जग हे माणसांनी आणि चुकांनी भरले आहे. चुकांना माफ करा आणि लोकांवर प्रेम करा

बंगलोर , जून २२ :

प्रश्न : प्रिय गुरुजी, देवी कालीचे दर्शन देऊन विवेकानंदानी रामकृष्ण परमहंसाना आशीर्वाद दिला असे आम्ही वाचले आहे. लोकांना हाच अनुभव आजसुद्धा येऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : याउलट आहे. रामकृष्णानी विवेकानंदाना आशीर्वाद दिला. खूप अनुभव घडले. ती फक्त एक शक्ती होती जिच्यामुळे संपूर्ण वातावरण बदलले. अध्यात्मिक शक्तीने नाते आणि मन बदलले.

प्रश्न :गुरुजी , एक माणूस एकापेक्षा जास्त बीज मंत्र एका आयुष्यात घेऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : हो, काहीच अडचण नाही.

प्रश्न : गुरुजी , जेंव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण केले तेंव्हा तुम्हाला कोण आवडले?
श्री श्री रवि शंकर : देवत्व, आणि तेच अजूनही आवडत आहे, हो!

प्रश्न : माझ्या आयुष्याशी निगडीत निर्णयांबद्दल मी संभ्रमावस्थेत असतो. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : संभ्रमावस्था चांगली आहे, तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही नेहमीच संभ्रमावस्थेत असता. याचा अर्थ असा की तुमची प्रगती होत आहे. ठराविक कल्पना मोडून जेंव्हा नवीन कल्पना येतात तेंव्हाच संभ्रमावस्था येते. पण ती तात्पुरती स्थिती असते. नवीन कल्पना येतात, तुम्ही त्याचबरोबर पुढे जाता आणि ते मोडल्यावर परत संभ्रमावस्था येते. तर तुम्ही पुढे जात आहात.

प्रश्न : मी अशा ठिकाणी राहतो जिथे मी बंदूक घेऊन फिरलो नाही तर मला मारून टाकतील, अशा जागी मी अहिंसक कसा राहू? मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : हिंसाचार म्हणजे स्व-सुरक्षा नाही आणि अहिन्साचार म्हणजे स्व-सुरक्षेचा अभाव असेही नाही. तुम्ही स्व-सुरक्षेसाठी तयार असले पाहिजे यात काही शंकाच नाही, पण तुमच्या मनात आणि हृदयात अहिंसा ठेवा. आणि मग तुम्हाला अहिंसा दिसेल, अशी अहिंसा की हिंसाचारी लोक सुद्धा हिंसाचार सोडून देतील.

मी जेंव्हा वॉशिंगटन डी. सी. मध्ये होतो, लोस एंजिलीस मध्ये होतो तेंव्हा हे माझ्याबरोबर इतक्या वेळा झालेले आहे. दोन्ही ठिकाणी एक सभ्य पुरुषाला माझ्यावर हल्ला करायचा होता. त्याने मला येशूच्या नावाने शाप दिले आणि म्हणाला की हे सगळे पैशाचिक आहे, योग पैशाचिक आहे. हा उंच जाड्या माणूस जसा पुढे आला, मी म्हणालो " थांब". आमच्याकडे कुठलीही हत्यारे नव्हती आणि सुरक्षा व्यवस्था पण नव्हती. तो त्याच्या गुढग्यांवर बसला आणि रडायला लागला. सगळ्यांना इतके आश्चर्य वाटले, तो सत्संग होता, अशाप्रकारे कोणी हल्ला करेल असे कोणालाही वाटले नव्हते. मी फक्त म्हणालो, "थांब, थांब', आणि तो वाकला आणि त्याने रडायला सुरुवात केली. नंतर त्याने शिबीर केले.
तुम्हाला माहिती आहे, गैरसमजुतींमुळे हिंसा होवू शकते. ताण आणि अत्याचारांमुळे हिंसा होवू शकते. पण जेंव्हा आपण अहिंसेमध्ये विश्वास ठेवतो आणि हृदयातील शक्तीबरोबर चालतो तेंव्हा तुम्हाला मोठा फरक दिसेल. अशा कितीतरी घटना आहेत.

खूप पूर्वी मी दिल्ली आणि नोयडा मध्ये होतो. हजार लोक मशाली घेऊन माझी गाडी जाळायला आले होते. मी फक्त माझा हात दाखवला आणि म्हणालो, "थांबा, तुम्हाला काय हवे ते करा फक्त १० मिनिटे मला बोलू द्यात. पण तेंव्हाच, त्या १० मिनिटात ते सर्व बदलले. त्या दिवसात, १९८० मध्ये, नोयडा इतका प्रगत नव्हता, ते सर्व जंगल होते, चोर - लुटारूंचे खेडे. म्हणून आपण अहिंसेमध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि मी असे म्हणत नाही की तुम्ही हत्यार वापरू नका किंवा स्व-सुरक्षा शिकू नका. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे अहिंसेमध्ये मुरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींचा आधार घेऊ शकता, तुम्ही स्व सुरक्षेसाठी साधणे बाळगू शकता.

प्रश्न : मी माझी एक खूप चांगली नोकरी सोडली कारण तेथे खूप इर्षा धोका देण्याचे प्रकार होते. अशा नकारात्मक लोकांबरोबर कसे काम करावे?
श्री श्री रवि शंकर : कौशल्याने. नकारात्मक लोकांमुळे तुमच्यामधील अनेक कौशल्ये बाहेर येतात. तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी तुम्हाला त्यांचाबरोबर कसे वागायचे ते शिकवले, त्या सर्व परिस्थितींमधून कसे बाहेर पडायचे आणि आणि पुढे जायचे हे त्यांचामुळे तुम्ही शिकला. आणि ते तुमची सर्व बटणे दाबातील आणि तुम्ही त्या बटण पासून मुक्त व्हाल.

प्रश्न : गुरुजी,खूप वेळा मला वाईट स्वप्ने पडतात. मी त्यापासून कशी सुटका करून घेऊ?
श्री श्री रवि शंकर : ध्यान करा, झोपी जायच्या आधी पण ध्यान करा आणि काही चांगले मंत्र ऐका, त्याने मदत होईल.

प्रश्न : गुरुजी, माझे आयुष्य अनेक वर्षांपासून अडीअडचणीने भरलेले आहे कि मला आता सगळे सोडून द्यावेसे वाटते. माझे वडील म्हणतात कि कोणीतरी आमच्या कुटुंबावर जादू टोणा केला आहे. जादू टोण्यासारख्या गोष्टी आहेत का आणि त्यातून मी कसा बाहेर पडू?
श्री श्री रवी शंकर: साधना, सेवा आणि सत्संग करा, काळी जादू तुम्हाला शिवू पण शकणार नाही. मंत्र म्हणा, वेदिक मंत्रोच्चार करा, रुद्र, ओम नमः शिवाय चा जप. या सगळ्याची मदत होईल.

प्रश्न : मी जेंव्हा यु. एस. मध्ये असतो तेंव्हा मला भारतात यायचे असते आणि मी जेंव्हा भारतात असतो तेंव्हा मला यु. एस. ची आठवण येते, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : बर, आत्ता जे करत आहात तेच करा, याची आठवण येऊ दे त्याची आठवण येऊ देत पण तुमचे ध्यान विसरू नका, साधना, सेवा आणि सत्संग विसरू नका. ते सगळीकडेच असेल.

प्रश्न : गुरुजी, महाभारतामध्ये कृष्णाने कौरव आणि पांडव दोघांना पाठींबा दिला. त्याने पांडवांच्या बाजूने शस्त्र का उचलले नाही जेंव्हा की त्याने पूर्ण सेना कौरवांच्या बाजूने पाठवली होती?
श्री श्री रवि शंकर : कृष्णाचे स्वतःचे मार्ग होते, अत्यंत गुड, तुम्ही समजू शकणार नाही. सोडून द्या. ज्याने कृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना समजले नाही, वेगवेगळे लोक, वेगवेगळे गट कृष्णामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात. म्हणूनच त्याला पूर्णावतार म्हणतात, तो प्रत्येक बाजूने पूर्ण आहे. एकमेवच.

प्रश्न : गुरुजी, ध्यानामुळे दृष्टीकोन बदलतो हे तर सरळच आहे, ध्यानामुळे कौशल्य पण वाढते का?
श्री श्री रवि शंकर : हो, नक्कीच

प्रश्न : गुरुजी , भाव समाधी बद्दल सांगू शकता का. आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : हो, भाव समाधी. बसा आणि संगीतामध्ये, भावनेमध्ये, भावामध्ये पूर्णपणे विरघळून जा. जेंव्हा मन स्थिर आणि शांत असते, तेंव्हा त्या क्षणी तुम्हाला नृत्य करावे असे वाटते. विचार आणि चिंता समाप्त होतात.

प्रश्न : मला माझे आई-वडील आणि माझे प्रेम यातील निवड का करावी लागते आहे?
श्री श्री रवि शंकर : अवघड प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, “ माझ्या आई-वडिलांना आवडत नाही अशा व्यक्तीला मी का निवडू किंवा माझे आई वडिलांना मी निवडलेली व्यक्ती का आवडत नाही?" तारेवरच्या कसरतीसारखे आहे, बरोबर?

प्रश्न : भक्ताचे देवावरचे प्रेम कमी होऊ शकते का आणि जर कमी झाले तर ते बदलण्यासाठी काय करावे?
श्री श्री रवि शंकर : वेळ जाईल तसे ते बरोबर होईल.

प्रश्न : भावना, शरीर, मन आणि राग यांचे काय काम आहे?
श्री श्री रवि शंकर : तुमचे शरीर स्वस्थ ठेवा आणि भावना सकारात्मक ठेवा. खूप सोपे आहे. हे असे विचारण्यासारखे आहे की " मी माझा शर्ट कुठे ठेवू आणि प्यांट कुठे ठेवू?" तुमचा शर्ट वर ठेवा आणि प्यांट खाली. दुसरी पद्धतच नाही. प्रत्येकाची आप-आपली जागा आहे: अहंकाराची आपली जागा, भावनेची आपली जागा, आपले शरीर स्वस्थ आणि ताकदवान पाहिजे. निसर्गाच्या नियमांचा आदर केला पाहिजे, ठीक आहे?

प्रश्न : जेंव्हा अनेक रस्ते असतात तेंव्हा मी निवडलेला रस्ता बरोबर आहे हे कसे ओळखावे?
श्री श्री रवि शंकर : जेंव्हा शंका येतात, तेंव्हा खात्री बाळगा की तो योग्य रस्ता आहे. बऱ्याच वेळा, जेंव्हा खरे असते तेंव्हाच शंका येते. आपण ज्याची शंका घेतो, ते सगळे चांगले आहे. जर कोणी तुम्हाला विचारले की तुम्ही आनंदी आहात का तर तुम्ही म्हणाल, "मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत". पण तुम्हाला तुमच्या दु:खाबद्दल पूर्ण खात्री असते, बरोबर? त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणी सांगितले की त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही म्हणाल, "खरच?" आणि जर कोणी म्हणाले, " मी तुझा द्वेष करतो",तर तुम्ही कधीही विचारात नाही की " खरच?"
बऱ्याच वेळा, आपल्या शंका चांगल्या गोष्टींसाठी असतात. जेंव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या मार्गावर असता, मार्ग चांगला की वाईट ही शंका येणारच.

प्रश्न : विश्वासघात कसा विसरावा? कुणीतरी माझा फार पूर्वी विश्वासघात केला आणि तो माणूस सारखा माझ्या मनात येत राहतो. योग, प्राणायाम, ध्यान केल्यानंतर ते विचार कधीतरी येतात. आधी सारखे सारखे यायचे. ते विचार संपूर्णपणे कसे काढून टाकावे?
श्री श्री रवि शंकर : ते आधीच कमी झाले आहे, हो की नाही? आतापर्यंत किती कमी झाले आहे? कधीतरी ते विचार येतात, बरोबर? मग काय? त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही ते जितके टाळाल, ते परत येत राहील. ते स्वीकारा, हा आयुष्यातला अनुभव आहे.

प्रश्न : असे म्हणतात की एखादी गोष्ट करून करून, अभ्यास करून माणूस परिपूर्ण होतो, पण परिपूर्ण कोणीच नसते, मग अभ्यास का करावा?
श्री श्री रवि शंकर : अभ्यास का करावा? कारण तसेही कोणी परिपूर्ण नाही. हो.
तुम्ही जेवता, आणि मग पोट रिकामे होते आणि परत, तुम्ही खाता आणि परत पोट रिकामे होते आणि तुम्ही परत खाता. मग, कशाला खायचे? पोट जर सारखे रिकामेच होणार असेल तर खायची काहीही गरज नाही.

प्रश्न : गुरुजी, कोणी जर एकसारखे खोटे बोलत असेल आणि सारखे दुसरी संधी मागत असेल तर काय करावे?
श्री श्री रवि शंकर : जर कोणी एकसारखे खोटे बोलत असेल तर काय करावे?
कोणीतरी मला काळ एक प्रश्न विचारला, " गुरुजी, तुम्ही माझावर रागावला आहात का?" मी म्हणालो, "नाही". याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझाशी नेहमी खोटे बोलत राहाल. आता, मला माहित आहे की काही लोक वाईट गोष्टी करतात, चुकीच्या गोष्टी बोलतात आणि इतरांच्या विश्वासाचा दुरुपयोग करतात. ते म्हणतात, " मी आताच गुरुजींशी फोन वर बोललो आणि ते असे असे म्हणाले."
मी माफ करतो आणि रागावत पण नाही पण मला त्यांची दया येते कारण ते त्यांचा डोक्यावर चिखल टाकत असतात. ते त्यांनाच त्रासदायक ठरत असतात. मग अशा लोकांवर रागावून मी माझे मन का खराब करावे? मला राग येत नाही पण दया येते कारण ते इथे तिथे जाऊन लोकांना त्रास देत असतात.

पिताजींनी एक वाक्य लिहिले आहे, " हे जग माणसांनी  आणि चुकांनी भरलेले आहे. चुकांना माफ करा आणि लोकांवर प्रेम करा." किती छान गोष्ट सांगितली आहे!
The Art of living
© The Art of Living Foundation