प्रत्येकाला योगदान देण्याची संधी दिली गेली पाहिजे


बंगलोर आश्रम, फेब. ०९ 

श्री श्री रवी शंकर आश्रमात संध्याकाळी ८:३० वाजता विशालाक्षी मंडपमध्येच सत्संग साठी  आले. वेलान्गांनी या तमिळ नाडूतील एका छोट्या गावाला भेट देऊन आले होते. इंडिअन प्रिस्त कोन्ग्रेस च्या १००० रोमन कॅथोलिक धर्मगुरूंशी संवाद साधतानाच्या अनुभवाबद्दल बोलत होते.(विस्डम ब्लोग वर पत्ता दिलेला आहे) तेंव्हा एक छोटी मुलगी उठली आणि श्री श्री ना म्हणाली की तिच्या गावात आर्ट ऑफ लिविंग चे केंद्र नाही, त्याचमुळे आर्ट ऑफ लिविंगचे कार्यक्रम होत नाहीत. हे सांगितल्यावर टी रडायला लागली. त्यांनी तिला आश्वासन दिले की लौकरच तिथे केंद्र सुरु होईल. त्या मुलीची आई उभी राहिली आणि म्हणाली " आमच्याकडे जे आहे त्यातून एक जागा खरेदी करायची आहे जेणेकरून तेथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे केंद्र उभे करता येईल.
ते म्हणाले " तुम्ही भावनिक होऊन जे आहे ते देऊ शकत नाही, कारण मी ते तसे घेणार नाहीit . या केंद्रासाठी खूप लोकांचे थोडे थोडे योगदान पाहिजे. पूर्वीच्या बऱ्याच लोकांनी हे सांगितले आहे. सुरुवातीला मी जेंव्हा केनडा ला गेलो तेंव्हा तिथे केंद्र नव्हते, एक माणूस माझ्याकडे एका आणि म्हणाला " श्री श्री, माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. माझ्याकडे १५००० डॉलर आहेत आणि मला हे सगळे वापरून आर्ट ऑफ लिव्हिंग चे केंद्र उभे करायचे आहे." मी त्याला नकार दिला आणि म्हणालो, " मला आर्ट ऑफ लिव्हिंग चा आश्रम उभारायची काहीही घाई नाही. जर तुझा आग्रहाच असेल तर १००० डॉलर दे आणि जर अजूनही काही द्यायचे असेल तर, २००० डॉलर दे पण त्यापेक्षा जास्त नाही. प्रत्येकाला योगदान द्यायची संधी दिली पाहिजे.