गुरु पोर्णिमा विशेष

बुधवार, जुलै ७ , २००९

गुरु सिद्धांत आयुष्यात महत्वपूर्ण आहे. पहिला गुरु हा दक्षिणामूर्ती आहे. अनंताचे अवतार कुशाग्रतेने विणले गेले की परिमित आणि अनंतासोबत अस्तित्वात राहतात. गुरु तत्व हे सर्व मनुष्यात आहे. ती बुद्धिमत्ता प्रत्येकात लागू आणि जागृत करायला हवी.

हे तत्व जेव्हा जागृत होते, आयुष्यातील कष्ट दूर होते. हे कष्टाचे औषध आहे, सर्व विद्येचे धन आहे.

गुरवे सर्व लोकानाम- दिव्य चेतना हा पूर्ण जगाच्या जगतातली प्रमुख प्रकाश आहे.
बिशाजे भव रोगीणाम - हे औषध आहे समाजातील रोग्यांसाठी, आयुष्यासाठी, दु:खीतांसाठी. हे सगळे कष्ट दूर करतो.
निधाय सर्व विद्यानाम श्री दक्षिनामुर्तये नमः   - मी या चेतनेला शरण जातो जे माझ्या हृद्यात आहे.

गुरु शब्दाचा अर्थ आज विशेषज्ञ म्हणून केला जातो - जसे व्यवसाय प्रबंधात विशेषज्ञ. गुरु म्हणजे असाधारण, मोठे. अर्थातच, विशेषज्ञ हा त्याचा एक भाग झाला. या सगळ्यात पूर्णता आहे. गूढता आहे. आपल्या चेतनेत, बुद्धिमत्ता तेव्हाच आयुष्यात येते जेव्हा गुरु तत्व आयुष्यात असते.जेव्हा आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हा गुरु तत्व आयुष्यात येते. तुम्ही कधी कुणासाठी काही करण्याची इच्चा केली आहे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता? मग तुम्ही गुरु होण्याची भूमिका पार पाडली.आई ही पहिली गुरु आहे. मग आपले शिक्षक येतात - विना शिक्षक  आणि इतर अनेक. सदगुरु सत्याचे ज्ञान,अंतिम वास्तविकता, अध्यात्मिक ज्ञान देतो.
गुरुपोर्णिमेला प्रत्येकाने चिंतन करावे, " मी कुठे होतो हे ज्ञान मिळण्यापूर्वी? मी आता कुठे आहे?" तुम्ही जेव्हा विपरीत बघता तुम्ही या ज्ञानाशिवाय कुठे होतात, तर आभार व्यक्त होतो.
या पोर्णिमेला व्यास पोर्णिमा देखील म्हटले जाते. व्यासांनी ही ज्ञानाची विद्या ४ वेदात श्रेणी बद्ध केली आहे, उपनिषद, उपवेद, २७ स्मृती, २७ उपस्मृती - एक मोठ्ठी ज्ञानाची विद्या जीवनाच्या प्रत्येक बाबींशी संबंधित आहेत आयुर्वेद ते वास्तुशास्त्र ते चिकित्सा ते औषध.ही पोर्णिमा त्यांच्या नावावर आहे.

हा दिवस आपण त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवतो ज्यानी मानव जातीच्या भल्यासाठी काम केले आहे . आपण लक्षात ठेवतो त्यांनी काय केले.
तुम्ही किती नशीबवान आहात तुमच्या आत अनंत अनुभव आहेत. या विशिष्ट साच्यात शरीर आणि मन जडलेला आहे. शरीर आणि मन सीमित आहेत पण भावनेची अभिव्यक्ती अनंत आहे.
साधकासाठी, नवीन वर्ष म्हणजे गुरुपोर्णिमा आहे. जेव्हा बाकीच्या जगासाठी ही अर्धी वाट असते, आम्ही अध्यात्मिक मार्गावर पूर्ण वर्ष साजरा करतो. आपल्या जीवनात दिव्य अभिव्यक्तीच, दिशेचं एक वर्ष आहे. एक वर्ष एकरूपतेची भावना आणि जगाला गुरूच्या चक्षूने बघणे. गुरू हा मार्गदर्शन करणारा आहे. मला ते करू द्या जे एका गुरुने, एका भल्या माणसाने या परिस्थितीत केले असते. बुद्धिमान व्यक्ती कधी प्रतिक्रिया देणार नाही. ते उत्तर देतील. तुम्ही शिकाल जेव्हा स्वतःला  त्या जागी ठेवाल (गुरु किंवा बुद्धिमान व्यक्ती) पुन्हा पुन्हा अनंत धेय्याचे प्रयत्न, विशाल बुद्धिमत्ता, पूर्ण दया आणि आनंद.

कुणालाच माहित नाही ही प्रथा कधी सुरु झाली. करोडो वर्षांपूर्वी, या पृथ्वीवर, किती सारे संत आणि ऋषी होऊन गेले आणि किती तरी पुढे भविष्यात होतील. आपण त्या सगळ्यांचे ज्ञानाच्या योगदानासाठी  भूतकाळात, वर्तमानात, आणि भविष्यात आभार मानतो. बुद्धीमत्तेशिवाय हे जगणे नाही, फक्त आहेच. आयुष्याची सुरुवात बुद्धिमत्तेने होते.

या गुरुपोर्णिमेला तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्याबद्दल विचार करा आणि आभार व्यक्त करा. सगळे गाऊ या आणि आंतरिक आनंदात डुबून जाऊया.
The Art of living

© The Art of Living Foundation