प्रेमाविना आयुष्य शुन्य आहे

17
2012
Jun
हार्लेम, हौलंड
मला सांगा, हि संध्याकाळ तुम्हाला कशी घालवायची आहे? तुम्हाला कोणत्या विषयांवर चर्चा करायला आवडेल? (श्रोत्यामधून आवाज: निरोगी कसे रहायचे, ध्यान करूया, आयुर्वेदा बद्दल सांगा, संकटकाळा विषयी बोला), पाहिलत! संकट या शब्दानेच आपल्या चेहऱ्यावर कसे स्मितहास्य आले, हे थोडे विचित्र आहे, हो कि नाही? सामान्यत: संकट म्हटल्यावर लोक अक्षरश: रडतात, पण इथे वेगळे आहे आणि हीच जीवन जगण्याची कला आहे –
प्रत्येक संकट हे कुणाच्या तरी फायद्यात बदलावे. संकटाला एक आव्हान, सुसंधी म्हणून स्वीकारायला हवे, हे आपण जगभर प्रचलित केले पाहिजे. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला माहीत आहे का, चायनीज भाषेमध्ये संकट आणि सुसंधी या दोन्हीना एकच शब्द आहे! तुम्ही संकट असे म्हटले तर त्याचा अर्थ सुसंधी म्हणून सुध्दा होतो.

आणि कोणत्या विषयांवर तुम्हाला चर्चा करायला आवडेल? (श्रोत्यामधून आवाज: स्वातंत्र्य, प्रेम, निर्णय कसे घ्यावेत? अव्यवस्था, अंतरराष्ट्रीय स्थरावर मुलांना कसे शिकवावे?, फुटबॉल) आता मला सांगा, जर ह्या विषयाबद्दल काहीच ज्ञान नसेल तर? फुटबॉल बद्दल मला काही कल्पना नाही. भारतामध्ये फुटबॉल तेवढा लोकप्रिय नाही, लोकप्रिय आहे ते म्हणजे क्रिकेट. पण त्याच्या बद्दल पण मला ज्ञान नाही. ह्या कुठल्याच विषयी मला ज्ञान नाही. (श्रोत्यामधून आवाज: चालेल, इथे असणे हेच आम्हाला खूप चांगले वाटते!)

तुम्हाला माहीत आहे का, शब्दापेक्षा आपल्या उपस्थितीने आपण खूप काही व्यक्त करू शकतो; तुम्ही ह्याचे निरीक्षण केले आहे का? शब्द महत्वाचे आहेत, पण शब्दापेक्षा उपस्थिती महत्वाची आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. जेव्हा तुम्ही विमानातून उतरता तेव्हा हवाई सुंदरी म्हणते कि “तुमचा दिवस चांगला जावो’”, पण हे वरवर असते. हे फक्त त्यांच्या तोंडातून येते, त्यावेळेस त्यांचे मन कुठेतरी दुसरीकडे असते. पण तेच जर का आपल्या कुणी जवळच्या म्हणजे तुमची आई, आजी, काका किंवा काकू यांनी असे म्हटले तर त्याच्यात भावना, कंपन असते.

तुम्ही हे निरीक्षण केले आहे का? आपण लहान असताना आपल्या मध्ये भावनांचे महत्व होते. आपण जे काही बोलू किंवा करू ते खरे होते. हृदय आणि मन एकत्र होते. पण जस जसे आपण मोठे होतो कुठेतरी, कधीतरी, काही तरी घडते ते आपल्याला देखील माहीत नाही आणि त्यामुळे या दोन्ही मधली तार तुटते, आणि मग आपल्या मनात जे नाही ते आपण बोलून जातो.

काही जण म्हणतात ’खूप खूप आभारी आहे!’. विशेषत: हे तुम्हाला अमेरिके मध्ये दिसून येईल. तुम्ही जर एक पाण्याचा ग्लास भरून दिला की ते लगेच म्हणतात, ‘खूप खूप आभारी आहे!’. या मध्ये खूप आभार मानण्यासारखे काय आहे? तुम्ही काही अरब देशातील वाळवंटात नाही जिथे तुमचा पाण्याविना जीव चालला आहे आणि कुणीतरी तुम्हाला ग्लास भरून पाणी दिले आणि तुम्ही म्हणता की,’धन्यवाद! तुम्ही माझे प्राण वाचविले, अशी तरी परिस्थिती नाही. हो की नाही? मी असे म्हणत नाही की तुम्ही धन्यवाद मानूच नका. मला असे म्हणायचे आहे की जिथे तुमच्या भावना आणि शब्दांमधील तारतम्य नसेल तिथे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

इथेच खरेपणाची उणीव भासते. आपल्या संवादामध्ये खरेपणा नसेल तर आयुष्य निरस आणि उदास वाटते. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे? कल्पना करा तुमच्या कडे सर्व सुख सोयी आहेत, झोपायला चांगला बिछाना आहे, खाण्यासाठी चांगले अन्न आहे, पण प्रेम नाही, आपुलकीची भावना नाही, तुमची कुणाला काळजी नाही. तुम्ही कसे जगता किंवा तुम्हाला काय झाले याची कुणाला पर्वा नाही. तुम्हाला या पृथ्वीवर जगावसे वाटेल? जर आयुष्यात प्रेम नसेल, आपुलकीची जाणीव नसेल तर आयुष्य हे शून्य आहे. हे मानवी आयुच्याची विशेषत: आहे.

कुत्री, मांजरी, गाय, घोडा या प्राण्यामध्ये देखील या भावना असतात. तुमच्या घरी घोडा असेल आणि तुम्ही एक महिन्यानंतर घरी आलात तर तो घोडा आपले प्रेम व्यक्त करतो. हो की नाही? माणसाने भावनांची जाणीव ठेवली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ‘ब्लू स्टार’ असायला हवे, जसे आपण आर्ट ऑफ लिविंग मध्ये म्हणतो. ब्लू स्टार म्हणजे जो नेहमी डोलत राहतो, हसत खेळत राहतो, ज्याला बुद्धी नाही आणि भावनांमध्ये गुंतून राहतो. हे पण चांगले नाही. आपल्याला भावना आणि बुद्धी, वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य ह्या मध्ये समतोल राखता आला पाहिजे.

काहीजण असतात जे फक्त स्वत: बद्दल काळजी करतात. दुसरे असे काही आहेत जे स्वत: बद्दल अजिबात काळजी करत नाहीत. ते एखाद्या यंत्रा सारखे काम करतात. आपल्या जगण्याचे तात्पर्य काय आहे, ह्या आयुष्या कडून आपल्याला काय हवे आहे याची त्यांना काहीच काळजी नसते.

जीवन जगण्याची कला म्हणजेच वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य या मधील समतोल राखणे. तुम्हाला तुमच्या स्वत:ची, मनाची, शरीराची, भावनाची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच बरोबर समाजाची पण तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. समाजासाठी काही जबाबदारी घ्या पण त्याच बरोबर स्वत:च्या वैयक्तिक विकासाकडे दुर्लक्ष करू नका. कंपन विषयकची काळजी कशी घ्यावी हे ना कोणी घरी ना कुठल्या शाळेत शिकविले जाते, हे आपल्या भावनाच आपल्याला शिकवितात आणि आपल्या भावनांना शुद्ध, निर्मळ, सौम्य, शांत आणि आनंदी कसे ठेवावे हे देखील शिकवितात. आपण आनंदी कसे रहावे हे आपल्याला कोणी शिकवीत नाही. हे आपल्या स्वभावात आहे हे आपण गृहीत धरतो . हे आपल्या स्वभावात आहे यात काही शंका नाही, पण आपण कुठेतरी हे हरविले आहे. हो की नाही? आणि मी तुम्हाला सांगतो की याचा स्टोक मार्केट शी काहीही संबंध नाही. तुम्ही जर भूतान, बांगलादेशला गेलात तर तुम्हाला हे जाणवेल की भले हे देश गरीब आहेत पण सगळे आनंदी आहेत.

अलीकडे संयुक्त राष्ट्र संघटने मध्ये भूतान च्या पंतप्रधानांनी, The GDH (Gross Domestic Happiness) नावाने एक परिसंवाद आयोजित केला, जो ‘आपण सुखी आनंदी कसे राहू शकतो?’ या विषयावर आधारित होता. आजकाल सर्वजण या विषयावर बोलत आहेत. आणि हेच आम्ही गेली तीस वर्षापासून बोलत आहोत. मला आनंद आहे कि तीस वर्षाच्या दीर्घकालावधी नंतर जगातील नेत्यांनी या विषयावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पन्नास वर्षापूर्वी सरकार ला मानवी आरोग्या विषयी काही काळजी नव्हती. पण काही कालावधीनंतर ते समाजातील लोकांची मानसिक, शारीरिक आरोग्याची आणि अध्यात्मिकाची काळजी घेवू लागले. The World Health Organization (WHO)ने तर हे दहा वर्षापूर्वी पासून सुरु केले आहे. आता जगातील सर्व सरकार Gross Domestic Happiness बद्दल बोलत आहेत. माझा इथे येण्याचा हेतू हाच आहे कि इथे हॉलंड मध्ये एक आनंदाची लाट निर्माण करणे.

मी जिथे जातो तेथील लोक हेच म्हणतात कि ,’गुरुजी तुम्ही इथेच रहा. तुम्ही इथे आल्यावर आम्ही सर्व खूप खुश, आनंदी आहोत’. मग मी सांगतो कि. ’मी नसल्यावर आनंदी न रहाण्याच हे कारण मला सांगू नका’. मला माहीत आहे कि मी आल्यानंतर एक आनंदाची लाट, तरंग निर्माण होते आणि हि लाट तरंग पसरविण्याची तुमची जबाबदारी आहे. ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे त्यांच्या मध्ये असे परिवर्तन आले आहे.

आपण स्वत: साठी थोडा वेळ दिला पाहिजे. थोड्यावेळ ध्यान करावे, सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला गुंतून घ्यावे. मला असे वाटते कि सर्वानी पुढे येवून नेतृत्व करून दुसऱ्यांना रस्ता दाखवावा. पहिल्यांदा एक निश्चय करा कि माझ्या आयुष्याचे ध्येय हे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आहे. मी कुठल्याही मार्गाने हातभार लावेन. तुम्ही तुमचा वेळ देवू शकता, तुमच्या कर्तृत्वाने काही करू शकता, तुमच्या साधनसंपत्तीने मदत करू शकाल.

तुमच्या सर्जनशील कल्पनेने पहा आपण या समाजाला किती आनंदी सुखी बनवू शकतो. माझे स्वप्न एक अहिंसा मुक्त विश्व पहावयाचे आहे. एक अहिंसा मुक्त समाज, आरोग्य शरीर, शांत मन, प्रतिबंध न करणारी बुद्धी, आघात मुक्त स्मृती आणि उदासी मुक्त आत्मा हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. लोकांच्या मनामध्ये खूप प्रतिबंध आहेत. आपल्याला हे प्रतिबंध नाहीसे केले पाहिजेत. युरोप देशात ३०% लोकसंख्या हि उदासीनते पासून पिडीत आहे आणि आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला ह्या साठी काहीतरी केले पाहिजे, हो कि नाही? त्यासाठी मी म्हणतो कि आपण आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर प्राचीन ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. प्राचीन लोकांना बरेच काही माहीत आहे. आपल्याला दोन्हींचा वापर केला पाहिजे; काही भूत काळातील गोष्टी आणि काही वर्तमान पिढीच्या गोष्टी. हे एकत्रित केल्याने आपण हे विश्व, समाज सुंदर बनवू शकतो.

तंत्रज्ञानामुळे विश्व हे छोटे खेडे झाले आहे. माणुसकी आणि अध्यात्मामुळे हे एका परिवारात परिवर्तन होईल. आपले स्वप्न विश्व एक परिवार बनवायचे आहे. आपण ह्या परिवाराचे एक भाग आहोत. ज्या क्षणी तुम्ही हा विचार कराल त्या क्षणी तुमच्या भावनांचे तुम्ही निरिक्षण करा. आपल्यात खरेपणा येईल. आपला स्वभाव एकदम नैसर्गिक होतो. आपण प्रत्येकाशी आपुलकीने वागतो. आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही, तो माझ्याविषयी काय विचार करेल?’, ‘त्याचे माझ्याविषयी काय मत असेल?’. ह्या सर्व चिंता दूर होतील. लपविण्यासारखे काहीच नसेल. तुम्हाला स्वत:चे संरक्षण करावे असे वाटणारच नाही किंवा दुसऱ्यापासून काही लपवावे लागणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे कि हे सर्व तुमच्याच परिवारातील आहेत.

आपण ज्यावेळेस म्हणतो कि मला संरक्षण हवे याचा अर्थ म्हणजे आपल्या मध्ये कुठेतरी भय आहे. भय वाटणे म्हणजे आपुलकीची जाणीव नाही. मला इराक च्या पंतप्रधानानी आमंत्रित केले होते. मी तिकडे गेल्यानंतर मला त्यांनी संरक्षण साठी १२ गाडया दिल्या. हि ४-५ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नुकतेच युद्ध संपले होते. त्यात दोन टँकर होते, जे अंतर कापायला नेहमी अर्धा तास लागायचा त्याला दोन तास लागले. मी ज्या हॉटेल मध्ये राहिलो होतो ते सर्व बाजूनी सुरक्षा रक्षकानी वेढले होते. तो ग्रीन झोन होता. तिथे तीन प्रकारचे झोन होते – ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. मी मंत्र्यांना सांगितले कि मी इथे काही सुरक्षा गराडयात रहायला आलो नाही. मला लोकांना जावून भेटायचे आहे. ते म्हणाले.’ हा रेड झोन आहे; तुम्ही तिथे जावू शकत नाही. तुम्ही भारतातून आलेले पाहुणे आहात आणि महत्वाचे व्यक्ती आहात. आम्ही तुम्हाला तिकडे जावू देवू शकत नाही’. मी म्हणालो,’माझी स्वत:ची सुरक्षा आहे, कृपया मला जावू द्या’, आणि मी त्यांना सारखे म्हणत राहिलो. ज्यांना काही बोलयचे नव्हते त्याच्याशी मला संपर्क साधायचा होता. सरकार नाराज झाले होते, पण ते पाहुण्यांच्या विनंती ला नकार देवू शकले नाहीत. मग मी तिथे गेलो आणि तेथील लोकांना भेटलो. सुरुवातीला त्यांच्यामध्ये खूप राग भरलेला होता. त्या जमाती च्या नेत्यांना मी भेटलो. तेथील शिया समितीने माझ्यासाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. ते खूप कृतज्ञ होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले कि, ‘गुरुजी हे तुमचे दुसरे घर आहे. आमच्या कडे परत या. आम्हाला असे वाळवंटात टाकून जावू नका. त्यांना माझी भाषा समजत नाही कि ते माझ्या धर्माचे नाहीत तरी देखील त्यांच्या मध्ये प्रेम, आपुलकी दिसत होती.

त्यानंतर इराकच्या पंतप्रधानांनी ५० युवकाना भारतात शांतीचे दूत बनण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. हे ५० युवक बेंगलोर मध्ये दाखल झाले. त्यांना इंग्रजी येत नव्हते. आम्ही त्याच्या साठी अनुवादक आमंत्रित केले होते. ते रात्री खूप वेळ जागे रहायचे, येथील कुठलेही नियम पाळायचे नाहीत. ते एकमेकात भांडण करत रहायचे. तसे पाहता आश्रम मध्ये खूप शांती आहे. इथल्या लोकांना असे चित्र पाहायची सवय नाही. त्यांना सावरायचे म्हणजे खूप मोठे आव्हान होते. ते खूप मासांहार खायचे, पण इथे आश्रमात फक्त शाकाहारी आणि आरोग्यकारक अन्न आहे. पहिला दिवस खुपच कठीण, त्रासदायक होता. दुसरा दिवस तर अजूनच त्रासदायक होता. तिसरा दिवस तर असह्य होता. त्यांना तिथून पळून जायचे होते. मग मी त्यांच्याशी बोललो, त्यांची समजूत काढली आणि मग ते थांबायला तयार झाले. चौथ्या दिवशी त्यांच्यात परिवर्तन झाले. मला सांगायला आनंद होतो कि हे युवक त्यांच्या मायदेशी गेले आणि त्यांच्या पैकी एकजण पंतप्रधानांना त्यांच्या सचिवालयात मदत करतो. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. मला पंतप्रधानांनी विचारले कि, ‘तुम्ही अशी काय जादू केली? कि हे सर्व युवक सारखे हसत असतात आणि एवढ्या तणावपूर्ण परिस्थितीत देखील खूप उत्साही असतात’. हे युवक मायदेशी शांतीचे दूत बनून गेले आणि त्यांनी हजारो लोकांना, शांत कसे रहायचे, दुसऱ्याशी कसे संबंध करायचे आणि आनंदी कसे रहायचे याचे शिक्षण देवू लागले. अर्थात हा तर सागरातील एक थेंब म्हणू शकाल;

मी असे म्हणत नाही कि सर्व काही बदललेले आहे. आज पण इराक मध्ये अजूनही बॉम्बस्फोट होत आहेत. पूर्ण इराकचे परिवर्तन झाले आहे असे नाही पण काही युवकांमध्ये खूप परिवर्तन आले आहे ज्यांना शांत कसे रहायचे माहीत नव्हते. म्हणून मला वाटते कि ह्या ज्ञानाची जगाला फार गरज आहे – स्व मध्ये कसे रहावे आणि दुसऱ्याशी संबंध असे ठेवावे. तुम्हाला काय वाटते? जीवनाचा सार म्हणजे प्रेम आहे, जीवनाची सुरुवात आणि ध्येय प्रेम आहे. प्रेमानेच जीवनाची सुरुवात होते आणि जीवनला आधार मिळतो. प्रेमा शिवाय कोणी जगूच शकत नाही. तुम्ही लहान असताना तुम्ही कुणावर अवलंबून नसता. सर्व लहान मुले हि आश्रित असतात, पण तुम्हाला त्याची कधी जाणीव होत नाही कारण तुमच्याकडे आईचे प्रेम असते ज्यामुळे तुम्ही तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. आणि तुम्ही जसे मोठे होतात तसे तुम्ही प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करता. तुम्ही आप्तसंबंधातून, तुमच्या मुलांकडून, वडीलधाऱ्याकडून किंवा सगळ्याकडून प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करता. तुम्ही ज्या वेळेस वृद्ध होता त्यावेळेस सुध्दा एकटे राहू शकत नाही कारण तुमची काळजी घ्यायला कोणीतरी हवे असते.

तुम्ही भौतिक दृष्टीकोनाच्या पलीकडे पहिले तर तुम्हाला अध्यात्मिकाचा प्रभाव दिसेल; एक प्रकारची उर्जा असते कि जिच्यामुळे प्रेम सर्वत्र असते. आणि हीच उर्जा, ज्याला तुम्ही काहीही म्हणू शकता, एका व्यक्ती कडून किंवा असंख्य व्यक्ती कडून तुम्हाला एक सुंदर कंपन मिळते त्यालाच तर प्रेम म्हणतात. आपण सर्व याच गोष्टीपासून बनलो आहोत. आपण आयुष्यभर जी गोष्ट शोधत असतो त्याच गोष्टी पासूनआपण बनलो आहोत. ध्यान म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपण अस्तित्वात आहोत त्या मध्ये विश्राम, आराम करणे. म्हणजे आपल्या उगम स्थानी रहाणे. मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी मुळे हि सृष्टी निर्माण झाली आहे ती गोष्ट अनाकलनीय, चिरंतन, सुंदर, प्रचंड आहे. मी त्याचे वर्णन करू शकत नाही. खर पाहता आपण प्रेमा बद्दल जास्त बोलू नये कारण ते व्यक्त करणे अशक्य आहे. माझे एक निरीक्षण आहे, जे मला मनोरंजक वाटते, पूर्वेकडील देशात प्रेम व्यक्त केले जात नाही. ते प्रेम अनुभवतात पण व्यक्त करत नाहीत. ‘I love you so much’ असे सांगायला खूप लाजतात. ते खूप लाजाळू आहेत आणि असे शब्द ते उच्चारत नाहीत. मला माहीत आहे कि माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझे तिच्यावर, पण तिने ‘मी तुझ्यावर प्रेम करते ‘ असे एकदा सुध्दा म्हटले नाही ना मी तिला कधी म्हटले नाही. आणि आपल्याकडे ‘I love you so much’ हे कधीच म्हणत नाहीत. नवरा बायको पण कधी शब्दाने प्रेम व्यक्त करत नाहीत. अमेरिके मध्ये याच्या बरोबर विरुद्ध आहे. कोणी बसले असेल किंवा उभे असेल तरी ते ‘Oh, I love you so much dear’ म्हणत राहतात. सकाळच्या चहा पासून ते रात्री झोपेपर्यंत ते वारंवार तेच म्हणत राहतात. मला असे वाटते कि याचा कुठेतरी मध्य, मधला मार्ग असावा. भारतातील खेड्यामध्ये लोक प्रेम करीत असतील पण ते कधीही बोलून दाखवत नाहीत.

माती मध्ये आपण ज्या प्रमाणे बीज पेरतो, प्रेम हि तसेच असावे, बीज जर जमिनीत जास्त खोलवर पेरले तर त्याला कधीही अंकुर फुटणार नाही. किंवा जमिनीवर ठेवले तरी त्याला अंकुर फुटणार नाही कि मुळे येणार नाहीत. प्रेम हे ना अमेरिके पद्धतीने ना पूर्वेकडील देशाप्रमाणे असावे, पण या दोन्हीतील मध्य असावे. प्रेम तुम्ही व्यक्त करा पण एवढे करू नका कि तुम्ही तुमच्या बायकोला सुरुवातीला, ’मधू, मधू, मधू’, म्हणाल आणि नंतर तुम्हाला मधुमेह होईल. सुरुवातीला तुम्ही म्हणता कि, ‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही’ आणि नंतर ‘ माझ्या डोळ्यासमोर उभी राहू नकोस’. असे खूप वेळा घडते. म्हणून मला वाटते कि आपण मध्य मार्गाने जावे, प्रेम व्यक्त करावे पण थोडे, अतिरेक नको. प्रेमाची मागणी केल्याने प्रेमाचा विनाश होतो. सामान्यत: बायको नेहमी म्हणते, ‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे?’. हा प्रश्न नवरा बायको एकमेकाला सारखे विचारत असतात. ‘तुमचे हल्ली माझ्यावर प्रेमच नाही. तुमचे खरच माझ्यावर प्रेम आहे?’ असे सारखे विचारणा केली असता थोडेफार काही प्रेम आहे त्याचा पण विनाश होतो. ‘अरे देवा, या माणसावर माझे प्रेम आहे हे मी कसे सिद्ध करू?’. एखाद्याला आपले प्रेम सिद्ध करून दाखवायचे म्हणजे ओझे वाटते कारण प्रेम व्यक्त करणे फार कठीण आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने व्यक्त करून दाखवा पण ते व्यक्त करता येत नसते. एका व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करायला कठीण जात असते आणि त्यात तुम्ही जर त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला भाग पाडले तर तो विचार करतो कि, ‘अरे बापरे, हि तर मोठी डोके दुखी आहे’. याच करणामुळे काही कालानंतर संबंध तुटतात. मी तुम्हाला एक युक्ती सांगतो त्याचे तुम्ही अनुसरण करा – तुम्हा विषयी कोणा व्यक्तीचे प्रेम कमी होत आहे असे तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांना विचारा कि, ‘तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम का करता? मी त्यासाठी पात्र नाही. मग त्यांना मोठेपणा वाटेल आणि ते आनंदी होतील. तुम्ही जर तृप्त असाल तर लोकांना तुमच्या बरोबर रहायला आवडेल, तुमच्या मध्ये काही उणीवा असतील किंवा तुम्ही जर निराश असताल तर लोक तुमच्यापासून दुरावतील. हे माझे निरीक्षण आहे, तुम्हाला काय वाटते? तर, तुमच्या सर्व विषयावर मी संबोधीत केले का? काही राहिले आहे का? चुकून काही राहिले का? (श्रोते:शांत)

प्रश्न: हा प्रतिकार येतो कुठून?
श्री श्री : काही प्रमाणात असुरक्षितता, अस्वस्थता आणि भूत काळातील आठवणी. तुम्हाला प्रतिकाराची जाणीव झाली कि तुम्ही त्यातून बाहेर येण्याचा निश्चय करा. हे पहा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रतिकाराची जाणीव होत नाही अथवा तुम्ही ओळखू शकत नाही. एकदा का तुम्ही हे जाणले तर त्यातून जरूर बाहेर येवू शकाल. मी बुद्धिवान नाही असा विचार करू नका. तुम्ही फार बुद्धिवान आहात. तुम्हाला थोडासा धक्का देण्याची आवश्यकता आहे म्हणूनच मी सगळीकडे फिरत असतो. तुम्हाला पाठबळ द्यायला समूह हवा आहे. जसे सगळ्यांना माहीत आहे कि दारूचे व्यसन वाईट आहे तरी पण बरेचजण दारूच्या व्यसनाधीन होतात आणि त्यासाठी एक AA म्हणून समूह आहे जो अशा लोकांना थोडे पाठबळ देवून त्यांना व्यसन मुक्त करतात. आपल्या कडे सुदर्शन क्रिये साठी आहे. हा समूह का आहे, कारण तुम्हाला एकटयाला जर व्यायाम करायचा आळस आला तर तुम्हाला समुहात करू शकाल, आणि त्याने आपल्याला मदत होते. व्यायामाचे पण तसेच आहे, सगळीकडे जिम का आहेत? घरी कोणीही व्यायाम करू शकतो, जिम ला जायची गरज काय आहे? कारण एकटयाला व्यायाम करायला कंटाळा, आळस येतो, जिम मध्ये तुमच्या बरोबर बरेच लोक व्यायाम करत असतात. आणि जर का तिथे प्रशिक्षक असेल तर ते तुम्हाला आणखीनच सोपे होते कारण प्रशिक्षक तुम्हाला व्यायाम करायला मदत करतो. संस्कृत मध्ये एक प्राचीन म्हण आहे, ‘तुम्हाला जर काही सोसायचे असेल तर ते तुम्ही एकटेपणात सोसू शकता पण जर कुठली गोष्ट शिकायची असेल किंवा त्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर ते समुहात करा’ – एकास तपस्वी द्विर अध्यायी. तुमच्यावर काही संकट असेल किंवा काही नकारात्मकता असेल तर ती टोम, डिक आणि हैरीला सांगण्यात काही तथ्य नाही. उलट ते म्हणतील कि हा मनुष्य किती भयानक आहे, किती नकारात्मक आहे आणि या मुळे ते पण उदास होतील. तुमच्या उदासीनता किंवा नकारात्मक बद्दल बोलून काही उपयोग होणार नाही, त्याची तुम्हाला काही मदत होणार नाही. लोक आपले संकट सगळ्यांना सांगत बसतात. तुम्ही जर आजारी असाल तर तुम्हीं हे डॉक्टरला सांगितले पाहिजे, तोच त्याच्यावर उपचार करू शकेल. आजारपणा विषयी मित्राला फोन वरून सांगण्यात काही तथ्य नाही, कारण तो काहीही करू शकणार नाही. याच्यामधून फक्त फोन कंपनीचा फायदा होईल. मी सांगतो तुम्हाला कि या जगामध्ये जर लोक आपले आजारपणाबद्दल आपल्या मित्रांना सांगणे बंद करतील तर फोन कंपन्याचे उत्पन्न ४०% कमी होईल. तुम्ही जर संकटात असाल तर ते सर्वाना सांगणे आवश्यक नाही, तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्याचा स्वीकार करा. आणि जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल उदा: वायोलीन किंवा पियानो वाजविणे, तर त्यासाठी कुणाची तरी आवश्यकता असते, बरोबर आहे कि नाही! संगीत, अभ्यास, जिम, योगा, ध्यान यातील काहीही समुहात करणे योग्य आहे. आज सकाळी इथे ९०० लोकांनी प्राणायाम आणि ध्यान केले. मी विचारले कि, ‘ आपल्या इथे किती केंद्र आहेत?’ उत्तर आले कि हॉलंड मध्ये ५ केंद्र आहेत. मग मी त्यांना सांगितले कि आपल्याला केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. सर्व लोकांनी एकत्र येवून श्वासांचा सराव केला पाहिजे, योगासने केली पाहिजेत ज्यामुळे त्यांची चेतना उंचावेल. तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या पैकी कितीजणांना वाटते कि अशा प्रकारची अनेक केंद्र असांवी जिथे लोकं एकत्र येतील आणि आनंदी होतील. (बरेचजण हात उंचावतात) तुम्ही सर्वजण मिळून अशी अनेक केंद्र बनविले पाहिजेत जिथे सर्व लोकं आठवड्यातून एकदा एकत्र येवून भोजन करतील, गाणी म्हणतील आणि त्याच्यामुळे आपुलकीची भावना येईल. मला हॉलंड आनंदमय करण्यास आवडेल. आपण पुढील एक वर्षात हॉलंडच्या प्रत्येक खेड्यात पोहोचून, कोणीही आत्महत्या करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हिंग चे यश म्हणजे Prozac च्या विक्रीत घट. ‘Prozac हे हॉलंड च्या कुठल्याही औषधी दुकानात मिळता कामा नये, कारण ते घ्यायला कोणी नसेल’ हे उद्दिष्ट आपल्या समोर ठेवले पाहिजे. आपण सगळे मिळून करू या? आपण याच दिशेने गेले पाहिजे. आपले उद्दिष्ट Prozac च्या विक्री मध्ये घट.