जन्माष्टमी

ओगस्ट २२, २०११  

भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमी. सत्याचे दृश्य आणि अदृश्य पैलुंमधील उत्तम संतुलन म्हणजे जन्माष्टमी; दृश्य भौतिक जग आणि अदृश्य अध्यात्मिक क्षेत्र. 
कृष्णाचा अष्टमीचा जन्म अध्यात्म आणि भौतिक अशा दोन्हीवरील प्रभुत्व दाखवतो. तो एक उत्कृष्ट शिक्षक आहे आणि अध्यात्मिक प्रेरणा आहे तसेच एक हुशार राजकारणी पण आहे. एका बाजूला, तो योगेश्वर (योगाचा देव - प्रत्येक योगीला ती अवस्था हवी असते) आणि दुसऱ्या बाजूला तो एक खोडकर चोर आहे. 
कृष्णाचा आणखी एक गुण म्हणजे तो संतांपेक्षाही पवित्र आहे आणि तरीसुद्धा तेव्हडाच खोडकर व्यापारी पण आहे! त्याचा स्वभाव म्हणजे दोन टोकांमधील समतोल आहे - म्हणूनच बहुतेक कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा थांग लागू शकत नाही. बाहेरच्या जगासाठी अवधूत हा वेडेपणा आहे आणि भौतिक माणूस, राजा,  राजकारणी हे अध्यात्मिक जगासाठी वेडेपणा आहे. पण कृष्ण द्वारकाधीश आहे आणि योगेश्वर पण आहे.
कृष्णाची शिकवण आपल्याला आजच्या काळातही उपयोगी आहे म्हणजे ते तुम्हाला भौतिक जगात हरवू देणार नाही आणि पूर्णपणे विरक्तही बनवणार नाही. ते तुमच्या आयुष्याला उजाळा देते, एका थकलेल्या आणि ताणाखाली असलेल्या व्याक्तीत्वापासून ते स्व केंद्रित आणि गतिशील व्यक्तीत्वापर्यंत.  कृष्ण आपल्याला कौशल्यपूर्ण समर्पण शिकवतो. गोकुळाष्टमीचा उत्सव आपल्याला विरुद्ध पण परस्पर पूरक गोष्टी आयुष्यात घ्यायला शिकवतो आणि तुमच्या आयुष्यात त्या प्रत्यक्ष उतरवायला शिकवतो.
म्हणूनच जन्माष्टमी साजरी करण्याचा प्रामाणिक मार्ग म्हणजे की तुम्हाला दोन्ही भूमिका करायच्या आहेत हे जाणून घेणे — या ग्रहावरची एक जबाबदार व्यक्ती आणि त्याच वेळी हे समजून घेणे की तुम्ही सर्व घटनांच्या वर आहात, स्पर्श न केलेले ब्राह्मण. तुमच्या आयुष्यात थोडे अवधूत आणि थोडे सक्रीय असणे हेच जन्माष्टमी साजरी करण्यामागचे महत्व आहे.



The Art of living