मन, मानसिकता आणि वेळ यांचे सुंदर शास्त्र

२६ जानेवारी, २०११, बेंगलोर आश्रम, भारत 


प्रश्न : गुरुजी, एका गुरूला निवडणे म्हणजे इतर महात्म्यांचे विचार न मानणे असे आहे का? आपल्याला एका पेक्षा अधिक गुरु असू शकतात का?
श्री श्री रवि शंकर: ओह! एका गुरूला सांभाळणे इतके अवघड आहे, तुम्ही कसे ......! (हशा) ते इतके सोपे नाही. सगळ्यांचा आदर करा पण एकच मार्ग धारा. सगळ्यांना मन द्या आणि तुम्ही पाहाल, सगळ्या महात्म्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे. फक्त एकच सत्य आहे, म्हणून, सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे, पण काळाच्या गरजेनुसार पद्धती वेगवेगळ्या आहेत.
या रस्त्यावर असताना मनात द्वंद्व ठेवू नका. ज्या रस्त्यावर असाल, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, आणि त्यामुळेच तुम्ही इथे आलेले आहात. तुम्ही त्या रस्त्यावर, त्या शिक्षकांची, त्या महात्म्यांची सेवा केली आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला येथपर्यंत घेऊन आले आहेत, आणि या धारणेने तुम्ही पुढे चला, ठीक आहे?
असे आहे की तुम्ही सगळेच करत बसलात तर, गोंधळात पडाल! तर, मी असे म्हणेन, की एकाला सगळ्यामध्ये बघा आणि सगळ्यांना एकामध्ये बघा.
सगळ्यांना मन द्या आणि एकच रस्ता निवडा.

प्रश्न : जर तुमचा गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्यावर नाराज असेल तर काय करावे?
श्री श्री रवि  शंकर: वेगाने प्रगती करा! गुरु तुमचा प्रगतीमुळे नाराज असतो. म्हणून, वेग वाढवा आणि प्रगती करा. जोरात पळा !

प्रश्न : गुरुजी, मानसिकता आणि वेळ यामध्ये काही संबंध आहे का? काही वेळा आपल्याला वेगवेगळ्या भावना का येतात, जसे की रात्री उदास वाटणे? 
श्री श्री रवि शंकर: हो, हो! वेळ आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत, हो! तुम्हाला हे माहिती पाहिजे. वेळ आणि मन हे समानार्थी आहेत. आठ गोष्टी आहेत: वैशेशिका, कानडा …सगळ्यांनी सांगितले आहे ' देश, काल, मनः' देश म्हणजे आकाश, काल म्हणजे वेळ आणि मनः म्हणजे मन. ही सगळी तत्व आहेत. आणि एकमेकांशी जोडलेली आहेत. देश आणि काल जोडलेले आहेत. आकाश आणि वेळ जोडलेले आहे. या पृथ्वीवरचा एक दिवस म्हणजे दुसऱ्यावरचे अनेक दिवस. चंद्रावर ही परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही, गुरु ग्रहावर असाल तर माणसाचे एक वर्ष म्हणजे तिथला एक महिना. जर तुम्हाला गुरु ग्रहावर १ वर्ष अनुभव घ्यायचा असेल तर माणसाची १२ वर्षे लागतील.
गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला १२ वर्षे लागतात. तसेच जर तुम्ही शनी ग्रहावर असाल, तर ३० वर्षांचे १ वर्ष!
अगदी तसेच पितरांचे, जे लोक वारले आहेत, आपले माणसांचे एक वर्ष म्हणजे त्यांचा १ दिवस. म्हणजे आपले सहा महिने म्हणजे एक रात्र आणि सहा महिने म्हणजे एक दिवस. तर, एका आत्म्यासाठी जे आपल्याला सोडून गेले आहेत त्यांचासाठी एक पूर्ण वर्ष म्हणजे एक दिवस आहे. वेगवेगळ्या आयामांमध्ये इतके वेगवेगळे काळ आणि वेगवेगळे अवकाश आहेत. म्हणून, वेळ आणि अवकाश जोडलेले आहेत. त्याला वेळ-अवकाश कर्व्ह. तसेच तिसर्या आयमाचे आहे, म्हणजेच मनाचे! मनविरहित, अलौकिक चेतना म्हणजे महाकाळ, शिवा, चेतनेची चौथी स्थिती.
त्याला महाकाळ म्हणजे मोठा काळ आणि मन नसलेला. मन नसणे म्हणजे चांगला काळ.
तर, सकाळी ४.३० ते ६.३०, सूर्योदयाच्या थोडे आधी, पहाटेच्या आधीच्या वेळेला निर्मितीक्षम वेळ म्हणाले आहे.
ब्राह्म मुहूर्त! आणि नंतर प्रत्यक दोन तासांनी, त्याला लग्न; म्हणजे वेळेचे एकक. आणि हे एकक मनाची स्थिती दर्शवते. आणि परत हे चंद्राच्या, सूर्याच्या स्थितीशी जोडलेले आहे. इतके पहलु आहेत! १० वेगवेगळे पहलु मनावर परिणाम करत. तर, फक्त वेळच नाही तर दिवसाची गुणवत्ता पण मनावर परिणाम करते. प्रत्येक अडीच दिवसांनी मनाची अवस्था बदलते! मनाची मानसिकता! तर जर तुम्ही त्रासलेले असाल, तर ते पुढे जास्तीत जास्त अडीच दिवस चालू राहू शकते; अडीच दिवसच असे काही नाही. एका टोकापर्यंत ते वाढते आणि खाली येते. पण अडीच दिवसानंतर तुम्हाला त्याच भावना तेव्हड्याच तीव्रतेने असणार नाहीत.
अशक्य! त्या बदलतात. खूप बदलतात! मन, मानसिकता आणि वेळ यांचा संबंध असलेले शास्त्र खूप मोठे आहे.
ज्योतिष शास्त्रा याच्यावर  प्रकाश टाकू शकते. तुम्हाला भविष्य सांगणारे माहित आहेत, सामान्यपणे आठवड्याच्या स्तंभामध्ये ते सांगतात, ' ओह, नात्यांसाठी चांगले, पैसे मिळवण्यासाठी चांगले, हे आणि ते!' ते त्या गोष्टी लिहितात (हसतात)! ते त्या गोष्टीना सर्वसामान्य बनवतात, ' तुम्ही जर या वेळी जन्माला आले असाल तर तुमच्यासाठी हे चांगले आहे आणि तुम्ही हे करा.' यात काही शंकाच नाही, हे खूप सामान्य आहे आणि पैसे कमावण्यासाठी केलेली गोष्ट आहे. पण ही फसवा-फसवी नाही; त्यात सत्यही आहे. त्याचा पाया सत्य आहे. मन आणि काल जोडलेले आहेत हे तवा सत्य आहे.
मन म्हणजे मानसिकता, विचार, मते, कल्पना, सर्व गोष्टी ज्या आपण गोळा करतो. आणि, मन नसणे म्हणजे ध्यान. पाहत आणि संध्याकाळ हे ध्यानासाठी चांगली वेळ समजली जाते. तर, जेंव्हा तुम्ही ध्यान करता, किंवा जेंव्हा वाईट काळ असतो, तेंव्हा तुम्ही ध्यान करता. जेंव्हा तुम्ही ध्यान करता तुम्ही मनाच्या प्रभावापासून मुक्त होता आणि स्वतःमध्ये जाता. स्वतः म्हणजे शिव तत्व.  शिव तत्व म्हणजे नेहमी उदार, काळजी घेणारे, प्रेमळ, वर न्हेणारे. तुमच्या आतील खोल चेतना की जी प्रेमळ, काळजी घेणारी, वर न्हेणारी आणि उदार आहे, ती मनाचे नकारात्मककाळाचे  परिणाम दूर करेल.
भारतामध्ये हा सामान्य विश्वास आहे, जेंव्हा वाईट काळ असेल तेंव्हा फक्त ओम  नमः शिवाय, असे म्हणा आणि ते निघून जाईल. तो सगळा वाईट काळ निघून जाईल.  ‘मनः’, जेंव्हा उलट बाजूने वाचले जाते, त्याचे नमः होते. मनः म्हणजे जेंव्हा चेतना जगाच्या बाहेर जाते, आणि नमः म्हणजे जेंव्हा चेतना आत जाते. शिवाय , शिव तत्वाकडे, चेतनेचा चौथा आयाम,  अस्तित्वाचा सूक्ष्मतम पहलु, शिव तत्व! नमः, म्हणजे मन निर्मितीच्या पायाभूत अवस्थेकडे जाते, तेंव्हा ते सर्वकाही अतिशय उदार अनुभवामध्ये बदलू शकते.

प्रश्न : तुमच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरे कशी असतात?
श्री श्री रवि शंकर: याचे उत्तर माझ्याकडे नाही!


© The Art of Living FoundationThe Art of living