प्रेम आत्म्याला मजबूत बनवते, दुस्वास आणि दुःख आत्म्याला कमजोर बनवतात.

बेंगलोर  आश्रम १५ मे :

प्रश्न : चांगली व्यक्ती आणि वाईट व्यक्ती असे काही आहे का? जर कोणी बाहेरच्या अडचणींमुळे बांधले गेले असेल, तर नकारात्मकता त्यांचा मागे येते का? त्यापासून सुटका कशी करून घ्यावी?
श्री श्री रवि शंकर: चांगला किंवा वाईट आत्मा असे काही नाही. ताकदवान आणि कमजोर आत्मा असतात. ताकदवान आत्मे आनंदात असतात, आणि कमजोर आत्मे दुःखी  असतात. आता, हे आत्मे ताकदवान कसे बनतात? समर्पणाने आत्मे ताकदवान होतात. प्रेम ताकद देते, दुस्वास आणि दुःख आत्म्याला कमजोर बनवते.

प्रश्न : विश्वाशी तुलना केली तर आपले अस्तित्व काहीच नाही, मग आपल्या जन्माने अथवा जन्म न घेण्याने काय परिणाम होतो? आपल्या कारामांचे काय परिणाम होतात?
श्री श्री रवि शंकर: हे पहा, विश्वात कशाचाच परिणाम होत नाही, तरी सगळ्याचा परिणाम होतो. एक प्रजाती जरी नष्ट झाली तरी संपूर्ण विश्व नष्ट होईल. समजा एक माशी ही प्रजाती नष्ट झाली, विश्व नष्ट होईल, त्याचे अस्तित्वच राहणार नाही. शास्त्रज्ञ पण हेच सांगत आहेत, एका विशिष्ट प्रकारचे फुलपाखरू नसेल किंवा विशिष्ट प्रकारचे फुल नसेल तर विश्व टिकू शकत नाही.
एका माशीचे बघितले तर काही अस्तित्व नाही; किती तरी ग्रह आहेत! कितीतरी सूर्यमाला आहेत! कितीतरी आकाश गंगा आहेत! तरीपण माशी नसेल तर विश्व नष्ट होईल. म्हणून, माश्यांचे तसे महत्व नाही पण त्या महत्वपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे, सगळ्यांचे महत्व आहे पण आणि नाही पण.

प्रश्न : प्रिय गुरुजी, जर शिव या विश्वाची संभावना असेल, तर नारायण तत्व काय आहे?
श्री श्री रवि शंकर: नारायण म्हणजे मानवी व्यवस्थेतील शिवाचे स्वरूप आहे. शिव तत्व हे पूर्णपणे अव्यक्त आहे; नारायण त्याचे व्यक्त रूप आहे. पाण्याची वाफ किंवा बाष्पासारखे हे आहे, तुम्ही ते पाहू शकत नाही पण ढगातून पाऊस पडतो तेंव्हा तो तुम्ही बघता. म्हणून पाणी हे नारायण आहे आणि बाष्प हे शिव तत्व आहे. म्हणूनच जेंव्हा तुम्ही स्वामी, सण्यासी किंवा योगी लोकांना बघता तेंव्हा म्हणता 'ओम नमो नारायण'

प्रश्न : मी इस्लाम च्या एका विशेष संप्रदायाचा आहे. इस्लाम बरोबर खूप हिंसाचार जोडला गेला आहे हे मी बघतो. जातीयतेवरून इतके वाद का आहेत?  त्यामागे काही मोठी शक्ती आहे का, कुठली अमानवी शक्ती? आपण सगळे धर्म साजरे करत आपला रस्ता का पाळत नाही? वेगवेगळ्या काळातील व प्रदेशांतील गुरूंचे वेगवेगळे भासणारे शब्द का आहेत?
श्री श्री रवि शंकर: त्या दिवसात संपर्क व्यवस्था इतकीशी चांगली नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी जाण्यासाठी महिने नाही तर वर्षे लागायची.  म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी जे काही प्रचलित असेल, त्याबद्दल संत किंवा गुरु जास्त बोलायचे. मुहम्मद जुदैसम आणि ख्रिस्चनबद्दल बोलले, ते हिंदुत्वाबद्दल किंवा बुद्धत्वाबद्दल बोलले नाहीत कारण ते त्या भागापर्यंत पोचले नव्हते; पण ते म्हणाले की प्रत्येक जमातीसाठी वेगवेगळे ज्ञान दिले गेले आहे. ते असेही म्हणाले होते की, ‘माझ्या आधीही किती भविष्य वक्ते येऊन गेले, त्या सगळ्यांचा आदर करा.' ते तेच म्हणाले, शांतता ठेवा आणि प्रत्येकाचा सन्मान करा.

ते म्हणाले की १ लाख भविष्य वक्ते माझ्या आधी येऊन गेले, तुम्ही त्या सगळ्यांना मोजलेत तर त्यात कितीतरी ऋषी आणि महर्षी  असतील, आणि सगळे गुरु जे या ग्रहावर येऊन गेले. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर, धर्म दाबला गेला आणि लोकांवर बंधने घालायला लागला.
मोहम्मादानी त्यावेळी स्त्रियांना खूप स्वातंत्र्य दिले पण नंतर ते सगळे बदलले. तुम्हाला माहितीये की हे सर्व धर्मांमध्ये होते, जसा वेळ जातो, विकृती येत जाते. मूळ लोकांनी जे सांगितले ते राहत नाही, गोष्टी बदलतात.
आज बघा, पाकिस्तानमध्ये रोज मशिदीमध्येच बॉम्ब स्फोट होत आहेत कारण इस्लाम मधील एक संप्रदाय असा विचार करतो की तेच बरोबर आहेत आणि बाकी सगळे चूक. वहाबी संप्रदाय असा विचार करतो की सगळे अगदी सुफी सुद्धा चूक आहेत. मुख्यत्वाने धार्मिक नेतेच यातले बऱ्याचशा समस्या निर्माण करतात, धर्मसंस्थापक नाही. धर्मसंस्थापक म्हणाले असते की, अध्यात्मिक मार्गावर चला, तुमच्या अंतरंगामध्ये जा आणि स्वतःला देवत्वाशी जोड. त्या सर्वांनी योग, जप आणि ध्यान करायला सांगितले असते. त्यामुळे, दुर्दैवाने, धर्मातले गाभा सोडून बाहेरील गोष्टीतच अडकलो आहोत आणि लोक विनाकारण भांडत असतात. म्हणूनच आपण अध्यात्माकडे वळले पाहिजे.

या लोकांचा महत्वाचा संदेश असा आहे: तुमच्याबरोबर शांतता ठेवा, परिसरात शांतता ठेवा आणि जगात शांतात ठेवा. दुसरे म्हणजे सगळ्यांवर प्रेम करा आणि सगळ्यांची सेवा करा, तिसरे असे की अनेक नवे असलेल्या त्या एका देवावर विश्वास ठेवा, एवढेच.
अनेक नावांमध्ये अनेक रूपांमध्ये एकच देवत्व आहे. सर्वांबद्दल तुमच्या हृदयामध्ये प्रेम आणि दया आणि शांती, जर या गोष्टी असतील तर तुम्हाला अशा लोकांचे ऐकायची गरज नाही की जे तुम्हाला सांगतात तू अमुक आहेस म्हणून हे करू नको आणि तमुक आहेस म्हणून हे कर.

प्रश्न : विष्णूचे काम सोपे की तुमचे इथले पृथ्वीवरचे काम सोपे?
श्री श्री रवि शंकर: हे पहा, मी कुठलीही तुलना करत नाही. माझे काम सोपे असो व अवघड, मी त्याची चर्चा करत नाही आणि विचार करत नाही. जे काही असेल, अवघड असले तरी ते करायचे आहे, सोपे असले तरी करायचे आहे आणि हे सर्व विष्णू शक्ती मुळेच होत आहे. विष्णू म्हणजे कुठेतरी पाण्यात बसलेला नाही, विष्णू तो आहे की जो इथल्या प्रत्येकाच्या कणाकणात आहे.

© The Art of Living Foundation
The Art of living