तुमचा वास्तविक स्वभाव

11
2013
May
बंगलोर, भारत


समग्र निर्मिती ही दोन प्रकारच्या प्रकृतीने बनलेली आहे : परा-प्रकृती आणि अपरा-प्रकृती. अपरा-प्रकृती  ही आठ प्रकारची आहे परंतु परा-प्रकृती, ज्यामध्ये समस्त कायम आहे,अशी परा-प्रकृती  ही केवळ एकाच प्रकारची आहे.

सहाव्या अध्यायात भगवान कृष्ण म्हणतो ,’ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय I अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा II’ (७.६)

तर, भगवान कृष्ण म्हणतो,’ही समग्र सृष्टी ही अपरा-प्रकृती  आणि परा-प्रकृती  या दोन्हीने बनलेली आहे, आणि या दोन्हीचा जन्म माझ्यामधूनच झालेला आहे. त्यांच्या निर्मितीचे मी कारण आहे आणि त्यांच्या नाशाचेसुद्धा मी कारण आहे, आणि ते सगळे माझ्यामध्येच निवास करून आहे. हे तू जाणून घे.’ 

ते ज्यापासून सगळे निर्माण झालेले आहे तो देव आहे.

आता तुम्ही मला विचाराल, ‘मग देव कुठून आला?’

जर तो कोणत्या उगमापासून निर्माण झाला आहे तर तो देव नाही. मग तो उगम जिथून तो निर्माण झाला तो देव आहे.

नेहमी लोक मला विचारतात, ‘देवाला कोणी जन्म दिला?’

जन्म घेणारा कोणी देव कसे काय होऊ शकतो? निर्मितीमधील प्रत्येक गोष्ट ज्यापासून जन्म घेते, आणि सर्वात शेवटी ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट विलीन होते ते देव आहे. 

हे ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की देव म्हणजे काहीतरी किंवा कोणीतरी असे जे तुमच्यापासून अतिशय दूर आहे; कोणीतरी ज्याच्यापासून सगळी निर्मिती निर्माण झाली आहे. नाही, तो दूरवर नाहीये. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो,’मला आणि फक्त मला (सगळे काही ज्यातून निर्माण झाले आणि ज्यामध्ये सगळे काही विलीन होणार आहे अशा सर्वांचे मूळ असलेल्या मला) जाणून घे.’

हे ‘मी’ व ‘माझे’ जे प्रत्येकामध्येच असते, ते चैतन्य ( स्वयं किंवा बोधावास्था ) आहे. आणि सर्व काही या चैतन्यातून निर्मान्र झाले आहे, आणि सर्वात शेवटी सगळे काही या चैतन्यामध्ये विलीन होणार आहे. चैतन्य हा जीवनाचा पाया आहे. 

हे शरीर जिवंत आहे याचे कारण आहे चैतन्याची उपस्थिती. जेव्हा चैतन्य देहाला सोडून जाते तेव्हा जीवन संपुष्टात येते.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मला प्रत्येक जिवामध्ये अस्तित्वात असलेली चेतना म्हणून जाणून घे. ती चेतना जी सर्व गोष्टीचा आधार आहे आणि जी समग्र निर्मितीला कायम ठेवून आहे. सर्व गोष्टींचे मी आद्य कारण आहे.’

तर, चैतन्य हे सर्व गोष्टींचा आधार आहे. आईच्या उदरात असलेल्या बाळामध्येसुद्धा चेतना असते ज्यामुळे त्या बाळाचा विकास होते. जर ती नसेल तर बाळाला मृत घोषित करतात. 


भगवान कृष्ण म्हणतो, ’निर्मितीमध्ये जिवंत असलेली आणि विकास पावणारी प्रत्येक गोष्टीचे कारण मी चैतन्य शक्तीच्या रूपाने सर्वत्र आविष्कृत होत आहे.’ 

चैतन्याच्या अस्तित्वामुळे झाडांना नवीन पालवी फुटते आणि त्यांना फळे येतात. झाडे आणि झुडुपे जिवंत आहेत कारण त्यांच्यात चैतन्य उपस्थित आहे म्हणून, नाहीतर ते विकसित झाले नसते.

आता आपल्याला वाटेल की दगडात प्राण नसतात परंतु तसे नाहीये. दगडातसुद्धा चैतन्य आहे. असे म्हणतात की समस्त निर्मिती ही जैविक (म्हणजेच जिवंत आणि विकास पावणारी) आहे. सम्पूर्ण रचनेमध्ये जीवितरहित काहीही नाहीये. सर्व गोष्टी जिवंत आहेत. 

तुम्हाला काय वाटते की निसर्ग किंवा पृथ्वी मृत आहे जेव्हा की तिने दीर्घ काळापासून अब्जावधी जीवांना जन्म दिला आणि सांभाळले आहे? बिलकुल नाही!! ही वसुंधरा अतिशय जिवंत आहे, म्हणूनच आपण तिला आपली माता, किंवा भू देवी म्हणतो. तिला ही पदवी बहाल केली आहे कारण तिच्यात जीव आहे. निसर्ग मातासुद्धा जिवंत आहे.

तर पृथ्वी ही जैविक आहे. अब्जावधी जिवंत प्राणीमात्र आणि सूक्ष्म जीवजंतू तिच्यामध्ये उपस्थित आहेत. निर्मितीच्या प्रत्येक अणु आणि प्रत्येक पेशी यामध्ये जीव आहे.

जेव्हा तुम्ही निर्मितीला या दृष्टीकोनातून पाहता तेव्हा तुम्हाला हे जाणवते की इथे काहीही मृतवत नाहीये, सर्वकाही जिवंत आहे.

जर तुम्ही बघाल तर निर्मितीतील काही गोष्टी निश्चल वाटतात तर काही हलताना दिसतात. परंतु वास्तवामध्ये सर्व काही गतिमान आहे. सूर्यसुद्धा हलतो आहे.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो,’या समस्त निर्मितीमध्ये सर्वत्र मी जिवंत आहे. ही निर्मिती अस्तित्वात आहे ती केवळ माझ्यामुळेच.’

भगवान कृष्ण पुढच्या श्लोकात समजावून सांगतो, ‘मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय I मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव II’ (७.७) 

तो म्हणतो, ‘ हे अर्जुना! माझ्याविरहित या निर्मितीमध्ये काहीही नाहीये हे जाणून घे. तो केवळ मीच आहे जो सर्व गोष्टींमध्ये आहे. या निर्मितीमध्ये माझ्या पलीकडे काहीही नाहीये. ज्याप्रमाणे मोती हे धाग्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे ही समग्र निर्मिती माझ्यामध्ये विणलेली आहे.’

काल मी म्हणालो होतो की ही समस्त निर्मिती ही गडद द्रव्य  किंवा गडद  उर्जा ज्याला म्हणतात त्या उर्जेने युक्त आहे. याचे सोप्पे उदाहरण आहे हवा. पहा, तुमच्या सभोवती हवा आहे आणि तुमच्या आतसुद्धा हवा आहे. जर तुमच्या शरीरातील सर्व हवा काढून टाकली तर तुमचे शरीर नुसते आक्रसून जाईल. टायरमध्ये ज्याप्रमाणे हवा असते त्याप्रमाणेच शरीरसुद्धा हवेने भरलेले आहे. टायरमधील हवा काढल्यावर ते जसे आकुंचित पावते तसेच आपले शरीरसुद्धा हवा काढल्यावर आकुंचित होऊन एका पिशवीत मावेल. शरीर इतके आकुंचित पावेल. ज्याप्रमाणे हवा काढल्यावर फुगा आकुंचित पावतो आणि एकदम छोटासा होऊ जातो त्याप्रमाणे.

त्याचप्रमाणे, हवा हा घटक तुमच्या शरीराच्या आत आणि त्याच्या सभोवती आहे. आपले शरीर हवा या घटकाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्याचप्रमाणे, या जगात कोणतीही गोष्ट चैतन्याच्या शक्तीशिवाय जिवंत राहू शकत नाही.

म्हणून तो म्हणतो, ‘ज्याप्रमाणे मोती हे धाग्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे ही समग्र निर्मितीमध्ये मी उपस्थित आहे. सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी मीच आहे.’

पुढचा श्लोक, ‘रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः I प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरूषं नृषु II’ (७.८) 

आता रोचक भाग सुरु होतो. भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी पाण्यातील ओलावा आहे, सर्व द्रव्य पदार्थांची चव आहे; सूर्य आणि चंद्र यांच्यातून निघणाऱ्या प्रकाशांची किरणे मी आहे. सर्व वेदांमध्ये प्रणव ( निर्मितीचा आदिम ध्वनी ) मी आहे.’

आपले वास्तविक नाव ॐ आहे. जे नाव घेऊन आपण वावरतो ते आपल्याला आपल्या पालकांनी दिलेले आहे, आणि ते केवळ या जीवनकालाकरिता मर्यादित आहे.

कोणचे जरी छान नाव असले तरीसुद्धा लोक मिंटू, पिंटू किंवा जिमी या लाडिक नावानेच हाक मारतात. मुलीचे नाव असेल पद्मा ( याचा अर्थ कमळ आहे) जे फारच छान नाव आहे, परंतु तरीसुद्धा लोक तिला पम्मी या लाडिक नावानेच बोलावतील. (हशा).

तर आजकाल लोक एकमेकांना काहीही नावाने बोलावतात. हे नाव आपला खरा स्वभाव नाही. आपला वास्तविक स्वभाव आहे ॐ. ते आपले जन्माला येण्याधीचे नाव होते आणि ते आपण मृत्यू पावल्यानंतरसुद्धा आपले नाव असणार आहे.  एक दिवशी आपण सगळे ॐ मध्ये विलीन पावणार आहोत.

शीख धर्मामध्ये गुरुदेव नानक यांची एक प्रार्थना आहे, ‘इक ॐकार (देव एक आहे), सतनाम (त्याचे नाव हे सत्य आहे), कर्ता-पुरख (तो सृष्टीकर्ता आहे)’.

याचा अर्थ, ॐ हे केवळ एकुलते एक सत्य आहे आणि ते समस्त सृष्टीचे कारण आहे. 

परंतु काही अज्ञानी लोक असतात जे म्हणतात, ‘ आम्ही ॐ मध्ये विश्वास ठेवीत नाही, आम्ही ॐकार यावर विश्वास ठेवतो.’ या दोन्हीमध्ये काय फरक आहे? काहीही फरक नाही. 

‘ॐ हे सर्व वेदांचे सार आहे आणि तेच मी आहे’ ,असे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगत आहे. 

ॐ च्या शिवाय ज्ञानामध्ये काहीही प्रगती होऊ शकत नाही. वेदांचे पठाण हे ॐ ने सुरु होते, आणि ॐ ने संपते. वेद हे ॐ चे विस्तारण आहे. समस्त निर्मितीचे सार हे ॐ आहे.

ध्वनी हा अवकाशाबरोबर निगडीत गुण आहे. म्हणून याच श्लोकात भगवान कृष्ण म्हणतो, ‘उच्चारलेला आणि व्यक्त केलेला सर्व प्रकारचा अवकाशातील ध्वनी मी आहे. माणसाला मिळालेले सामर्थ्य मी आहे. ज्याप्रमाणे स्त्रीला तिच्या नाजुकपणा आणि ममत्व याने ओळखतात त्याप्रमाणे तू मला पुरुषातील निश्चयीपणाने (शक्ती, कौशल्य किंवा यत्न या लक्षणांनी) जाण’.

पुढच्या श्लोकात, तो म्हणतो: ‘पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्र्चास्मि विभावसौ I जीवनं सर्वभूतेषु तपश्र्चास्मि तपस्विषु II’ (७.९) 

गंध हा गुण पृथ्वी या घटकाबरोबर निगडीत आहे. 

आपल्याला वाटते की आपल्याला सुवासाचा अनुभव वायू घटकामुळे येतो, परंतु तसे नाही. ज्याप्रमाणे साखरेचा गुण गोडपणा आहे, पाण्याचा गुण ओलेपणा आहे, अग्नीचा गुण उष्णता आहे, त्याचप्रमाणे सुवास हा गुण पृथ्वी घटकाचा आहे.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी पृथ्वी घटकाचा सुवास आहे; मी अग्नीची उष्णता आहे, आणि प्रत्येक जीवातील जीवावेग मी आहे. एखादा माणूस चांगला असू दे वा वाईट, सिंह असू दे नाहीतर मांजर, उंदीर किंवा गाढव, जिथे कुठे तुम्हाला जीवन दिसते, त्याचे मूळ कारण मी आहे. हे सर्व मी आहे. ज्ञानी ॠषीमुनींचे तप (तपश्चर्या) मी आहे. यति आणि ज्ञानी ॠषी यांच्यातील अनुकंपा आणि इच्छाशक्ती मी आहे.’