रोज साधना करा

श्री श्री रवि शंकर नुकतेच उत्तर भारतच्या एक आठवड्याच्या दौर्यावरून परत आले. तिथलाच एक अनुभव सांगताना श्री श्री म्हणाले,  आसाम मधील बोडोलेंड म्हणून एक जागा आहे, एक अतिशय दुर्गम प्रदेश, हिंसाचाराने भरलेला! आपल्या वाय. एल. टी. पी. प्रशिक्षकांनी इतके चांगले काम केले आहे. बोडोलेंड मध्ये जवळ पास १ ,५० ,०००  लोक भर दुपारी सत्संग साठी गोळा झाले होते. इतक्या दुर्गम भागामध्ये लोकांनी चांगले काम कारला सुरुवात केली आहे. तिथे  तुम्ही वीज नाही म्हणून तक्रार करू शकत नाही, कारण तिथे तसेही वीज नाही.  तिथे वीज नाही, पाणी नाही आणि रस्ता पण नाही. पण तिथले लोक समाधानी आहेत. आपल्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना आपण तक्रार करतो, पण जिथे सोयी नाहीत तिथे सुद्धा लोक समाधानाने राहतात.
(श्रोत्यांपैकी कोणीतरी प्रश्न विचारते)

प्रश्न : दारू आणि सिगारेटबद्दलची इच्छा कशी सोडावी?
श्री श्री रवि शंकर
: सिगारेट आणि दारू सोडण्यासाठी तुम्ही तीन गोष्टी करू शकता.

  1.  अध्यात्मिक साधना रोज करा. यातून तुमची अशा इच्छा मधून सुटका होईल. 
  2. असा विचार करा कि दारू आणि सिगारेट मुळे तुमचे नशीब खराब होणार आहे. तुम्ही जर ते घेतलेत तर काही तरी वाईट गोष्ट तुमचा आयुष्यात होईल.
  3. जर तुम्ही १ महिन्यासाठी सिगारेट आणि दारू सोडणार असाल तर कोणीतरी १ करोड देणार आहे, तर तुम्ही की कराल? जेंव्हा  जेंव्हा इच्छा होईल तेंव्हा  तेंव्हा असा विचार करा कि तुम्ही १ करोड रुपये घालवत आहात.
तुम्ही लोभ किंवा भीतीमुळे स्वतःवर काबू ठेवाल. वाईट सवयी सोडण्यासाठी लोभ आणि भीती एखाद्या दिव्य औषधी सारखे उपयोगी पडतात, जादू झाल्यासारखे.
यानंतर श्री श्री रवि शंकर यांनी श्रोत्यांचे ध्यान घेतले.


"जे अव्यक्त आहे ते प्रेम
जे अटल आहे ते सौंदर्य 
जे टाळता येत नाही ते सत्य "
~ श्री  श्री  रविशंकर