जीवन साथी

सोमवार, ऑगस्ट , १६, २०१०


प्रश्न : गुरुजी, माझ्यामध्ये एक वर्षाचा संकल्प घेण्याची क्षमता नाही. मी काय करू?

श्री श्री रवि शंकर : क्षमता नाही? एक एक दिवसाच्या संकल्पाने सुरुवात करा. एक दिवसाचा जरी संकल्प करू शकलात तरी ते पुरेसे आहे. तुम्ही रोज असे करा. असा विचार नका करू की, "अरे देवा, मला आता एक वर्ष भर हे करायचे आहे.’ आज मी करत आहे– हे चांगले आहे. उद्या करेन - हे चांगले आहे.


प्रश्न : प्रिय गुरुजी, मी खूप प्रार्थना केली होती की या आठवड्यात तुम्ही इथे यावे. तुम्ही इथे आलात यासाठी मी आभारी आहे. प्रार्थनेबद्दल काही सांगा.
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्हाला खूप आभारी वाटत असते किंवा लाचार वाटत असते, तिथे प्रार्थनेचा जन्म होतो. प्रार्थनेचा उदय होण्याचे तिसरे कारण असे आहे की जेंव्हा तुम्ही ज्ञानात स्थित होता. तेंव्हा तुम्हाला दिसते की चेतनेचा विस्तार झाला आहे, चेतनेच्या एका नव्या आयामात तुम्ही पोचला आहात, की जो पूर्ण आहे, अंतर्ज्ञान, ज्ञान आणि प्रेमाने भरलेला आहे.



प्रश्न : कृपया नात्यांबद्दल सांगा. बऱ्याच वेळा ती इतकी अवघड का होतात?
श्री श्री रवि शंकर :
तुम्हाला परत एकदा ‘Celebrating Love’ हे पुस्तक वाचले पाहिजे. तुम्हाला की वाटते की नात्यांमध्ये अडचणी का येतात?



प्रश्न : मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. उलट जेंव्हा मी माझ्या भावना लपवतो तेंव्हा मला ताण येतो. मला कळत नाही की या परिस्थितीतून मी कसा बाहेर पडू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान करून सुद्धा मनाला रिकामे करणे अवघड आहे का?
श्री श्री रवि शंकर :
जर तुमच्या डोक्यात खूप विचार येत असतील, तर त्यामागे काही करणे आहेत. एक कारण तर असे आहे की पोट साफ नसणे, पोटाला तडस लागणे, असे असेल तर मनात खूप विचार येतात. जर शरीरात रक्त प्रवाह नीट नसेल तरी पण खूप विचार येतात.  हो की नाई? तर, योगासन आणि प्राणायाम केल्याने तुम्हाला मदत मिळेल. योग्य आहार केल्याने मदत मिळेल. आयुर्वेदिक डौक्टरना दाखवा. तो सांगेल, जर शरीरात पित्त जास्त झाले असेल तर त्यानुसार योग्य जेवण केल्याने मदत मिळेल.



प्रश्न : ज्या लोकांमध्ये आक्रमकता, ईर्ष्या आणि असंतुलन  अशा नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांबरोबर काम कसे करायचे?
श्री श्री रवि शंकर :
कौशल्याने. त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देताना कारुण्याचा उपयोग करा आणि बघा की तुम्ही त्यांच्या बरोबर कसे काम करू शकता. हां? यातून पहिली गोष्ट अशी होईल की तुमचे कौशल्य वाढेल. दुसरी गोष्ट अशी की धैर्य वाढेल. तीसरी गोष्ट अशी की तुम्हाला कळेल की ती व्यक्ती नेहमी ईर्ष्यापूर्ण किंवा रागात नसतो. तो पण बदलतो. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की लोक कसे बदलतात.



प्रश्न : लहान मुलांसारखे होणे आणि जबाबदारी घेणे यात काय साम्य आहे?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जबाबदारी घेता ही एक गोष्ट झाली. लहान मुलासारखे होण्याने जबाबदारी घेण्याला काही फरक पडत नाही. उलट यामुळे जबाबदारी घेण्याला मदत मिळते.



लहान मुलासारखे होणे आणि लहान मूल होणे यात फरक काय आहे? लहान मूल झाल्यावर तुम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही. लहान मुलासारखे होऊन जबाबदारी घेता तेंव्हा तुम्ही नैसर्गिक राहता, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून घेता, सगळ्यांकडून प्रतिक्रिया मागता, आणि जर कुठली प्रतिकूल प्रतिक्रिया असेल तर तुम्ही त्यामुळे चिंतेत पडत नाही, त्याचा सामना करता. जर ते योग्य असेल तर त्याचा स्वीकार करा, जर निरर्थक असेल तर स्वतःचा तोल न ढळू देता त्याकडे दुर्लक्ष करा.


प्रश्न : आपण आपल्या ग्रहासाठी काम करणे किती आवश्यक आहे?आपण की करू शकतो? आपण हे सगळे कसे टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: आपल्याला या गोष्टींबद्दल जागरूक राहायला लागेल की हा ग्रह म्हणजे आपले घर आहे. जेंव्हा आपण वरून पाहतो तेंव्हा आपल्याला देशांच्या सीमा दिसत नाहीत. सीमा रेषा या आपल्या समजुतीच्या सीमा रेषा आहेत, आपला भ्रम आहे. खरे तर कुठलीच सीमा रेषा नाही. आकाशाला सीमा रेषा माहित नाहीत. ढगांना पण या सीमा कळत नाहीत. हवेला कुठलीही सीमा नाही. या पृथ्वीचे पाचही तत्व सीमा रेषा मनात नाहीत. हा ग्रह सगळ्यांचेच घर आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत, यासाठी आपल्याला बृहद दृष्टिकोण ठेवायला पाहिजे. योग्य दृष्टिकोण काय आहे? तर हा पूर्ण ग्रह आपले घर आहे.



आपण आपला परमाणु कचरा इथे तिथे फेकू शकत नाही. जगात कुठेही ती जागा असो, परत आपल्याकडेच ते पोचेल! आपण कुठलीही एक जागा सीमाबद्ध करून साफ नाही ठेवू शकत. हे शक्य नाही. आपल्याला पूर्ण ग्रहाची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला पूर्ण जगाला जैविक शेतीकडे घेऊन गेले पाहिजे. जेंव्हा जेवण किंवा पीक पिकवण्याची वेळ येते तेंव्हा आपण हे नाही सांगू शकत की ' ठीक आहे, मी केवळ इथेच जैविक शेती करेन, बाकी जगात प्रदूषण होऊ देत!' कारण हवेतून सगळीकडे प्रदूषण पोचणार आहे! आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करून खूप व्हायरसना जन्म दिला आहे. आपण पृथ्वीवरचे कित्येक जीव नष्ट केले आहेत. आपण पृथ्वीची काळजी नाही केली, की ज्यामुळे अन्नाचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. येणाऱ्या पिढ्यांना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


मला असे वाटते की या ग्रहावर प्रत्येक व्यक्तीला पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याची, पृथ्वी टिकवून ठेवायची आणि तिचा विकास करायची, जलाशय तसेच पाण्याचे रक्षण करणे व जास्तीत जास्त झाडे लावणे याची जबाबदारी घ्यायला लागेल. हे खूप आवश्यक आहे!


जगाची अजून एक मोठी समस्या आहे ती महणजे पाण्याची कमतरता. लाखो लोक उपासमारीच्या टोकावर आहेत. आपल्याला पूर्ण जगाकडे लक्ष ठेवून त्याची काळजी घेतली पाहिजे. हां, आपल्याला आपले घर, आपला शेजार पाजार, जिथे आपण राहतो तिथली काळजी तर घेतलीच पाहिजे. हे सगळ्यात जास्त जरुरी आहे, पण त्याच बरोबर ही पण काळजी घेतली पाहिजे की या ग्रहावरचा प्रत्येकजन या कुटुंबाचा एक भाग आहे.


प्रश्न : हे शक्य आहे का की आपण प्रेम पण करावे आणि आतूनही मजबूत राहू, प्रेम पण करू आणि तर्कसंगत पण राहू, प्रेम करूनही वैराग्यात पण राहू, प्रेम भी करूनही ईर्ष्या आणि परिग्रह यापासून दूर राहू?
श्री श्री रवि शंकर : नक्कीच. जर ज्ञान असेल तर हे शक्य आहे की तुम्ही प्रेम पण करू शकाल आणि या नकारात्मक भावनांपासून दूर राहाल. भावनांपासुन दूर राहाल. ज्ञानाबरोबर प्रेम असणे आनंददायक आहे. जर प्रेमाबरोबर ज्ञान नसेल तर तुम्ही सांगितले ते सर्व होते – ईर्ष्या, लालच, इत्यादि।


प्रश्न : प्रिय गुरुजी, आपण मला मार्गदर्शन कराल का - मी ज्या व्यक्तीवर एक वर्षापासून प्रेम करते ती व्यक्ती माझासाठी योग्य आहे का?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जेंव्हा एखाद्यावर गाढ प्रेम करता तेंव्हा ती व्यक्ती तेव्हाद्यापुरती ठीक असेल. पण भविष्यातही ठीक असेल हे कोणी सांगू शकत नाही. हे तुमच्यावर आहे की ती परिस्थिती तुम्ही कशी संभाळाल. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर आधी हे माहिती करून घ्या की की तीव्याक्ती पण तुमच्यावर प्रेम करते की नाही. जर ती व्यक्ती पण तुमच्यावर प्रेम करत असेल तर दोघांनी मिळून ज्ञानात राहून पहा की हे प्रेम टिकवून कसे ठेवायचे– पुढे कसे जाल, कसे वागला, इत्यादी, ठीक आहे!



प्रेमाची सुरुवात खूप सरळ असते, पण खूप लोक हे प्रेम टिकवून ठेवू शकत नाहीत.
जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल आणि जर तुम्हाला त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करता आला नाही, त्याला वाढवता आले नाही तर तुम्ही ते घालवून बसता. ‘Celebrating Love’ या पुस्तकात मी त्या कौशल्याबद्दल सांगितले आहे, की ज्यामुळे तुम्ही प्रेम टिकवून ठेऊ शकता.