जेंव्हा तुम्ही ध्यान करता तुमचे मन शांत होते, आणि ते शांत मन देवाचे घर असते.

 
बेंगलोर, मे २२

प्रश्न : जय गुरुदेव, गुरुजी, मी मन, बुद्धी, स्मृती, अहंकार इ. मधून जगाला ओळखतो. पण या सहा पायऱ्या ओलांडल्यानंतरच मी मला स्वतःला ओळखू शकतो. तर माझा प्रश्न असा आहे की जेंव्हा आपण या सहा पायऱ्या ओलांडतो, त्यानंतर स्वतःला सातव्या पायरीवर कसे ठेवावे?
श्री श्री रवि शंकर:  आपल्याला या सहा पायऱ्या सोडायची गरज नाही; आपण शरीर, मन आणि बुद्धी सोडू शकत नाही. आपल्याला याबरोबर राहिलेच पाहिजे आणि स्वतःला ओळखले पाहिजे. शरीर, मन स्मृती आणि बुद्धी आहेत आणि त्यांना तिथेच राहू देत. तुमचे काम सुरु होण्याआधी आणि झाल्यानंतर रोज काही मिनिटे ध्यान करा आणि आराम करा. हे पहा, जेंव्हा तुम्ही ध्यान करता आणि तुमचे मन शांत होते, ते शांत मन देवाचे घर असते. म्हणूनच तुम्ही देवाला जणू शकत नाही पण देवाबरोबर एकरूप होऊ शकता. तुम्हाला शांत वाटत असेल, आनंदी वाटत असेल, तुम्ही तुमच्या आत जात असता. यात तुम्ही "मीच सगळे काही आहे, हे सर्व मीच आहे'.

प्रश्न : जय गुरुदेव. गुरुदेव. मी तुमची खूप सारी पुस्तके वाचली आहेत आणि सत्य साई बाबा आणि ओशोंची पण वाचली आहेत. मला त्यांच्यात काही फरक वाटला नाही, ते सर्व प्रेमाबद्दल बोलतात आणि मला वाटते की ते फक्त वेगवेगळी भौतिक रूपे आहेत. ओशोंचा झोर्बा द बुद्ध या संकल्पनेचा माझ्यावर खूप परिणाम आहे. मला तुमच्या त्याबद्दलच्या धारणा माहिती करून घ्यायच्या आहेत. ते ज्याप्रकारे भौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही विषयांवर एकदम बोलले ते मला आवडले. तुम्हाला काय वाटते ते ऐकायचे आहे.
श्री श्री  रवि शंकर: हो, ते खूप मोठे वक्ते होते आणि ते खरच खूप चांगले बोलायचे. त्यांना एक खोल बौद्धिक अंतर्दृष्टी होती की जे चांगले आहे पण एक गोष्ट नव्हती ती म्हणजे मंत्रांचे ज्ञान; मंत्रांच्या रूढीचे ज्ञान. बुद्ध म्हणाले की हे काही नाहीये, सगळे नाही आहे आणि ते असेही म्हणाले की त्यांनी अंतिम गोष्टीचा शोध घेतला, मी स्वतःचा शोध घेतला पण मला असे लक्षात आले की स्व नाहीच. मी शोधले आणि खुप शोधले आणि असे लक्षात आले की आत्मा पण नाही.
पण सनातन धर्मामध्ये, आदि शंकराचार्य म्हणतात ‘कोणाचा शोध घेतला जातो? काय आहे की जे सापडले नाही?' ते नाण्याच्या दोन बाजुसारखे आहे. ते रिकामेपणाबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला वेदांत पूर्णत्वाबद्दल बोलते. ती एक पायरी आहे, कुणीतरी पासून कुणी नसणे ही एक पायरी आहे, आणि वेदांत तुम्हाला कुणीही नसल्यापासून कुणीतरी सगळ्यांकडे घेऊन जाते.

प्रश्न : प्रिय गुरुजी, असे म्हणतात की पुनर्जन्मातून आपले आत्मे परत परत वापरले जातात, तरी सुद्धा जगाची लोकसंख्या वाढत आहे. बाहेरच्या ग्रहावरील आत्मे पृथ्वीवर येऊन राहात आहे की इतर जीव मनुष्य जन्म घेत आहेत?
श्री श्री रवि शंकर: इतर जीव. दोन्ही शक्य आहे, दोन्ही गोष्टी घडत आहेत.

प्रश्न : गुरुजी , डॉ. स्टीफन हॉकिंग यांना यांना आताच्या मनुष्य जन्माबद्दल खूप विश्वास आहे. ते म्हणतात की या आयुष्याच्या पलीकडे काही नाही, या अस्तित्वाशिवाय दुसरे काही नाही. मला माहित नाही की धर्मांचा किती अभ्यास त्यांनी केला आहे पण मला माहित आहे की तुम्ही भौतिक शास्त्राचा अभ्यास केला आहे. तर तुम्ही त्यांना कसे उत्तर द्याल?
श्री श्री रवि  शंकर:  कोणीही शास्त्रज्ञ असे म्हणणार नाही की, ' मला सगळे काही माहित आहे आणि इथे जे काही आहे तेवढेच आहे आणि त्या पलीकडे काही नाही'. अजिबात नाही, स्टीफन हॉकिंग असे नाही म्हणाले की इथे आहेच तेच सर्वस्व आहे. ते म्हणाले की अनेक स्तर आणि आयाम आहेत. आपला मेंदू लहरी विश्लेषक आहे; तो काही विशिष्ट लहरींचे विश्लेषण करू शकतो. आत्ता या क्षणी अनेक इतर लहरी आहेत. त्यामुळे कोणीही शास्त्रज्ञ वेवेगळ्या स्तरांवरचे अस्तित्व, अनेक विश्व, यांचे असणे नाकारू शकत नाही, कारण अनेक तरंग आहेत. तुम्ही जे पाहता ते तरंगांचे काम आहे आणि त्यांत अनंत स्तर आहेत, एक आत आणि दुसरी त्याचा आत. मायक्रोसोम पासून म्याक्रोसोम पर्यंत, इतकी विश्व आहे आणि काळाचे वेगवेगळे स्तर.

प्रश्न : जय गुरुदेव. रामकृष्ण परमहंस हे मोठे साधक होते, त्यांनी आयुष्यभर साधना केली तरी आयुष्याच्या शेवटी त्यांना त्रास झाला, का?
श्री श्री रवि शंकर: कधी कधी, गुरु त्यांच्या शिष्यांचे कर्म घेतात. त्यांच्या शिष्यांच्या कर्मामुळे त्यांना शारीरिक आजारामधून जावे लागले. प्रत्येकानेच त्यातून जावे असे काही नाही, काही गुरु तसे करायला निवडतात, एवढेच!

प्रश्न : कधी कधी मी कामामुळे थकून जातो आणि स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसतो. मी स्वतःवर नियंत्रण कसे ठेवू कारण याचे परिणाम माझ्यासाठीच त्रासदायक असतात?
श्री श्री रवि शंकर: हो, म्हणूनच जेंव्हा तुम्ही थकून जाता, बस आणि ध्यान करा. प्राणायाम करा आणि ध्यान करा त्याने तुमचा थकवा निघून जाईल.

प्रश्न : प्रिय गुरुजी, मला एक लक्षात आले आहे की जेंव्हा कोणी तुम्हाला फुलांची माल घालतो ती पडते, असे का?
श्री श्री रवि शंकर: फुलांच्या माळांची काही गरज नाही, ती मी तुम्हाला परत देतो आहे.

प्रश्न : गुरुजी, असे म्हणतात की मृत्युच्या शेवटच्या क्षणी जो विचार किंवा जी स्मृती असते त्याचा परिणाम पुढच्या जन्मावर होतो. माझ्या मनात या भौतिक जगाचा खूप परिणाम आहे. या माझ्या मनात मृत्यूचा वेळी फक्त तुमचा आणि तुमचा विचार असावा यासाठी मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: त्यासाठी मृत्युच्या शेवटच्या क्षणाची वाट बघायची काही गरज नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि सेवा, साधना आणि सत्संग करा.

प्रश्न : आदरणीय गुरुजी, मला आपल्या देशाच्या अर्थशास्त्राबद्दल काळजी वाटते ज्यावर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम होत आहे. त्याच वेळी अणु उर्जा घटक आहे हे जपान च्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. आपला देश कसा पुढे जाईल?
श्री श्री रवि शंकर:  लोकांमध्ये त्याबद्दल विचार वाढवा. प्रत्येकाने आपल्या वातावरणाबद्दल सजग राहिले पाहिजे, लोकांसाठी, देशासाठी. जेंव्हा प्रत्येकाला ही काळजी वाटेल, तेंव्हा गोष्टी बदलतील.

प्रश्न : जय गुरुदेव. देव आहे का, त्यावर विश्वास कसा ठेवावा?
श्री श्री रवि शंकर: गाड्या पळत आहेत, तुम्ही त्यांना पाहता का? हो, पण त्यांना कोणी पळवत आहे की त्या आपला आप पळतात? त्यात चालक आहे, बरोबर, पण गाड्या पळताना तुम्हाला नेहमी चालक दिसत नाही, बरोबर?

प्रश्न: गुरुजी, प्रत्येकजण मोक्षाचा मागे पळत आहे. मोक्ष म्हणजे काय ते मला पण कृपया सांगा?
श्री श्री रवि शंकर: तू पण मोक्षाच्या मागे का धावत आहेस? तू जर पळत नाहीस तर मग अडचण काय आहे? जे पळत आहेत त्यांना मी सांगेन, तू त्याची काळजी करू नको.

प्रश्न : गुरुजी माझ्याकडे ३० एकर शेतीखालाची जमीन आहे जिथे शेवटी गुरुदेव दत्ताचे आणि साई बाबांचे एक छोटे देऊळ आहे, पश्चिम दिशेच्या जवळ दक्षिणोत्तर जागा आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार आहे. माझ्या वास्तू तज्ञाने मला सांगितले आहे की अशी जमीन असणे धोकादायक आहे आणि ती काढून टाका. गुरुजी, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर:  हे पहा, ग्रहावर अशी जमीन आहे. प्रत्येक जागेत काही चांगले घडते आणि काही फार चांगले घडत नाही, काही फरक पडत नाही. 'ओम नमः शिवाय' चा किंवा 'गुरु ओम' चा जप करा आणि सर्व नकारात्मक परिणाम दूर होतील.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझा नवरा माझावर नेहमी आरडा ओरडा करतो आणि मी साधारण आवाजात बोलले तरी मोठ्याने बोलतो. इतरांशी अतिशय मृदू बोलतो, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: याचा अर्थ असा की तो इतरांपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतो. त्याने तिथेच फरक केला आहे. इथेपर्यंत तुम्ही सांभाळले आहे; तुम्हाला माहिती आहे की कसे सांभाळावे, संभाळा. तो चांगले बोलेल याची अपेक्षा ठेवू नका, निदान तुम्ही चांगले बोला आणि त्याला कठोर राहू देत. ते एकतर्फी असेल, फरक पडत नाही, सामंजस्य राहील.

प्रश्न :गुरुजी, ज्ञानाचा मार्ग खूप अवघड आहे; समर्पणाने ज्ञान मिळू शकते का?
श्री श्री रवि शंकर: हो, नक्कीच.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी स्वतःची तुलना जगाबरोबर करणे कसे थांबवू?
श्री श्री रवि शंकर: तुमच्याकडे स्वतःची तुलना इतरांबरोबर करण्याइतका वेळ आहे. अरे बापरे, मला वेळच नाही. तुमच्या हातात खूप वेळ आहे, तुम्ही काहीतरी जास्त निर्मितीक्षम करा. तुम्ही बसून स्वतःची जगाबरोबर तुलना करत आहात, वेळेचा केवढां  अपव्यय.

प्रश्न : गुरुजी, आपल्या शास्त्रात चार गोष्टी करा म्हणून सांगितल्या आहेत त्या म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आणि करू नये अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार.  काम हा करावे आणि करू नये या दोन्हीत आहे, असा विरोधाभास का?
श्री श्री रवि शंकर:  हो, कारण ते अती करणे हे चूक आहे आणि योग्य प्रमाणत करणे चांगले आहे. जेवणातील मिठासारखे आहे, योग्य प्रमाणात मीठ चांगले असते आणि जास्त मीठ चांगले नसते.

प्रश्न : ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक ज्योतिषी वेगवेगळे खडे आणि अंगठ्या घालायला सांगतात. तुम्ही त्या घालायला सांगता का आणि जर तुम्ही अध्यात्मिक मार्गावर असाल तर या गोष्टी घालायची गरज आहे का?
श्री श्री रवि शंकर: नाही, काही गरज नाही, नक्कीच प्रत्येक गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर थोडाफार परिणाम होतो पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दगडाच्या एका तुकड्यापेक्षा नक्कीच शक्तिशाली आहात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा. नाहीतर 'ओम नमः शिवाय' चा जप करा, तो सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे की जो कुठल्याही ग्रहाचे वाईट परिणाम घालवू शकेल. The Art of living