सृष्टी देवता आहे

प्रश्न : कोणाला मी समर्पण करावे?
श्री श्री रवी शंकर : परमात्मा कि जो माझ्या आत आहे, त्या परमात्म्याला मी समर्पण करतो.

प्रश्न : पूजा काय आहे?
श्री श्री रवी शंकर : जिचा जन्म पुरातन काळापासून झाला आहे (संपूर्णपणे) तीच पूजा आहे. जेव्हा कृतज्ञता अगदी सदगतीत होतात, जेव्हा कंठ दाटून येतो कृतज्ञतेच्या भावनेने तेव्हा तुम्ही जे काही कर्म करता तिलाच पूजा म्हणतात. जेव्हा आपण सगळे समर्पण करतो - त्या भावना तिलाच पूजा म्हणतात.

प्रश्न : गुरुजी हिंदुत्वाची जी प्रतीके आहेत त्याच्यामागे जे गूढ अर्थ आहेत ते परस्पर विरोध दर्शवितात त्याबाबतीत तुम्ही बोलला होतात. कृपया ज्या करोडो देविदेवता आहेत त्यांच्याबद्दल काही सांगाल का?
श्री श्री रवी शंकर: करोड ,कोटी म्हणजे प्रकार. ३३ करोड म्हणजे ३३ प्रकारची दैवी स्पन्दने आहेत. आपल्या शरीरात सुद्धा ३३ प्रकारची स्पंदने आहेत. ३३ प्रकारचे जीन्स आपल्या शरीरात असतात. एक विशिष्ठ प्रकार आपले डोळे बनवतो ,एक प्रकार आपले नाक बनवतो त्याचबरोबर एक विशिष्ट प्रकार आपले कानाचे पडदे , केस, नखे. हे सगळे प्रत्येक विशिष्ठ प्रकारच्या जीन्स ने बनलेले आहे कि जी ३३ प्रकारची आहेत.
त्याचप्रकारे ३३ प्रकारच्या ईश्वरी शक्ती आहेत. एकच प्रकाश, एकच देव, एकच परमात्मा तरी सुद्धा ३३ प्रकार आहेत. देवांच्या ३३ प्रकारच्या दैवी शक्ती आहेत. इथे करोड म्हणजे संख्या दर्शवित नाही . दैवी शक्तीला कुलाही आकार , रूप नाही, पण आपल्या प्राचीन संतानी सांगितले आहे कि तुम्ही कुठच्याही रूपाने, नावाने भजू ,पुजू शकता. सगळी हजारो नवे हि देवाचीच आहेत. हे खूप गहिरे विज्ञान आणि अंतरज्ञान आहे. हे खूप अदभूत आहत जेव्हा तुम्ही त्याच्या खूप खोलात जाता तेव्हा तुम्हाला त्यातले गम्य कळते. लोक ज्यांनी हे लिहिले, ज्याचा शोध लावला त्यांना खरच आश्चर्यकारक ज्ञान आहे. हे विश्व तसे सोपे अजिबात नाही.खूप गुंतागुंतीचे आहे.आधुनिक भौतिकशास्त्र हि हेच सांगते कि जेवढे तुम्ही खोल जाल तेवढे अधिक पहेलू तुम्हाला दिसतील.हे विश्व खूप वेगळे आहे, हि ईश्वरी शक्ती जी नियम सांभाळते आणि जिने इतके वेगळे विश्व बनवले ती देवता . इंग्रजी नाव डेवीड आणि संस्कृत मध्ये देव + विद , देव म्हणजे दैवी शक्ती आणि विद म्हणजे माहित असणे. डेवीड म्हणजे ज्याला दैवी शक्ती म्हणजे काय ते माहित असते.हि दैवी शक्ती म्हणजे कुठे स्वर्गात नसते ती ह्या जगातच आहे , ह्या विश्वातच आहे, सगळीकडे आहे. आणि ते तुम्हाला जाणवले पाहिजे जेव्हा तुमचे मन शांत असेल, नितळ, प्रसन्न आणि हृदयात स्थिरावले आहे, जेव्हा मन आणि बुद्धी चा एकत्र मिलाप होऊन ते एकजीव होईल तेव्हा तुम्ही हे समजून घेण्याच्या मनस्थितीत असाल कि हि वास्तविकता सूक्ष्म आहे आणि सृष्टी देवता आहे.

प्रश्न : गुरुजी ही जी दैवी शक्ती आहे ती आपल्या थोड्या प्रार्थनेलाच उत्तर देते तर काही प्रार्थना अनुत्तरीतच राहतात असे का?
श्री श्री रवी शंकर : मला खरचं माहित नाही कि काही प्रार्थनांचीच उत्तरे मिळतात आणि काहींची मिळत नाहीत. मला काही कल्पना नाही .पण तेच कदाचित तुमच्यासाठी चांगले असेल. आणि आत्ता जे तुम्हाला हवे आहे त्याबाबतीत तुमचे विचार आणि मन बदलू शकते. जेव्हा तुम्ही खरेदीला जाता - भारतात तरी हे नेहमी घडते , खरेदी करताना दुकानदाराला तुम्ही विचारता कि मी नंतर येऊन हि वस्तू बदलू शकते का, जर मला नाही आवडली तर? मग ते घरी जातात आणि नाही आवडली तर दुसऱ्या दिवशी बदलून घेतात. सर्वात अविश्वासू हे आपले मनच असते कारण तुम्हाला माहित नाही कि आत्ता काय हवे आहे आणि नंतर काय पाहिजे आहे? म्हणून मनाला त्याच्या मूळ उगमस्थानाकडे आणणे महत्त्वाचे आहे. मनाचे केंद्रस्थान हे खूप महत्त्वाचे असते अध्यात्मिक उत्क्रांतीसाठी . हे समजून घ्या कि काय अशाश्वत आहे आणि काय अविनाशी आहे. कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात चिरकाल आनंद आणणार आहे आणि कुठली गोष्ट तात्पुरती अनुकूल वाटून अनंत काळासाठी दुख आणणार आहे. कुठल्या गोष्टीचा परिणाम तात्पुरता अस्वस्थ करणारा आहे परंतु अनंत काळासाठी आनंद आणणारा आहे. आणि त्याचबरोबर कुठल्या गोष्टीच्या कारणामुळे चिरकाल अस्वस्थता राहणार आहे. ह्यालाच विवेक , तार्तम्यता म्हणतात . चातुर्य - आहे हे जाणून घेणे.