त्याग केल्याने तुम्ही सशक्त होता


05
2012
Jun
बेंगलोर, भारत
कोणत्या कारणामुळे आपण उदास होतो? पक्षी, आकाश, निसर्ग यामुळे आपण कधीच निराश, उदास होत नाही. पर्यावरणामुळे पण आपण उदास होत नाही. मग आपले निराश होण्याचे नेमके कारण काय? आपण आपल्या भोवतालच्या लोकांमुळे निराश होतो. आपले शत्रूच काय पण आपल्या मित्रांमुळे आपण निराश होतो. आपले मन आपल्या शत्रू किंवा मित्रामध्ये गुंतून राहते. दिवसभर आपण आपल्या मित्राबद्दल किंवा शत्रूबद्दल सतत विचार करत असतो.
कोणाचे काही वाईट केले नाही तरी लोकं आपले शत्रू बनतात. इथे बऱ्याच लोकांना हा अनुभव आला आहे. आपण कोणाचाहि अपमान केला नाही तरी लोकं आपले शत्रू होतात. हे खूप आश्चर्यकारक आहे. आपण विचार करतो कि, ‘काल पर्यंत हा माझा चांगला मित्र होता, आज अचानक ह्याला काय झाले? तो असा का वागत आहे?
त्याचप्रमाणे आपण ज्यांच्यावर काही उपकार, मदत केली नाही ते लोकं आपले जवळचे मित्र बनतात. म्हणून मी सांगतो कि, ही सर्व काही आश्चर्यकारक आणि रहस्यमय कर्म आहेत ज्यामुळे काही लोकं आपले मित्र बनतात आणि काही शत्रू.
तर मग आपण काय करायचे? आपण आपले सर्व मित्र आणि शत्रू यांना एका टोपलीत ठेवून आपण अंर्तमनाने रिकामे व्हायचे आणि आनंदी रहायचे. हे सर्व जे काही घडते ते एका नियमाने होते, पण हा नियम काय आहे आणि कुठून आला हे आपल्याला माहित नाही. लोकांच्या आपल्या बद्दलच्या असणाऱ्या भावनांबद्दल आपण कधीही काहीही सांगू शकत नाही. त्यासाठीच आपला आपल्यावर पूर्ण विश्वास असायला हवा, देवावर विश्वास ठेवावा पण कोणा मित्र अथवा शत्रूवर ठेवू नये. मित्र आणि शत्रू यांच्या बद्दल विच्रार करून आपला वेळ वाया घालवू नये. काय म्हणता तुम्ही?
याचा अर्थ असा घेवू नका कि तुम्ही तुमच्या मित्रांपासून दूर रहा किंवा नवीन मित्र बनवू नका. मला हे अजिबात म्हणायचे नाही. प्रेम, मित्रत्व हे आपल्या स्वभावातच असायलाच हवे. आपल्या शेजारी कोणी येवून बसल्यावर आपण त्यांच्या कडे पाहून स्मितहास्य करून त्यांच्याशी दोन गोष्टी बोलतोच. आपण हा विचार करू नये कि हा मित्र आहे कि शत्रू, मला कुणाबरोबर काहीच बोलायचे नाही असा विचार करून तिथून रागाने उठून जावू नये, हे चांगले, शहाणपणाचे लक्षण नाही. हा दुर्लक्षितपणा आणि मुर्खपणा आहे. आपण सर्वांशी वार्तालाप केला पाहिजे आणि त्याच वेळेस स्व: वर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. समजले का तुम्हाला?
जेव्हा आपण आपल्या स्व वर लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आपल्याला राग येत नाही, आपण उदास होत नाही कि आपण आक्रमक होत नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारची निराशा येत नाही. नाही तर बऱ्याच वेळेला काय होते, आपण विचार करतो कि एकेकाळी हा माझा किती चांगला मित्र होता आज तो माझ्याशी बोलत देखील नाही, मी त्याच्यासाठी काय काय केले आणि तो आज माझ्या विरोधात गेला. या विचाराने आपण आपला वेळ वाया घालवतो. हे आपण अजिबात करू नये. ठीक आहे ना !!!!!
आयुष्य हे फार छोटे आहे आणि या छोट्या वेळेत काही चांगले कृत्ये करावेत. आपल्याकडे त्याग बुद्धी असायला हवी. त्यागाने आपण सशक्त बनतो. जी शक्ती त्यागाने मिळते ती दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. त्याग आपल्याला चांगली शक्ती देतो. सगळेजण कुठल्या ना कुठल्या मार्गाने छोटे किंवा मोठे त्याग करतातच. या जगात असा एकही मनुष्य नाही कि जो त्याग करत नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्याग करावाच लागतो. जिथे प्रेम आहे तिथे कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो. आई आपल्या सुखाचा त्याग आपल्या मुलासाठी करते. प्रत्येक आई तिच्या बाळासाठी रात्रभर जागी राहते. तिचे सर्व लक्ष रात्रंदिवस आपल्या बाळावर असते. ती त्याच्या साठी आपले सुख विसरते.
त्याच प्रमाणे जगात अशी काही लोकं आहेत जे समाजासाठी त्याग करतात. हो कि नाही? जसे वडील आपल्या घरासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. नाही तर त्यांना एवढी मेहनत घ्यायची काय गरज आहे? कशासाठी? ते काही स्वत:साठी करत नसतात. कुटुंबाला सुख मिळावे म्हणून ते आपल्या सुखाचा त्याग करतात. हो कि नाही? एकटा मनुष्य एवढी स्वत:साठी मेहनत करत नाही. नाही तरी एकट्या मनुष्याच्या काय गरजा आहेत? त्याला फक्त रहायला एक छोटी खोली आणि पोटासाठी अन्न. एवढ्यासाठी थोडीशी मेहनत खूप आहे, रात्रंदिवस मेहनत करायची गरज नाही. आणि तो जर का ब्रम्हज्ञानि असेल तर तो थोडक्यात सुध्दा आनंदी आणि समृद्ध असेल. पण ज्याच्यावर कुटुंब आणि समाजाची जबाबदारी असेल तर त्याला कष्ट हे घेतलेच पाहिजेत.
म्हणजे प्रत्येक मनुष्य हा त्याग करतोच. जर कोणी मोठा त्याग करत असेल तर तो जास्त सशक्त आणि समृद्ध असतो. काहीजण आपले सुख आणि एशोराम त्याग करण्यासाठी तयार असतात, काहीजण आपली धन संपत्ती, काहीजण आपले नाते संबंध, काहीजण समाजानी दिलेल्या आदर सन्मानांचा त्याग करायला तयार असतात. आणि याचा विरोधाभास म्हणजे काही लोकं आपला समाजातील आदर सन्मान सोडायला तयार नसतात. जर का त्यांचा कुणी अपमान केला तर त्यांना खूप वाईट वाटते आणि ते कोसळतात. ती त्यांची दुर्बलता असते. आपण याचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.
समृद्ध आणि सशक्त होण्यासाठी मोठ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. ज्यांच्याकडे त्याग करायला काहीच नाही आणि म्हणतात कि मी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे, हे बरोबर नाही. सर्व कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडून ज्या व्यक्तीकडे सर्व काही आहे अशा व्यक्तीला त्याग बुद्धीची जाणीव असायला हवी. हे सर्वात चांगले.
हे पहा, एक संत म्हणू शकतात कि माझ्याकडे काहीच नाही, माझ्यासाठी घर पण नाही. मी किती मोठा त्याग केला आहे. पण मी याला त्याग म्हणत नाही कारण त्याच्यावर काही जबाबदारी, कर्तव्ये नाहीत. पण कोणी एक जण मोठ्या आश्रमाची आणि मोठ्या संस्थेची व्यवस्थापन जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो. आणि हे करताना ज्याला त्याग आणि वैराग्याची जाणीव आहे तो सर्वोच्च. हाच भगवान श्रीकृष्णाचा मार्ग आहे.
अर्जुन भगवान श्री कृष्णाला म्हणाले कि, ”मी सर्व गोष्टींचा त्याग करून हिमालयात जात आहे. मला माझ्या भावंडांशी युद्ध करायची इच्छा नाही आणि मला राजेशाही चा उपभोग घ्यावयाचा नाही. मी हे सर्व कशासाठी करू? कृष्णा तू मला युद्ध करायला का भाग पाडत आहेस? मला जावू दे. मला हिमालयात जायचे आहे. तेव्हा श्री कृष्ण म्हणाले, “नाही, तू ते करू नकोस. तू तुझा धर्म सोडू नकोस, त्याच्यातून तुला काय फळ मिळेल याचा तू विचार करू नकोस.
तुम्ही तुमची कर्तव्ये आणि जबाबदारी पार पाडा पण त्याच बरोबर त्यागाची जाणीव ठेवा. देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी उचला पण त्याचबरोबर मनात त्यागाची आणि वैराग्याची जाणीव ठेवा.
संत कबीर यांची एक सुंदर कविता आहे, “ झुठ ना छोडा, क्रोध ना छोडा, सत्य वचन क्यों छोड दिया; क्रोध ना छोडा, काम ना छोडा, नाम जपना क्यों छोड दिया”
आपली जाणीव जेव्हा ईश्वराच्या नामजपाने पक्व होईल त्याच वेळेस आपण जप करायचे थांबवावे. जप केल्याने तुमची प्रगती अजपा कडे होते. पण तुम्ही जर जप अर्ध्या वरच सोडलात तर ते चुकीचे आहे. उदा: तुम्हाला कुठे उतरायचे आहे त्यानुसार तुम्ही एखाद्या बस मध्ये चढता. त्यावेळेस तुम्ही असे म्हणू शकत नाही, कि जर मला बस सोडायचीच आहे तर ती मी पकडू कशाला? काही लोकं असा विचार करतात. त्यांना समजत नाही कि जिथे तुम्ही बस पकडता आणि जिथे ती बस सोडता त्या दोन्ही वेगवेगळी ठिकाणे असतात. तुम्ही एका ठिकाणाहून बस मध्ये बसता आणि ती दुसऱ्या ठिकाणी उतरता. त्याच प्रमाणे तुमच्या मनाची स्थिती जप करण्याआधी वेगळी असते आणि जप केल्यानंतर वेगळी असते. आपल्या जीवनाचा प्रवाह पण ह्याच दिशेने असावा.
त्याग हा महत्वाचा आहे. त्यागाविना आपल्या मनात फार जडता येते. ज्या व्यक्तीला त्यागाची जाणीव असते, त्या व्यक्तीची तुम्ही कितीही स्तुती केली तरी त्याला त्याचा अहंकार येत नाही. ज्ञानी, त्यागी आणि भक्त यांची तुम्ही कितीही कौतुक, स्तुती केली तरी त्यांना अहंकार येत नाही. आणि ज्याला वैराग्याची किंवा त्यागाची जाणीव नाही अशा व्यक्तीला स्तुती, कौतुक म्हणजे एक ओझे वाटते. प्रेम आणि कौतुक ओझे वाटू शकते. असे वाटू लागल्यास आपण त्याच्या पासून दूर राहणे पसंत करतो. याच कारणांमुळे काही प्रेम विवाह तुटले आहेत. नवरा बायको मध्ये एक जण दुसऱ्यावर इतके प्रेम दाखवितो कि दुसरी व्यक्ती ते हाताळू शकत नाही. मग ती दुसरी व्यक्ती पळवाटा शोधते, आणि पळून जाते ! किती जणांनी असे होताना पहिले आहे? (खूप जण हात उंचावतात)
बरेच जण माझ्यापाशी येवून म्हणतात कि, “मी या व्यक्ती वर खूप प्रेम करतो, पण ती व्यक्ती माझ्यापासून दुरावते”. मी त्यांना सांगतो कि, ”तुम्ही एवढे प्रेम व्यक्त करू नका कि समोरचा व्यक्तीला कंटाळा येईल आणि तो चिडेल”.
परदेशात हेच नेमके होते. एक दुसऱ्याच्या पाठीमागे सारखे, ‘प्रिये प्रिये’, करून पळतात. आणि मग काय होते? त्यांना मधुमेहाचा त्रास सुरु होतो!!
ते सारखे प्रिये प्रिये म्हणतात आणि मग एके दिवशी ते कंटाळून म्हणतात कि, “मी तुला सहन करू शकत नाही”. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अतिशोक्ती करू नये. आपल्या कडे भारतात एकदम विरुद्ध आहे. इथे प्रेम व्यक्त केले जात नाही. तुम्ही खेडे गावांत जाऊन पाहिले तर ते प्रेम कधीही व्यक्त करत नाही. ते आपल्या हृदयात प्रेम जपतात. परदेशात प्रेम एवढे व्यक्त करतात कि त्यातील प्रेम नाहीसे होते.
प्रेम हे एका बीजा प्रमाणे पेरले पाहिजे. जर तुम्ही बीज मातीत खोलवर पेरले तर त्याला कधीही अंकुर फुटणार नाही. जर तुम्ही १० फुट खोल बीज पेरले तर ते मरून जाईल. हीच परिस्थिती भारतातील खेडे गावात आहे. अशा काही नवरा बायकोच्या जोड्या आहेत जे आयुष्यभर एकत्र आहेत पण आपले एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत नाहीत. शहरात आणी परदेशात वस्तुस्थिती एकदम ह्याच्या उलट आहे. तिथे नवरा बायको सारखे एकमेकाला ‘I Love you’ म्हणतात आणि म्हणूनच त्यांचे प्रेम अयशस्वी होते. त्यांचे नाते औपचारिक होते.
समजा तुम्हाला कुणी पाणी आणून दिले कि लगेच तुम्ही म्हणता, ‘खूप खूप धन्यवाद!’ इथे धन्यवाद म्हणायची काही गरज नाही. त्याने फक्त टेबला वरचा पाण्याने भरलेला ग्लास उचलून तुम्हाला आणून दिला आणि तुम्ही लगेच त्याला धन्यवाद म्हणता.
जर तुम्ही खरेच एखाद्या वाळवंटातून २-३ दिवस पाणी न पिता आला आहात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला जर कोणी पाणी देवू केले आणि तुम्ही, ‘खूप खूप धन्यवाद’ म्हटलात तर त्यांत तुमचा प्रामाणिकपणा दिसू शकेल.
आपल्याच घरात आपण खूप औपचारिक राहतो. जर आपल्याला कोणी पाणी अथवा काही खायला दिले कि आपण लगेच, ‘धन्यवाद’ म्हणतो! ह्याला काहीच अर्थ नाही.
आपल्या भावना किती खोलवर आहेत हे आपल्या शब्दातून प्रामाणिकपणे व्यक्त झाले पाहिजे. शब्दांतून सगळ्याच भावना व्यक्त करता येत नाही, पण भावनांना नेमक्या शब्दात गुंडाळून व्यक्त करता आले पाहिजे. नाहीतर एखाद्याच्या खऱ्या अर्थाने भावना व्यक्त करणे अवघड होते. त्यासाठी शब्द हे फार महत्वाचे असतात आणि अशा पद्धतीने आपली भाषा व्यक्त करता आली पाहिजे.
कन्नड भाषेत एक छानशी कविता आहे जिचा सार असा आहे, ‘तुम्ही ज्या वेळेस बोलता, तुमची शब्द रचना हि जणू गळ्यातील मोती हारा प्रमाणे असावी. ती मोत्यासारखी शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट, निर्मळ असावी, ती हिऱ्या सारखी चमकणारी असावी आणि ती पारदर्शक असावी. तुमच्या संभाषणाचा परिणाम असा झाला पाहिजे कि भगवान श्री शंकरांनी सुद्धा डोके हलवून आपली संमती दर्शवली पाहिजे. भगवान श्री शंकर हे तसे नेहमी शांत आणि स्थिर असतात, पण तुमच्या संभाषणाने त्यांनी सुद्धा आपले डोके हलवून म्हटले पाहिजे कि, ‘हो, हे सत्य आहे! ते बरोबर आहे.’
प्रश्न: गुरुजी, जर प्रेमाचे वास्तव्य चेतने सारखे आहे तर मग हि नातीगोती कशासाठी?
श्री श्री रविशंकर: चेतनेतूनच मनुष्य व्यक्त होत असतो. आणि मग नातीगोती ही आपापसात होतात. जर तुम्हाला कुठल्या नात्यांची गरज नसेल तर तुम्ही बळजबरीने कुठले ही नाते करू शकत नाही. तुम्हाला कुठेतरी नात्यांची गरज वाटते म्हणूनच तुम्ही हा प्रश्न विचारात आहात. तुम्ही स्वत:शी झगडत आहात म्हणून तुम्हाला नात्यांची गरज वाटते, पण इथे तुमचा अहंकार आड येतो आणि तुम्ही विचार करता कि ‘मला नात्यांची गरज नाही’. किंवा तुम्हाला नक्की माहीत नाही कि तुम्हाला नात्यांची गरज आहे कि नाही. ह्या साठी मी म्हणतो कि नाती चांगली राहिली अथवा वाईट त्याचा तुमच्यावर काही परिणाम होता कामा नये. तुम्ही फक्त विश्राम करा. सर्व काही बाजूला ठेवून ध्यान करा, विश्राम करा, आणि स्व कडे पहा. या जगात कोणाच्याही बरोबर संवाद साधताना चांगले संबंध जोडण्याचा प्रयत्न करा.
प्रश्न: गुरुजी, स्वत:ला आकर्षणापासून कसे दूर ठेवावे?
श्री श्री रविशंकर: ‘आकर्षणापासून दूर राहणे’ हा विचार जरी मनात आला तरी तुम्ही त्या पासून दूर आहात हे नक्की. हे चांगले आहे. तुम्ही असे समजून घ्या. गाडीला ब्रेक असणे आवश्यक आहे नाही तर तुम्ही संकटात येवू शकता. आयुष्य हे प्रेमाने भरलेले आहे यावर तुमचा दृढ विश्वास हवा. तुम्हाला प्रेम वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, ज्या क्षणी तुमची उदासीनता दूर होईल त्या क्षणी प्रेम स्पष्ट दिसू लागेल. या साठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे – उदासीनते पासून मुक्तता आणि विश्राम.
प्रश्न: गुरुजी, माझी अशी इच्छा आहे कि मी घराचे दार उघडताच दारात तुम्ही असावेत, जेव्हा माझा फोन वाजेल त्यावेळेस तुम्ही तिकडून बोलत आहात आणि मी तुमचा आवाज एकत आहे. जो कोणी साधना रोज करत असेल त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. तर मग मी माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किती वेळ थांबू?
श्री श्री रविशंकर: हो! मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एके दिवशी मी आणि एक व्यक्ती, आम्ही आश्रमातून कोणालाही न सागंता बाहेर पडलो. आम्ही दुरवर एका गावात निघलो. वाटेत मी चालकाला एका छोट्या झोपडी पाशी गाडी थांबावयास सांगितली. मी त्या झोपडीत गेलो. आत मध्ये एक मनुष्य बसलेला होता. तो एका साधा शेतकरी होता ज्याच्याकडे थोडीशी शेती होती. घरात एक छोटासा टीव्ही होता ज्याच्यावर तो माझे कार्यक्रम पहायचा. कार्यक्रम पाहून त्याला मला भेटायची तीव्र इच्छा झाली. आणि मग तो विचार करायचा कि, ‘मी गुरुजींना कसे भेटू? माझ्याकडे तर बेंगलोरला जाण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत. मला काहीही करून गुरुजींना भेटायचे आहे’.
मी त्याचा समोर जावून उभा राहिलो! त्याला एवढा जबरदस्त धक्का बसला कि तो लगेच गुडघ्यांवर पडून रडू लागला. तो एक साधा शेतकरी होता. त्याची अर्ध्या एकरा पेक्षा ही कमी शेती होती जिच्या मध्ये तो टोम्याटो पिकवायचा. त्याचे छोटे कुटुंब होते.
त्याच प्रमाणे एकदा मी एका शाळेत गेलो आणि तिथे मी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना शिकविले. जवळ जवळ दोन तास मी त्याच्यांशी बोललो. ते सर्व खूप उत्तेजित आणि उत्साही झाले होते. ती एका छोट्या गावातील छोटी शाळा होती. शिक्षक खुपच गंभीर झाले होते. म्हणून मी त्यांना थोडे उत्तेजन दिले आणि सर्वाच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य आले. हे फक्त ज्ञानामुळेच झाले. ज्ञान एकून ते जर आपल्या आयुष्यात आचरणात आणले तर आपल्या आयुष्य आनंदी आणि उस्ताहपूर्ण राहते.
कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते!
एकदा मी आणि किशोरदा आसाम हून अरुणाचल प्रदेश साठी प्रवास करत होतो. आसाम मधील एक खेडेगाव पार करताच मी एका झोपडी बाहेर गाडी थांबावयास सांगितली. आम्ही त्या झोपडीत गेलो आणि मी किशोरदा ना त्या झोपडीत असणाऱ्या महिलेला ७०० रुपये देण्यास सांगितले. त्या महिलेच्या पतीचे ऑपरेशन करावयाचे होते ज्याच्या साठी तिला २१०० रुपये लागणार होते. पण तिच्या कडे फक्त १४०० रुपयेच होते. ऑपरेशन साठी तिच्या कडे पुरते पैसे सुद्धा नव्हते. म्हणून ती देवळात देवासमोर ती पैशांसाठी प्रार्थना करीत होती. तिच्या देवळात एक काली मातेचा फोटो होता आणि एक श्री रामकृष्ण परमहंसचा. ती त्यांच्या समोर बसून पैशांसाठी प्रार्थना करीत होती. मी तिला भेटून तिच्या बरोबर थोडा वेळ घालविला.
मला काय म्हणायचे आहे कि - ही सर्व सृष्टी एकाच शक्ती पासून निर्माण झाली आहे आणि तीच शक्ती ही सृष्टी चालवत आहे. एकाच तत्वापासून ती निर्माण झाली आहे. आपण सगळेजण ह्याच तत्वापासुन निर्माण झालो आहोत. तुम्ही कुणाला ही नमस्कार करा अथवा कुठल्याही देवाला प्रार्थना करा ते सर्व ह्याच तत्वाला जावून मिळते.
आता पहा, ती महिला मला ओळखत देखील नव्हती, हा प्रसंग २० वर्षापूर्वी घडला आहे. त्या वेळेस आम्ही फक्त ४-५ जण गाडीत होतो. आम्ही ज्या वेळेस तिला भेटलो त्यावेळेस पाहिले कि ती खूप सामर्थ्यवान आणि एकदम भक्ती मध्ये दंग होती. जर आपण ईश्वराला हृदयापासून बोलविले तर पहा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवू लागतात. तुम्हा पैकी किती जणांच्या तरी बाबतीत असे घडले आहे. हो कि नाही? किती जणांच्या तरी जीवनात असे अदभूत चमत्कार घडले आहेत. पहा!
इथे सर्वाच्या जीवनात असे घडले आहे. (दर्शकांकडे बघून). हे आश्चर्यकारक नाही. हे घडत राहते. हे जर घडत नसेल तर हे आश्चर्यकारक आहे. वास्तविक पाहता जर चमत्कार घडत नसेल तर आश्चर्यकारक आहे! हो खरच, काही चमत्कार तत्काळ होतात आणि काहींना वेळ लागतो.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हटलात कि त्यागाने माणूस सशक्त बनतो. पण काय त्याग करायला माणसाचे अंतर्मन सशक्त हवे?
श्री श्री रविशंकर: हो, त्यागाने तुम्ही सशक्त होता. आणि त्यासाठी आपले अंतर्मन ज्ञानाने सशक्त केले पाहिजे. दुर्लक्षितपणा तुम्हाला त्याग करायला सशक्त बनवू शकत नाही. ते फक्त ज्ञानातूनच होवू शकते. निरीक्षण करून पहा. काही वेळापूर्वी तुम्ही हा ज्ञानाचा मुद्दा एकला आणि तुम्हाला आता धैर्य आणि धीटपणा आला. हो कि नाही? हे लगेचच किंवा तत्काळ होते.
प्रश्न: गुरुदेव, YLTP कार्यक्रमामुळे आमच्या क्षेत्रात खूप काही बदल घडून आले आहेत. ह्या कार्यक्रमाचा ध्येय, उद्देश काय आहे? कोणते उद्दिष्ट ठेवून मी युवाचार्याचे काम करू?
श्री श्री रविशंकर: श्रेया (स्वत:ची प्रगती) आणि प्रयास (समाजातील दुसऱ्याची प्रगती). तुमची आणि समाजाची प्रगती ही एकत्रित झाली पाहिजे. ते एका मागोमाग होवू शकत नाही. हेच YLTP कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे.
तुमच्या आयुष्यातील एक किंवा दीड वर्ष हे देशासाठी दिले पाहिजे. आणि तुम्ही पाहाल कि तुमची प्रगती कशी होते!! जर आपल्याला इमारत उंच बांधायची असेल तर तिचा पाया हा खोलवर खोदला पाहिजे. तुमची जर मोठ्या सामाजिक दर्जा वर जाण्याची महत्वकांक्षा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टींचा त्याग करावा लागेल. आळशी राहून आराम करून तुम्हाला हे साध्य करता येणार नाही. तुम्हाला कष्ट हे घेतलेच पाहिजेत. आणि ह्याच कष्टातूनच तुम्हाला चांगले फळ मिळेल.