ज्या क्षणी तुमचा केंद्रस्थानी याल, तुम्हाला सगळीकडेच देवत्व दिसेल


कोलकाता  (भारत), फेब. १२
शिव रात्रीला रुद्र पूजेचा आधी श्री श्री रवी शंकर शिव आणि शिवरात्रीचा खऱ्या अर्थाबद्दल बोलले. 
आपण शिव तत्वाबद्दल थोडेसमजून घेऊयात. अगदी थोडेसेच कळू शकते.  बुद्धी संतुष्ट आणि आतील चेतना जागृत असली पाहिजे. संपूर्ण  समाधानासाठी वैज्ञानिकता आणि  अध्यात्मिक ज्ञान या दोन्हीची गरज असते. देवत्व शोधण्यासाठी खूप लांब..तीर्थयात्रेला जायची गरज नसते. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही देव पाहू शकला नाहीत तर तुम्हाला इतर कुठेही देव दिसणार नाही. जिथे मन लय पावेते तेथे शिव आहे. जिथे आहात तिथे संपूर्ण राहा. ज्या क्षणी तुम्ही तिथे असता, स्व केंद्रित असता, तिथेच तुम्हाला सगळीकडे देवत्व दिसते. हे ध्यान आहे. भगवान शिव च्या अनेक नावापैकी एक नाव आहे विरुपाक्ष - म्हणजे ज्याला आकार तर नाही पण तो पाहू शकतो. सगळीकडे हवा आहे हे आपल्याला माहित आहे आणि आपण ती आपण अनुभवू  शकतो. पण जर हवासुद्धा तुम्हाला अनुभवू शकली तर काय होईल? आपल्या सभोवताली अवकाश आहे, आपल्याला कळते. पण जर अवकाश सुद्धा आपल्याला ओळखायला लागले तर? असे होते. फक्त आपल्याला माहित नाही. वैज्ञानिकांना हे माहित आहे आणि ते त्याला सापेक्षतेचा सिद्धांत असे म्हणतात. जो पाहतो आणि जे पाहतो त्या दोघांवरही परिणाम होतो.  देवत्व तुमचा चहुबाजुना आहे आणि ते तुम्हाला पाहत आहे.  त्याला आकार नाही.  ते आकार विरहित अस्तित्व आणि लक्ष्य आहे.  तोच द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य आहे. हे आकार विरहित देवत्व म्हणजेच शिवा. फक्त जागरूक होऊन या शिव तत्वाचा अनुभव घेणे म्हणजेच शिव रात्री.


बऱ्याच वेळा उत्सव साजरा करताना जागरुकता नसते. उत्सव साजरा करत असताना गाढ विश्रांती घेणे आणि जागरूक राहणे म्हाजेच शिव रात्री. जेन्वा तुमचा समोर काही अडचण येते तेंव्हा तुम्ही जागरूक असता. जेंव्हा सर्वकाही व्यवस्थित असते, तेंव्हा आपण निवांत असतो; शिव रात्रीला आपण जागरूक राहून विश्रांती घेतो. असे म्हणतात की जेंव्हा बाकी सगळे झोपलेले असतात तेंव्हा योगी जागा असतो. एका योगी पुरुषासाठी प्रत्येक दिवस हा शिव रात्री सारखा असतो. भगवान शिवाबद्दल आदी शंकराचार्यानी एक कविता लिहिली आहे. (श्री श्री त्या कवितेतील काही ओळी म्हणतात)

आद्यंतहीनम - असा की ज्याला शेवट आणि सुरुवात नाही. सर्वदा - तो भोलेनाथ आहे ( सगळ्याचा निरागस राजा) जो सगळीकडे सगळ्या वेळी आहे. आपल्याला असे वाटते की भगवान शिवा म्हणजे तो कुठेतरी दुसरीकडे  गळ्यात साप घालून बसला आहे, शिवा तो आहे की ज्याचात सगळ्यांनी जन्म घेतला आहे, जो सगळ्यांना या क्षणी समेऊन घेतो. जे दिसते ते सगळे त्याचेच रूप आहे.
He permeates the entire creation. तो अजन्म आहे आणि कधी मृत्यू होत नाही.He is eternal.
तो चेतनेचा चौथे रूप आहे, तुर्यावस्था, ध्यानस्थ  अवस्था, की जे जागे होण्याच्या, गाढ झोपेच्या आणि स्वप्नावास्थेच्या पलीकडे आहे.


तो अद्वैत चेतना आहे की जे सगळीकडे आहे. म्हणून शिव पूजा करण्यासाठी तुम्ही स्वतःच शिवा मध्ये विलीन झाले पाहिजे. शिव बनून शिवा ची पूजा केली पाहिजे. चिदानंद रुप - फक्त आनंद रुपी अशी चेतना आहे.
तपो योग गम्य - जो ताप आणि योगाच्या मदतीने जाणून घेता येईल. वेद मधील माहितीचा मदतीने शिव तत्वाचा अनुभव घेता येऊ शकतो. शिवोहम  (मी शिव आहे ), शिवा केवलोहम (फक्त शिवाच आहे )हि स्थिती मिळवता येते. शिवरात्री हा आनद आणि समाधान अनुभव करायचा दिवस आहे.योग शिवाय शिवाचा अनुभव होऊ शकत नाही. योग म्हणजे फक्त आसने नव्हेत तर शिव तत्वाचा अनुभव जो ध्यान, प्राणायाम बरोबर येतो. जेंव्हा ते आतून "वाव" असा आनंद  देते.

शंभो हा शब्द पण तेथूनच उगम पावला आहे - देवत्व किती सुंदर आहे ते जाणून घेणे, निर्मिती आणि स्वत्व! सर्व निर्मितींमध्ये एकाच चेतना असणे हा एक चमत्कारच आहे.  याचा पेक्षा मोठा चमत्कार की असू शकतो. एकच अनेक कसे असू शकतो? हि शिवरात्रीची अनेकातून एका कडे जाण्याची रूढी एकमेव आहे. ध्यान आणि योग हे त्यासाठी जरुरी आहे. ध्यानाशिवाय मन कधीच शांत होऊ शकत नाही. शिवरात्रीला ध्यान, भजन हे सगळे उत्सवाचाच एक भाग आहे. प्रत्येक जन मनापासून सहभागी होतो. प्रत्येकाने गायले पाहिजे. सगळ्या कारणाचे कारण शिव आहे. ज्याच्यामुळे सर्व आहे – झाडे वाढणे, सूर्योदय, वर वाहणे...... प्रत्येक घटनेमागे शिव आहे - ज्याचामुळे सर्व होते आणि ज्याचाशिवाय काहीच होत नाही. पंचमुख, पंचतत्त्व – शिवला पाच मुख आहेत- पाणी, हवा, पृथ्वी, आग आणि अवकाश! या पाच तत्वांना समजून घेणे म्हणजे तत्त्व ज्ञान. आणि मग शिवाची अष्टमुर्तीच्या रुपात पूजा केली जाते(आठ रूपे)– मन, बुद्धी, अहंकार हे समाविष्ट आहेत. हे दोन्ही शिवाचे सरूप आणि अरूप रूपे आहेत. शिवाची प्रार्थना म्हणजे शिव तत्त्वात सामावून जाणे आणि काही चांगल्याची इच्छा करणे. कशाची इच्छा करावी? मोठ्या मनाने संपूर्ण जगासाठी चांगले मागावे, कोणीच दुक्खी नसावे, ‘सर्वे  जनः सुखिनो भवन्तु .’ या मुहूर्तावर एक संकल्प करा.ते असे आहे की जे सारखे सारखे तुमाचाकडे येते,श्वासासारखे, हृदयातील धड धाडी सारखे. आणि असा संकल्प जेंव्हा तुम्ही देवत्वाला समर्पण करता, तो नक्कीच पूर्ण होईल.

आपण सुद्धा निसर्गाची पूजा करतो. देवत्व पृथ्वीवर सगळीकडे आहे. झाडे, पर्वत, नद्या, पृथ्वी आणि मनुष्यप्राणी यांना मान दिल्याशिवाय पूजा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. सगळ्यांचा सन्मान करणे म्हणजेच दक्षिणा. द म्हणजे देणे आणि दक्षिणा म्हणजे जे आपल्याला स्वच्छ करेल अशा वस्तू देणे. ज्या देण्याने तुमची पापकर्मे नाहीशी होतील. कुठलीही पूजा दक्षिणेशिवाय अपूर्ण आहे. समाजात जेंव्हा आपण कौशल्याने, कुठल्याही प्रकारे मान विचलित होऊ न देता वागतो तेंव्हा सर्व नकारात्मक भावना, जसे की राग, चिंता, दुख्ख नाश होतात. मी असे म्हणेन की तुमचे ताण, चिंता आणि दुक्खे मला दक्षिणा म्हणून द्या. आणि हे कसे होईल? तर साधनेमुळे, सेवा आणि सत्संग.

आतल्या भवन आणि विश्वासाच्या समुद्रात जाण्यासाठी बुद्धीची बोट करा!