आधुनिक जगात ध्यानाची गरज


प्रश्न: आजच्या आधुनिक जगात ध्यान करायची गरज का आहे?
श्री श्री रवी शंकर: आजच्या आधुनिक जगात ध्यानाची गरज.. तुम्हाला माहितीये, जर तुम्ही ध्यानामुळे मिळणाऱ्या फायद्यांकडे बघितले तर लक्षात येईल कि त्याचीच आज गरज आहे. पूर्वीच्या काळी साक्षात्कार व्हावा म्हणून ध्यान केले जायचे, 'स्व' चा शोध घेण्यासाठी. मानसिक कष्टामधून मुक्ती मिळवण्यासाठी, त्यातून बाहेर येण्यासाठी, अडचणीमधून बाहेर येण्यासाठी सुद्धा ध्यान मदत करते. स्वतःच्या क्षमता वाढवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान; तीन गोष्टी! 

आज साक्षात्काराला आपण बाजूला ठेवूयात, आजच्या विचित्र सामाजिक परिस्थितीमुळे, ताण-तणावामुळे ध्यानाची गरज निर्माण झाली आहे. जितकी जास्त जबाबदारी तितकी जास्त ध्यानाची गरज आहे. जर तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसेल, तर कदाचित तुम्हाला ध्यानाची गरज भासणार नाही कारण तुम्ही काहीच करत नाही. कामात जितके जास्त व्यग्र असाल तितका कमी वेळ तुमच्याकडे असतो, जितके जास्त काम कराल, तितक्या जास्त इच्छा मनात असतात आणि ध्येय पण असतात, तेवढेच ध्यान पण करायची गरज वाढते कारण ध्यान फक्त ताणातून मुक्तता देत नाही तर नवीन गोष्टीना तोंड देण्याची ताकद पण वाढवते. ध्यानामुळे आरोग्य वाढते, ध्यान हे आत्म्यासाठी अन्न आहे, मनासाठी शक्ती देणारे आहे तर शरीरासाठी आयुष्यरेखा आहे. ध्यान तुमचे शरीर आकारात ठेवते, चेता संस्थेला मदत करते, मनाला मदत करते, जागरुकता वाढवते, दृष्टीकोन सुधारते आणि स्वतःला इतरांसमोर नीट मांडायला पण मदत करते, सगळे मिळाल्यावर अजून काय पाहिजे? .
ध्यानाचे फायदे बरेच आहेत, थोडक्यात म्हणायचे तर .. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर ध्यान करा. आनंदी आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी ध्यानाला पर्याय नाही. 

प्रश्न: ध्यान करण्याच्या कलेचे मनाला फायदे  कुठले, शरीराला, नात्यांना, अध्यात्मिक इच्छा आणि समाजाला फायदे कुठले?
श्री  श्री  रवी  शंकर : ध्यान तुमचा दृष्टीकोन बदलायला मदत करते. मन स्पष्ट विचार करू शकते. लोकांशी कसे बोलावे, कसे वागावे, विविध घटनांमध्ये कसा प्रतिसाद द्यावा,  इ. मध्ये ध्यानामुळे सकारात्मक बदल होतो. या सर्वांमुळे  हिंसा विरहित समाज, रोग विरहित शरीर, गोंधळ विरहित मन, मुक्त बुद्धी, आघात विरहित बुद्धी आणि दुक्ख विरहित आत्मा यांसाठी मदत होते.