महिला दिन विशेष

बंगलोर, मार्च ८,२०११

प्रश्न: कृपया अर्धनारीश्वर या संकल्पनेबद्दल विस्तारित स्वरुपात सांगा.
श्री श्री रविशंकर: सगळ्यांमध्ये स्त्री आणि पुरुषाची गुणसूत्रे असतात. तुम्ही तुमचे आई व वडील दोघांपासून बनले आहात. तुम्ही अर्धे आई व अर्धे वडील यांपासून बनले आहात. दिव्यातेमध्ये स्त्री व पुरुष दोहोंची तत्वे आहेत. हे खूप आधी समजले होते आणि अर्धनारीश्वर च्या रुपात दाखवले होते.भगवान फक्त पुरुष किंवा महिला नाही - अर्धनारीश्वर आहे. सृष्टिमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही तत्व आहेत.

देवी दुर्गा वाघावरून येते ; दुर्गा आई आहे, जी किती सौम्य  करुणामयी आहे, तरीसुद्धा वाघावर बसते जो अतिशय क्रूर आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे.! विरोधाभासी मूल्य एक दुसऱ्याला पूरक आहेत आणि प्राचीन लोकांना याची माहिती होती. वैज्ञानिक दृष्टिकोण पाहता जर एक जरी जनावर लुप्त झाला तर सृष्टी टिकू शकत नाही. प्रत्येक जनावर पृथ्वीवर तरंगाच्या रुपात विशिष्ठ उर्जा आणत असतो. वाघ दुर्गा देवीच्या स्पन्दनाना पृथ्वीवर आणतो.

देवी सरस्वतीला अनेक हात दाखवले आहेत! एका हातात जप माला आहे जे ध्यान दाखवते, त्यांच्या दूसऱ्या हातात पुस्तक आहे,जो बौद्धिक ज्ञान दाखवते आणि एका हाताने वीणा वाजवताना दाखवले जाते. म्हणूनच जेंव्हा बौद्धिक ज्ञान, संगीत और ध्यान एकत्र असतात तेंव्हा ज्ञानाच उदय होतो. लाखो हजार वर्षांपूर्वी हे ज्ञान होते. देवी सरस्वती एका दगडावर बसली आहे, याचा अर्थ असा आहे की जेंव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते तेंव्हा ते तुमच्यामध्ये खोलवर जाऊन बसते. देवी लक्ष्मी कमलावर बसली आहे, याचा अर्थ असा की लक्ष्मी चंचल आहे. धन अस्थिर असून गतीवान आहे आणि गतीवान असला पाहिजे.

प्रश्न: स्त्री साथी लग्न करणे महत्वपूर्ण आहे का? देवानेच तिची काळजी घ्यावी हे ठीक नाही का? आई न बनता सुद्धा ती परिपूर्ण आहे का?
श्री श्री रविशंकर: तुम्ही सर्व जगाची आई असल्याचा अनुभव घेऊ शकता, आई पानाचा भाव हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळेच करुणा, प्रेम आणि ओढ आहे.
 विवाह केला पाहिजे अथवा नाही हा व्यक्तिगत निर्णय आहे. आनंदी राहणे सगळ्यात महात्व्चे आहे. हे माझे मत आहे. असे किती आहेत जे अविवाहित आहेत आणि खुश आहेत, आणि असे किती आहेत जे विवाहित आहेत परन्तु खुश नाहीत आणि याच्या विरुद्ध पण आहे. निवड तुमची आणि आशीर्वाद माझे!

प्रश्न: जेंव्हा घरातल्या मोठ्या व्यक्तीच परंपरा आणि पारंपारिक मूल्यांना विसरले आहेत तेंव्हा मी घरातील एक स्त्री म्हणून की करू शकते?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जे काही शिकायचे आहे ते तुम्ही इंटरनेट वर शिकू शकता. हे किती अद्भुत युग आहे, एका लैपटोप वर गूगल वर शोधून पृथ्वीवर उपलब्ध असलेली कुठलीही माहिती सहजतेने उपलब्ध होऊ शकते. सर्व सूचना हाताच्या बोटांवर उपलब्ध आहेत. मी नेहमी सांगायचो की ज्ञान हातच्या बोटांवर उपलब्ध होईल आणि जे मला ऐकायचे त्यानाही माहित नव्हते की मी असे का सांगत आहे. सर्व माहिती याने उपलब्ध आहे. मी त्याला ज्ञान तर नाही म्हणणार पण माहिती  म्हणू शकतो. 

प्रश्न: कधी पुरुष दिवस पण असेल का?
श्री श्री रविशंकर: (हसून) त्यसाठी सुद्धा देवी ची (स्त्री जाति) प्रार्थना करावी लागेल.
राक्षस आणि देवता सिद्ध त्यांचाकडे वरदान मागत असत. कोणी गम्मत करताना सांगत होते की :एकदा एका माणसाने कुणाला तरी विचारले की या घराचा मालक कोण आहे, ती व्यक्ती म्हणाली की माझा बायकोला विचारून सांगतो!

प्रश्न: कुठलेही लक्ष प्राप्त करण्यासाठी मानवा मध्ये कुठले ८ महत्वपूर्ण गुण पाहिजेत?
श्री श्री रविशंकर: त्या संख्येला फक्त ८ वरच का थांबवत आहात ? तुम्हाला त्या ८ ची यादी हवी की की त्या ८ चा विस्तार. यावर विचार करूयात.
सगळ्यात पहिले तर लक्ष ठरावा. मन इतके चंचल आहे, यासाठी लक्ष ठरवणे महत्वपूर्ण आहे. नंतर तुम्हाला त्यासाठीचा वेळ मर्यादा ठरवायला लागेल. नंतर त्याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांचा अनुमान लावणे आणि परिस्थितीनुरूप बदलायची तुमची क्षमता वाढवायला लागेल. लक्ष पूर्ती साथी लागणारी साधणे गोळा करणेही सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

प्रश्न: स्त्री आणि पुरुषांसाठी आध्यात्मिक मार्ग भिन्न आहेत का?
श्री श्री रविशंकर: नाही. आध्यात्म महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहे.
इतिहासात काही काळासाठी पुरुषांनी महिलांवर काही निर्बंध लावले होते, ज्यामुळे महिला सत्तेमध्ये येऊ शकल्या नाहीत. परन्तु समाजाचे काही कायदे असतात आणि प्रत्येक व्यक्तीने त्यांचे पालन केले पाहिजे.

प्रश्न: मृत्यु आणि पुनर्जन्म यांच्या मधल्या वेळात की होते ?
श्री श्री रविशंकर: निद्रा अवस्थेतून जाग्रित अवस्थेमध्ये तुम्ही येत तेंव्हा काय होते? तसेच होते- तुम्ही निष्क्रिय होता. जेंव्हा वेळ येते तेंव्हा चेतना परत येते.

प्रश्न: आपल्या महाकाव्यांमध्ये महिलांनी अनेक असाधारण काम केले आहेत, ज्यावर विश्वास करणे कठिण आहे! तुम्ही यानाद्दल काही सांगा.
श्री श्री रविशंकर: उदाहरण घ्यायचे झाले तर आपण गांधारी बद्दल boluyat, तिने मदक्यान्मधून १०० मुलांना जन्म दिला आहे. वास्तवाट त्यांनी टेस्ट ट्यूब बाळांना जन्म दिला. एक भ्रूण आणि १०० मडकी! आपल्याला तेंव्हाही यामागचे विज्ञान माहिती होते !
जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते केवळ तथ्य असते. जसे कोणीही विश्वास ठेवत नाही की डायनासोर होते परन्तु त्यांच्या असण्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. जटायु एक डायनासोर पक्षी ज्यावर सीतेने सवारी केली होती. भगवान श्री कृष्ण च्या आस्तित्व बद्दल सुद्धा पुरावे आहेत. त्याला ज्याप्रकारे पुढे आणले जाते ते बऱ्याच वेळा कल्पना आणि  तथ्य यावर आधारित असते. जसे कुठल्या कवितेमध्ये कल्पना आणि तथ्य यांचे मिश्रण असते. जर तुम्ही अब्दुल कलाम ,जवाहरलाल नेहरु किंवा इंदिरा गाँधी यांच्या आयुष्याबद्दल वाचाल तर तुम्हाला कळेल की, त्यात कित्येक गोष्टी जोडल्या जातात.

प्रश्न: वर्तमान क्षणात आणि प्रभावकारी राहण्यासाठी मला काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर: तुम्ही आत्ता ठरवत आहात की भविष्यात वर्तमान क्षणात राहण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे! तुम्हाला कळते आहे की मी काय म्हणत आहे?

प्रश्न: कृपया आध्यात्म आणि साम्यवाद यातील सामानातेबद्दल सांगा?
श्री श्री रविशंकर: हाँ, साम्यवाद म्हणतो की सर्वाना समा संधी मिळाली पाहिजे. आध्यात्म म्हणते की दिव्यता सगळ्यांमध्ये आहे आणि प्रत्येक जण ईश्वर आहे. अशाप्रकारे दोघेही एकच गोष्ट सांगतात. तुमच्या भावना समान असतील पण अभिव्यक्ति वेगवेगळी असू शकते. तुम्ही प्रेम वेगवेगळ्या रुपात अभिव्यक्त करता जसे की एखादे लहान मूळ अथवा वृद्ध यांच्या बद्दल वेगळे प्रेम असते.

(गंगा अशी नदी आहे की जिचा निर्माण प्राचीन लोकांनी केला – http://www.bharathgyan.com/ वेब साईट वर भागीरथी बद्दल तथ्य आणि गोष्टी आहेत की कसे संतानी आणि त्यांचा सहकार्यांनी त्याची संरचना केली आणि कसे मानसरोवर चा प्रवाह पश्चिम दिशेकडून केला.

प्रश्न: मानसिक रूपाने विक्षिप्त असलेल्या लोकांबरोबर कसे राहावे याबद्दल सांगा?
श्रीश्री रविशंकर: ते लोक इथे सेवा घेण्यासाठी आले आहेत, त्यांची सेवा करा!!!