गुरु पूर्णिमा संदेश

सोमवार, जुलै २६, २०१०
एका  वर्षात १२ - १३ पोर्णिमा येतात त्यापैकी वैशाख पोर्णिमा संबोधली जाते जन्म आणि ज्ञानासाठी, ज्येष्ठा पोर्णिमा पृथ्वी मातेला आणि आषाढ पोर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. ह्यालाच  गुरुपोर्णिमा असे म्हणतात.

हा तो दिवस आहे जेव्हा शिष्य आपल्या गुरूंच्या परीपुर्णतेत जागे होतात आणि जागे करण्यासाठी गुरुला कृतकृत्य होतात. हा आभार द्वैत (तुम्ही आणि मी) नाही तर अद्वैत आहे. ही नदी नाही जी एकीकडून दुसरी कडे वाहत जाईल. तर हा सागर आहेत जो स्वत्वात चालतोय. म्हणून, गुरु पूर्णिमा ही कृतज्ञतेच प्रतिक आहे.

गुरुपुर्णिमा उत्सवाचा उद्देश आहे मागे वळून बघणे आणि मागच्या एक वर्षात आयुष्यात किती प्रगती केली हे पाहण. एका साधका साठी गुरुपुर्णिमा एक महत्वाचा दिवस आहे, नवीन वर्षाचा एक दिवस आहे. हा दिवस आहे एखाद्याचा अध्यात्मिक मार्गावरील प्रगतीचा आढावा घेण्याचा आणि दृढ संकल्पाला नविनिकृत करण्याचा आणि आपल्या ध्येयावर  केंद्रित करण्याचा आणि येणाऱ्या पुढच्या वर्षात काय करायचे आहे यावर मार्ग काढणे. जसा पौर्णिमेचा चंद्र उगवतो आणि मावळतो, कृतज्ञतेचे अश्रू निर्माण होतात आणि स्वतःच्या विशालतेत सामावून जातात.

तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरात लाखो जीवकोश आहेत आणि प्रत्येक कोशाला त्याच स्वतःच आयुष्य असत.बरेच जीवकोश रोज जन्म घेतात आणि मरण पावतात. म्हणून, तुम्ही एक फिरते शहर आहात.कित्येक शहरं या पृथ्वी ग्रहावर  आहेत आणि पृथ्वी ग्रह सूर्या भवती फिरत असतो. त्याच प्रमाणे, कित्येक जीवकोश आहेत आणि कित्येक  जीवजंतू तुमच्या शरीरात आहेत आणि तुम्हाभोवती फिरतात. तुम्ही एक फिरती वस्ती आहात. एका मधाच्या पोळ्यासारख, कित्येक मधमाश्या येतात आणि त्यावर बसतात, पण तिथे एक  राणी मधमाशी असते. जर राणी मधमाशी गेली तर दुसऱ्या माश्या पण जातात.त्याच प्रमाणे,आपल्या शरीरातही परमाणु असतात राणी मधमाशी. जर ते तिथे नसेल तर, सगळाच निघून जाईल. माहित करायच, त्यात छोट्या परमानुचा सगळ्यात छोट स्वरूप, आत्मा किंवा स्वत्व.ती सगळीकडे आहे तरीपण कुठेही नाही. तीच  राणी मधमाशी आहे आणि तेच तुम्ही आहात. आणि तेच दिव्य आहे, आणि तेच गुरु तत्व आहे. ज्याप्रमाणे पितृत्व, मातृत्व, त्याप्रमाणे गुरुत्व देखील आहे. तुम्हाला कोणा ना कोणा सोबत गुरुत्व साकारावं लागत. तुम्ही खेळा, तुम्ही लोकांना जाणत्या किंवा अजाणते पणाने सल्ला द्या आणि मार्गदर्शन करा, आणि त्यांची काळजी घ्या आणि प्रेम द्या. पण हे पूर्ण १०० टक्के करा कुठलीही परतीची अपेक्षा ना करता.त्यालाच गुरुत्वात जगणे म्हणतात, स्वत्वात जगणे. दिव्य, तुम्ही आणि गुरु तत्व यात काहीच फरक राहात नाही. हे सगळ एकाच गोष्टीवर येतं, राणी माशीवर. ध्यान हे आराम आणि विश्रांती ह्यात एक परमाणु सारख आहे.

सर्व गोष्टींचा विचार करा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतंय, आणि विचारा तुम्हाला काय हवय. आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. आपण सर्व काही प्राप्त करतो, पण प्राप्त करणेच पुरेसे नाही, तर ज्यांना गरज आहे त्यांना आपण द्यायला हवे आणि आशीर्वाद द्यावा.
The Art of living
© The Art of Living Foundation