अध्यात्मिकता आनंदाबरोबर सुरु होते!

बेंगलोर, मे २३:

प्रश्न: गुरुजी, विज्ञानाने अध्यात्मिकता समजावता येऊ शकते का?  ही निर्मिती जी विज्ञान अजून सांगू शकला नाही त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटते. वेदांमध्ये याचे उत्तर आहे का?
श्री श्री रवि शंकर : हो, मनोरंजन ही योगाची सुरुवात आहे. जेंव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनोरंजक वाटते तेंव्हा तुम्ही निसर्गातील सत्यांबद्दल प्रश्न विचारू लागता तेंव्हा तुमचा प्रवास सुरु होतो. हे उत्तम आहे. ‘विस्मयो योग भूमिका,’ अध्यात्मिकता मनोरंजनाबरोबर सुरु होते
आणि नंतर ते कायम अम्युजमेंट पार्क मध्ये असल्यासारखे वाटेल. तुम्ही आश्चर्यचकित होता, वाव! हे काय आहे? हे जग काय आहे? किती प्रकारची झाडे, पाने, फुले, फळे, भाज्या, माणसे, हे काय आहे? जेंव्हा असा विचार येतो तेंव्हा ज्ञान सुरु होते.

प्रश्न: गुरुजी, जर आपण घटना आहे तशी स्वीकारली तर आपण निर्माण क्षम कसे होऊ?
श्री श्री रवि शंकर : हे तुम्हाला शिबिरामध्ये (आर्ट ऑफ लिव्हिंग चा पार्ट १ शिबीर ) कळले असेलच, बरोबर? स्वीकार म्हणजे निष्क्रियता नव्हे; स्वीकार म्हणजे आत्ताची परिस्थिती ओळखणे.

तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मुलाला माहिती पाहिजे की ते जगातील प्रत्येक रुढीचा भाग आहेत. पाकिस्तानींचे पूर्वज हिंदू होते, बौद्ध, जैन होते; खूप पूर्वज या पुरातन पद्धतींचे होते. काही पारसी होते. पाकिस्तानातील मुलांना उपनिषद शिकवले पाहिजे, थोडे योग आणि ध्यान. योगाचा जन्म पाकिस्तान मध्ये झाला; जन्म म्हणजे आता ज्याला पाकिस्तान म्हणतो त्या भागात योग शिकवला गेला आणि तिथे त्याचा प्रचार झाला.

अध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे खूप लोक सर्व प्रकारचा प्रचार करतात, त्याच्याबद्दल त्यांना खरी  माहिती नसते. म्हणूनच लोकांना अध्यात्मिक ज्ञान देणे हे आपले महत्वाचे कर्तव्य झाले आहे. तुम्हाला असे वाटत नाही का?
आपण आता खूप कार्यक्षम झाले पाहिजे आणि सर्व प्रकारची अंधाधुंदता दयेमध्ये रुपांतरीत होईल आणि तीच अंधाधुंदता चांगले काम करण्याच्या प्रतीबद्दतेमध्ये रुपांतरीत होईल हे बघितले पाहिजे. हो की नाही. आपण त्यासाठी काम केले पाहिजे. हो.

प्रश्न : प्रिय गुरुजी, सुदर्शन क्रिया डी. एन. ए. बदलू शकते का?
श्री श्री रवि शंकर: हो.

प्रश्न : गुरुजी, टीका स्वीकारण्याइतके स्वतःला मजबूत कसे बनवू? 
श्री श्री रवि शंकर: हे पहा, तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका, टीका अगोदरच झाली आहे, हो की नाही? तुम्हाला पर्याय नाही. फक्त कोणी बोलले की तुम्हाला टीका झाल्याचे कळते, बरोबर. त्यांनी बोलल्याशिवाय तुम्हाला कसे कळेल? कोणी तुमची टीका करेपर्यंत तुम्हाला माहिती नसते. त्यांनी टीका केल्यावर, ती झालेली आहे. तुम्हाला काय पर्याय आहे? ओके, त्याचा स्वीकार करू नका, त्याने तुम्हाला काय होईल? तुम्ही आणखी दुःखी व्हाल. तुम्ही हुशार असाल तर त्याचा स्वीकार कराल, जर तुम्हाला  हुशार व्हायचे नसेल तर तुम्हाला काही काल त्रास सहन करायला लागेल. फक्त याच मार्गाने तुम्ही करू शकाल.

प्रश्न: गुरुजी, तुमची माझ्यावर कृपा आहे हे मी पहिले आहे. मला जे काही पाहिजे, माझ्या ज्या इच्छा आहेत, ते तुम्ही मला देता. असे कधीही झाले नाही की मला जे हवे ते मिळाले नाही पण इच्छा अशा आहेत की त्या संपत नाहीत आणि आता मला स्वतःची लाज वाटते आहे, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : हे पहा, आता तुम्ही त्याबद्दल सजग झाले आहात, बरोबर? तुम्ही आता बरोबर रस्त्यावर आहात. गाडीने 'यु' टर्न घेतला आहे. काहीतरी मोठे मागा. छोट्या गोष्टी का मागता? आणि तुमच्यासाठी मागू नका, सगळ्यांसाठी मागा. तुम्ही जे मागाल, ते मिळेल.

प्रश्न: कधी कधी, माझे मूल ज्या शाळेत जाते ती शाळा मला आवडत नाही. मी त्याला शाळेतून काढून घरीच ठेवू का? 
श्री श्री रवि शंकर: नाही, शाळेचे वातावरण चांगले नाही म्हणून घरी राहणे चांगले नाही. मुले मंद होतील. आपल्याला शाळेतील पद्धती आणि या घटना बदलल्या पाहिजेत. म्हणूनच आपण इतक्या शाळा सुरु करत आहोत; आपण भारतामध्ये जवळपास १०० शाळा सुरु केल्या आहेत.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझी सासू इतर धर्मांच्या लोकांना प्रसाद वाटत नाही. त्यांचा तर्क असा आहे की ज्यांना प्रसादाचे महत्व कळत नाही त्यांना प्रसादाचा फायदा होत नाही. त्यांचा हा विचार मी कसा बदलू?
श्री श्री रवि शंकर: त्या करत नसतील तर काही फरक पडत नाही, तुम्ही सगळ्यांना द्या. प्रसादाचे पदार्थ खूप वेळा चांगले असतात, लोकांना आवडेल. तुम्हाला माहितीये, प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. त्यांचे असू देत, तुमचे मत तुमच्यापाशी, इथे काहीच संघर्ष नाही. तुम्हाला हवे ते तुम्ही करा.

प्रश्न: महत्वाचे काय आहे: वेदना, ज्ञान की प्रेम? 
श्री श्री रवि शंकर: हो, वेदना, ज्ञान आणि प्रेम नेहमी एकत्र असतात. कधी कधी एकाला खूप महत्व दिले जाते आणि कधी दुसऱ्याला जास्त महत्व दिले जाते. तुम्हाला दोन्ही बरोबर गेले पाहिजे. छान !

The Art of living