दुसऱ्याच्या मधले चांगले गुण बाहेर आणणे हे आपले काम आहे!!!

बेंगलोर, मे ७:

प्रश्न : गुरुजी , आपण जेंव्हा म्हणतो की अमुक तमुक व्यक्तीला आत्मदर्शन झाले आहे, कृपया मला सांगा की त्यांना काय साक्षात्कार होतो?
श्री श्री रवि शंकर
: साक्षात्कार म्हणजे मी शरीर नाही आणि त्यापेक्षा जास्त आहे हे कळणे. मी इथे माझा या जन्माआधी होतो आणि मी माझ्या मृत्युनंतरही इथे असेन. जर कुणाला हे कळले तर तेव्हडे पुरे आहे. पण ते फक्त तेच सांगू शकतात, इतक लोक नाही सांगू शकत.


प्रश्न : प्रिय गुरुजी, कृपया मला सांगा की आपण अध्यात्म शोधणारे माणसे आहोत की अध्यात्मिक व्यक्ती पण मनुष्याच्या रुपात?
श्री श्री रवि शंकर:
दोन्ही. अध्यात्मिक व्यक्ती मनुष्याचा रुपात आणि ज्यांना आपल्या मूळ स्वरूपाकडे परत यायचे आहे.

राधा या शब्दाचा अर्थ महिती आहे का? राधा म्हणजे मूळ स्वरूपाकडे परत येणे. धारा म्हणजे प्रवाह; स्रोतापासूनच प्रवाह म्हणजे धारा आणि धारा हा शब्द उलट वाचला की तो राधा असा होतो. जेंव्हा पाणी खाली पडते, तेंव्हा ती धारा असते, आणि जेंव्हा पाणी परत जिथून वाहायला सुरुवात झाली तिथे जाते त्याला राधा म्हणतात.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझा मुलगा २ वर्षांचा आहे, त्याला इतर लोकांबरोबर असुरक्षित वाटते. त्या वयाचा सगळ्याच मुलांना असे वाटते का? मी ते कसे हाताळावे?
श्री श्री रवि शंकर:
ती लहान मुलांमधली असुरक्षितता पण असू शकते. २ वर्षांचे मूळ असुरक्षित असू शकत नाही, ते तुमचे स्वतःचे मत असू शकते. काही वेळा मुलाला काय वाटत आहे किंवा काय म्हणायचे आहे यावर तुम्ही तुमचीच मते पुढे करत राहता. विशेषकरून आजी-आजोबा असे जास्त करताना दिसतात. आजोबा म्हणतील की माजं ६ महिन्याचे बाळ मजकडे बघून मला म्हणाले, “आजोबा तुम्ही आज फिरायला जाऊ नका, आज माझाबरोबर थांबा" आणि हे ते त्याचा डोळ्यातून सांगत होते. बाळ बोलू पण शकत नाही आणि आजोबाना वाटते की ते सर्व सांगते आहे. खूप गोष्टी ही तुमची मते असतात.


तुम्हाला जर असे वाटत असेल तुमच्या मुलामध्ये ईर्ष्या आहे, भावंडाबद्दल ईर्ष्या आहे, तुम्हाला तसे वाटत असेल तर त्यांना जवळ घ्या आणि थोडे जास्त लक्ष द्या.

प्रश्न : गुरुजी मी येस + हे शिबीर २ वर्षांपुर्वी केले आणि नुकतेच माझ्या आई-वडिलांना माझ्या hollow and empty या अनुभवाबद्दल आणि 'काहीच नसणे' या भावनेबद्दल सांगितले. ते म्हणतात की माझा काही उपयोग नाही. मी त्यांना काय सांगू?
श्री श्री रवि शंकर:
त्यांना काहीच सांगू नको. त्यांना दाखवून दे की तू खूप काही करू शकतोस. तुझा कामाने त्यांचे मन जिंक, शब्दाने नाही.


प्रश्न : गुरुजी , लालसा दिव्य गुण कसा असू शकतो? मला तर त्यात खूप त्रास होतो.
श्री श्री रवि शंकर:
तडप म्हणजेच ईश्वर!


प्रश्न: गुरुजी, मला असे वाटते की माझा सभोवताली अतिशय स्वार्थी आणि दुष्ट लक आहेत ज्यांना माझ्याकडून फक्त काम करून घ्यायचे आहे. मी माझा निर्दोष स्वभाव आणि साधेपणा कसे टिकवून ठेऊ?
श्री श्री रवि शंकर:
सगळ्यात पहिल्यांदा, कुणालाही दुष्ट आणि भ्रष्ट असे नाव चिकटवू नका. तुम्ही त्यांना त्याच प्रकारे पाहाल. ते तसे असले तरी त्यांना तसे नाव चिकटवू नका. तुमचा विचार किंवा संकल्प त्यांचातले वाईटात वाईट गुण बाहेर पडू शकतात. तरीपण, जर तुमचा संकल्प चांगला असेल, तर जे वाईट आहेत त्यांचातले पण चांगले गुण दिसून येतील.


आज श्रीनगर मधल्या एका प्रशिक्षकाने मला फोन केला; त्याने ५० तरुणांचा YLTP शिबीर घेतले. तो सांगत होता की त्या तरुणांमध्ये इतका मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याचे कलेक्टर निरोप समारंभाला आले होते आणि म्हणाले, " हा चमत्कार आहे. या तरुणांना काय झाले आहे? इतका मोठा बदल?”. तरुण म्हणत होते की तुम्ही याप्रकारे आम्हाला अध्यात्मिक ज्ञान या आधी कधीच दिले नाही आणि तुम्ही आम्हाला दोष देता की आम्ही हे केले न ते केले, पण कुणीही कधीही आम्हाला आत्मिक शांततेबद्दल शिकवले नाही.

त्यामुळे दुसऱ्यानमधले चांगले गुण बाहेर काढणे हे आपले काम आहे, आपण दुसऱ्यांची खूप वेळा निंदा करतो, म्हणतो की "तू निराशाजनक आहेस" पण तुम्हाला माहिती आहे की इतर काही चांगले गुणही आहेत, तुम्हाला त्यांना आशा दाखवली पाहिजे. तुमच्या आजूबाजूचा लोकांमध्ये जे दिव्य गुण आहेत ते बाहेर काढा; हे एक तुमचे विशेष कार्य म्हणून हातात घ्या. मी तुम्हाला भोळे व्हा म्हणून सांगत नाहीये. काळजीपूर्वक राहा, त्याच वेळी चांगले गुण बाहेर काढा.

प्रश्न : असे म्हणतात की आयुष्य हे चेतनेचे खेळ आणि प्रदर्शन आहे. चेतनेला हे खेळ खेळावे असे का वाटते?
श्री श्री रवि शंकर:
खेळ हा स्वभाव आहे. जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा तुम्ही खेळ खेळता. जेंव्हा तुम्ही खेळता तेंव्हा तुम्हाला गरज नसते. म्हणूनच तुम्ही खेळता. तुम्हाला जर खूप गरजा असतील तर तुम्ही फक्त काम आणि कामच करता, तुम्ही खेळू शकत नाही, कळतंय का? खेळ तेंव्हाच येतात जेंव्हा मोकळा वेळ असतो. तुमचा आयुष्याचा गरजा पूर्ण झाल्यावर खेळ हा तुमच्या आयुष्याचा भाग बनतो. चेतना पूर्ण आहे आणि तिचा स्वभाव खेळकर आहे. खेळकर असणे हाच दिव्य स्वभाव आहे.


प्रश्न: गुरुजी, वातवरण हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे, त्याची काळजी घेण्यासाठी आपण काय करावे?
श्री श्री रवि शंकर:
हो. वातावरणाची काळजी घेणे हा आर्ट ऑफ लिव्हिंग चा मोठा भाग आहे. झाडे लावा; प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा, जर शक्य असेल तर प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरा. या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासारख्या आहेत. तुम्ही त्याबद्दल बेसिक कोर्स मध्ये आधीच ऐकले असेल त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे.

वातावरण स्वच्छ ठेवा, जर तुम्हाला लोक रस्त्यावर घाण करताना दिसले तर तुम्ही तिथे उभे राहा आणि लोकांना बोलावा आणि म्हणा, " आपण ही जागा स्वच्छ करूयात". असे काहीतरी करूयात.
The Art of living
© The Art of Living Foundation