्यापैकी किती जण दहा वर्ष आधीच्या माणसापेक्षा खूप वेगळे आहेत? (खूप जण हात वर करतात.) पहा, हेच दाखवते की तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही. दहा वर्ष पूर्वीच्या व्यक्तीचा जो काही विचार करता ते म्हणजे फक्त विचाराचा एक गठ्ठा आहे, मन. पण तुम्हाला थोडा अवकाश मिळाला, मनाच्या बाहेर मन नसण्याचा अवकाशाची झलक मिळाली जिथे आपण आहोत ; आणि ध्यान म्हणजे मन नसणे. पण कधी कधी ढग परत येतात आणि विचार येतात आणि ते जातात आणि त्यांच्यामध्ये कौशल्याने तुम्ही स्वतःशी केंद्रित राहता.