आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत



गुरुजींचे गुरु पौर्णिमेच्या दिवसाचे  प्रवचन 
मोन्त्रिअल, १५ जुलै  २०११ : 

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुमचे आयुष्य गुरु तत्व आहे. तुमच्या आयुष्यावर एक प्रकाश झोत टाका. ज्ञान जे तुमच्या आयुष्यातून उजळेल - तुम्ही आदर दिला पाहिजे, आणि त्यालाच गुरूचा आदर म्हणतात.  हे पहा, आयुष्याने तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवल्या आहेत - तुम्ही काय चुकीचे केले आणि काय बरोबर केले, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकला नाही, तर गुरु तिथे नसतो.  तुमच्या आयुष्याकडे बघा आणि आयुष्याने दिलेल्या ज्ञानाचा आदर करा. त्यालाच गुरूचा आदर म्हणतात. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? हे काहीतरी महत्वाचे आहे.

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुम्ही आयुष्यावर प्रकाश टाकता, आणि जेंव्हा ज्ञान असते, ज्ञानाचा आदर करा. ज्ञान हेच गुरुतत्त्व आहे. तर, तुमच्यामध्ये गुरु तत्व आहे, ज्ञान आहे. प्रत्येकामध्ये ज्ञान आहे.  त्यावर प्रकाश टाका. आयुष्यात ज्ञान म्हणजे पाहत आहे; ज्ञान आले आहे;ज्ञानाचा आदर करा. आपण जेंव्हा ज्ञानाचा आदर करणे थांबवतो तेंव्हा अंधार येतो, तेंव्हा  पौर्णिमेचा चंद्र नसतो, तिथे चंद्रच नसतो. चंद्र म्हणजे मन आणि आणि जेंव्हा तो ज्ञानाने पूर्ण भरलेला असतो तेंव्हा गुरु पौर्णिमा असते. त्यामुळे जेंव्हा तुम्ही आयुष्याने काय शिकवले त्याचा आदर केलात तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी गुरु पौर्णिमा असू शकते.

बऱ्याच वेळा आपण आपले तोंड दुसरीकडे फिरवतो, डोळे बंद करतो आणि आपल्या इच्छा गिळून टाकतो. मला हे, हे, हे आणि हे हवे आहे - ज्ञानाचा मान न ठेवता आपण इच्छा गिळून टाकतो.  हे पहा, देणाऱ्याने तसेही दिले आहे, त्याने तुम्हाला खूप काही दिले आहे. पहिली गोष्ट ही की ज्ञानाचा आदर ठेवा, दुसरी गोष्ट अशी की या गुरु पौर्णिमेला तुम्हाला दिली गेलेली भेट वापरा.  तुम्हाला खूप आशीर्वाद दिले गेले आहेत. तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांचा वापर करा आणि तुम्हाला अजून मिळेल. त्देणारा न दमात देत आहे आणि तुमच्याकडून काही ओळख पण नकोय आणि तुम्हाला असे भासवतो की ते तुमचेच आहे.  देणारा देतो आणि तुम्हाला अशी भावना देतो की ते तुम्ही मिळवले आहे. देणाऱ्याला अंत नाही, आणि देण्याने तो दमणार पण नाही, देणारा देतो;  अनंत तुम्हाला भरपूर देत राहतो, आणि आपल्याला जे मिळाले आहे ते आपण चांगल्यासाठी वापरले पाहिजे.

तुम्हाला एक चांगले भाषण दिले आहे; ते चांगल्यासाठी वापरा. तुमचे भाषण तक्रारींसाठी, आरोपांसाठी, वाईट गोष्टी बोलण्यासाठी वापरू नका. तुम्हाला उत्तम बुद्धी दिली आहे, बुद्धी वापरा. लोक बुद्धी वापरण्यामध्ये इतका कंजूसपणा का करतात ते मला कळत नाही.   तुम्हाला वाईन माहित आहे, ती जेवढी जुनी होईल तेवढी चांगली आणि महाग होत जाते. मी असे  ऐकले आहे, वाईन कधी घेतली नाही. त्याच प्रमाणे बुद्धी वापरा ती चांगली होत जाईल. आपण ते जेव्हडे चांगल्यासाठी वापरू, तेव्हडी ती जास्त तरतरीत होत जाईल. काळजी करू नका. तुम्ही असा विचार करू नका की बुद्धी वापरल्याने कमी होईल. ती न वापरल्याने, ती कमी होईल. तुमची बुद्धी चांगल्यासाठी वापरा. तुमचा आवाज सुस्वर असेल, तर चांगल्यासाठी वापरा. तुमच्या शरीरात ताकद आहे, सेवा करा.  तर, आपल्याला जे काही दिले गेले आहे, ते चांगल्यासाठी वापरा. जेंव्हा मी चांगल्या वापरासाठी म्हणतो, तेंव्हा ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, जगासाठी वापरा. देवत्व जगात राहते. तर जगाची सेवा करणे म्हणजे देवत्वाची पूजा आहे.

ज्ञानाचा आदर केल्याने आयुष्याचा स्तर उंचावतो. आणि तुम्हाला हे दोन जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता आणि जेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता, भावनांनी पूर्ण, तेंव्हा ते अनंताला भावते. एवढेच  !

हे जाणून घ्या की प्रत्येकामध्ये गुरु आहे आणि ज्ञानाचा प्रकाश देतो आहे, तिथे आरती करा, तिथे आत असलेल्या गुरु साथी. आरती करणे म्हणजे काय? परमानंद, अशा परमानंदामध्ये ज्ञानाबरोबर जाणे, आयुष्याने आपल्याला काय दिले आहे त्यावर प्रकाश टाकणे. सत्य काय आणि असत्य काय? बरोबर काय आणि चूक काय? आपण जे बरोबर नाही ते का निवडले, ते करायला आपल्याला कशाने भाग पडले आणि बरोबर काय आणि चूक काय? हे तुम्हाला कुणाला विचारायला नको. तुमच्या आतले काहीतरी तुम्हाला सांगते. हो की नाही? आत काहीतरी टोचते, हे चुकीचे आहे. त्याचा आदर करा, आदर करा! तुम्ही ऐकत आहात? सगळे?

हे खूप सोप्पे आहे, तरी गहन आहे.

तुम्हाला माहिती आहे, धार्मिक असणे आणि धार्मिकता न दाखवणे ही एक सुंदर गोष्ट आहे. जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि भेटवस्तू दिल्याची भावना दिली, तर ती भेट आहे? बघ, मी तुला भेट देतो आहे, मी तुला भेट देतो आहे. दहा वेळा कोणीतरी सांगते आणि हातात चोकलेट देते, तुम्ही काय म्हणता? तुझ्याकडेच ठेव, मला नको. त्याचप्रमाणे जेंव्हा धार्मिक असूनही आपण धार्मिकता दाखवत नाही; मी बरोबर आहे, मी बरोबर आहे. धार्मिकता दाखवणे राग आणते, निराशा आणते आणि या ना त्या दृष्टीने चुकीचे ठरवते. एका दृष्टीने तुम्ही बरोबर असाल. दुसऱ्या दृष्टीने तुम्ही चूक असता. तुम्ही माझ्याबरोबर  आहात ना? याचा काही अर्थ आहे का? बरोबर असणे आणि धार्मिकता न दाखवणे, शुद्ध असणे आणि त्याचा अभिमान नसणे, दयाळू असणे आणि त्याचे प्रदर्शन न मांडणे - मी काय म्हणत आहे ते तुम्हाला दिसते आहे का?  हुशार असणे आणि ' पहा मी किती हुशार आहे' असा बाजा न वाजवणे - त्यातला रस निघून जातो, बरोबर, तुम्ही काय म्हणता? हुशार असणे आणि स्वाभाविक असणे, अगदी स्वाभाविक, साधे, साधेपणा; कधी कधी  मूर्ख बनायला पण तयार असणे. हे खूप सुंदर ज्ञान आहे. तुमचे आयुष्यच हे तुमच्याकडे आणते आणि तुमच्या आयुष्यात दाखवते. तुमच्या आयुष्यावर चिंतन करा, परत परत आणि परत आणि परत आणि परत. खूप छान!

खोलीच्या शेवटी लांब इकडे तिकडे करणाऱ्या लोकांकडे पाहून, श्री श्री म्हणाले:

काही लोक असतात की जे सारखे वर खाली जात असतात, त्यांना माहित नसते की कुठे जायचे किंवा काय करायचे. तिथेच आपल्याला मार्गदर्शक लागतो, एक गुरु, काही लोक त्याच रस्त्यावरून वर खाली करत असतात, दार कुठे आहे हे माहित नसते , आणि कुठून आत जायचे ते माहित नसते. पहा, आजूबाजूच्या लहान लहान गोष्टी नीट पहिल्याने सुद्धा किती टरी शिकायला मिळते.

एका संताबद्दल एक गोष्ट आहे; मला वाटते संत रामदासांची . ते पहाटे एका गावातून चालत निघाले होते आणि एक बाई, तिच्या झोपडीच्या बाहेर समोर झाडत होती, आणि ती म्हणाली, 'राम उठ, अजून किती वेळ झोपणार आहेस?', तिने तिचा आत झोपलेल्या मुलाला हाक मारली. एक तरुण मुलगा, ज्याचे पण नाव राम होते. जेंव्हा त्या संताने ते ऐकले , ज्याचे नाव राम होते, तो लगेच म्हणाला, ' अरे, कोणीतरी मला जागे व्हायला सांगत आहे'. असे म्हणतात की त्याच क्षणी तो खरोखरच जागा झाला. म्हणाला, 'वाह!', खरच तो इतका उत्साहित झाला. ते म्हणाले, त्यानंतर मी कधी झोपलोच नाही, मी इतका तरतरीत झालो, माझे मन सारखे भूतकाळ आणि भविष्यकाळात जाऊन उसळत होते'.

त्याला कोणीही सांगितले नाही, की तू हे केले पाहिजेस, तू ते केले पाहिजेस आणि मान तुला असे फिरवू शकते. आपले मान त्याची स्वतःची माया बनवते, स्वतःचे जग बनवते, त्याचा स्वतःचा बुडबुडा आणि आपण स्वतःच्याच बुडबुड्यात फिरत राहतो. आपण सगळे जग आपल्याच चष्म्यातून पाहत असतो आणि सगळे तसेच मनात असतो. याला विपर्याय म्हणतात.

विपर्याय म्हणजे रंगवलेली दृष्टी, बरोबर नसलेली दृष्टी. तर गुरु तत्व किंवा ज्ञान असा प्रकाश आहे की ज्याने तुम्ही खरच जागे होता अनो पाहता - ओह, हे असेच आहे!

मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असे वाटले की तुमची मते चुकलेली आहे?

पहा, बऱ्याच वेळा तुमचे निर्णय चुकले आहेत पण तुम्ही जेंव्हा निर्णयात होता, तुम्ही विचार केलात की या गोष्टी अशाच आहेत - तो बुड बुडा आहे ज्यात आपण असतो, गुरु तत्व म्हणजे बुड बुड्यातून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे,  गुरु तत्व म्हणजे त्या बुड बुड्या मधून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे, आयुष्याने दिलेल्या ज्ञानावर प्रकाश टाकणे. हे पहा. मग आपण पाहतो की आपले निर्णय अधिकाधिक बरोबर होत जातात. आता ९०% निर्णय चुकीचे असतील आणि १०% बरोर, हे खरेतर उलटे झाले पाहिजे. ९०% बरोबर आणि १०% चूक, २% किंवा ३% किंवा १०% चुकणे ठीक आहे.
१. तुमचे स्वतःचे आयुष्य तुमचा गुरु आहे.
२. आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. हे लहान मुलांच्या शाळेतील शिक्षकांसारखे नाही- तुम्ही काहीतरी शिकता आणि जाता आणि बस्स, पण आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहे.
३. तुमच्या आयुष्यातील ज्ञान तुमचा गुरु आहे. आयुष्यावर प्रकाश टाका आणि त्यानेच ज्ञान येते.
४.देणाऱ्याने तुम्हाला भरपूर दिले आहे आणि देत आहे, त्याचा चांगला वापर करा. आपण आपल्या क्षमतांचा जेव्हडा चांगला वापर करू तेवढे जास्त आपल्याला मिळत जाते.
५. ज्ञानाचा आदर करा. तुम्हाला माहिती आहे, ज्ञान, त्याचा आदर करा कारण गुरु आणि ज्ञान अविभाज्य आहेत आणि आयुष्य आणि ज्ञान अविभाज्य असावेत. कधी कधी आपण आपले आयुष्य ज्ञानाशिवाय घालवतो. मग तिथे गुरु तत्व नसते. तुम्ही गुरूचा आदर करत नाही. समजले. ते सदगुरू आहे.
६. धार्मिक राहा आणि धार्मिक पणा दाखवू नका. धार्मिकपणा दाखवणे तुम्हाला या ना त्या मार्गाने चूक ठरवतो आणि राग आणि निराशा आणतो. तसेच चांगले असण्याचे पण आहे. जर तुम्ही असे म्हणाल की मी चांगला आहे तर तुम्ही असा विचार करता की बाकीचे वाईट आहेत. ‘मी खूप चांगला आहे’ ते दु:खी  भाव आणते. जे लोक स्वतः खूप चांगले आहेत असा विचार करतात ते स्वतः वाईट आहे असा विचार करणार्यांपेक्षा आनंदी असतात. जे लोक स्वतःला वाईट समजतात, ते काळजी करत नाहीत, पण जर कोणी म्हणेल की ' मी चांगला आहे', तर ते विचार करतात, ' हे माझ्याबरोबर काय होत आहे'. तर मी जर असा विचार केला, ' मी खूप चांगली आहे', माझा चांगुलपणा दाखवणे मला दु:खी बनवू शकते. माझा धार्मिकपणा दाखवणे मला रागिट बनवते. चांगले राहा आणि चांगुलपणा दाखवू नका. इतरांना त्याबद्दल बोलू देत; तुम्ही स्वतःच स्वतःचा बाजा वाजवू नका. दयाळू राहा पण दयाळूपणा दाखवू नका.

आपल्याला हेच करायचे आहे - परत आणि परत परत या गोष्टी गोळा करायच्या आहेत, आणि आपल्या बुद्धीने परत परत शोषून घ्यायचे आहे. हाच सत्संग आहे. सत्संग म्हणजे सत्याबरोबर असणे, हुशारी बरोबर असणे, तुमच्या आत असलेल्या ज्ञानाबरोबर असणे. तुमच्या आतील सत्याबरोबर हात मिळावा, समजले?

देणारा देऊन दमला नाही. तो देऊन कधी दमात नाही आणि ते तुमचेच आहे अशी भावना तुम्हाला देतो. तो दयाळूपणे तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल अशी भावना देत आहे, ' अरे पहा, हे माझे आहे'. खरेतर, तुमचे काहीच नाही. पण देणारा असा देतो की तुम्हाला घेतल्यासारखे वाटत पण नाही. काय? देणारा असे देतो की ते तुमचेच आहे असे तुम्हाला वाटते, तुम्ही घेतले पण नाही, तोच मोठेपणा आहे आणि तीच सुंदरता आहे.

त्याचप्रमाणे, त्या बाईचे स्वतःच्या मुलाला उद्देशून ओरडणे त्या संताला जागे करू शकले आणि आत्मसाक्षात्कार होऊ शकला, तेच होते - बाई म्हणाली: ' राम तू किती उशीरपर्यंत झोपणार आहेस, जागा हो. कधीपर्यंत झोपणार आहेस?', उठ आणि तिथूनच रामदास स्वामींचा प्रवास सुरु झाला. तुम्ही जागे होण्यासाठी निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या संधी देत आहे, तुम्ही कधीपर्यंत झोपणार आहात, तुम्ही तुमचे मन कधीपर्यंत  वापरत बसणार आहात का, का, का, का. तक्रार करणारे, रडणारे ओरडणारे मन, जागे व्हा, आयुष्य खूप कमी आहे. या कमी वेळात आयुष्याचा मन ठेवा! ते इतके अनमोल आहे. तुमची कौशल्ये आणि संसाधने , जी तुमच्या दाराशी आली आहेत यांचा चांगला वापर करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा चांगला वापर करा, तुमचा आवाज, तुमची बुद्धी. कुणी कौतुक करो अथवा ना करो, तुम्ही गा.