ईश्वर तुम्हाला दु:ख देणे अशक्य आहे

17
2013
Dec
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव, जर देवानेच दुखावले तर आम्ही कुठे जायचं ?

श्री श्री: कुठेही जायचं नाही. देवाने तुम्हाला दुखावणे अशक्य आहे. लहानपणी शाळेत असताना आम्हाला कानडी मधला एक श्लोक शिकवला जायचा. त्याचा अर्थ असा आहे की, ऊस जितका जास्त पिळावा तितका त्यातून जास्तच गोड रस बाहेर पडतो. हिर्यालातुम्ही जितके जास्त तासाल तितका तो जास्तच चमकतो, सोन्यावर जितके जास्त हातोड्याचे घाव घालावे, आगीत घालावे तितके ते जास्तच चमकते. चंदन तुम्ही जितके जास्त घासाल तितका त्याचा सुगंध अधिकच दरवळतो.

निसर्ग तुम्हाला अनेकपरीक्षांमधून दिव्यांमधून जायला लावतो आणि तुम्ही त्यातून झळाळत बाहेर पडता. एक गोष्ट लक्षात ठेवा निसर्ग तुमच्यावारासा भार कधीच टाकणार नाही जो तुम्ही पेलू शकणार नाही. देव आधी शेपटीचे माप घेतो आणि मग ती प्राण्याला लावतो.म्हणजे त्याला शेपटी सहज हलवता येईल. विचार करा जर उंदाराला हत्तीची शेपटी असती तर ती त्याला उचलताही आली नसती.निसर्ग खूप हुशार आहे. तो तुमच्या सामोराशीच समस्या उभी करती, जी तुम्ही हाताळू शकता.

प्रश्न: गुरुदेव, माझे एक खोल दडवून ठेवलेले गुपित आहे, ज्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. जर मी त्याबद्दल बोललो तर मी सगळे काही आणि सगळ्यांना गमावून बसेन. मी एका भौतिक जगात रहातो, मी पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाही आणि मला अपयशाचे भय वाटते. मी काय करावे ?

श्री श्री: तुम्हाला परीकाम काय होणार ते दिसते आहे, मग तुम्ही अशी गोष्ट कां करता ज्याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाहिये.

‘कन्फेशन’ (पापाची कबुली) नावाची एक गोष्ट असते. आता, तुम्ही कोणत्याही एका टॉम, डिक किंवा हॅरी समोर जाऊन पापाची कबुली देऊ शकणार नाही. पण एखाद्या समजदार माणसा समोर पापाची कबुली देऊ शकता जो गोपनीयता पाळू शकेल. चर्च मध्येही ती पाळली जाते. चर्च मध्ये एक खोली असते तिथे जाऊन तुम्ही पापाची कबुली देऊ शकता. तिथे त्या पाद्र्यालाही दिसत नसते की त्यांच्याशी कोण बोलत आहे.तुम्ही कबुली दिली की तिथे असलेल्या एका छोट्या खिडकीतून ते तुम्हाला काही प्रसाद देतात ज्याने तुम्हाला छान वाटते.तुम्ही इथे आहात याचे हे ही एक कारण आहे, रिक्त आणि पोकळ होण्यासाठी. तुम्ही तुमच्या चिंता, काळज्या लिहून टोपलीत टाका आणि मोकळे व्हा.

भूतकाळात जी काही असुखकारक घटना घडली आहे, ती झाली, होऊन गेली. तुम्ही त्याला पकडून ठेऊन तुमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ खराब कां करताय ? म्हणूनच लिहा आणि टाकून द्या !

तुम्हाला जर असे वाटत असे की बोलून टाकल्याने फायदा होईल किंवा न बोलल्याने निरागस लोकांना त्रास होईल तर मग त्यांच्या बद्दलच्या जिव्हाळ्याने बोलून टाका म्हणजे ते अडकणार नाहीत. पण बोलणे कुणासाठीच चांगले नसेल तर मग तो विषय काढून चर्चा करण्यात काही अर्थ नाही. एखाद्या शहाण्या माणसाला सांगा किंवा लिहा आणि देवाला अर्पण करून टाका आणि मुक्त व्हा.

प्रश्न: श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक जास्त गरीब, असे कां ? गरीब लोक चौरस आहार मिळण्यासाठी धडपडत असतात, देव त्यांची काळजी कशी घेतो ?

श्री श्री: गरीब लोकांबद्दलचे माझे निरीक्षण असे आहे की देवाने त्यांना शिक्षा केळी आहे म्हणून ते गरीब आहेत असे नाही तर त्याचे कारण आहे दारू , तिच्यामुळेच लोक गरीब राहिले आहेत. एखादा कामगार जवळ जवळ, शहरात ऑफिसमध्ये सर्वसाधारण काम करणाऱ्या माणसाइतकेच कमवत असतो. पण त्याच्या कमाईतले दोन त्रीतीयांश तो दारूवर घालवतो त्यामुळे तो गरीब राहतो.

गरिबीचे दुसरे कारण आहे आळशीपणा. आजही तुम्ही एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी बघीतली तर असे दिसेल की त्यांनी नीट कष्ट घेतले तर ते वर येऊ शकतात, खरोखरच वर येऊ शकतात. पिरॅमिडच्या पायथ्यापासून वरपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे दिसतात. तुमच्यात करून दाखवण्याचा जोश, इच्छा आणि उत्साह असायला हवा. बरेचदा लोकांमध्ये याचाच अभाव असतो.

आम्ही जेव्हा पहिल्यांदा ही जागा बघायला इथे बंगलोरमध्ये आलो होतो, तेव्हा हा आश्रम म्हणजे एक ओसाड जागा होती. ही जागा कुणालाही नको होती. इथे काहीही उगवत नव्हते, ना गवत, ना झाडं. या ६० एकर जागेत फक्त एकच झाड होते. कल्पना करा ! इथे काहीही नव्हते. फक्त पाणी उपलब्ध नसलेली खडकाळ, पडीक जागा होती. त्याकाळी फिलीप, किरण, विनोद मेनन आणि आणखी बऱ्याच लोकांनी ही सगळी झाडे लावली. सगळ्या आश्रमात लोक गवताच्या झोपड्यांमध्ये रहात होते. मला आठवते आहे ते बरोबर असेल तर, सरपंचाच्या मालकीचे एकच घर कौलारू छप्पर असलेले असे शेजारच्या खेड्यात होते. बाकीची सगळी घरं गवताचे छप्पर असलेली होती जी पावसाळ्यात गळायची आणि मोठा वारा सुटला तर उडून जायची. अशी परिस्थिती होती. फक्त इथेच नाही तर आसपास सगळीकडेच.

इतकेच नाही तर या कनकपुरा रोडवर फक्त दोन बसेस यायच्या. एक सकाळी आणि एक संध्याकाळी. आणि खाली असलेल्या नदीतली वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक्स असायच्या. (सुदर्शन क्रियेच्या टेप मध्येही तो आवाज ऐकू यायचा ! ) त्या काळी जयानगर मधून आश्रमात यायला दोन बसेस घ्याव्या लागायच्या.

आम्ही या जागी आलो तेव्हा हे पूर्णपणे एक खेडेगावच होते. आम्ही शेजारच्या २० खेड्यातून मुले गोळा केली आणि त्यांच्या साठी शाळा सुरु केली. आसपासचे लोक खूप गरीब होते.आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आमच्याकडेही पैसें कमीच होते. आश्रमासाठी आम्ही बँकेकडून बरेचदा ओव्हर ड्राफ्ट (आगाऊ रक्कम) घ्यायचो. आणि दोन तीन महिन्यांनी परत करायचो. 

नव्वदच्या शतकात मी या भागातल्या सगळ्या गरीब आणि बेरोजगार तरुणांना बोलावलं. सगळे २० ते २५ वर्षे या वयोगटातले होते. मी त्यांना सांगितले की त्यांनी काही नोकरी करावी असे मला वाटते. ते सगळे त्यांच्या कुटुंबियांवर एक ओझे बनून राहिले होते. काहीही करायचे नाहीत.संपूर्ण दिवस बसून रहायचे, रेडिओ ऐकायचे, पत्ते किंवा क्रिकेट खेळायचे आणि संध्याकाळी जाऊन दारू प्यायचे. आम्ही लहान मुलांसाठी शाळा काढली पण तरुण मात्र बेकार होते. ते दहावी पास होते आणि त्यांना शेतावर जाऊन काम करायचे नव्हते, शेतीतले कसलेच काम करायचे नव्हते. त्यांना असे वाटत होते की जे अजिबात शिकलेले नाहीत किंवा चौथ पर्यंत शिकले आहेत त्यांनी शेती करायची. हे शेती कां करतील ? त्यांना शेतात काम करायचे नव्हते.

मी कर्नाटक सरकारच्या लघु उद्योग विभागाच्या अधीक्षकांना भेटलो आणि त्यांच्याकडे असलेले सगळे प्रकल्प या मुलांना दाखवायला सांगितले. त्यांनी काहीतरी करावे असे मला वाटत होते. ( आमचा देखील गवताचे छप्पर असलेला एक हॉल होता जिथे आम्ही अष्टावक्र गीतेवर प्रवचने दिली.त्याचं जागी मी या मुलांना आणि त्यां अधीक्षकांना बोलावले होते.)

ते अधीक्षक अगदी उत्साहाने आले. त्यांनी खूप कष्ट घेऊन त्यांनी तीन ते चार तासांत जवळ जवळ २२५ प्रकल्प समजावून सांगितले. आणि त्या मुलांकडे दर वेळी हे जमणार नाही, ते शक्य नाही असे सांगायला कारणे तयार होती ! अधीक्षकांनी प्रत्येक प्रकल्प समजावून सांगितला की ते म्हणायचे, “गुरुदेव, हे शक्य नाही ! ” शेवटी मी त्यांना विचारले की “कशाने कां होईल ?” ते म्हणाले, “आम्हाला पोलिसमध्ये नोकरी मिळवून द्या किंवा आम्हाला बस कंडक्टर करा.”

पोलिसात किंवा कंडक्टर म्हणून किती जणांना नोकरी मिळू शकते ? कुणालाही व्यावसायिक व्हायचे नाही. कुणालाही कष्ट करायचे नाहीत. या लोकांना गरीबच रहायचं आहे , मग तुम्ही काय करू शकता?

त्यां वेळी मग आम्ही युवा नेतृत्व शिबिर सुरु केले. आम्ही त्या सगळ्यांना तीन महिन्यांचे कठीण असे प्रशिक्षण दिले. त्यांचा आळस निघून जावा म्हणून सकळच्या वेळी त्यांना चांगला व्यायाम करायला लावला. जेव्हा त्यांनी क्रिया आणि ध्यान करायला सुरवात केळी तेव्हा आम्ही त्यांना तीन महिन्यांसाठी नोकरी दिली. पण त्यांना हे सांगितले की तुम्हाला काहीतरी करावे लागेल. आज त्यांच्यापैकी बरेच जण व्यावसायिक झाले आहेत.

आज तुम्हाला आश्रमात कुठे गवताचे छप्पर दिसते ? नाही ! लोकांनी घरे बांधली. फक्त इथेच नाही तर आसपासची खेडीही आता संपन्न झाली. आर्थिक सुबत्ता आली. आता तुम्हाला या भागातून कामगार मिळत नाहीत. ते दुसरीकडून येतात.

असाच एक मुलगा होता. तो आमचा रखवालदार होता. आज त्याच्या हाताखाली ४०० लोक कामा करतात. या मुलाची कहाणी खूप रंजक आहे. लहान असताना त्याच्या शाळेत तो खूपच त्रासदायक होता. तो सगळ्या मुलांशी भांडायचा त्यामुळे कोणतीही शाळा त्याला प्रवेश द्यायला तयार नव्हती. त्याचे वडील त्याच्यापुढे थकून,कंटाळून गेले होते. त्यामुळे ते त्याला इथे सोडून गेले. ते आम्हाला म्हणाले, यांच तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांना तो घरी नको होता कारण तो सगळ्यांना मारायचा, सगळ्याची तोडफोड करायचा, सगळीकडे नुसता त्रास. मग तो नुसता शक्ती कुटीर च्या बाहेर बसून रहायचा आणि लोकांना माझ्या खोलीत येण्यापासून रोखायचा. त्या काळी आमच्याकडे दुसरा कुणी रखवालदार नव्हता, तोच एकटा होता. तो सगळ्यांना रोखायचा. अगदी माझ्या आईला सुद्धा ! बरेचदा तिला माझ्यासाठी जेवण घेऊन आत येण्यासाठी त्याच्याशी झगडा करावा लागायचा. केवळ इथे रहाण्याने त्याच्यात केवढा फरक पडला बघा ! मग तो परत गेला आणि त्याचं लग्न झालं. त्याने एक मोठा धंदा सुरु केला. तो फार शिकलेला नव्हता, पण आज त्याच्याकडे जवळजवळ ३०० ते ४०० माणसं काम करताहेत. आणखी बऱ्याच लोकांची हीच कहाणी आहे. आणखी बरीच उदाहरणं आहेत, एकच नाही. आळस मात्र जायला हवा.

मंत्रीपदाचा उमेदवार असलेल्या एकाची चहाची टपरी होती. तो अगदी गरीब परिस्थितीतून आला होता. आज तो एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे रामनाथ गोएंका यांचे आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्र सुरु केले आणि त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवरही उघडपणे लिहीले. ते फक्त दुसरीपर्यंत शिकले आहेत. ते मुंबईच्या रस्त्यांवर हातगाडीवर भाजी विकायचे. ते गरिबीतून वर आलेले असले तरी आज त्यांनी साम्राज्य उभे केले आहे.

आध्यात्मिक जोश, आत्मविश्वास आणि गरिबीतून वर येण्याची प्रबळ इच्छाशक्ती हे आपल्याकडे असायला हवे. फक्त गरिबांना जेवण आणि इतर गोष्टी देऊन काही उपयोग होणार नाही.

इथियोपिया हे आणखी एक उदाहरण आहे. तिथे सात वर्षे दुष्काळ होता. इतकी वर्षे दुष्काळ असल्यामुळे तिथले लोक काम करेनासे झाले. आठव्या वर्षी पाउस पडला तरी लोक काही काम करेनात ! कारण त्यांना इतर देशांकडून मदत मिळण्याची सवयच झाली होती.

दुसऱ्या कुणीतरी मदत, अन्न आणि इतर गोष्टी द्याव्या असेच त्यांना वाटू लागले. आजदेखील इथियोपियामध्ये इतकी मोठी जमीन आहे पण चीनी आणि भारतीय लोक तिथल्या जमिनी विकत घेऊन त्या कसत आहेत. कारण तिथल्या लोकांमधला काही करण्याचा जोश राहिलेलाच नाही.

इथियोपिया मध्ये आणखी एक विचित्र गोष्ट आहे. कुठल्यातरी धार्मिक श्रद्धेमुळे वर्षातले सहा महिने इथियोपिया मधले लोक दूध किंवा कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. त्यामुळे मग आता कुणालाही दुग्ध व्यवसाय करायचा नाही कारण सहा महिने त्यांच्या मालाची विक्रीच होणार नाही.

कदाचित् पूर्वीचा कालीकुनितरी म्हटले असेल की थंडीच्या दिवसात थंड दूध पिऊ नये किंवा दुसरे काहीतरी ठोस कारण असेल.काही असो एक धार्मिक श्रद्धा म्हणून सहा महिने दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न करण्यामुळे त्या संपूर्ण व्यवसायावरच दुष्परिणाम होऊ शकतो. दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी मनाची एक विशिष्ठ धारणा असावी लागते. आणि मी तुम्हाला सांगतो हे आतूनच वाटायला हवे कुणीतरी कीव करून काही केल्याने काही होणार नाही. लोक म्हणतात, “मी बिच्चारा, इतरांकडे पैसें आहेत. माझ्याकडे नाहीत !”

तुमच्याकडे कां नाहीत ? कारण तुम्ही त्याच्यासाठी कष्ट घेतलेले नाहीत.

अर्थात याला दुसरी बाजूही आहे जिथे लोकांची पिळवणूक होते. हेही योग्य नाही.

प्रश्न: गुरुदेव,मी शिजवलेल्या भाताला हात लावला की माझे सासूसासरे मला हात धुवायला लावतात. माझी पाली चालू असताना मला देवघरात, स्वयंपाकघरात जाऊ देत नाहीत, कपड्यांना हात लाऊ देत नाहीत. अशा परंपरा कां पाळतात ? यामागे काही शास्त्रीय कारण आहे कां ?

श्री श्री: कोणताही प्रथा सिद्ध करायला किंवा बाद ठरवायला वैज्ञानिक प्रयोग करावे लागतात. प्रयोग केल्या शिवाय ती परंपरा चूक किंवा बरोबर ते ठरवता येत नाही. उदाहरणार्थ पारंपारिक घरामध्ये शौचास जाण्यापूर्वी पुरुष त्यांचे जानवे कानावर अडकवत असत. कधी कधी हे विचित्र वाटायचे. कारण असे सांगितले जायचे की जानवे खूप लांब असते आणि कशाततरी अडकू नये म्हणून कानावार अडकवून ठेवायचे. पण न्यूयार्क मधील एका वैज्ञानिकाने एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला ज्यात म्हटले होते की कानाचा मागचा भाग आणि कानाची पाळी ही मल विसर्जनाशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा कान पिळले जातात तेव्हा रक्तदाब खाली येतो आणि मल विसर्जना सुलभ होते. तर, या प्रथेचा परिणाम अजूनही आहे. त्यामुळे ती अंधश्रद्धा आहे असे म्हणता येणार नाही. जरी एका स्तरावर ती अंधश्रद्धा होती तर दुसऱ्या स्तरावर त्या प्रथेला शास्त्रीय कारण होते.

त्याचप्रमाणे स्वयंपाकात हळद वापरणे किंवा किंवा भांडी धुणे ही एक अंधश्रद्धा आहे असे लोकांना वाटत होते. बर्याचशा पदार्थांमध्ये पदार्थ शिजवून झाल्यावर त्याच्यावर पान ठेवायचे. ऐंशीच्या दशकात हळदीवर बरिच टीका झाली की त्याने फक्त रंग येतो, त्यात काही फारसे पोषण मूल्य नाही, त्यात पावित्र्य वागैरे काही नाही, त्याने जेवणात काही पोषक अशी भर पडत नाही. नव्वदच्या दशकात मात्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले की हळद ही सर्वात चांगली अँटींऑक्सिडेंट आहे.

आयुर्वेदिक वैद्यांनी सांगितले आहे की हळद ही ‘वयस्थापन’ म्हणून काम करते. म्हणजे शरीराचे वार्धक्य रोखते. पण त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. एम.बी.बी.एस. डॉक्टर्स म्हणायचे की थोतांड आहे. नंतर शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की हळद तब्येतीसाठी खूप चांगली आहे. ती कॅन्सरला रोखते. तर कोणतीही प्रथा चुकीची आहे असे सिध्द केल्याशिवाय तुम्ही ती बाद करू शकत नाही.

मी परत तेच सांगतो आहे की मनाची तयारी ठेवा. कधी ते बरोबर ठरवले जाईल आणि नंतर चूक. संपूर्ण देशात अशी एक लाट आली होती की शेंगदाणा तेल खूप वाईट आहे. दक्षिण भारतात फक्त शेंगदाणा तेल आणि तिळाचे तेल वापरत असत. पाम तेल विकणाऱ्या एका कंपनीने खोबरेल तेल वाईट आहे, बाकीची सगळी तेलं वाईट आहेत असा प्रचार केला. अचानक सगळे पाम तेल वापरू लागले.

नक़्विन संशोधनाने सिध्द केले आहे की शेंगदाणा तेल अतिशय चांगले आहे, ते सर्वात चांगले आहे. ते शेंगदाणा तेलाची स्तुतीसुमने उधळत असतात. खरे तर इथे शेकडो, हजारो वर्षे शेंगदाणा तेल वापरले जात आहे. तामिळनाडू मध्ये तिळाच्या तेलाला ‘नल्ला एनाई’ म्हणतात. म्हणजे ‘चांगले तेल’. आपल्या शरीरासाठी ते खूपच चांगले आहे.

तेल बाजारात मलेशियाहून पाम तेल भारतात आणायचे होते त्यामुळे काही वैज्ञानिकांनी हा निष्कर्ष काढला. एका कंपनीने हा निष्कर्ष काढला होता आणि त्यामुळे लोकांचे चुकीचे मत झाले. त्यामुळे संशोधन हे सच्चे असायला हवे. आणि पुढच्या संशोधनासाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी. भविष्यात आणखी एखादे संशोधन झाले आणि त्यात सिध्द झाले की हे चूक आहे तरमग तेच पकडून ठेवता कामा नये. नवीन स्वीकारायची तयारी हवी.

प्राची अशा आयुर्वेद पद्धतीची खासियत ही आहे की ती ५,००० वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे परंपरेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याचशा गोष्टी परंपरेच्या नावाखाली केल्या जातात.

उदाहरणार्थ, लोक म्हणतात की लहान बाळाच्या अंगावर गरम खीर चोळावी म्हणजे त्याची चांगली वाढ होईल. किंवा त्याचे पाय पकडून त्याला काही वेळ उलटे हलवावे म्हणजे कदाचित कुठलातरी देव प्रसन्न होईल किंवा असेच काही तरी. या सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी अगदी काही ठिकाणीच होतात. काही खेड्यांमधून धर्माच्या नावाखाली त्या पाळल्या जातात. पण हे मूर्खपणाचे आहे.

मी असे म्हणत नाही की सगळ्या परंपरा पाळाव्यात, त्याच वेळी त्यांना पूर्णपणे उडवूनही लावू नये. सुवर्णमध्य साधावा.

जर एखाद्याकडे कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना सुतक असते किंवा घरात मुल जन्मले सोयर असते. म्हणजे त्यांना दहा दिवस शिवायचे नसते. हे सगळे जवळचे नातेवाईक पाळतात. ते काही साजरे करत नाहीत किंवा कुणाच्याही घरी जात नाहीत. त्यांच्या घरचे अन्न कुणी घेणार किंवा खाणार नाही. याच्या मागचे कारण काय आहे ? कुणी तरी जाते तेव्हा त्यांच्या घरातले इतके द:खात बुडून जातात की त्यांच्या दु:खाच्या लहरी त्यांच्या घरात, त्यांच्या वातावरणात असतात. त्यामुळे ते सर्व नेहमीच्या जबाबदाऱ्यांपासून त्यांना सूट असते, इतकेच. असे नाही की तुम्ही कुणाला स्पर्श केला तर तुम्हाला काही तरी होईल. फक्त दहा दिवसांमध्ये लहरी तशा दु:खात बुडालेल्या असतात इतकेच.

समजा कुणाला दु:ख झाले नसेल ! समजा कुटुंबात कुणी तरी खूप काळ आजारी असेल, ते गेल्यावर कुटुंबातील लोकांना बरे वाटते. ते म्हणतात, “ चला, बरे झाले त्याला, मुक्ती मिळाली, मला त्याच्यासाठीही बरे वातेय आणि माझ्यासाठीही.” मग तिथे नकारात्मक, निराशाजनक, दु:खी लहरी नसतात. कारण त्यांना गेलेल्या व्यक्तीसाठी बरे वाटत असते. प्रत्येकाला एक दिवस जायचेच असते.

त्याचप्रमाणे जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा सगळेजण खूप उत्साहात असतात, आनंदी असतात. त्यावेळी सुद्धा लहरी शांतिमय नसतात. त्यामुळे असे म्हटले जाते की त्यावेळीही त्यांना नेहमीच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून सूट दिली जाते. पण लोक ही गोष्ट इतकी ताणतात की ते तुमच्या बुद्धीला पटत नाही.

जेव्हा स्त्रियांची पाळी सुरु असते तेव्हा त्यांना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे हे फक्त त्यांना नेहमीच्या कामात अडकू नये म्हणून हो प्रथा पाळली जाते. स्त्रियांनी विश्रांती घ्यावी, झोपावे,आराम करावा, वाचावे, काही विणकाम करावे. नाही तर त्या काम करायला लागल्या तर मग खूपच काम करतात.

भात आणि शिजवलेल्या अन्नाचे असे आहे की पूर्वीच्या काळी शिजवलेले अन्न पिष्टमय आणि चिकट असायचे. बरेचदा ते भांड्यातून उतू जायचे. तुम्ही भांड्याला हात लावला आणि तोच हात आणखी कुठे लावला तर सगळेच चिकट होईल. तुम्ही अन्नाला हात लावला तर ते तुमच्या हाताला लागेल, त्यामुळे तुम्ही हात धुतलेले बरे, हेच कारण आहे. आज काळ तुम्ही त्याला हात लावत नाही चमचा वापरता. त्याकाळी स्वच्छता आणि आरोग्य याची खूपच काळजी घेतली जायची. त्यामुळे तुम्ही चिकट खरकट्या गोष्टीला हात लावला की तुम्हाला हात धुवायला लागतात. त्याकाळी फळेही वेगळी ठेवत असत. तरीही या प्रथांवर संशोधन व्हायला हवे.

ज्यू लोकांमध्येही अशाच प्रथा आहेत. जर तुम्ही दुधाला हात लावला तर मांसाला हात लावायचा नाही. त्यांच्यात असे खूप नियम आहेत.

जपानी लोकांच्याही अशा प्रथा आहेत. जुन्या विचारांचे लोक पाहुण्यांसाठी वेगळे कप आणि भांडी ठेवतात. त्यांच्याकडे या पाहुण्यांच्या भांड्यांसाठी वेगळे कपाट असते ज्यात त्यांच्यासाठी असलेली भांडी ठेवली जातात. हे जपानमध्ये बघून मला खूपच आश्चर्य वाटले होते.भारतात देखील आपल्या कपबश्या वेगळ्या ठेवण्याची प्रथा बरेच लोक पाळत असत. जपानमध्ये पारंपारीक घरांमध्ये आणि मॉनेस्टऱीज मध्ये हे प्रामुख्याने दिसते.

याच्यापैकी बऱ्याच सवयींच्या मागे काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी किंवा कारण नाही. अशावेळी त्या पाळणे आपण थांबवायला हवे. काही प्रथा असतील तर त्या चांगल्या आहेत कां हे बघितले पाहिजे किंवा त्या दिशेने काही प्रयोग तरी करून बघितले पाहिजेत. 

प्रश्न: गुरुदेव, नशेच्या आहारी गेलेल्या, स्वत:ला आणि इतरांना सतत त्रास देणाऱ्या माणसाला कसे काय स्वीकारायचे ?

त्याची ओढ , जिगर आणि समर्पण यात अंतर कसे ठेवायचे ?

श्री श्री: त्याला यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते ते करायला पाहिजे.युक्ती,शक्ती आणि प्रीती कसेही करून त्याला यातून बाहेर काढायला हवे. सर्वात उत्तम म्हणजे त्याला सुधारगृहात ठेवणे. कलकत्यात एक सुधारगृह आहे. इतर ठिकाणी सुद्धा अनेक सुधारगृहे आहेत. त्याला अशा ठिकाणी घेऊन जा. त्याला सुदर्शन क्रिया करायला लावा. तो जर क्रिया आणि प्राणायाम शिकला तर खूपच फरक पडतो. बऱ्याच लोकांनी सुदर्शन क्रिया नियमित करायला लागल्यावर नशा आणि दारू सोडली आहे.

प्रश्न: गुरुदेव, आजकाल बरेच लोक कॅन्सरने आजारी आहेत. या आजाराला आला कसा घालायचा ? त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्या रुग्णाने आणि त्याच्या कुटुंबियांनी काय करावे?

श्री श्री: जीवनशैली बदलण्याने फायदा होईल. तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक साधने बंद करा. तुमचे आय फोन, आय पॅड, वाय फाय, हे सगळे झोपताना बंद करा. झोपताना इतके सगळ्या इलेक्ट्रॉनिक लहरी भोवताली असणे चांगले नाही.

बरेचदा तुम्ही अयोग्य गोष्टी खाता. जर तुम्ही नीट ध्यान केले नाही तर शरीराला त्याची किंमत मोजावी लागते. योग्य वेळी, योग्य आहार घ्या. त्रिफळा, च्यवनप्राश घ्या. हे सगळे अँटींऑक्सिडेंट आहेत आणि ते तुमच्या शरीरात जायला हवेत.