श्रीमंती म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे

७ मार्च २०११ : 
श्री श्री  रवि शंकर : श्रीमंती म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे. तुमच्याकडे बँकेत भरपूर पैसे असतील, भरपूर दौलत असेल पण जर ताण असेल पण जर त्याचा तुम्हाला ताण येत असेल, त्रास होत असेल तर कोणीही तुम्हाला श्रीमंत म्हणू शकणार नाही. श्रीमंती म्हणजे  भरपूर पैसे नव्हे, तर  आयुष्यातील उदारता ओळखणे, त्याला महत्व देणे, आयुष्याचा सन्मान करणे. माणसामधला विश्वास त्याची श्रीमंती दाखवतो. श्रीमंती तुम्हाला कशासाठी हवी आहे? आत्मविश्वास वाढवणे..बरोबर? पण जर त्यामुळे कमजोरी वाढत असेल तर त्या श्रीमंती चा काहीही उपयोग नाही, जर श्रीमंतीमुळे आजारपण वाढले असेल तर ती श्रीमंती नाही, श्रीमंती जर भांडणाचे कारण बनत असेल तर ती श्रीमंती नाही, बरोबर! ज्ञान म्हणजेच श्रीमंती, विद्या म्हणजे श्रीमंती, आरोग्य म्हणजे श्रीमंती, आत्मविश्वास म्हणजे श्रीमंती, मुल्ये म्हणजे श्रीमंती. जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, कुठलीही परिस्थिती सांभाळू शकता, ती श्रीमंती आहे. 

प्रश्न: गुरुजी  मला एक जाणवले की लोकांना प्रेम देता येते पण ते घ्यायचे कसे ते कळत नाही. मग आत जे इतके प्रेम आहे त्याचे की करायचे? गुरुजी मागणी आणि पुरवठा यांचा ताळ - मेळच राहत नाही. 
श्री श्री  रवि शंकर: हो, मी आधीच या बद्दल बोललो आहे; खूप लोकांना माहिती नाही की प्रेम घ्यावे कसे. कोणीतरी येते आणि म्हणते की मी तुझावर प्रेम करतो, आणि इतके प्रेम करतो.. थोड्या वेळाने तुम्हाला वाटते की कान बंद करून घ्यावे आणि म्हणवे की हे माझासाठी खूप जास्त होते आहे, मला पळून जाऊन द्या, कारण काही जण प्रेमात आरामदायक नसतात आणि आपण कधीच आपल्या स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही. आपण की आहोत हे आपण ओळखलेच नाहीये. आपण प्रेम नावाच्या पदार्थापासून बनलो आहोत हे आपल्याला माहीतच नाहीये. जेंव्हा आपण स्वताशी जोडलेले नसतो तेंव्हा दुसऱ्याशी मोकळेपणाने जोडले जाऊ शकत नाही. म्हणून जेंव्हा कोणी तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करतो तेंव्हा तुम्हाला कसेसे होते, कारण तुम्ही स्वतःशी जोडलेले नसता. त्यामुळे तुम्हाला कळत नाही की प्रेम घ्यावे कसे, म्हणूनच एक म्हण आहे,"डुकराला मोती चारू नका". आधी प्रेमाला योग्य तो आदर द्या आणि जे त्याचा आदर करत नाहीत त्यांना ते देऊ नका. याचा अर्थ प्रेम देण्यात पण कौशल्य हवे. 
प्रेम देण्याचे कौशल्य म्हणजे प्रेमात असणे, प्रेम हि कृती नाही तर प्रेम हि स्थिती आहे. तुम्ही कुठल्याही अतीशिवाय तिथे राहा, आणि म्हणा की मी कुठल्याही अतीशिवाय इथे आहे तुझ्यासाठी, आता ते तुजवर आहे की येऊन घे. तुमच्यामध्ये असलेल्या ताकदी मुळे लोक तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतील. आणि कुठलीही जबरदस्ती न करता समजाऊ शकता की तुमचे किती प्रेम आहे. ते पचवायला वेळ द्या कारण जबरदस्ती केली तर तुमाचासाठी उलटे पण होऊ शकते.