तुमच्या आयुष्यालाच तुमची साधना समजा!


 25
2012............................... Banglore Ashram
May

२५ मे २०१२ – बेंगलोर आश्रम
प्रश्न: गुरुजी भगवद्गीतेमधे भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि माझा जन्म आणि कर्म दोन्ही अध्यात्म आहे. कृपया हे स्पष्ट करा.
श्री श्री रविशंकर: हो, तुम्ही जेव्हा आत्मज्ञान प्राप्त करता तेव्हा तुम्हाला दोन्ही, जन्म आणि कर्म अध्यात्म असल्याचे जाणवते. ही समज तुम्हाला येते. तुमच्यामधे जर एकदा शिस्तपणा आणि नैतिक जबाबदारी प्रस्थापित झाली कि तुमच्याकडून चुका होवूच शकत नाहीत. तुमच्या मुखातून एकही वाईट शब्द येवू शकत नाही. तुमच्या हृदया मध्ये दुसऱ्यांबद्दल तिरस्कार निर्माण होवू शकत नाही. कारण सर्वजण तुमच्यातील एक भाग आहे असे तुम्हाला वाटू लागते. हेच प्रेमाचे सर्वोच शिखर आहे. हेच ज्ञान, सतर्कता तुमच्या मध्ये पूर्णपणे प्रस्थापित झाल्यावर तुम्हाला स्व: चा अनुभव येईल. हेच भगवतगीते मध्ये म्हटले आहे “ तत् स्वयम् योगा संसिद्ध: कलेन अत्मानी विंधाती”
जीवनात आपण फक्त एवढेच समजले पाहिजे की – मी जे काही करतोय आणि जे काही केले आहे ते सर्व अध्यात्मानेच उस्फुर्त होवून झाले आहे. आणि हे सर्व मी अध्यात्माला समर्पित करतो. सर्वात पहिल्यांदा तुम्ही अध्यात्माला समर्पित आहात हे तुम्ही जाणले पाहिजे मग तुमच्या चुकीच्या वर्तनात सुध्दा तुम्हाला विनासायसपणा जाणवेल.
ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपल्या काही तीव्र इच्छामुळे आपण जर काही चूक केली तर त्याच्यावर आपण तोडगा शोधला पाहिजे आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. हे वारंवार केल्याने आपण एका अशा अवस्थेत येतो जिथे आपण प्रेममय होवून जातो आणि आपल्याला जाणवते कि सर्व काही अध्यात्मामुळे प्रेरित आहे.
प्रश्न: गुरुजी, या शरीरांपलीकडे मी तुम्हाला गुरु म्हणून कसे ओळखू शकतो, समजू शकतो? मला वाटते कि याबाबतीत मी कमी जाणतो.
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जर वाटत असेल कि मी या बाबतीत खूप कमी जाणतो तर तेच खूप आहे. आराम करा, विश्राम करा! हेच प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? अभेद – मी त्याच्यापासून वेगळा नाही आणि तो माझ्यापेक्षा वेगळा नाही. समजा कुणी जर एखाद्या मुलाला वाईट बोलले तर त्याचे वडील काय म्हणतील? “जर तू माझ्या मुलाला वाईट बोललास म्हणजे मला वाईट बोलल्यासारखे आहे.” किंवा जर तुम्ही कुठल्या पालकांना वाईट बोललात तर त्यांचा मुलगा काय म्हणेल? “माझ्या आई वडिलांना वाईट बोलणे म्हणजे मला वाईट बोलल्यासारखे आहे.” ते सर्व प्रतिकार करतील, हो कि नाही? म्हणजे त्यांच्यामध्ये एकता आहे. जिथे आपुलकीपणा आणि एकता असते तेच प्रेमाचे प्रतिक आहे.
प्रश्न: गुरुजी, गरुड पुराणा मध्ये मृत्यू नंतरचे वर्णन खूप भयानक केले आहे. पण तुम्ही म्हणता कि मृत्यू म्हणजे एक शांत झोप. याच्यावर काही बोलावे.
श्री श्री रविशंकर: हो, आपण मृत्यू बद्दल नंतर बोलूया आधी आपण जीवना विषयी बोलूया. या जीवना मध्ये आपण जर सर्व इच्छा पासून तृप्त झालो तर सर्व काही व्यवस्थित होईल. पण जीवनाच्या शेवटी आपण दु:खी, कुणा विषयी अभद्र बोललो, किंवा कुणावर राग धरला तर ती एक मोठी समस्या आहे. म्हणून जीवनाच्या शेवटी विशेषतः मृत्यूच्या क्षणी आपण तृप्त आणि आनंदी होवून या शरीराचा त्याग करावा.
पण जीवनाचा शेवटचा क्षण कुणीही सांगू शकणार नाही म्हणून जीवनात नेहमी आनंदी आणि तृप्तमय रहा !
प्रश्न: काळाच्या पलीकडे चेतना आहे का? आपण असे का म्हणतो कि पृथ्वीलोकावरची १०० वर्षे म्हणजे पितृ लोका मधील १ दिवस?
श्री श्री रविशंकर: हे असच आहे ! आपल्या जीवनातील १ वर्ष म्हणजे पितृ लोकातील १ दिवस. हे आपल्या धर्मग्रंथ मध्ये लिहिले आहे. आपण सर्वजण पितृलोका मध्ये जावून आलो आहोत पण आपल्याला तो काळ लक्षात नाही. आपण तो काळ कसा घालविला याची परिपूर्ती करायची तुम्हाला गरज नाही. हे सर्व धर्म ग्रंथात लिहिले आहे आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

प्रश्न: गुरुजी तुम्ही भगवान श्री शंकरा विषयी खूप सांगितले आहे. आपण श्री शंकरा ला शिवलिंगम म्हणून का पुजतो?
श्री श्री रविशंकर: लिंगम म्हणजे ओळख, एक असे चिन्ह कि ज्या मधून तुम्हाला सत्य आणि वस्तुस्थितीची ओळख होते. जे दिसू शकत नाही पण एका अशा वस्तू मुळे तुम्ही ते ओळखू शकता ते म्हणजे लिंगम. जेव्हा एक बालक जन्माला येते तेव्हा तुम्ही कसे ओळखता कि ते मुलगा आहे कि मुलगी? शरीराच्या एका भागामुळे तुम्ही ओळखू शकता कि ते मुलगा आहे की मुलगी. नाहीतर काही वयापर्यंत सर्व लहान बालके एक सारखीच दिसतात. पण शरीरामधील एका भाग त्यांचे भविष्य सांगते. याच कारणामुळे शरीराच्या त्या भागाला लिंगम म्हणतात. त्याचप्रमाणे ज्याने हि सृष्टी निर्माण केली त्याला तुम्ही कसे ओळखणार? त्याला काही आकार नाही. पण ज्याने हि सृष्टी निर्माण केली त्याची काहीतरी ओळख असली पाहिजे. म्हणून एक असे चिन्ह कि ज्याच्या वरून आपण स्त्री  पुरुष आकार ओळखू शकतो, ह्या दोन आकारांची संयोग करून एक अशी ओळख त्या सृष्टी निर्मात्याला द्या ज्याला आकार, ओळख नाही जो या ब्रम्हांड मध्ये व्यापक आहे तो म्हणजे शिव लिंगम. म्हणून म्हटले आहे कि, “नमामि शमीशना निर्वाणारुपम विभूम व्यापकम ब्रहमवेदास्वरूपम”  निर्वाणारुपम – ज्याला आकार नाही कि शरीर नाही, विभूम – तो सर्व व्यापक आहे, ब्रहमवेदास्वरूपम – सर्वोच ज्ञानाचा प्रतिक आहे.
बघा इंटरनेट, फोन कसे काम करतात? अवकाशां मधील प्रत्येक अणु रेणू मध्ये ज्ञान आहे. आता या इथे आपण सर्वजण बसलो आहोत, जगामध्ये किती तरी माध्यमे चालू आहेत, विविध प्रकारचे कंपन आहेत, आता इथे कितीतरी इ-मेल्स आहेत. त्यामुळेच जेव्हा तुम्ही तुमचा संगणक चालू केल्यानंतर लगेच तुमचे इ-मेल्स डाउनलोड होतात.
तुम्ही जे शब्द टाइप करून SMS  व्दारे पाठविता ते पण या आवकाशात आहेत. तुम्ही जर कुणावर रागविला असलात तर ते पण या आकाश तत्वात आहे. तुम्ही जर कुणाचे अभिनंदन केले आहे तर त्या भावना या आकाशात आहेत. म्हणूनच हे सर्व ज्ञान स्वाभाविकपणे या आकाश तत्वात आहे. हे ज्ञान आताच नाही तर हजारो वर्षांपासून या आकाश तत्वात आहे. तुम्ही हे पण पाहू शकता कि हजारो वर्षापूर्वी काय झाले आणि हजारो वर्षांनतर काय होईल, कारण हे सर्व या आकाश तत्वात लिहून ठेवले आहे अभिलीखीत आहे आणि या क्षणी इथे आहे.
मग एखादा या आकाश तत्वाला कसा आठवणीत ठेवील? पूर्वीचे लोक एक गोलाकार दगड ठेवून त्याची उपासना करत आणि या सृष्टी निर्मात्याला पूजत.
प्रश्न: गुरुदेव, भक्ती आणि ज्ञान यांचा काय संबंध आहे? ज्ञाना विना भक्ती फलदायी होवू शकते का?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जर रसगुल्ला आवडत असेल तरच तुम्हाला तो खाण्याची इच्छा होईल, बरोबर? एखादी गोष्ट तुम्हाला जर माहीत नसेल तर त्या गोष्टी विषयी तुम्हाला इच्छा कशी काय निर्माण होईल? आवडणे म्हणजे भक्ती.
तुम्ही प्रेम आणि इच्छा कोणत्या गोष्टी विषयी करता? जी गोष्ट तुम्हाला आधीपासून माहीत आहे. या, आधी पासून माहीत असलेल्या गोष्टीला ज्ञान म्हणतात. आणि एखादी गोष्ट तुम्हाला आवडली कि तुम्ही त्या विषयी माहिती काढून घेता.
हेच नेमकं नवरा बायको मध्ये होते. ते लग्नाच्या आधी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न झाल्यावर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते कुठे जातात, काय करतात समजण्याचा प्रयत्न करतात. ते दोघ वेगवेगळ्या शहरात असले तरी ते फोन वरुन एकमेकाची विचारपूस करतात. एक आई पण आपल्या दुसऱ्या शहरात राहणाऱ्या मुलाला हेच विचारते कि “तू आज काय जेवलास? आज कुठे गेला होता? आज कुठले कपडे घातले होतेस?
जर तुमचा एखादा प्रिय व्यक्ती तुमच्या पासून जर लांब रहात असेल तर तुम्हाला त्याच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुक्ता असते. ह्याचे कारण म्हणजे तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्या विषयी सर्व काही जाणून घेण्यास तुम्ही प्रयत्न करता. ह्याच कारणामुळे नवरा बायकोला वाटते कि ते एकमेकांवर हेरगिरी करत आहे, हे सहाजिक आणि नैसर्गिक आहे. जिथे ज्ञान आहे तिथे प्रेम आपोआपच फुलत जाते. ज्या प्रमाणे एक अवकाशयात्री अवकाशा संबंधी जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यात त्याची रुची एवढी वाढते कि तो त्यातच गुंग होवून जातो. तुम्ही भक्ती आणि ज्ञान यांना दूर करू शकत नाही. सुरवातीला जर ज्ञान असेल तर त्याच्या मागोमाग भक्ती येईल. आणि जर सुरवातीला भक्ती असेल तर त्याच्या मागोमाग ज्ञान येईल. म्हणून त्यांना दोन वेगवेगळे मार्ग समजू नका.

प्रश्न: गुरुदेव, यशस्वी दांपत्य जीवना मध्ये नवरा बायकोची काय भूमिका असते हे तुम्ही खूप वेळा सांगितले आहे. आज, यशस्वी दांपत्य जीवनामध्ये सासर मधल्या लोकांची भूमिका काय असावी हे सांगा.
श्री श्री रविशंकर: तुमचे आई वडील तुमच्यावर किती वेळा तरी रागावले असतील. हो कि नाही? जेव्हा तुमची आई तुमच्यावर रागावते त्यावेळेस तुम्ही ते स्वीकारता, पण तेच का तुमची सासू तुमच्यावर रागावली तर तुम्हाला राग येतो आणि दु:ख होते जणू तुमच्या घशा मध्ये काही रुतले आहे. तुमचे सासू सासरे तुम्हाला काही सांगायच्या आधी कचरतात. ते तुम्हाला तुमच्या आई वडिलां सारखे रागावत नाहीत. ते तुम्हाला कमी रागवतात. ते ज्या अधिकाराने आपल्या मुलांना रागवतात तो अधिकार ते आपल्या सून किंवा जावई वर रागविताना नसतो.
एखादा व्यक्ती अभ्यास करून अधिकाराने दुसऱ्या व्यक्तीबर कृती करतो तेव्हा तो त्याच्यावर रागावतो किंवा काहीतरी कटू बोलतो. ते तुम्हाला खटकते कारण तुम्ही त्यांना आपले मानत नाही, तुम्ही त्यांना परके मानता. तुम्ही जर तुमच्या सासूला आपली आई मानत असाल तर तुम्ही तिला जावून मिठी माराल जरी तिने काही कटू बोलल्या असल्या तरी. पण तुम्ही त्यांना परके मानता, आणि मग काही वादावादी झाल्या नंतर तुम्ही अपेक्षा करता कि त्या येतील आणि माफी मागून मिठी मारतील.
तुमचे सासू किंवा सासरे जर तुमच्यावर रागावले तर ती एका चांगली गोष्ट आहे. तुम्ही समजून घेतले पाहिजे कि ते त्यांच्या मुलात आणि तुमच्या मध्ये काही फरक करत नाहीत. तुम्ही तुमच्या आई बरोबर कधी भांडण केले नाही का? जरा तुलना करून बघा. दोन्ही बाजू एकदा तपासून पहा. तुम्ही तुमच्या आई बरोबर किती वेळा तरी भांडला आहात. किती वेळा तरी ती तुमच्यावर रागावली आहे. पण त्याचा तुम्हाला कधी राग आला नाही. कधीच नाही थोडा सुद्धा नाही. तुम्ही फक्त खांदे उडवत झाडून टाकला.
तुमच्या आई बरोबर जर तुमचा वाद झाला तर तुम्ही त्याच दिवशी तिची माफी मागून तिच्या बरोबर बोलत असता जणू काही झालेच नाही असे दाखवता. हेच तुम्ही तुमच्या सासूबाई बरोबर करा, सासुबाई बरोबर भांडण झाल्यानंतर त्याच दिवशी त्याची माफी मागून त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करा जसे तुम्ही तुमच्या आई बरोबर करता. काही दिवसांनी ते पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतील. प्रेमाने तुम्ही कुणालाही आणि सर्वाना जिंकू शकता. संकल्प करून तुम्ही त्यांना जिंकू शकता. जर प्रेम आणि संकल्पाने तुम्ही त्यांना जिंकू शकला नाहीत तर प्रार्थना करा, आणि कृपादृष्टी ने तुम्ही नक्कीच तुमचे ध्येय साध्य होईल.

प्रश्न: गुरुजी, भगवतगीते मध्ये भगवान श्री कृष्णाला सर्वोच आत्मा मानले आहे आणि सर्वस्वी तोच आहे. शिवतत्व मध्ये श्री शंकराला सर्वस्वी मानले आहे. या पैकी कोणते सत्य आहे?
श्री श्री रविशंकर: दोन्ही, कारण दोघां मध्ये काहीच फरक नाही. तो जो शिवा आहे तोच कृष्ण आहे आणि तोच देव आहे. दोन असे वेगवेगळे प्रकार नाहीत फक्त एकच. एकेकाळी ते ऋषी होते, त्यांचा विश्वास होता कि भगवान श्री कृष्ण (हरी) आणि भगवान श्री शंकर (हर) हे वेगळे आहेत. काहीजण हरी म्हणून प्रार्थना करू लागले आणि काहीजण हर म्हणून प्रार्थना करू लागले. मग देवाने त्या ऋषींना असा दृष्टांत दाखवून दिला कि ज्या मध्ये त्यांचे अर्धे शरीर हरीचे होते आणि अर्धे शरीर हर चे होते, आणि सांगितले कि हरी आणि हर मध्ये काहीच फरक नाही. ते एकच आहेत.
त्याच प्रमाणे काहीजणांना वाटते कि शिव आणि शक्ती वेगवेगळे आहेत. पूर्वी थोर ऋषी भ्रिंगी होवून गेले, त्यांना पण हेच वाटायचे. त्यांचा असा विचार होता कि मर्दानी आकार हा बायकी आकारा पेक्षा वरचढ आहे.
खूप धर्मामध्ये स्त्रियांना त्यांची हक्काची जागा दिली गेली नाही. त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो आणि पुरुषांना प्रथम दर्जा दिला जातो.
म्हणून ऋषी भ्रिंगी भगवान श्री शंकराला पूजत असत आणि स्त्री स्वरुपाकडे दुर्लक्ष करत असत. ते शक्तीला कधी पूजत नसत. म्हणून देवाला वाटले कि यांना चांगली बुद्धी येईल असा धडा शिकवला पाहिजे. कधी कधी प्रामाणिक साधा सरळ माणूस सुद्धा भटकतो. ते चांगलेच असतात पण त्यांचा बोध चांगला नसतो, त्यांच्या बुद्धीवर काळ्या ढगांचे सावट असते. ऋषी भ्रिंगी ना खरे ज्ञान दाखविण्यासाठी देवाने अर्धनारेश्वरचे रूप धारण केले म्हणजे अर्धे शरीर पुरुषाचे आणि अर्धे शरीर स्त्रीचे. हे पाहिल्यानंतर ऋषी भ्रिंगी यांनी या आकाराभोवती प्रदक्षिणा घातली. त्यांना शिव रूपाच्या अर्ध्या शरीराभोवती प्रदक्षिणा घालता येत नव्हती म्हणून त्यांनी शिव आणि शक्ती म्हणजेच स्त्री आणि पुरुष एकाच आकारात असल्याने संपूर्ण प्रदक्षिणा घातली. म्हणजे त्यांनी दोन्ही शिव आणि शक्ती ची आराधना केली.
एका स्त्रीला तोच मान दिला पाहिजे जो आपण एका पुरुषाला देतो. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करू नये. आपण आज जे काही स्त्री शक्ती, स्त्री अधिकार बद्दल बोलतो ते १०० वर्षापूर्वी पासून या देशात चर्चेत आहे. अर्धनारेश्वर च्या रूपात देवाने हे ज्ञान ऋषी भ्रिंगी यांना दिले.
भ्रिंगी या शब्दाचा अर्थ म्हणजे मोठी मधमाशी. माधामाशिचा जसा आवाज चालू असतो तसाच भक्तीचा महिमा ऋषी भ्रिंगी यांच्या हृदया मध्ये नेहमी असायचा. मधमाशी जशी प्रत्येक फुलावर जाऊन मध गोळा करते त्याच पद्धतीने ऋषी भ्रिंगी प्रत्येक माणसापाशी  जाऊन शिवतत्व घ्यायचे. पूर्ण ब्रह्मांडात ऋषी भ्रिंगी शिवतत्व गोळा करायचे आणि त्याला पूजत असत. ते खूप मोठे भक्त होते. पण ते स्त्रीचा आदर करत नव्हते म्हणून देवाने त्यांना एकाच स्त्री पुरुष आकारात दर्शन दिले.
हे पौराणिक आहे पण खरे असू शकेल, सार असा सांगता येईल कि अशा पद्धतीने ऋषी भ्रिंगी यांना कळले कि हरी आणि हर मध्ये काही फरक नाही.     
इतिहासात भगवान श्री कृष्ण खूप मोठे व्यक्ती होते. त्यावेळेस श्री शंकराचा जन्म झालेला नव्हता, म्हणून त्यांना स्वयंभू म्हटले आहे.
इस्लाम धर्मात हेच म्हटले आहे कि अल्लाचा कधी जन्म झाला नव्हता तसेच शिवाचा पण कधी जन्म झाला नाही. ते स्वत: प्रकट होतात. त्यांचे काळावर वर्चस्व आहे त्यामुळे मृत्यू पण त्यांना स्पर्श करू शकत नाही. शीख धर्मात पण हेच म्हटले आहे कि देव काळाच्या पलीकडे आहे – एक ओमकार सतनाम करता पुराख निरभाऊ निर्वैर अकल मुरात.  सर्व धर्म एकाच तत्वा संदर्भात सांगतात आणि तेच भगवान श्री कृष्णाने गीते मध्ये म्हटले आहे कि ‘अवजानन्ति मम मुधा मनुसिम तनुम अश्रीतम; परम भवम अज्जानंतो मम महेश्वरं’.
मुर्ख लोक माझ्याकडे एक फक्त शरीर म्हणून बघतात. माझ्या अलौकिक स्वभावचा लोकांना अनुभव नाही, लोक माझ्याकडे एक मानव शरीर आणि मन म्हणून बघतात. मुर्ख लोकं मला अजून ओळखू शकले नाहीत.  मी मानवी शरीरात आहे पण माझी चेतना हि सर्वोच चेतना आहे., हे अर्जुना ! तू माझ्यातील ईश्वरी मूलतत्वाकडे लक्ष दे.
त्यामुळे असे म्हटले जाते कि मानवी बुद्धी , मानवी मन हे ईश्वरा मध्ये कधीही पाहू नये, कारण ज्या दृष्टी कोनातून तुम्ही ईश्वराकडे पाहता तसेच तुम्हाला चित्र दिसते. जर तुम्ही मूर्तीकडे एक दगड म्हणून पाहिले तर तो फक्त दगडच असेल, पण तुम्ही जर त्या मूर्ती मध्ये भक्ती पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला ईश्वर दिसेल.
त्याच पद्धतीने आपण जर प्रत्येक मनुष्यामध्ये भक्तीचे मुलतत्व पाहिले आणि प्रेम केले तर आपल्या आजूबाजूला एकात्मता दिसेलकारण आपण सर्वजण एकाच ईश्वरापासून आलो आहोत. मनुष्य बुद्धी म्हणजे बाहेरील मर्यादित आकार बघणे एवढीच असते, पण आपण इथे सर्वत्र सर्वामध्ये जी भक्ती व्यापक आहे त्याच्या कडे पहावे.
प्रश्न: गुरुजी, आपण जसे ज्ञान जमवतो आणि समजतो तसेच गमवतो का?
श्री श्री रविशंकर: आपण ज्ञान कधीही हरवू शकत नाही. आपण संपूर्ण ज्ञान मिळविल्यानंतर ते हरविणे कदापि शक्य नाही. हां, पण कोणी अर्धवट ज्ञान घेतले असेल तर त्याने ते परत नीट समजून घ्यावे.
प्रश्न: मी ज्यावेळेस ध्यान करायला बसतो, माझे मन खूप भटकते. त्याच्यावर मी नियंत्रण कसे करू?
श्री श्री रविशंकर: हे पहा. तुम्ही तुमच्या जीवनालाच साधना समजा. आपले संपूर्ण जीवन साधनाच आहे. तुमचे मन कुठे भटकते? त्याला जिथे तृप्ती मिळेल ते तिथेच जाईल. तुम्ही परत ध्यान करायला बसल्यावर निरीक्षण करा कि माझे मन मला तृप्ती मिळेल अशा ठिकाणी भटकते का? अशा पद्धतीने तुम्ही जर निरीक्षण केले आणि त्या मागचे कारण ज्ञानाने शोधले तर तुम्हाला जाणवेल कि मन ना इथे आहे ना तिथे, मग तुमचे मन शांत आणि स्थिर होईल व स्व: मध्ये येईल. म्हणून तरी ध्यान करण्यासाठी खूप सीडी आणि मार्गदर्शन दिले जाते. हे करत रहा. पण फक्त ध्यान केल्याने तुमचे मन शांत होणार नाही. ध्यान बरोबर ज्ञानाची पण त्याला गरज आहे.
प्रश्न: गुरुदेव, जर आपला प्रियजन किंवा जवळचा आपल्याला सोडून जातो, आपल्याला त्यांना आपल्या आयुष्यात  परत आणता येईल का, विशेषत: आपण या मार्गावर असताना?
श्री श्री रविशंकर: जो कोणी गेला आहे तो आपल्या बरोबर जागी गेला आहे. जेव्हा आपला जवळचा कोणी प्रियजन जातो, तो तुम्हाला आठवण करून देतो कि हे आयुष्य क्षणिक आहे आणि ते संपणारच आहे. कळतयं का तुम्हाला?
एके दिवशी मला पण जायचे आहे. तुम्हाला पण सर्व सोडून जावे लागेल. त्या क्षणा मध्ये तुम्हाला निराश वाटेल. त्या साठीच तर ध्यान, साधना, सत्संग आहे. हे सर्व केल्याने तुम्ही शोक, दु:ख यावर मात करू शकता.

प्रश्न: गुरुजी, मला आश्रम मध्ये रहायचे आहे.
श्री श्री रविशंकर: हो, आश्रम व्यवस्थापनाशी संपर्क साधा. मी आधी म्हटल्या प्रमाणे हे सर्व विश्व माझे आश्रम आहे. तुम्ही कुठेही असा, दुसऱ्यांना ज्ञान द्या आणि दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर रहा. मग तो आश्रमच होईल. प्रत्येक घर हे आश्रम आहे. आश्रम म्हणजे काय? जिथे आपले मन काही प्रयत्न न करता शांत आणि स्थिर होईल, शरीरात उत्साह भरेल, बुद्धीला थोडी चालना मिळेल, आत्म्यालाही शांतता मिळेल आणि जीवन हे उत्सव होईल.

प्रश्न: आत्म्याला जर मृत्यू नाही तर मग या ग्रहावरची लोकसंख्या का वाढत आहे?
श्री श्री रविशंकर: खूप प्रकारच्या प्राण्यांच्या जाती या पृथ्वीवरून नष्ट होत चालल्या आहेत. साप, किटके, सिंह वगैरे नष्ट होत चालले आहेत. गाढवांची पण संख्या कमी होत चालली आहे ! पूर्वी जेवढी गाढवं आपल्याला दिसायची तेवढी आता आपल्याला दिसत नाहीत. जंगल नष्ट करून तिथे शहर उभी केली जात आहेत. मग माकडे कुठे जातील? म्हणून ते आपल्या घरात येतात.
प्रश्न: मी जेव्हा स्फोटाची किंवा विमान दुर्घटनेची बातमी एकतो ज्याच्या मध्ये लहान मुले मरण पावतात, त्या दिवशी मला दिवसभर दु:ख वाटते, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही त्यांची पण काळजी घेता का?
श्री श्री रविशंकर: हो, काळजी करू नका, असे वाटणे नैसर्गिक, साहजिक आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या दु:खा बद्दल दु:ख होत असेल याचा अर्थ म्हणजे तुम्ही मानव आहात. दुसऱ्यांचे दु:ख जाणवत नाही ते हृदय कसले? पण तुम्ही त्यात अडकून रहायचे नाही जेणे करून तुम्ही दुसरे काहीच करू शकणार नाही. सेवा करून तुम्ही याच्यावर मात करू शकाल.