सहजता आणि सरलता यांचा अभाव म्हणजेच अहंकार!


प्रश्न: चांगले आणि वाईट कर्मामध्ये काय अंतर आहे?
श्री श्री रवि शंकर:
कर्माला चांगले वाईट असे नाव आपण देतो. तणावातून आपण जे काही करतो ती सर्व वाईट कर्मे आहेत. प्रसन्न चित्ताने जे काही कराल ते सर्व चांगले असते. एक गोष्ट आहे- बोधिसत्व चीनला गेले. तेंव्हा चीनचा चक्रवर्ति राजा स्वागत करण्यासाठी आला, म्हणाला " आम्ही इतके तलाव बांधले आहेत, इतके सगळे केले आहे, अन्न दान केले आहे, हे केले आहे, ते केले आहे." हे सर्व ऐकल्यानंतर बोद्धिसत्व ने म्हणाले की तू नरकात जाशील. हे काय चांगले कर्म आहे!  का? मी करत आहे. मी करता आहे! हे सगळे करता भावाने केले आहे. तणावातून केले आहे. अहंकाराने केले आहे. तेंव्हा ते चांगले कर्म असले तरी ते वाईट कर्म बनते.

प्रश्न: गुरुजी अहंकार काय आहे आणि त्याला कसे नष्ट करता येईल?
श्री श्री रवि शंकर
: स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून वेगळे मानणे म्हणजे अहंकार. इतरांपासून स्वतःला वेगळे मानणे. मी खूप चांगला आहे, सगळ्यांपेक्षा चांगला आहे किंवा वाईट आहे. दोन्ही अहंकार आहे. आणि अहंकार तोडायचा प्रयत्न पण करू नका. असे वाटते, त्याला राहू देत. जर असे वाटत असेल की मला अहंकार आहे तर म्हणा ठीक आहे, माझा खिशातच राहा! काही प्रोब्लेम नाही! ते आपले आपण सहज होऊन जाईल. सहजतेचा अभाव हाच अहंकार आहे. सरलतेचा अभाव हाच अहंकार आहे. आपलेपणाचा अभाव अहंकार आहे. आत्मीयता असल्याचा अभाव अहंकार है. आणि याला तोडण्यासाठी सहजता, आत्मीयता, आपलेपणा, सरलता या गोष्टी जीवनात आणाव्या लागतील

प्रश्न: जर कुणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या आत्म्याच्या शांती साठी काय करू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: तुम्ही शांत व्हा. जसे तुम्ही शांत व्हाल, प्रेमाने पूर्ण होता, भजनामध्ये एक होता, ज्ञानात एक होता, ज्ञानात राहता, तेंव्हा जे लोक पलीकडे गेले आहेत त्यानाही खूप छान वाटते. आत्ता आपण इथे बसून ध्यान करत आहात, केले आहे, सगळ्याचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही तर त्यांचावारही आहे जे पलीकडे पोचले आहेत.

प्रश्न: आपण आपली सहनशीलता कशी वाढवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: परत तीच गोष्ट! माझ्यात सहनशीलता नाही हे जेंव्हा मानून चालतो तेंव्हा ते तसेच होते. माझी आज्जी नेहमी म्हणायची की कुठलीही गोष्ट नाकारात्मक बोलु नये. का? ती म्हणायची की काही देवता घरात असतात त्यांचे नाव आहे वास्तू देवता. तुम्ही काही म्हणाला त्याला ते तथास्तु म्हणतात. समजून चला की घरी मिठाई नाही तर मिठाई नाही असे कधीही म्हणायची नाही. म्हणायची की बाजारात भरपूर मिठाई आहे, चला बाजारात जाऊयात. शब्दांमध्येही ती कधीही नाही म्हणायची की मिठाई संपली आहे. म्हणाल तर माहिती नाही की कुठे वास्तू देवता असेल आणि तथास्तु म्हणेल. मग सगळे संपलेलेच असेल. याच प्रकारे जर काजू हवे असतील तर बाजारात काजू भरलेले आहेत, बाजारात चला.
त्या पिढीतल्या लोकांच्या मनात किती विश्वास होता.आणि ही गोष्ट खरी पण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे खरे आहे. आपण ज्याला ण समजत मानतो, ते तसेच होते. आभावाला मानल तर अभाव राहतो. खूप लोक म्हणतात की पैसे नाहीत तर वास्तू देवता लगेच तथास्तु म्हणते.  जे आयुष्यभर ' नाही नाही' चे गाणे लावतात, ते कधीच तृप्त नसतात. एक समृद्धि चा अनुभव करा. माझ्या जवळ सर्व काही आहे. मग तुमच्याजवळ सर्व गोष्टी यायला लागतील. माझ्या जवळ नाही, माझ्यात प्रेम नाही मग तसेच वाटायला लागते. मी खूप प्रेमळ आहे. समजून चला, तेंव्हा मनात प्रेमच झळकेल.

एक अतिशय कंजूस व्यक्ति माझ्याजवळ येते तर मी बोलतो की तू किती उदार आहेस. तेंव्हा एक जण माझ्याजवळ येऊन म्हणाले  "गुरुजी तुम्ही नेहमी म्हणता की मी उदार आहे. मी कुठे उदार आहे? मी किती कंजूष आहे. मी माझ्या पत्नीला दहा रुपये सुद्धा खर्चू देत नाही. तुम्ही मला उदार कसे म्हणू शकता? मुले काँगेस प्रदर्शनात जातात तेंव्हा एक-दोन कैन्डी विकत घ्यायला पण मला त्रास होतो. मी एकच मिठाई घेऊन देतो, आणि तुम्ही मला उदार म्हणता.
कारण तू उदार बनावे.
ज्या भावना तुमच्या मनात आणायची इच्छा होते, ते मानून चाल, ते आपलेच आहे. त्याला नाही असे मानून चालला तर नाही होणार.
हे लक्षात ठेवा, " काजू भरलेले आहेत, बाजारात जाऊयात!"

प्रश्न: गुरुजी, लग्नात प्रेम असून सुधा इतकी भांडणे का होतात?
श्री श्री रवि शंकर
: काय म्हणायचे? मला तर काहीच माहिती नाही! माहिती करून घ्यायची चेष्टा पण केली नाही! होऊ शकते की काही जोड स्वर्गात बनले तिथे थकले आणि मग नरकात उतरले, किंवा असेही असेल की नरकातल्या विशेष भागात आले.
पहा, प्रत्येक संबंधांमध्ये कुठे ना कुठे, कधी ना कधी, काही ना काही गडबड ही होताच असते आणि ते ठीक पण होते. तेंव्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला समजावा, संभाळा, त्याने सर्व गोष्टी ठीक होतील. कधी ना कधी गोष्टी ठीक होतातच.

परदेशात अजूनही एका देशात ८२ वर्षाचा पुरुषाने, ८० वर्षाच्या आपल्या पत्नीवर कोर्ट केस केली. घटस्फोट घेतला ८० वर्षानंतर. ४० वर्ष एकसाथ राहिले दोघे. शेवटी केस का केली? ज्या खुर्चीवर तो रोज बसायचा, पत्नी ती देत नव्हती! सोडायला तयार नव्हती! बाकी प्रत्येक गोष्टीचे दोन भाग झाले, खुर्चीची गोष्ट घेऊन कोर्टात एव्हडी मोठी केस झाली! माणसाचा मेंदू खूप विचित्र आहे! ज्याचाशी मैत्री करतो त्याचाशी भांडण करतो. आणि ज्याचाशी भांडतो परत त्याचाशीच मैत्री करण्यासाठी तडफडतो. 

तर हे जीवन खूप जटील आहे, आणि जटिल जीवनात हसत हसत निघून जाणे हीच बुद्धीमानी आहे. फक्त व्यक्तिलाच पाहत बसाल तर अज्ञानात राहाल. व्यक्ती नाही व्यवहार होतो. व्यक्तीच्या मागे जी चेतना आहे, सत्ता आहे, त्याला पाहाल तर ती एकच चेतना आहे - या व्यक्ती कडून असे करून घेतले, त्या व्यक्तीकडून तसे करून घेतले. अशा प्रकारे व्यक्तीच्या मागे जी चेतना आहे, जीचामुळे सर्व होते, त्याला ओळखणे हेच ज्ञान आहे. समजलात का?

आपण सगळ्यांना पाहाल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे  Hollow and Empty. आणि जसा विचार आला तसा त्यांनी काही व्यवहार केला. त्यांची काय चूक.

प्रश्न: गुरु आणि ऋषिकडून काही मागितले पाहिजे का?
श्री श्री रवि शंकर
: हे तर मागितलेच. काही उत्तर तर मागितलेच आहे. जेंव्हा मागणी येते तेंव्हा ती आल्यावरच तुम्ही विचार करता की मागू की नको.आली मागणी. तहान लागली तर पाण्याची मागणी येते. पाण्याचा मागनिलाच तहान म्हणतात. भूक म्हणजेच जेवणाची मागणी. मागणी स्वाभाविक आहे. मागणी आल्यावरच कळते की मागणी आली. काय? नाही? आता करावे न करावे - गोष्टच नाही. करून टाकले. करूनच समजेल की केले. केल्यानंतरच कळले की मी मागितले आहे. ती खरी मागणी जी आतून आली आहे, खोलवरून, आवश्यकता आहे. आशी आवश्यक मागणी पूर्ण होणारच आहे. पूर्ण होते.

प्रश्न: बेसिक कोर्स सांगतात, "जो जसा आहे तसे त्याचा स्वीकार करा." याचा अर्थ असा आहे की भ्रष्ट नेत्यांचा पण स्वीकार करायचा जे आपल्या देशाला विकायला बसले आहेत ?
श्री श्री रवि शंकर
: तीन प्रकारच्या दक्षता समजून घ्या- शारीरिक, वाचिक और मानसिक - कृत्यात, वाणीत आणि भावनांमध्ये. जसे काही लोक करतात- बोल्त खूप चांगले, गोड गोड पण कामाची वेळ येईल तेंव्हा काम नाही करणार. हे काय? वाणी तर ठीक आहेत पण कृत्या मध्ये नाही. खूप लोकांचे मन खूप साफ आहे ते भावनेमध्ये ठीक आहे , पण जसे तोंड उघडतील तसे आग ओकू लागतात. समाजात ही खूप मोठी समस्या आहे. व्यक्ती चांगल्या आहेत, काम पण चांगले करतात, पण जसे तोंड उघडतात तसे लोकांना वाटते की कान बंद करावेत. काही लोक काम ठीक ठीक करतात पण बोलत नाहीत. आणि काही लोक काम ओं ठीक करतात, बोलतात पण ठीक आणि मन मात्र ठीक नसते, भावना ठीक नसतात. खूप कमी लोक मिळतील ज्यांचे भाव, वाणी आणि कृत्य पण शुद्ध आहे. किती वेळा आपण टेलर ला कपड़े देतो तो चांगली चांगली गोड गोड गोष्टी करेल, दिवाळीच्या एक दिवस आधी या, देऊन टाकू! त्यांचा मनात काही चुकीची भावना नसेल, त्यांच्या मनात खोटे बोलणे किंवा धोका देणे या भावना नसतील - भाव ठीक असेल, वाणी ठीक असेल, पण कृत्यामध्ये गडबड. काही लोक आपल्या कृत्यात गडबड करतात. बोलतात चांगले, भाव पण ठीक आहे पण तुम्ही लोक असे समजत की त्यांनी जाणून बुजून केले - तेंव्हा तुमचा भाव गडबड झाला. त्यांचे कृत्य गडबड झाले आणि तुमचा भाव गडबड झाला. तुम्ही दोगेही एकच बोटीत आहात. तिन्हींची शुद्धि पाहिजे - वाणी शुद्ध पाहिजे, कृत्य शुद्ध पाहिजे आणि भावनेची शुद्धी पाहिजे. तेंव्हाच सिद्ध व्हाल  - Perfection.
The Art of living