चालत रहा आणि भाव उच्च ठेवा

बर्लिन, जुलै ४ :
भव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवानंतर बर्लिन मध्ये, स्वयंसेवकाच्या गटाने श्री श्री समोर आपले अनुभव सांगितले 

श्री श्री रवि शंकर : अडचणी हे बघण्यासाठी येतात की तुम्ही त्यातून पार होवू शकता की नाही, तुमच्यात शक्ती आहे. तुमचा भाव नेहमी उच्च असायला हवा. काही फरक पडत नाही, काही हरकत नाही, पुढे चला आणि भाव उच्च ठेवा. हा महत्वाचा धडा आहे - मग तुम्हाला घटनांचा काहीच फरक पडत नाही. अडचणीतूनच तुम्ही शिकत जातात. ह्या तात्पुरत्या अडचणी आहेत, त्यांच्याकडे हसत हसत बघा.

प्रश्न: माझे साहेब खूप हट्टी  आहेत. आमच्यात  खूप वाद  होतात. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: सोपे आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते वेगळ्या पद्धतीने म्हणा. मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एका माणसाची बायको खूप हट्टी होती.ती नेहमी नवरा जे म्हणेल त्याच्या उलट करायची. नवरा निराश झाला आणि एका स्वामीकडे सल्ला मागण्यासाठी गेला. स्वामी त्याच्या कानात काही तरी पुटपुटले. तीन महिन्या नंतर, स्वामी त्याच्या शहरात आले आणि त्यानी त्याला आनंदित बघितले. त्याने स्वामीजींचे आभार मानले आणि म्हणाला,"तुमची युक्ती कामी आली.स्वामीजींनी त्याला सल्ला दिला जे काही पाहिजे आहे त्याच्या उलट मागायचे. उदाहरणार्थ, जर त्याला तळलेले बटाटे हवे असतील तर त्याने बायकोला बिना तळलेले बटाटे मागायचे. आपण आपल्या मनाला कसे सांभाळतो यावर अवलंबून आहे. जेव्हा संभाषण तुटून जाते तेव्हा बोलू नये. कडक लोक तुमचे गुण वाढवतात.

प्रश्न: तुम्हाला निराशा कमी करण्यासाठीच्या औषधाबद्दल तुम्हाला काय वाटत?
श्री श्री रवि शंकर: ज्ञानात राहा. ज्ञानाच्या गोष्टी ऐका आणि आपला अभ्यास रोज करा. मग तुम्ही नैराश्येत जाणार नाही. वैद्यकीय सल्ला माना आणि हळू हळू पुढे जा. सेवा करा, एका समुदायामध्ये सामील व्हा. जेव्हा तुमच्याकडे काही नसत, तेव्हा तुम्ही स्वतः बद्दल विचार करता आणि निराश होता.

प्रश्न: आम्ही कुणाला प्रार्थना करायची, तुम्हाला की देवाला? तुम्ही आमची प्रार्थना देवा पर्यंत पोहोचवाल किं तुम्हाला सरळ मिळतील?
श्री श्री रवि शंकर: प्रार्थना जन्मजात आहे. हे असे नाही जे तुम्ही मनाने करता किंवा मनात असत. ते आपोआप घडत जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते. प्रार्थना करण्यासाठी प्रयत्न करू नका. आरामात राहा.देव फक्त एकाच आहे जो सगळ्यांसाठी काम करीत असतो. तुम्ही कुणालाही प्रार्थना करा, ती एकाच देवाला जाईल जो या ब्रम्हांडाच्या निर्मितीला कारणीभूत आहे. कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. मला तुमच्या सगळ्या समस्या द्या आणि आनंदाने घरी परत जा.

प्रश्न: तुम्ही सगळ्या प्रार्थनेचे उत्तर देता?
श्री श्री रवि शंकर: तुम्ही काय मागता या बाबत काळजी पूर्वक राहा. तुम्ही नेहमी शेवटी एक वाक्य जोडायला हव, "आणि जे काही योग्य असेल ते."

The Art of living
© The Art of Living Foundation