असुयेवर विजय कसा मिळवाल

27
2013
Nov
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव असुयेवर कसा विजय मिळवावा?

श्री श्री: फक्त हे जाणून घ्या की तुम्ही एक दिवस मरणार आहात आणि दुसरा माणूस सुद्धा एक दिवस मरणार आहे. ज्या माणसाचा आपण द्वेष करता तो आणि तुम्ही दोघेही एक दिवस संपणार आहात. द्वेष करण्यासारखे त्यात काय आहे.

एक दिवस मुल्ला नसरुद्द्दिन आणि त्याचा मित्र भर उन्हाळ्यात दुपारी एका झाडाखाली विश्रांती घेत होते. विश्रांतीनंतर मुल्ला उठला आणि म्हणाला “ओह! मी मस्त स्वप्न पहिले. एक सुंदर मुलगी माझ्या प्रेमात पडली” त्याच्या डोळ्यात अजूनही चमक होती. तो इतका आनंदी दिसत होता, त्यावर त्याचा मित्र म्हणाला “मला तुझा इतका द्वेष वाटतो आहे, या सुंदर मुली माझ्या स्वप्नात का येत नाहीत? मला फक्त माझ्या बायकोची भीतीदायक स्वप्ने पडतात आणि घाम फुटतो”

मुल्ला म्हणाला “तुला काय वाटते मला माझ्या बायकोच्या आठवणीने घाम फुटत नाही? ते स्वप्न होते. तू सुद्धा तसे स्वप्न का बघत नाहीस? माझ्या स्वप्नाचा द्वेष का करतोस? तुला तुझी स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. ती खरी होवोत किंवा नाही.”

जेंव्हा तुम्ही दुसर्याचा द्वेष करता तेंव्हा आयुष्याकडे खूप संकुचित दृष्टिने पाहता. त्या पलीकडे पहा. त्यामुळेच इच्छाहीन होणे महत्वाचे आहे, त्यामुळे तुमच्यात एक स्थिरता येईल. ही स्थिरता पाहून तुमच्याबद्दल सगळ्यांना हेवा वाटेल.

प्रश्न: या जगा बद्दलची वास्तवता एका कुत्र्याच्या आणि माकडाच्या सुद्धा दृष्टीकोनातून वेगळी आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टीकोन दुसर्यापेक्षा वेगळा असतो. मग खरे सत्य कसे कळेल? सत्य कसे कळेल?

श्री श्री: सत्याचे वेगवेगळे स्तर आहेत. जस जशी आपली चेतना विस्तारते तस तसे आपले ज्ञान सुद्धा वाढते. एका लहान मुलाच्या दृष्टीने जग वेगळे असते, जस जसे आपण मोठे होतो तस तसे सगळे बदलत जाते. त्यामुळे ज्ञान हे चेतना आहे. जस जशी चेतना विस्तारते तस तसे ज्ञान विस्तारते.

प्रश्न: गुरुदेव, शंकराचार्यांना आज सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्या सारख्या पूज्य वक्तीला या कटू अनुभवातून का जावे लागले? कोणताही राजकारणी किंवा माध्यमे या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसत नाहीत.

श्री श्री: त्यांनी दिलगिरी वक्त केली पाहिजे. राजकारणी आणि माध्यमे यांनी क्षमा मागितली पाहिजे, त्यांनी हे एका व्यक्तीच्या बाबतीत नव्हे तर एका संस्था बाबतीत केले आहे, अशी संस्था जी दोन हजार वर्ष जुनी आहे. ‘सनातन धर्माचा’ प्रतिनिधी जो या संस्थाचा प्रमुख होता. अनेक लोक अनेक वर्ष यामुळे बेचैन झाले. ९ वर्ष या कटू अनुभवातून जाणे हा एख्याद्या संता साठी मोठा काळ आहे. पण त्यांच्या साठी हे एक तप होते. त्यांच्या साठी याचा फार फरक पडत नाही. एखाद्या संतासाठी प्रशंसा किंवा दुषणे याने काही फरक पडत नाही. पण व्यवस्थेसाठी, लोकांच्या विश्वासासाठी हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.

काही लोक बदनामी करून लोकांचा विश्वास तोडू पाहत आहेत. लोकांचा जर धर्मावर, अध्यात्मावर विश्वास असेल तर ते व्यसनाधीन होणार नाहीत, हातात बंदुका घेणार नाहीत. लोक भक्ती मार्गावर असतील तर व्यसने करणार नाहीत. या लोकांना आपली उत्पादने विकायची आहेत त्यामुळे ते लोकांना धर्म आणि अध्यात्म या पासून तोडू पाहत आहेत. यात काही नवीन नाही, पूर्वीपासून हे चालत आले आहे. त्यामुळे जे लोक झुरळ किंवा डीस सुद्धा मारणार नाहीत अशा लोकांवर असे गंभीर आरोप करतात. ९ वर्षानंतर हे सिद्ध झाले की सर्व ३२ जण निर्दोष आहेत. न्याय करायला उशीर लागता कामा नये, हे ६ महिन्यात वाहयला पाहिजे होते. पण याला ९ वर्ष्या इतका मोठा काळ लागला. आपला सत्य वर नेहेमीच विश्वास असला पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, विष्णूच्या १० अवतारापैकी कोणता सगळ्यात सुंदर आहे? आणि कृपया आम्हाला “कल्की” अवताराबद्दल सांगा.

श्री श्री: सुंदरता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला सुंदर वाटते. सुंदरता कुठे नाही? अगदी काट्यात सुद्धा सुंदरता आहे, पानात सुंदरता आहे. जर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलला तर तुम्हाला सगळीकडे सुंदरता दिसेल. प्रत्येक अवतारात काही चांगले आणि काही वाईट गुण आहेत.