तुम्ही या जगासाठी भेट आहात!!!

१३ मे २०११ बेंगलोर आश्रम

प्रश्न :प्रिय गुरुजी , तुम्ही म्हणालात की आपले नाते ह्या पृथ्वी इतके जुने आहे. आपण कधी कुठल्या मागच्या जन्मात तुमचा वाढदिवस साजरा केला आहे का? मला आठवत नाही , पण तुमच्या नक्कीच लक्षात असेल. कृपया सांगा ना.
श्री श्री रवि शंकर :
हो , नक्कीच आपण साजरा केला आहे. आता मला सांग जेंव्हा मला तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेंव्हा आपण अगदी पहिल्यांदा भेटतोय असे वाटले तुम्हला ? नाही ना , मला सुद्धा मी कोणा अनोळखी माणसाला भेटत आहे असे वाटले नाही . आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना मी भेटलो आहे , मला नेहमीच असे वाटत आले आहे की मी ह्यांना आधी भेटलो आहे आणि मी ह्यांना आधीपासूनच ओळखतो आहे. आत्तापर्यंत मी कधीच कुठल्या अनोळखी माणसाला भेटलो नाहीये.

प्रश्न :गुरुजी मला तुमच्याविषयी उत्कट अभिलाषा हवी आहे , पण ती येते आणि जाते, आणि मन दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावते . मला हि उत्कट अभिलाषा तुमच्याविषयी सुसंगत कशी राहील?
श्री श्री रवि शंकर
: काहीच हरकत नाही. आयुष्यात जरा मजा करा. जेंव्हा तुम्ही म्हणता की मला अभिलाषा नाही , पण तीसुद्धा एक अभिलाषाच आहे. तुमची अभिलाषा हि अभिलाषेसाठीच आहे. तुम्हाला राग येतो कारण तुम्ही रागात असता . तसेच तुमची अभिलाषा हि अभिलाषेसाठीच आहे हे माहिती असणे पण अभिलाषाच आहे.

प्रश्न :गुरुजी संकल्प आणि इच्छा ह्यात काय फरक आहे? आणि त्यात जर फरक असेल तर सगळ्या इच्छा ह्या संकल्प स्वरुपात बदलण्यासाठी काय करावे?
श्री श्री रवि शंकर
: तुम्हाला माहित असेल मी ह्याविषयी खूप बोललो आहे, संकल्प आणि इच्छा , आणि त्या बदलणे . हे सगळे वैराग्य आहे. खरे तर वैराग्य सगळीकडे कमी येते.

प्रश्न :गुरुजी मी आज विचार करतो आहे की सगळीकडे प्रकाशाचा समावेश आहे आणि जेंव्हा मी स्वतःमध्ये पाहतो आहे , तिथे तुमचाच प्रकाश माझ्यात आहे . माझ्यात , त्याच्यात आणि सगळीकडेच तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात. मी जिकडे पाहतो तिकडे फक्त तुमचाच प्रकाश आहे. तुम्ही कोठून आला आहात आणि तुम्ही कोण आहात? कृपया मला आज तरी सांगा.
श्री श्री रवि शंकर :
मी कोण आहे ह्याचे उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याशी एक व्यवहार करावा लागेल . तो व्यवहार म्हणजे, पहिले तुम्ही हे जाणून घ्या की तुम्ही कोण आहात? आणि जेंव्हा तुम्हाला हे समजेल की तुम्ही कोण आहात तेंव्हा मी कोण आहे हेही तुम्हाला समजेल. आणि हेच मला पाहिजे आहे की तुम्ही जाणून घ्या की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कळेल की मी कोण आहे.

प्रश्न :हे जग इतक्या जलदगतीने बदलत आहे पण तरीही तुम्ही तेच आहात. न बदललेले इतके सुंदर आणि पूजनीय. हे कसे काय गुरुजी?
श्री श्री रवि शंकर :
काही प्रश्न हे आश्चर्यकारक असतात, तसाच हासुद्धा प्रश्न नाहीये पण तुम्ही आश्चर्य करावे असे आहे . प्रश्न हे नेहमीच वेडेवाकडे आणि कुटील असतात पण आश्चर्य हे नेहमी सरळ म्हणूनच आयुष्याचे प्रश्नांकडून आश्चर्यात परिवर्तन करणे हेच ज्ञान आहे .ज्ञान हे प्रश्नांची उत्तरे देत नाही तर प्रश्नांचे आश्चर्यात रुपांतर करते. म्हणूनच ह्याविषयी तुम्ही आश्चर्य बाळगावे असे आहे.

आश्रमवासियांनी दररोज भगवदगीतेमधील श्लोक म्हणणे सुरु केले आहे. मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे दररोज भगवदगीतेमधील श्लोक म्हणणे सुरु करा. रोज तीन ते चार श्लोक म्हणा . जरी तुम्हाला संस्कृत कळत नसेल तरी ठीक आहे. नुसता अनुवाद देखील पुष्कळ आहे.