मानवी अस्तित्वाचे पाच कोष (वर्ल्ड कल्चर फोरम)

18
2013
May
हॅन्गझु, चीन

पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे यावर आपण सगळे सहमत आहोत, परंतु हे शिक्षण ग्रामीण भागात, गावकऱ्यांपर्यंत, आणि शहरांमध्येसुद्धा पोहोचणे जरुरी आहे. आपल्याला लोकांना शिकवायला पाहिजे, जागरुकता आणली पाहिजे.

आज हव्यास आपल्या समाजाला पोखरतो आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, कुटुंबे उध्वस्त होत आहेत, आपण ज्या मानवतेला पुष्टी देतो ते नष्ट होत आहे. लोभाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला तद्भावीतेची भावना निर्माण करायला हवी. 

या संमेलनामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी अध्यात्मिक मुल्ये, मानवतावाद, आणि मानवी मुल्ये यावर भाष्य केले त्याचा मला फार आनंद होत आहे. दहा वर्षापूर्वी, वीस वर्षापूर्वी याला मनाई होती. पर्यावरणवादी किंवा वैज्ञानिक परिषदेमध्ये प्रेमाबद्दल केवळ बोलणेसुद्धा असमर्पक मानले जायचे. आज आपल्या लक्षात येत आहे की आपल्याला समाजाला आनंदी करणे जरुरी आहे. केवळ उच्चतम स्थूल एत्तदेशीय उत्पादन (GDP) असणे पुरेसे नाही, आपल्याला उच्चतम स्थूल एत्तदेशीय आनंद (GDH-Gross Domestic Happiness) याची गरज आहे.

 आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला ती जागरुकता निर्माण करायला पाहिजे. भगवद्गीतेनुसार, भारताच्या पवित्र धर्मग्रंथानुसार,असे म्हणतात की निसर्ग हे आठ गोष्टीने किंवा विश्व हे आठ वस्तूने बनलेले आहे : पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश (अवकाश), मन, बुद्धी आणि चैतन्य.

आपण पृथ्वीची सुरक्षा केली पाहिजे. खाणींच्या नावाखाली आपण इतके सुरुंग लावता कामा नये. आपण आपल्या लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे, आणि ग्राहकवाद तेव्हाच नियंत्रणात येईल जेव्हा मानवतावाद फुलून येईल. जेव्हा तद्भावितेची भावना आपल्याला असेल तेव्हा या ग्रहाची काळजी घेणे अधिकाधिक महत्वाचे होईल. पृथ्वी हा जीव आहे. ती जीवंत आहे कारण ती अनेक जीवंत प्राण्यांना निवारा देते आहे.

संपूर्ण जगभरातील प्राचीन लोक पृथ्वी, नदी, पर्वत आणि वायू यांचा सन्मान करायचे. आपल्याला ही प्राचीन मुल्ये टिकवून ठेवायला पाहिजे आणि सर्वांच्या विकास आणि उत्कर्ष यासाठी आधुनिक दृष्टी ठेवली पाहिजे.

तणाव-रहित मन असणे हे जास्त महत्वाचे आहे. एक आहे पर्यावरणाचे प्रदूषण आपण निर्माण करतो, दुसरे आहे भावनिक प्रदूषण. जर कोणी उदास असेल तर तो त्याच्या खिन्नतेच्या लहरी त्याच्या सभोवती पसरवतो. संपूर्ण जग इतर काही नसून कंपने आहे, सर्व काही लहरी आहेत.

जगाकडे लहरी म्हणून पाहणे हा तो दृष्टीकोन आहे जो लोकांना आनंदात पाहण्याकरिता आपण वापरणे जरुरी आहे.

जगात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालेल आहे कारण आपण प्रेम, तद्भाविता, आणि अनुकंपा या शब्दांकडे लक्ष देत नाही आहोते. खिन्न होण्याचे एक अगदी सोप्पे सूत्र आहे: बसा आणि केवळ स्वतःबद्दल, ‘माझे काय? माझे काय? माझे काय?’ असे म्हणत विचार करीत राहा. हा उदास होण्याचा खात्रीचा मार्ग आहे.

जेव्हा आपण या ग्रहाची काळजी घेतो, जेव्हा आपण आपल्या सभोवतीच्या माणसांची काळजी घेतो, जेव्हा आपण आपला मदतीचा हात पुढे करतो आणि प्रत्येक गरजूसाठी उपलब्ध राहतो, तेव्हा उदासी आपल्या जीवनातून गायब होऊन जाते. असे शिक्षण किंवा अशी जागरुकता ही आजची निकडीची गरज बनली आहे कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार येत्या दशकात आत्महत्या हा सर्वात मोठा मारेकरी ठरणार आहे. 

कर्करोग हा आणखी एक आजार आहे. हा सर्व रोगांना तेव्हाच हाताळता येईल जेव्हा आपण आपल्या पृथ्वी ग्रहाची काळजी घेऊ, जेव्हा आपण आपल्या जलसंपदेची काळजी घेऊ, जेव्हा आपण आपल्या परिसरातील, पर्यावरणातील कंपनांची काळजी घेऊ. सगळीकडे इतके अनेक उंच टॉवर्स असल्यामुळे विद्युतचुंबकीय किरणोत्सर्ग हा पहिल्यापेक्षा अधिक जास्त आहे, आणि त्यामुळे अनेक शहरी भागांमध्ये आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

भारतामध्ये ‘झाड कापण्याआधी तुम्ही त्या झाडाकरून परवानगी घेणे जरुरी आहे.’ अशी एक प्राचीन म्हण आहे. झाड हे सजीव आहे हे या मागचे कारण आहे. तुम्ही त्या झाडाची पाच कलमे लावून मोठी करणार असे त्या झाडाला वाचन द्यावे लागते. तर आता मला झाड कापण्याची परवानगी द्या.

ही परंपरा फार काळापासून अस्तित्वात आहे. मला खात्री आहे की ही चीन (वेदांत ते त्सु बौद्ध धर्मापर्यंत चीन आणि भारत यांच्या समान परंपरा आहे.) इथेसुद्धा होती.

तर, संपूर्ण विश्व हे एक व्यक्तिगत भाग आहे, आणि आपण या विश्वाचा एक अविभाज्य घटक आहोत.

मानवी अस्तित्वाचे पाच कोष आहेत: पर्यावरण हा आपला एक कोष आहे, भौतिक शरीर हे आपला दुसरा भाग आहे, प्राण किंवा उर्जा तिसरा भाग आहे (चीनच्या परीभाषेनुसार चि; जेव्हा प्राण किंवा उर्जा जास्त असते तेव्हा उत्साह, सृजन असते. जेव्हा उर्जेची पातळी खालावते तेव्हाच खिन्नता, आत्महत्येचे विचार आणि निसर्ग व स्वतःला दुखावण्याचे विचार मनात घोळू लागतात.)

म्हणून हा प्राण असलेला भाग विकसित करणे अत्यावश्यक आहे. चौथा कोष आहे मन, जे महत्वाची भूमिका करते. पाचवे आहे चैतन्य, जे पर्यावरणाचे संरक्षण आणि मानव जातीचे जतन करणे यात महत्वाची भूमिका निभावते. 

थोडक्यात सांगायचे तर मी म्हणेन प्रदूषण-मुक्त पर्यावरण, आजार-मुक्त शरीर, गोंधळ-मुक्त मन, निरोधन-मुक्त बुद्धी, आघात-मुक्त स्मृती, आणि शोक-मुक्त आत्मा हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.