प्रेमाबरोबर बांधिलकी म्हणजेच भक्ती!!!

बुधवार, एप्रिल २७,२०११

मॉन्ट्रियल केंद्र कॅनडा, २१ अप्रैल २०११.

प्रश्न : जेंव्हा प्रिय व्यक्तींचा मृत्यू होतो तर त्यांचा पुनर्जन्म होतो का? आपण त्यांना ओळखू शकतो का? पालकांच्या बाबतीत आपण त्यांचाशी परत संबंधित होऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर:
सर्व काही शक्य आहे! जर त्यांचा पुनर्जनम आता होतो तर तुम्ही त्यांना ओळखू शकता आणि अनुभव सुद्धा घेऊ शकता! तुम्ही हा अनुभव केलाय की तुम्ही कुठे जाता आणि कोणी व्यक्ती शी घनिष्ठ संबंध जुळून जातात? तुमचा अंतरात्मा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव करून देईल. सर्व संभव आहे. कधीतरी आपण एकमेकांशी सम्बंधित होतो. पूर्वी आपण आपापसात संबंधित होतो; आता सुधा आपण एकमेकांशी संबंधित आहोत. आपल्याला हे समजो अथवा न समजो, तरी पण आपण एकमेकांशी संबंधित आहोत.

प्रश्न : आनंद काय आहे?
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्ही म्हणता, मला काही नको, तो आनंद आहे. जेंव्हा तुम्ही खुश होता आणि तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की "तुम्हाला काय पाहिजे?" तुमचे उत्तर असते की "नाही, मला काही नको"

प्रश्न :प्रिय गुरूजी मी माझ्या स्वतःवर खूप संशय घेतो, मी आपले कौशल्य, योग्यता आणि निर्णय यांवर संशय घेतो. स्वतःवे संशय करण्यापासून स्वतःला कसे थांबवावे?
श्री श्री रवि शंकर :
कोणी व्यक्ती जर स्वतःवर संशय घेत असेल तर त्यावर उपाय काय? सगळ्यात पहिल्यांदा या संशयाला समजून घ्या; संशय नेहमीच कुठल्यातरी चांगल्या गोष्टीसाठी असतो. जेंव्हा तुम्हाला कोणी म्हणते, "मी तुझावर प्रेम करतो", तर तुम्ही लगेच विचाराल, "खरच?" आणि जर कोणी म्हणाले " मला तुझी घृणा येते" तेंव्हा तुम्ही विचारणार नाही "खरच" म्हणून.  म्हणूनच संशय हा नेहमी चांगल्या गोष्टींवरच असतो. तुम्ही तुमच्या योग्यतेवर संशय घेता; पण काम्जोरीन्व्र कधीही संशय घेत नाही. तुम्ही आनंदावर संशय घेता, पण दुःखावर कधीही संशय घेत नाही. ठीक आहे? कोणीही आपल्या उदास भावना किंवा निराशेवर संशय घेत नाही, परंतु म्हणतो की माझा पूर्ण विश्वास नाही की मी खुश आहे किंवा नाही. जेंव्हा तुम्ही हे समजून घेता की संशय हा नेहमी सकारात्मक गोष्टींवर असतो तेंव्हा तुमचे मन एका विशिष्ठ स्तरावर पोचते.
संशयाचा सरळ अर्थ आहे; प्राण उर्जेची कमी यासाठी अधिक प्राणायाम करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही त्या स्थितीतून बाहेर पडला आहात.

प्रश्न : प्रिय गुरुजी भक्त कोण असतो? भक्ताने काय केले पाहिजे? भक्त कसे बनता येते?
श्री श्री रवि शंकर:
भक्त बनण्यासाठी कुठलाही अवघड प्रयत्न करू नका; प्रेमाबरोबर बांधिलकी म्हणजेच भक्ति. प्रेमाबरोबर विवेक असणे म्हणजेही भक्ती.
विवेकाशिवाय प्रेम नकारात्मकतेत बदलू शकते. आज प्रेम करा; उद्या घृणा करा; आज प्रेम करा, संबंधांबद्दल तृष्णा उद्यासाठी ठेवा.

प्रेमाबरोबर विवेक म्हणजे परमानन्द असतो; आणि तीच भक्ती आहे. भक्ति एक अतिशय मजबूत बंधन आहे, हा आपलेपणाचा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्ती या गुणांबरोबर जन्म घेतो. हे परत लहान मूळ बनण्यासारखे आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी मी धन्य आहे की मी तुमच्याबरोबर आहे आणि माझा स्तनांचा कर्क रोग सुद्धा बारा होत आहे ज्याचे निदान मागच्या वर्षी झाले. तुम्ही मला आणि आम्हाला सगळ्यांना सांगू शकता का की रोगापासून काय शिकायला मिळू शकते?
श्री श्री रवि शंकर:
तुम्हाला आजारांपासून काहीही शिकण्याची आवश्यकता नाही. पुढे चला. हा जीवनाचाच हिस्सा आहे. शरीर कधी कधी आजारी पडते. हे अनेक कारणांमुळे होते. हे कर्म, पूर्व संस्कार आणि वंशपरंपरागत जीन मुळे होऊ शकते. हे प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आवश्यकता नसताना जेवण करणे, आणि हे आत्ताच्या औद्योगीकीकरणामुळे पण होऊ शकते. याच्यामुळे अनेक विकिरण उत्पन्न होत आहेत. त्यासाठी त्यातून काय शिकता येईल याचाकडे लक्ष द्यायची गरज नाही.
फक्त एक विश्वाश, एक ज्ञान आणि एक कृतज्ञता यांचाबरोबर पुढे चला. तुम्ही आनंदी राहिले पाहिजे की आपण या ग्रहावर आहात, आणि जोपर्यंत तुम्ही इथे आहात, तुम्हाला सगळे चांगलेच करायचे आहे कारण सगळ्यांना निश्चितपणे इथून एक दिवस जायचे आहे.

प्रश्न : मला दोन सिद्धांतांचा परिचय करून दिला गेला आहे ज्यामुळे माझे गोंधळ होतो आहे; अ: मी करता नाही, ब: मला प्रत्येक लहान सहन गोष्टींची जबादारी घेतली पाहिजे माझे त्याचावर नियंत्रण नसले तरी, कृपया हे समजवा?
श्री श्री रवि शंकर :
जीवन या दोन गोष्टींचे संतुलन आहे. जबाबदारी घेणे आणि ती समर्पित करणे. आणि हे एक उत्तम संतुलन आहे. वर्तमान आणि भविष्य याची जबाबदारी घ्या आणि भूतकाळाबद्दल एक जाणून घ्या की हे असेच होणार होते आणि पुढे चला. परन्तु तुम्ही बऱ्याच वेळा याच्या विरुद्ध करता. तुम्ही विचार करता की भूतकाळ तुमची स्वतंत्र इच्छा होती आणि त्याचा पश्चात्ताप करता. आणि भविष्याला भाग्य समजून त्यासाठी काहीच करत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की ज्ञानी लोक काय करतात? ते भविष्याला स्वतंत्र इच्छा, आणि भूतकाळाला भाग्य समजतात आणि वर्तमानात खुश राहतात. यासाठी तुम्ही तुमच्या भूतकाळाचा पश्चात्ताप करू नका आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे आणि त्याचसाठी सक्रीय व्हा.  
The Art of living