अहंपणावरील सर्वोत्कृष्ट उतारा

03
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : अहं आणि अधिकारवृत्ती यांच्यामध्ये काही नाते आहे का, आणि या दोहोंच्या बाहेर आम्ही कसे यायचे?

श्री श्री : हो.

अहं, अधिकारवृत्ती, असूया, क्रोध आणि लोभ हे सगळे जोडलेले आहेत. हे सगळे अहंला जोडलेले आहेत. आता या अहंपासून सुटका कशी मिळवायची, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

खरं तर यावर उपाय एकदम सोप्पा आहे. फक्त एका दिवसासाठी चक्रम होण्याचे मान्य करा. केवळ एकच दिवस वेड्या माणसासारखे वागा. इतकेच करणे चांगले आहे.

अहंचा अर्थ असा की तुम्ही समोरच्या व्यक्तीवर स्वतःचा प्रभाव पडण्याचा प्रयत्न करीत आहात.अहंच्या अस्तित्वा करिता समोरची व्यक्ति असणे जरुरी आहे. एखाद्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तिथे अहं असू शकत नाही. समोरची व्यक्ति असेल तेव्हाच आपला अहंकार उफाळून येतो जर तुम्ही एखद्या बालकासारखे असाल, जेव्हा तुम्ही सहज, नैसर्गिक असाल तर हा अहंपणावरील सर्वोत्कृष्ट उतारा आहे.

जेव्हा तुमच्यामध्ये जास्त नैसर्गिकता येते आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर मनमोकळे असता आणि सगळ्यांबरोबर तुम्ही तद्भावीत असता तेव्हा अहंपणाचा निभाव लागू शकत नाही आणि तो टिकू शकत नाही. या सगळ्या गुणांमुळे तुमचा संपूर्ण कायापालट होतो. जर तरीसुद्धा अहंपणा "मी, मी" करीत असेल, तर अहंच्या कक्षा रुंद करा.

एक आहे पारदर्शक अहं आणि दुसरा आहे रुंदावलेला अहं. दोन्हीचा अर्थ समानच आहे. रुंदावलेल्या अहंचा अर्थ आहे-सगळ्यांचा समावेश केलेला आहे-सगळे माझेच आहे.मी सर्वस्व आहे. हे फार चांगले आहे.

तर मग एक तर अहंला अजून फुगवून खुपच मोठा करा किंवा मग साध्यासुध्या आणि निष्पाप अशा सहज कृतींनी त्याचे रुपांतर करा.याने अहं पारदर्शक होतो.

प्रश्न : गुरुदेव,मी अशा काही परिस्थितीत आहे की मी माफ करू शकत नाही आणि विसरूही शकत नाही. कृपा करून मला मार्गदर्शन करा की मी काय करू.

श्री श्री : मग असे करा की तुम्ही तुमच्या मृत्यूचा विचार करा, की तुमचा मृत्यू होणार आहे. तुमचे मन जरी (त्या प्रसंगात) अडकलेले असेल, तरीदेखील तुमचा अंत अटळ आहे; तुम्ही हे जग सोडून जाणार आहात. आता,तुम्हाला हा ठसा घेऊन जायचे आहे का? चला उठा,जागे व्हा!

जीवन हे अल्प आहे आणि प्रत्येक जण एक बुजगावणे आहे. बुजगावण्याला स्वतःचे डोके नसते. सगळेजण हे बुजगावण्यासारखे आहेत आणि प्रत्येकामध्ये एक खास शक्ती आणि उर्जा कार्यरत आहे.

ते परमकारणाकारण सगळ्या कारणांचे कारण आहे. वेगवेगळया लोकांच्या मनात वेगवेगळया गोष्टी भरणे हा सगळा शिवतत्वाचा खेळ आहे. हे अद्वैत ज्ञान समजून घ्या, अनुभवा.

आपण सगळे एकाच पदार्थापासून बनलेलो आहे.

सगळी लहान लहान मने आहेत पण हे मन मोठ्या मनाने आणि कर्मानुसार प्रभावित असते. म्हणून वेगवेगळे लोक हे विविध प्रकारे वागतात.

तुम्ही कोणचे काहीही वाईट केले नसतानादेखील ते लोक तुमचे शत्रू बनतात असे कधी तुमच्या लक्षात आले आहे? तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आला आहे?असे लोक शत्रू बनतात ज्यांचे तुम्ही खास करून खूप भले केलेले असते.आणि मग ही व्यक्ति माझी खास दोस्त आहे, मी या व्यक्तीकरिता इतके केले आणि ही व्यक्ति माझी शत्रू झाली असे तुम्ही नवल करता ! हो ना?

त्याचप्रमाणे असेपण लोक आहेत ज्यांना तुम्ही काही खास मदत केली नाही तरीदेखील ते तुमचे चांगले दोस्त बनतात, असे नाही का झाले?

तुम्ही आगगाडीमध्ये कोणलातरी भेटला आणि मग त्यांनी बाहेर येऊन तुमची अतिशय मदत केली होती.

तर मग म्हणून मैत्री आणि शत्रुत्व निर्माण होते ते काही अनोळखी कर्मफलानुसार. म्हणूनच मित्र किंवा शत्रू हे सगळे सारखेच असतात कारण त्यांच्यामार्फत एक निराळीच शक्ती कार्य करीत असते. हे जाणून घ्या आणि आरामात राहा.

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही काही चांगले काम करता तेव्हा त्याची टीका करणारे लोक असतात. महाभयंकर कामे करणारी माणसे आहेत आणि त्याचे कौतुक करणारे लोकदेखील आहेत. तुम्हाला हे सर्व विचित्र वाटत असेल. म्हणून सगळे सोडा आणि निश्चिंत व्हा.

प्रश्न : गुरुदेव, जीवनात ध्येय असणे जरुरी आहे का, का आयुष्यात आपल्याकडे जे येईल त्याच दिशेने जावे?

श्री श्री : तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे याचे एक व्यक्तिगत ध्येय असायला हवे. जर ध्येय असेल तर जीवन हे एका नदीसारखे वाहत जाते. जेव्हा ध्येय नसते तेव्हा पाणी शेतात वेडेवाकडे वाट्टेल तसे धावते आणि शेतभर पसरते. ध्येय ही एक बांधिलकी आहे, हे एक वचन आहे.म्हणूनच तुम्हाला ध्येय,लक्ष्य असायला पाहिजे.

ध्येय काय आहे? सर्वोत्कृष्ट मिळवणे, योगी होणे, ध्यानी बनणे आणि जगाची सेवा करणे हे ध्येय आहे.

जगाची सेवा करणे हीच खरी पूजा (प्रार्थना) आहे.

प्रश्न : गुरुदेव, केवळ काही खास प्रसंगीच मी लोकांना आणि घटनांना त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारू शकतो,परंतु काही प्रसंगी मी तसे स्वीकारू शकत नाही. हे असे का आहे ते मला माहित नाही. लोक आणि घटना यांना कायम कसे स्वीकारावे हे मला माहित नाही.

श्री श्री : त्याची गरज नाही. तुम्हाला सतत तसे करण्याची आवशक्यता नाही. तुम्हाला त्यांना स्वीकारण्याची गरज नाही. लढा द्या!

किती मोठा सुटकारा मिळाला, नाही का? तुम्हाला लढण्याची मुभा मिळाली! मी सांगतो की जा आणि खुशाल आनंदाने भांडा.

हे बघा, अशी कोणतीही गोष्ट जी तुम्ही करू शकत नाही ती तुम्ही करणे बंधनकारक नाही. जे आणि जितके तुम्ही करू शकता ते आणि तेवढेच तुम्ही करा. जर स्वीकारणे एवढे अवघड आहे तर स्वीकारू नका. जर अस्वीकार सोप्पा आहे तर अतिउत्तम; परंतु जर स्वीकारणे सोप्पे असेल तर ते करा.

प्रश्न : सर्वसामान्यपणे सदाचरणी माणसे असतात ती दुःखी असतात आणि पाप मार्गावरील माणसे समाधानी आणि आनंदी असतात. खरे तर त्यांचेच कौतुक होते आणि ते अतिशय वरच्या हुद्द्यावर असतात. असे कसे?

श्री श्री : मी दुःखी दिसतो का? इथे असलेले स्वामीजी दुःखी दिसत आहेत का? हे पहा,स्वामीजी तर हसत आहेत. सभोवती बघा;ही सगळी सर्वसामान्य साधी माणसे आहेत. ती सर्व तुम्हाला दुःखी दिसत आहेत का? इथे तुम्हाला ही माणसे आनंदी नाही का दिसत? पाकशाळा बघा, स्वागतकक्ष बघा, सगळीकडे लोक आनंदी आहेत, नाही का?

 (उत्तर : हो)

जर तुम्ही मौजमजेच्या मागे लागलात तर वाट्याला दैना येते. जर तुम्ही ज्ञानाच्या मागे लागलात तर आनंद तुमच्या मागे मागे येतो.

प्रश्न : माझी इच्छाशक्ती अतिशय कमकुवत आहे.मी अनेक प्रयत्न केले परंतु जीवनात दहापैकी आठ वेळा मी असफल राहिलो आहे. माझी इच्छाशक्ती चांगली होण्याकरिता मी काय करू?

श्री श्री : सर्वात प्रथम म्हणजे तुमची इच्छाशक्ती कमकुवत आहे असे लेबल तुम्ही स्वतःला चिटकवून घेतले आहे. मामला खलास. तुम्ही स्वतःला कोणतेही लेबल लावून घेऊ नका. 

नंतर लहानसहान गोष्टींनी सराव सुरु करा. छोट्या अवधीचे, लहानशा कालमर्यादेचे संकल्प ठेवा.

उदाहरणार्थ दहा दिवसांचा संकल्प,मी दररोज व्यायाम करणार,पुढचे दहा दिवस मी कोणतेही अपशब्द वापरणार नाही. एकदा का तुम्हाला हे जमायला लागले की मग तुम्ही अधिक कालमर्यादेचे संकल्प ठेवू शकता.

प्रश्न : मी बऱ्याच काळापासून ध्यान साधना करीत आहे. अलीकडच्या ध्यानादरम्यान तुम्ही मला दर्शन दिले आणि तुम्ही मला प्रसाद दिलात. माझे डोळे तर बंद होते परंतु तुम्ही सगळ्याचे अवलोकन करीत होतात. आता माझा प्रश्न असा आहे की ते तुम्ही खरोखर होतात का तुमच्या अवतारातील तो देव होता?

श्री श्री : एका साधकाला त्याच्या आयुष्यात अनेक अनुभव येतात. त्याच्याबद्दल जास्त चिरफाड करण्याची आवश्यकता नाही. पुढे जात राहा.

कालचा अनुभव हा कालचा होता:आजचा अनुभव हा आजच्यासाठी आणि उद्या तुम्हाला एक नवीन अनुभव येईल. मिळालेला अनुभव हा सुखावह असू दे किंवा वाईट असू दे, आपण त्यात अडकून न राहता पुढे जात राहिले पाहिजे.