वैराग्य म्हणजे तुम्ही स्वतःला आव्हान देणे

१७ मे २०११

प्रश्न : प्रिय गुरुजी, हे खर आहे का की भगवद गीतेमधील प्रत्येक अध्यायाचा विशिष्ठ ग्रहांवर परिणाम होतो? कृपया याबद्दल सांगा.
श्री श्री रवि शंकर: ग्रह खूप दूर आहेत, त्यांचा तुमच्या मनावर परिणाम होतो. तसाच भगवदगीतेतील प्रत्येक श्लोकाचा, अध्यायाचा तुमच्यावर परिणाम होतो.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझ्या व्यवसायात मी व्यस्त आहे, पण मला सेवा करायची खूप इच्छा आहे. असे काही आहे का की जास्त वेळ न देता मी पैसे देऊन मदत करू शकतो. त्याला सेवा म्हणता येईल का?
श्री श्री रवि शंकर: हो, ते चालेल. काही लोक वेळ देऊ शकतात, काही लोक साधन उपलब्ध करून देऊ शकतात. सेवा दोन्ही देऊन होते वेळ आणि संसाधन

प्रश्न : गुरुजी , तुम्ही नेहमी आम्हाला सांगता की वैराग्यपूर्ण राहा आणि तुम्हीच असे म्हणता की वैराग्य ही घटना आहे. मला खरच वैराग्य पूर्ण व्हायचे आहे पण मला कळत नाही की हे आयुष्यात कसे घडवून आणावे? कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री  रवि शंकर: वैराग्य ही घटना नाही; मी असे म्हणेन की वैराग्य म्हणजे तुम्ही तुम्हाला दिलेले आव्हान असते. तुम्ही जेंव्हा तुमची जागरुकता वाढवता, जेंव्हा तुम्ही सगळे जाणार आहे अशा दृष्टीने बघता आणि मृत्यू हा महत्वपूर्ण आहे, आपण सगळे मारणार आहोत आणि सगळे बदलत आहे. जेंव्हा हे ज्ञान मिळते तेंव्हा वैराग्य आपोआप येते. तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे आणि आयुष्याकडे थोड्या मोठ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे आणि आपोआपच तुमच्यामधून वैराग्य बाहेर येईल; पण थोडा प्रयत्न करावा लागेल. थोडासा प्रयत्न जरी झाला तरी या गोष्टी होतील.

प्रश्न :गुरुजी, मी तुम्हाला प्रार्थना करतो की मला अशा सिद्धी द्या की जेणेकरून ज्या लोखंडी साखळ्या आपल्याला अलग करतात त्या मी तोडू शकेन,मी प्रार्थना करतो की तुमचा सचिवांना अशा सिद्धी द्या जेणेकरून ते समजू शकतील की मी आतून किती चांगली व्यक्ती आहे आणि मला लगेच तुम्हाला भेटण्याची वेळ देऊ शकतील.
श्री श्री  रवि शंकर: त्यांना माहिती आहे की तू किती चांगली व्यक्ती आहेस आणि म्हणूनच ते तुला थांबवून ठेवत आहेत, त्यांना माहिती आहे की तू जास्त वेळ थांबू शकतोस, हो. मी दिवसातून ३ वेळा दर्शन देतो आणि मी सगळ्यांना भेटतो, आज मी जवळपास १००० लोकांना भेटलो मी भेटत राहतो. पण तुमचे समाधान होत नाही, हं, मी लोकांना परत परत रांगेत येऊन उभे राहताना बघतो. तुम्ही थोडे काही काम करता, मोठे प्रोजेक्ट घेता आणि माझाशी बोलायला काही कारण काढता. तुम्ही काही करत नाही पण फक्त उभे राहून मला भेटायचे असते, भेटायची वेळ घेणे तर नाहीच.

प्रश्न: प्रिय गुरुजी, भारतावर दक्षिणेच्या अम्मांचे राज्य आहे, पूर्वेच्या दीदी, उत्तरेच्या बेहेनजी, राजधानीतील आंटी आणि मध्यातील मेदाम यांचे राज्य आहे: भारतावर महिलांचे राज्य आहे, आता हे पुरुषांचे जग नाही गुरुजी, तुम्ही काय म्हणता?
श्री श्री  रवि शंकर : आणि राष्ट्रपती भवन, ताई तिथेपण आहे. प्रवक्ती पण महिलाच आहे आणि राज्य ही महिलाच करत आहेत. अशी आशा आहे की हे अधिक चांगले होईल आणि तुमच्या घरात, तुमच्या घरात कोणाचे राज्य आहे, ते विसरू नका!

प्रश्न : गुरुजी, मी आणि माझी पत्नी २ वर्षांपूर्वी वेगळे झालो, आम्हाला परत लग्न करायचे आहे. तुम्ही असे म्हणू शकता की आमचा बाबतीत घटस्फोट टिकू शकला नाही पण आम्ही दोघे थोडे भीत आहोत, की आम्ही तीच चूक पुन्हा तर करत नाही ना? कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री  रवि शंकर: तुम्हाला हे पुढे न्यायचे आहे हे चांगले लक्षण आहे. जसा वेळ जातो तसे तुमची चेतना बदलत जाते, तुमचे मन बदलते आणि तुमची समजून घेण्याची क्षमता पण बदलते. हे सगळे बदलते असताना जर तुम्हाला आणखी एक प्रयत्न करून बघायचा असेल तर त्यात काही चूक नाही, प्रयत्न करून बघा. जर ते योग्य तरले नाही तर पुढच्या जन्मात ह\तीच व्यक्ती जोडीदार म्हणून परत निवडू नका.

प्रश्न : जर आयुष्य एक दिवस संपणार असेल तर मी त्याचा आनंद कसा घ्यावा. हा विचार मला आयुष्याच आनंद नाही घेऊ देत.
श्री श्री रवि शंकर: याने खरेतर तुमचा आयुष्याबद्दलचा मन वाढला पाहिजे. हे पहा, फुल हे कधीतरी नष्ट होणारच आहे तरी पण तुम्ही फुलाकडे बघण्याचा आनंद घेता की नाही. तुम्ही गुलाब जमून, आईस क्रीम, इ. खाल्ल्यावर तर संपणार आहे पण तुम्ही त्याचा आनंद घेता ना? आता पहा इतका सुंदर पूर्ण चंद्र, पण तोही अदृश्य होणार आहे एक दिवस, तरीसुद्धा आपण त्याचा आनंद आज घेत आहोत. छान आहे!

प्रश्न : माझे एका मुलीवर प्रेम आहे पण आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत. मी असे ऐकले आहे की ब्रिटीश आल्यापासून जातीव्यवस्था सुरु झाली. त्या आधी जाती व्यवस्था नव्हती. आता ब्रिटीश जाऊन ६० पेक्षा अधिक वर्षे झाली, आता मी तीचाशी लग्न करू शकतो का?
श्री श्री  रवि शंकर: हो, हो. जात ही काही अडचण नाही. फक्त तुमच्या आई-वडिलांबरोबर शांतता ठेवा, आई-वडिलांबरोबर नाते खराब करून, आयुष्यभर दोन्ही बाजूनी त्रास सहन करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना समजवा आणि मग पुढे जा, काहीच अडचण नाही. त्यांना समजावून द्या की जातीची काहीच अडचण नाही. ते काहीच नाहीये.

प्रश्न : गुरुजी आज बुद्ध पोर्णिमा आहे. त्याबद्दल काही सांगा
श्री श्री  रवि शंकर: बुद्धाने आयुष्यभर ध्यानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. आपण एक छोटे ध्यान करूयात.

प्रश्न : मी राजस्थानचा आहे, राजस्थान मध्ये अनेक आश्रम आहेत आणि मी असा विचार करत होतो की आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचा आश्रम बांधला तर, तुम्हाला काय वाटते?
श्री श्री रवि शंकर: ठीक आहे, आश्रम बांधा, तुम्ही सगळे एकत्र या आणि एक बनवा. मी लोक बनवतो, तुम्ही आश्रम बनवा. कालच आम्ही बोलत होतो की इतके सगळे आश्रम आहेत, पण लोकच नाहीत. आश्रमामध्ये योगी नाहीत म्हणून मी असा विचार केला की सगळ्यात आधी ताकदवान लोक बनवावे आणि म्हणून मी 'व्यक्ती विकास केंद्र ' असे नाव ठेवले 'आश्रम विकास' नाही.

प्रश्न : जेंव्हा कोणी खूप जवळचे वारते आणि आपण त्याचसाठी तयार नसतो. खूप काही सांगायचे बोलायचे असते जेंव्हा ते जातात तेंव्हा तुम्हाला ते हवे हवेसे वाटत असतात. तुम्ही म्हणता की ते नेहमी असतात, हे कसे करायचे?
श्री श्री  रवि शंकर: जे सोडून गेले आहेत त्यांना हे समजेल की जग म्हणजे एक खेळ आहे; बाकी काही नाही; ती एक लाट आहे त्यामुळे त्यांना काही सांगायची, समजवायची गरज नाही, काही न सांगता ते समजून घेतील. जेंव्हा आपण शरीर रुपात असतो तेंव्हा शब्द लागतात, पण एकदा शरीर सोडले की संवाद हा भावनेतून होतो.तेंव्हा काळजी करू नका, तुम्ही आनंदात राहा, जे गेले ते गेले आणि आता आपण इथे आहोत.

प्रश्न : गुरुजी, जर आपले अगदी जवळचे लोक आमच्या तुमच्याबद्दलच्या भावना समजत नसतील आणि तर्काने विश्लेषण करत असतील तर त्याचा त्रास होतो. ही परिस्थिती कशी सांभाळावी, हे आमच्या आयुष्यात सारखेच होत असते.
श्री श्री  रवि शंकर: तुम्हाला सगळ्यांना सगळे का समजावून सांगायचे आहे? भावना अशा असतात की लोकांना त्या पटकन समजत नाहीत. तुम्हाला तुमच्या सर्व भावना अशाप्रकारे व्यक्त करायची गरज नाही. त्यांना कदाचित भीती वाटत असेल की तुम्ही घर सोडून आश्रमात जाल आणि तिथेच राहाल. तुमचे प्रेम आणि समर्पण भाव येव्हादाच दाखवला पाहिजे की ते समजू शकतील.तसेच आनंदाचेही आहे, काही वेळा तुम्हाला कळत नाही की आनंद कसा दाखवावा; जर तुम्ही तो खूप दाखवला तर लोकांना समजत नाही.
एक भक्त कुणाचा अंत्यसंस्काराला गेला, आणि तिथे भजन चालू होते आणि त्याने नाचायला सुरुवात केली, लोकांना काही कळलेच नाही. जेंव्हा सत्संग आणि भजन असते आणि तुम्ही आनंदात असता आणि तो म्हणाला की तसेही सर्व उत्सवच आहे पण अशा ठिकाणी तुम्ही नाचलात तर लोक नाराज होतात. त्यामुळे तुम्ही बघितले पाहिजेत की समोरच्या माणसाला काय समजते; आणि तुम्हाला हवे ते त्यांना कसे सांगायचे. सांगताना कौशल्यपूर्ण राहा जेणेकरून तुमच्या पद्धतीने त्यांचा मनात राग किंवा भीती उत्पन्न होऊ नये आणि मग दुर्लक्ष करा. एका मर्यादेनंतर फक्त दुर्लक्ष करा.

प्रश्न : मला असे वाटते की भारतातील सामाजिक आर्थिक प्रश्न अति लोकसंख्येमुळे आहेत, तुम्ही याच्याशी सहमत आहात काय?
श्री श्री  रवि शंकर: नाही, नाही. भारताचे प्रश्न अति लोकसंख्येमुळे नाहीत, ते भ्रष्टाचारामुळे आहेत. लोकसंख्या हा काही वर्षापूर्वी शाप समजला जात होता पण लोकसंख्या हा आर्थिक सुधारणेचा घटक आहे. लोकसंख्या म्हणजे मोठा बाजार, बाकीचे देश भारताकडे का पाहतात, कारण इथे मोठी बाजारपेठ आहे.
 
© The Art of Living Foundation
The Art of living