आपण आनंदी राहिले पाहिजे आणि इतरांना आनंदी ठेवले पाहिजे

बेंगलोर, मे ८, २०११

श्री श्री रवि शंकर: स्वतः ला शांत ठेवण्यासाठी दिवसातला काही वेळ आपण मोकळा ठेवला पाहिजे. यासाठी, आपण सजग राहिले पाहिजे की जे आज आहे ते काही काळाने नसणार आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखे. अस्थिरतेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आपण जगतो तर आनंदात जगावे आणि इतरांना आनंदात ठेवावे. आपण जेंव्हा मृत्यूला आठवतो तेंव्हा आयुष्याचे प्रश्न कमी वाटतात.
आपण जगताना आपल्याला दोन गोष्टी मिळवायच्या असतात - आपण किती प्रेम वाटले आणि किती ज्ञान मिळवले. याच दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मेल्यावर सुद्धा आपल्याबरोबर राहतात.

दररोज थोडावेळ बसून ध्यान केले पाहिजे - दुसरे की विचार करतात अशा अनावश्यक गोष्टींपासून मोकळे व्हा. आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की देव(परमात्मा) सगळ्यांमध्ये आहे. जर तो सगळ्यांमध्ये नसेल, तर आपण त्याला देव म्हणू शकत नाही. तो नेहमी इथे आहे, सगळीकडे आणि आपल्या सगळ्यांमध्ये. आपण डोळे बंद करून त्याला पाहतो आणि यालाच ध्यान म्हणतात. गुरु, देव आणि आत्मा हे सारखेच आहेत.

जेंव्हा तुम्ही आश्रमात येत, तुमचा सगळ्या चिंता इथेच सोडून द्या - त्यांना तुमच्याबरोबर परत घेऊन जाऊ नका.
तुम्ही जेंव्हा सेवा करता, तुमचा गरजांची काळजी घेतली जाते. आपले काम ज्ञान पसरवणे हे आहे. तुम्ही ज्ञान पसरवा, आणि तुम्हाला जे गरजेचे आहे ते आपोआप होईलच.

आपली स्वतःची कमाई स्वतःवरच खरच करण्यात काही अर्थ नाही. त्यातले २-३ टक्के सामाजिक कार्य, धर्म जागृती (सत्य पसरवणे) यासाठी दिले पाहिजेत – त्याने भ्रष्टाचार कमी होईल. आपण सगळे एकत्र आले पाहिजे आणि देशवासियांना त्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे.

जेंव्हा तुम्हाला प्रश्न पडेल स्वतःला विचारा, आणि जर उत्तर नाही मिळाले, तरच तुमच्या गुरूला विचारा. तुमच्या प्रारब्धानुसार(मागचे कर्म) तुम्हाला बाकीचा गोष्टी मिळतील आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी होतील.

संगीत, ध्यान आणि ज्ञान - या तीनही गोष्टी आयुष्यात असल्या पाहिजेत