एक देवत्व, एक माणुसकी, विविधतेचा उत्सव, हेच आपले पवित्र कर्म आहे.

बर्लिन, जुलै २-३. आर्ट ऑफ लिव्हिंग ची ३० वर्षे पूर्ती सोहळा

वर्ल्ड कल्चर फेस्टिवल मधील श्री श्री रवि शंकर यांच्या भाषणातील काही अंश 

जिथे लोकांमधील भिंती नाहीशा झाल्या अशा या शहरात येऊन मला खूप आनंद होत आहे, आता विविध सभ्यता आणि संस्कृतींमधील भिंती नाहीशा होण्याची वेळ आली आहे.  आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपल सगळ "जग एक कुटुंब आहे".  आपण सगळ्यांना प्रेम, दया आणि सेवेच्या भावनेमध्ये एकत्र आणले पाहिजे. 

आम्ही जेंव्हा सुरुवात केली, आमची एक कल्पना होती, आजच्या कार्यक्रमाचा विषय 'इंद्रधनुष्याचे रंग' असेल आणि पाऊस आला आहे! कठीण परिस्थितींमध्ये गाणे हेच दाखवते, की आपण काहीतरी मिळवले आहे. 

परिस्थिती कशीही असो, एक कुटुंब बनुन आम्ही जगाची सेवा करणे चालूच ठेवू, . विविधता आणि या ग्रहावरील जीवन यांचा उत्सव साजरा करायची ही वेळ आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने, आमच्या मुलांसाठी तणाव-मुक्त, हिंसाचार मुक्त समाज घडवू शकतो. दारिद्र्य नसलेला, विविधतांचा उत्सव करणार आणि देवत्वाशी जोडलेला.' एक देवत्व, एक माणुसकी, विविधतेचा उत्सव, हेच आपले पवित्र कर्म आहे. '

The Art of living
© The Art of Living Foundation