देवदूत म्हणजे एक सकारात्मक उर्जा आहे

बेंगलोर आश्रम १८ मे २०११ 


स्वामी , साधू ह्यांना मी बघितले आहे कि त्यांची निंदा केली कि त्यांना अजिबात आवडत नाही. आणि सतत संकटांविषयी बोलून बोलून तुम्हाला कशातच उत्तर मिळत नाही. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. तुम्ही हे नक्की करून पहा . जेंव्हा तुमच्यावर कुठले संकट येते किंवा आव्हान येते तेव्हा तुम्ही शांत राहून अंतर्मुखी व्हा . तुम्हला लगेच उत्तर मिळेल. हे करून पहा नाहीतर तुमचे संकट वाढत जाईल. ह्यात तुमची कर्म असतात. ते कमी करा , वाढवू नका. करुणामय व्हा. तुम्ही आधी स्वतः आनंदी व्हा , दुसर्यांना आनंदी करायला जाऊ नका. ह्याचाने तुम्ही स्वावलंबी व्हाल. वैराग्याबत तुम्हाला ओढ असू द्या. सतत असे म्हणू नका कि हा माणूस असा आहे, तो मला हे म्हणाला. ह्यात गुंतू नका. आणि गुरुजींनी माझ्याकडे बघितले नाही असे अजिबात म्हणू नका, जर मी तुम्हाला लाथ मारली तेरी त्याला प्रसाद समजा . सगळे इकडे प्रसाद आहे. तुम्ही नुसतेच लोकांचे त्रास ऐकू नका , आणि त्यात वाहून जाऊ नका. लक्ष नको आणि चिंता नको.


प्रश्न: गुरुजी तर्पण म्हणजे काय?
श्री श्री रवि शंकर : तर्पण म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण करणे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी करण्यात येणाऱ्या पूजेला तर्पण, सगळ्या धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने तर्पण केले जाते. हिंदू धर्मात सुद्धा हे पूर्वापार  चालत आले आहे. 


प्रश्न : गुरुचे काम आहे मनातला गोंधळ वाढवणे मग आम्ही कोणाकडे जावे.
श्री श्री रवि शंकर : कुठेही गेलात तरी गोंधळ वाढणारच आहे मग कुठेच जाऊ नका. तिथेच रहा .उत्तर मिळेल.


प्रश्न : गुरुजी कृपा करून देवदूताविषयी  सांगा. ते प्रत्येक ठिकाणी असतात का?आणि ते सगळ्यांच्या आयुष्यात काही चांगले करतात का?
श्री श्री रवि शंकर: हो नक्कीच . देवदूत म्हणजे एक सकारात्मक उर्जा आहे. 


प्रश्न : गुरुजी आमच्या मनात काय चालले आहे तुम्हाला कसे कळते आणि तुम्ही आमच्या सगळ्या इच्छा  कशा  पूर्ण करता , जरी आम्ही तुमच्या पासून इतके दूर राहतो .
श्री श्री रवि  शंकर: ते माझे गुपित आहे.


प्रश्न :आई बाबा नेहमी सांगतात कि कोणाच्या श्राद्धात, किंवा तेराव्याला जाऊ नये , का?
श्री श्री रवि शंकर: ती एक सामाजिक प्रथा आहे त्यात जाण्यात काहीच हरकत नाही, जाऊन आल्यानंतर अंघोळ करून शुद्ध व्हा.

The Art of living
© The Art of Living Foundation