आपल्याला कशाची गरज आहे तर आंतरिक समृद्धीची आणि बाह्य कृतीशीलतेची

मंगळवार, ऑगस्ट १०, २०१०

ऑगस्ट ५,२०१०,वोबुर्ण,मेसेच्युसेट्स, युएसए
तुम्ही काय करता जेव्हा गर्दीत अडकता? (प्रेक्षक यादी सांगतात) तुम्ही देवाला सच्च्या मनाने ती दूर करण्यासाठी प्रार्थना करू शकता. तुम्ही गाडीत गाणे ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही बाहेर जाण्याचा जवळचा मार्ग घेऊ शकता. तुम्ही एकतर गर्दीचा आनंद घेऊ शकता किंवा श्लोक म्हणू शकता. आता काय करू नये? तक्रार. हे थांबवा आणि तुम्ही तुमचा उत्साह कायम ठेवू शकाल. आपण या जगात या उत्साहासकटच येतो पण वाटेत तो कुठेतरी हरवतो. आपण जसजसे मोठे होत जातो, आपण सकारात्मतेकडून नकारात्मतेकडे जातो. तर या ट्राफिक जॅमकडे बटणे दाबण्याच्या परीक्षेसारखे बघा. 

प्रत्येक घटना ही
विवेकात खोलवर जाण्याची एक संधी असते. एखादी  अप्रिय घटना कुठेतरी आपल्या जन्मासोबत आलेल्या ज्ञानाला बाहेर काढते. सकारात्मक किंवा नकारात्मक, प्रत्येक घटनेमुळे हेच होते.  जर घटना आपल्यावर  प्रबळ झाली, आपण भावना आणि बुद्धिमत्ता हरवून बसतो. मग आपल्याला मदतीची गरज भासते. इथेच समन्वय येतो. आपण एकत्र बसतो आणि गातो आणि भार हलका होतो. प्रत्येकाने आयुष्यात थोडा वेळ ध्यान करण्यासाठी काढायला हवा. यालाच सत्संग, सत्याबरोबर राहणे म्हणतात. आयुष्यात सत्याचा सामना करत राहा. काहीच क्षण शांती, स्थिरता, आणि मजबुती आणू शकतात. 
लोकांना वाटत हे सगळा कंटाळवाणं आहे. त्यांना वाटत ज्ञान हे फार गंभीर आहे. मी म्हणतो ज्ञानाबरोबर जा आणि मजा तुमच्याबरोबर येईल,पण मजेच्या मागे जाल तर कष्ट तुमच्या मागे येतील. आत्मज्ञान तुम्हाला हलके आणि लहान मुलांप्रमाणे बनवतो. आंतरिक उत्साह आणतो. हेच अध्यात्म होय.

अनुभव करा की सगळं ठीक आहे. सगळं ठीक होईल. तेंव्हाच आपण आत जाऊन ध्यान करू शकतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता, सगळं ठीक रहाते. जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर येता तेव्हा तुम्हाला काहीच दिसत नाही. तुम्ही आयुष्यातल्या, जगातल्या समस्येप्रती सजग होता. तुम्ही ह्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ध्यान हे स्वतःशी हास्य आहे आणि सेवा दुसर्यांच्या चेहेर्यावर हास्य आणते. तर पहिले तुम्ही आंत जायला हवय "सगळं ठीक आहे" या भावनेमध्ये. हे जाणून घ्या की तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुमची काळजी घेतली जात आहे. हा विश्वास यायला हवा. हेच ध्यान आहे.

मग जेव्हा तुम्ही बाहेर येता, तेंव्हा काम करताना काय चूक आहे हे तुम्ही जाणू शकता आणि त्यावर काम करू शकता. हे सगळं कर्तव्य समजून करू नका. हे कर्तव्य म्हणून नाही तर तुमचा सहज स्वभाव असल्यासारखे करा. जर तुम्ही कर्तव्य समजलात तर त्यात सुंदरता नसेल. सेवा करा आणि हसत राहा. हसा आणि सेवा करा. सहसा आपण सेवेत हसत नाही. लोक त्रासून जातात आणि दुसर्यांना सेवेच्या नावाखाली त्रास देतात. आणि
जे लोक आनंदात असतात ते सेवा करीत नाही! दोन्ही प्रकारचे लोक एकाच पायावर चालतात. तुम्हाला दोन्ही गुणांची गरज आहे, आंतरिक ऐश्वर्य आणि बाहेरील कृतिशीलता.
The Art of living