हे जाणून घ्या की एक शक्ती आहे जी सगळ्यांची काळजी घेत आहे आणि ती शक्ती तुमच्यावर प्रेम करते.

मोन्त्रिअल, जुलै ९:

प्रश्न: प्रिय गुरुजी, सर्व भितींवर विजय कसा मिळवावा आणि जर यश मिळाले तर या अनुभवातून काय अपेक्षा ठेवावी?
श्री श्री रवी शंकर: "सगळ्या" भीती असे काहीही नाही. फक्त एकच भीती असते आणि ती नष्ट होण्याची भीती आहे आणि निसर्गानेच ती भीती ठेवली आहे.  आणि ती नष्ट कशी होईल तर हे समजून घेण्याने की 'मी शरीर नाही, मी आत्मा आहे. '  पहिली गोष्ट. दुसरी 'माझ्याबरोबर सगळे चांगलेच होईल' एव्हडेच. तिसरे नाही.

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्ही खूप वेळा स्वप्नात येता  आणि उत्तरे देऊन अध्यात्मिक मार्गदर्शन पण केले आहे.  हे खरे आहे का, मी यावर विश्वास ठेवू का?
श्री श्री रवी शंकर: जेंव्हा सगळे चांगले होत असेल तर..... पण गोष्टी चुकीच्या होत असतील तेंव्हा तुमचे स्वतःचे मन असते! (हशा)  हे पहा, जर तुम्हाला विचार आला, आणि तो बरोबर ठरला तर "मला अंतर्ज्ञान झाले असे म्हणता.  जर ते सत्य परिस्थितीबरोबर जुळले नाही तर तुम्ही त्याला "मला अंतर्ज्ञान झाले" असे म्हणत नाही'.तुम्ही कसे म्हणता? "मला भास झाला". भास आणि अंतर्ज्ञान यातला फरकच हा आहे की भास बरोबर नसतो.

प्रश्न: महत्वाचे काय आहे, आनंद की कर्तव्य?
श्री श्री रवी शंकर : दोन्ही.  तुम्ही तुमचे कर्तव्य केले पाहिजे आणि आनंदी पण राहिले पाहिजे. तूम्हाला दोन्हीमधला पर्याय का हवा आहे? हं....जर पर्याय असेल तर कर्तव्य आधी करा, तुम्ही आनंदी नसला तरी ते तात्पुरते असेल. ..बरोबर?  आनंद तर आहेच, तो येईल. पण जर तुम्ही कर्तव्यापेक्षा आनंदाला निवडले तर शेवटी तुम्हीच दु:खी  व्हाल.  सुरुवातीला थोडे दु:खी राहणे हे नंतर कायम दु:खी राहण्यापेक्षा कधीही चांगले.

प्रश्न: गुरुजी, कृपया कर्मांचे नियम सांगा, मी शारीरिक त्रासांपासून कसा मुक्त होऊ आणि निःस्वार्थी सेवा कशी करू? माझा शारीरिक आजारांमुळे मी कार्यरत, प्रेमळ आणि आनंदी राहू शकत नाही. मी लौकर दमतो. कृपया मार्गदर्शन करा. खुप सारे प्रेम.
श्री श्री रवी शंकर: तुम्हाला माहिती आहे, त्याची काळजी करू नका हे सर्वोत्तम आहे. कळले? कर्म फक्त मनात असते, तरी तुम्ही शारीरिक आजारांबद्दल काळजी करता "अरे ही माझी कर्मे आहेत....." पहा, शरीराची त्याची मर्यादा आहे. प्रत्येकाच्या शरीराला मर्यादा आहेत. आपण निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्याचे तोटे सहन करायलाच लागणार आहे.  ठीक  आहे?  तुमचे  मन मजबूत ठेवा, आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला परमानंद कधी आणि केंव्हा मिळेल?
श्री श्री रवी शंकर: काही शक्यता नाही (हशा) . नाही. विसरून जा. तुम्ही विसरून जायला तयार आहात का? मग तुम्हाला आत्ता कळेल. तुमचे मन " परमानंदाबद्दल, मला एक दिवस परमानंद मिळवायचा  आहे....." याबद्दल चिंतीत आहे.

प्रश्न: माझ्या हृदयाला पुढे जायचे आहे पण मन जाऊ देत नाही, मी काय करू गुरुजी? आभारी आहे.
श्री श्री रवी शंकर त्यांचे सतत भांडण होतच असते. जसे वृद्ध जोडपे सारखे भांडत असते (हशा)

प्रश्न: मी अशा चुका केल्या आहेत की त्याचा परिणाम इतरांवर पडला आहे अशा परिस्थितीत मला शांतता कशी मिळेल?
श्री श्री रवी शंकर: तुम्ही योग्य जागी पोहोचला आहात.

प्रश्न: प्रिय गुरुजी, नमस्कार. मोठे बक्षीस मिळवण्याच्या इच्छेने लॉटरीचे तिकीट घेतले तर चालेल का? (हशा) की ते पैसे घेणे चांगले नाही. कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री रवी शंकर: काहीच बोलायचे नाही. मला तुमच्या मनात दुसरे द्वंद्व निर्माण करायचे नाही.

प्रश्न: गुरु पौर्णिमेची इच्छा म्हणून मी लॉटरीचे बक्षीस मागू शकतो का?
श्री श्री रवी शंकर: मन किती गमतीदार वागते! फार काही न करता लॉटरी हवी आहे. छान छान छान छान.

प्रश्न: जय गुरु देव गुरुजी, कृपया मला माफ करा.
श्री श्री रवी शंकर: केले.

प्रश्न: प्रिय गुरुजी, पतंजली म्हणतात की योग तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. आदिशंकर म्हणतात की फक्त ज्ञानच मुक्ती देऊ शकते. कृपया समजावून सांगा.
श्री श्री रवी शंकर: आणि तुम्ही विसरलात की भक्ती सूत्र सांगते की फक्त समर्पणच मुक्ती देऊ शकते! जोडले जाणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. विचाराने बुद्धी शुद्ध होते. तुम्ही जर बुद्धीजीवी असाल तर बुद्धी हेच परम आनंदात राहण्यापासून दूर ठेवते. मन मध्ये येते आणि प्रश्न विचारात राहते, शंका घेत राहते.
ज्ञानातून बुद्धी शुद्ध होते.
योगाने शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो.
प्रेम/समर्पणाने हृदय शुद्ध होते.

तुम्ही एक रस्ता निवडला तर बाकीचे दोन रस्ते बरोबर येतात.  ते होईल, ते होते. योग म्हणजे एकत्र येणे आणि एक होणे आणि जर तुम्ही हृदयःचा मार्गाने गेलात, नक्कीच आपोआप एकी होईल आणि जेंव्हा एकत्र येणे होते तेंव्हा ज्ञान येते.ज्ञान मार्गाने जा - जोपर्यंत ज्ञान प्राप्तीचा उत्साह नसेल तोपर्यंत ज्ञानात कसे जाणार?  उत्साहाचा पाया प्रेम आहे. तर, ज्ञानामध्ये प्रेम पण आहे. जर ज्ञानाबद्दल प्रेम नसेल तर त्यासाठी उत्साह पण येणार नाही. म्हणून तुम्ही जरी ज्ञान मार्गाने गेलात तरी तिथे प्रेम आहेच, फक्त लपलेले आहे. आते बरोबर येते आणि फुलते.  जेव्हडे जास्त तुम्हाला माहिती होईल तेवढे जास्त तुम्ही त्यावर प्रेम कराल, तेवढे जास्त तुम्हाला ते आवडेल. हे एक रहस्य आहे. हं?  इंग्रजी म्हण आहे ' अतिपरिचयात अवज्ञा' ठी अतिसाय उथळ आहे. तुमचा तेवढा परिचय होईल, तेवढे जास्त प्रेम त्यात तुमच्यासाठी फुलेल. बरोबर? म्हणून, तुम्ही ज्ञानातून जा अथवा प्रेमातून जा अथवा योगामधून जा. योगामध्ये कर्म योग, कृत्य पण येते. योग म्हणजे एकत्रित येणे. बाकीचे दोन बरोबर येतात.

प्रश्न: तुमचे ज्याचावर प्रेम आहे आणि ते विरोध करत असतील तरी त्यांना अध्यात्मिक मार्गावर कसे आणावे? मी प्रयत्न करत राहतो पण त्याचा की उपयोग होताना दिसत नाही.
श्री श्री रवी शंकर : प्रयत्न सोडू नका.  तुमच्या सर्व युक्त्या वापरा. प्रश्न असा आहे की जर कोणी विरोध करत असेल तर त्यांना अध्यात्मिक मार्गावर कसे आणावे. मी म्हणेन, प्रयत्न करत राहा, परत प्रयत्न करा आणि करत राहा. जर ते हट्टीपणा करत असतील तर तुम्ही जास्त हट्टी व्हा.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही कोण आहात आणि काय आहात यावर मला शंका घ्यायची नाही पण तरीसुद्धा शंका आहे. मी काय करावे?
श्री श्री रवी शंकर: काही हरकत नाही, तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे जास्त शंका घ्या. तुम्ही शंका घेण्याला माझी काही हरकत नाही. जाणून घ्या की आपण ज्याचावर शंका घेतो ते नेहमी चांगले असते. आपण प्रेमावर शंका घेतो, रागावर नाही. आपण आपला क्षमतांवर शंका घेतो, आपला कमतरतांवर नाही. आपण आपल्या आनंदावर शंका घेतो. आपला शंकांचा स्वभाव जाणून घ्या.

प्रश्न: गुरुजी, आडमुठ्या लोकांचा राग निघून जाण्यासाठी, ज्यांना अध्यात्मिक मार्गावर यायचे नाही त्यांना कशी मदत करावी?
श्री श्री रवी शंकर: तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य द्या. तुम्ही कोणावर ताबा ठेवू शकत नाही. ही व्यक्ती अशीच आहे, तुम्ही त्यांचे काय कराल? आपल्या काही कुणाला काही सांगण्याने ते बदलणार नाही आणि तुम्ही कुणावर ताबाही ठेवू नये.  माझा निष्कर्ष हा आहे, काय? कुणावरही ताबा ठेवू नका. त्यांना ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जाऊ द्यात.  त्यांनी ऐकले तर फक्त त्यांना मार्गदर्शन करा, तसेही हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय करू शकता?

तुम्हाला मी काय सांगतोय ते समजत आहे का? तुम्ही त्यांच्यावर ताबा ठेवायचा प्रयत्न करा - तुमची मुले, पती-पत्नी आणि मित्र - कुठलाही हेतू न ठेवता;  तुमचे त्यांना ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात काहीच वाईट हेतू नाही. पण ते जेंव्हा रागावतील तेंव्हा तुम्ही काय करू शकता?  तुम्हाला माहिती आहे, तुमच्या ताबा ठेवण्याच्या प्रयत्नामुळे तुम्हाला राग येतो.  ज्या क्षणी तुम्ही ताबा ठेवणे थांबवलं , त्या क्षणी तुमचा राग नाहीसा होईल, कळले? हं?  जेंव्हा कोणी तुमचे ऐकत नाही तेंव्हा तुमची चीड चीड होते, बरोबर? तुम्ही त्यांना दहा वेळा सांगता तरी ते तुमचे ऐकत नाहीत, आणि मग तुम्हाला काय मिळते? चीडचीडेपणा.  तेंव्हा तुमचे ज्ञान पुढे आले पाहिजे ' ठीक आहे, हा माणूस असाच असायला पाहिजे. तुम्ही काय करू शकता?  जय गुरु देव!' मग लगेच काय होते? कमीत कमी तुमचा मेंदू आरामात राहतो, तुमची चीड चीड होत नाही.

मग, मी काय म्हणालो? कुठल्याही परिस्थितीवर, माणसावर ताबा मिळवणे सोडा.  तुम्ही शांत असा; ताबा मिळवण्याची इच्छा ही खरी अडचण आहे. तुम्हाला कळले का? कुठल्याही  परिस्थितीत गोष्टी घडत राहतील, या अथवा त्या मार्गाने.  तुमच्याकडून जितके जास्त चांगले होईल तेवढे करा आणि बाकीचे सोडून द्या. संपले. कळले?

आता, याचा अर्थ आळस, नेतृत्व, पुढाकार घेणे किंवा सुव्यवस्था यांचा बरोबर गोंधळ घालू नका. मी काय सांगतोय ते कळत आहे ना? ही तारेवरची कसरत आहे. हुशार माणसाला ताबा न ठेवता पुढाकार घेणे जमते, कळले? ताबा मिळवण्याचा प्रयत्न न करता पुढाकार घ्या.  आणि एक वेळा नाही तर दहा वेळा सांगायचे धैर्य ठेवा.  अगदी पहिल्यांदाच असे म्हणू नका  की, "मी सांगितले आणि त्या माणसाने ऐकले नाही" नाही. तुम्हाला ते दहा वेळा सांगण्याचे धैर्य पाहिजे आणि तरी त्यांनी ऐकले नाही तरी तुम्ही काळजी करू नका.

हेच ज्ञान आहे, दहा वेळा सांगण्याचे धैर्य असणे. त्यांनी एकदाही केले नसताना तुम्ही दहा वेळा कसे सांगाल? तुम्ही म्हणता " अरे, ते करत नाहीत, ते तसेच आहेत" तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आळशी आहात, तुम्ही पुढाकार घेत नाही, तुमच्यामध्ये प्रतिबद्धता नाही. मी तुम्हाला एक अतिशय अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे, तुम्ही ऐकत आहात ना? तुम्ही एखाद्या गोष्टीशी बांधील असाल तर तुम्ही काय करता- तुम्ही करत राहता... बरोबर?

समजा तुम्हाला लाकूड कापायचे आहे, तुम्ही एकदा कापता, जर लाकूड मऊ असेल तर लगेच कापले जाते. पण जर लाकूड कडक असेल, तर तुम्ही काय करत राहता? मारत राहता. किती वेळा? ते तुटेपर्यंत. तुम्ही मारत राहता. आपण काय करतो, आपला मनात सर्वांसाठी एकच मापदंड असतो.  आपण म्हणतो की, "अरे, हे लाकूड एका फटक्यात कापले गेले म्हणजे सगळीच लाकडे एका फटक्यात कापली जाणार” आणि मग आपल्याला राग येतो. नाही.  काही कडक असतात काही मऊ असतात. प्रत्येकाला त्याचा त्याचा वेळ लागतो कापले जाण्यासाठी. आणि जर कापले जात नसेल तर ते लाकूड नाही, मग तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी बोलवा.

तुम्ही शांततेत आहात. हा माझा निष्कर्ष आहे. काय? ताबा ठेवू नका, त्यांना ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जाऊ देत. पण त्यांना मार्गदर्शन करत राहा; ते ऐकत नसतील तर ते त्यांच्याच डोक्यावर चिखल उडवून घेत आहेत. तुम्हाला माहिती आहे, हत्तीला अंघोळ घालायला चार-पाच लोक लागतात. कधी कधी ते हत्तीला खाली झोपायला लावतात आणि बादल्या बादल्या पाणी ओततात. तुम्ही हत्तीला अंघोळ करताना बघितले आहे का? नाही? अरे, तुम्ही जेंव्हा बेंगलोरला याल तेंव्हा एक नाही दोन हत्ती आहेत. घासायला दोन तास, स्पा बाथ सारखे करतात! रोज त्यांना घासले जाते, आणि पाणी ओतले जाते.  मग, ते चमकतात, दहा मिनिटे त्यांना सोडा आणि ते चिखल सगळीकडे उडवतात. त्यांना काही कळत नाही, 'मी आताच अंघोळ केली आणि मी माझ्यावर परत चिखल उडत आहे’. ज्या क्षणी त्यांना चिखल आणि माती दिसते, ती ते उचलतात आणि स्वतःच्या डोक्यावर उडवतात आणि परत मळतात (हशा) काय करायचे? हं.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मैत्रीपूर्ण राहण्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कसे मित्र असावेत? आणि जर ते माझ्या बाजूने उभे राहत नसतील किंवा माझ्यावर विश्वास ठेवत नसतील तर काय करावे?
श्री श्री रवी शंकर: ऐका, कोणालाही विश्लेषण करू नका. हा एक निष्कर्ष आहे. कोणाचेही विश्लेषण करणे थांबवा. कुणाचेही विश्लेषण करायला वेळ कुठे आहे, आणि तुमचेही विश्लेषण करू नका. आरामात राहा, प्रत्येक गोष्टींची काळजी घेणारी शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्यावर प्रेम करते. हे जाणून घ्या आणि आरामात राहा. बरोबर? सर्वोत्तम कल्पना? तुम्ही शांत राहा, आणि तुमची मदत होईल. दुसरे कोणी तुम्हाला मदत करणार नाही; तुमचे तुम्हालाच करायला लागेल. आणि निसर्ग आपल्याबरोबर आहे,  आपल्याबरोबर एक शक्ती आहे की जी दुसरे कोणी समजू शकत नाही., आपण स्वतः सुद्धा नाही.  म्हणून, त्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि आरामात राहा.

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्हाला माहिती आहे का की मला काही वाईट गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी सेवा आणि पार्ट २ शिबीर दर तीन महिन्यांनी करायचे आहे. पण माझ्या कुटुंबातील लोकांमुळे मी ते करू शकत नाही. गुरुजी, काय करू? कृपया मदत करा.
श्री श्री रवी शंकर: वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही वेबकास्ट बघत आहात; जिथे आहात तिथे ध्यानाला बस. हं. हो. हे तुमच्या अस्वस्थपणाचे कारण नसावे. ठीक आहे? इतके ज्ञान आहे., ध्यानाच्या इतक्या सी.डी. आहेत. ते रोज करा. तुमची साधना करा; कोणीही तुमचा ध्यान करण्याचा हक्क काढून घेऊ शकत नाही. वेळ काढा आणि तुमचे ध्यान करा.  हे ज्ञान तुमच्या जागृतावस्थेत ठेवा. एवढे पुरेसे आहे. संधी नक्कीच येईल, आणि तुम्हाला सांगायला लागणार नाही, ' दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी' असे.. हं? जेंव्हा शक्य असेल तेंव्हा या, आणि जर एक वर्षात एकदाही झाले नाही तर आणखी थोडे प्रयत्न करा.  कमीत कमी वर्षातून एकदा एडव्हान्स कोर्स करा.

प्रश्न:  प्रिय गुरुजी, तुम्ही देव, प्रेम पहिले आहे का?
श्री श्री रवी शंकर: अरे, तू स्वतःला पाहिले आहेस का? आरशामध्ये नाही. देव काही डोळ्यांनी बघायची वस्तु नाही. तुम्हाला ते माहिती करून घेतले पाहिजे. तुम्ही देवाला बघितले असे म्हणत असाल तर त्याचा अर्थ  देव कुठेतरी आणि तुम्ही कुठेतरी असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही दर्शक आहात आणि ते दृश्य. देव कधीही दृश्य असू शकत नाही, देवच दर्शक आहे, नजर ठेवणारा......हं?  आणि तुम्ही आहात, तुम्ही ते असू शकता. जेंव्हा मन स्थिर असेल तेंव्हा तुम्ही तिथे असू शकता, त्याचा आधी नाही.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझ्या बहिणीला एक जण आवडतो पण माझे कुटुंब परवानगी देणार नाही. माझा विश्वास आहे की ही तिची निवड आहे. मी जर तिला या माणसाबरोबर राहू दिले तर मी माझ्या घरच्यांशी खोटे बोलल्यासारखे होईल की जे मला करायचे नाही. मी काय करू?
श्री श्री रवी शंकर: शांतता बनवून ठेवा. हो. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितले नाही तर दोन्हीकडून फसवल्यासारखे होईल, त्यांना वाटेल की तुमच्या बहिणीने त्यांचाबद्दल आदर ठेवला नाही आणि तुमच्यावरच विश्वास पण जाईल. ते चांगले नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना कल्पना द्या. आणि जर तुम्हाला असेल वाटले की ही व्यक्ती योग्य आहे तर तुम्ही वकील पण बना (हशा)
The Art of living