तुम्ही जेंव्हा दुसऱ्यांना मदत करता किंवा ज्ञानात राहून काळजी घेता तेंव्हा तुम्ही त्यांच्यासाठी गुरूच असता.

मोनट्रीअल केंद्र, कॅनडा, एप्रिल २१:  




प्रश्न : तुम्ही गुरु आहात हे तुम्हाला कसे कळले? तुम्हाला गुरु होते का? कधी कधी मी असा विचार करतो की मी फक्त माझ्यासाठी गुरु असेन. तुम्ही त्याला काय म्हणाल?

श्री श्री रवि शंकर: तुम्ही स्वतःसाठी सर्जन असू शकत नाही. तुम्ही सर्जन असू शकता पण स्वतःसाठी नाही, बरोबर? तर तुमची आई ही तुमचा पहिला गुरु आहे. आई तुम्हाला शिकवते. नक्कीच, गुरूचा तुमच्याबद्दलचा भाव आणि दृष्टीकोन हा विना अट असतो. कुठलीही अट न ठेवता तुम्ही गुरुची भूमिका पार पडली पाहिजे. तुम्ही इतरांना ज्ञानात राहून मदत केली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. तेंव्हा तुम्ही त्यांच्यासाठी गुरूची भूमिका पार पडत असता.

तुम्ही जर कुणाला ' मला काही नको' या भावनेने मदत केलीत, मला फक्त तुमची प्रगती हवी आहे तेंव्हा तुम्ही त्यांचे गुरु असता. तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला गुरु मानावे असे त्यांचाकडे मागू नका. नाही, एक सच्चा गुरु काहीही मागत नाही, आभार पण नाही.



प्रश्न : मी ऐकले की आर्ट ऑफ लिव्हिंग भारतातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे? आम्ही इथे उत्तर अमेरिकेत भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी काय करू?

श्री श्री रवि शंकर: त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ही परस्थिती कशी हाताळावी? भ्रष्टाचार ३ पातळ्यांवर आहे. १ म्हणजे लोकांमध्ये. लोक भ्रष्टाचाराला जगण्याचा एक भाग म्हणून स्वीकारतात. दुसरे म्हणजे नोकरशाही; आणि तिसरे म्हणजे राजकारणी लोक. प्रत्येक स्तरावर चांगले लोक आहेत.आणि तसे चांगले नसणारे लोक पण आहेत. आपण त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स मध्ये आणले पाहिजे आणि प्राणायामाच्या पद्धती शिकवल्या पाहिजेत. ते सुधारतील.



प्रश्न : प्रिय गुरुजी, २०१२ मध्ये काय होणार आहे ते तुम्ही सांगू शकाल का?

श्री श्री रवि शंकर: नेहमीप्रमाणेच. फक्त लोक जास्तीत जास्त अध्यात्मिक होतील.



प्रश्न : अध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी आपण हा वेळ कसा वापरावा?

श्री श्री रवि शंकर: तुम्ही जे आत्ता करत आहात तेच करा.



प्रश्न : जगामध्ये अनेक लढाया आणि प्रादेशिक हिंसाचार होत आहे. जगातील हिंसाचार कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?
श्री श्री रवि शंकर: हिंसाचाराचे मूळ ताण आणि रागामध्ये आहे. राग आणि ताण कमी करण्याचा मला माहित असलेला एकमेव मार्ग म्हणजे ध्यान, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया. हाच एक मार्ग आहे. तुम्ही आयुर्वेदाचा वापर करा, आहार बदला, तुम्ही ते करू शकता. तरी ते सर्व दुय्यम आहे. 



प्रश्न : गुरुजी, गाणे म्हणणे हा शिबिराचा महत्वाचा भाग का आहे? गाण्याचे अध्यात्मिक महत्व काय?

श्री श्री रवि शंकर: तुम्हाला माहिती आहे, ज्ञान आणि तर्क, आणि संगीत मेंदूच्या दोन भागांमध्ये निर्माण होतात, दोन्ही महत्वाचे आहे. त्याने शरीर व्यवस्थेमध्ये संतुलन येत. संगीत जरुरी आहे.

The Art of living