भक्तीचे रंग

05
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रामाणीकपणा हा मनुष्य स्वभावाचा एक गुण आहे.

एखादा मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो घरी प्रामाणिक असतो आणि त्याच्या कामामध्ये पण प्रामाणिक असतो. पती किंवा पत्नी म्हणून तो त्यांच्या जोडीदाराबरोबर पण प्रामाणिक असतो.

तुम्ही कोठेही गेलात तर त्यांच्या चरित्रातील प्रामाणीकपणा हे नेहमी चमकत असतो. 

भक्तीचे पण तसेच आहे. देवभक्त हा देशभक्त आणि त्या जग निर्माण करणाऱ्याचा भक्त पण असतो. त्यांचे प्रेम आणि भक्ती हि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येते.

अनेक वेळा लोक असा प्रश्न विचारतात कि देवभक्त हा देशभक्त किंवा देशाभिमानी कसा असू शकतो. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो कि तसे असू शकते.

कोणी जर त्यांच्या देशावर प्रेम करीत असेल तर ते दुसऱ्या देशाचे किंवा देशांचे शत्रू असतात असे नाही. आपण देशभक्तीकडे नेहमीच एका संकुचित दृष्टीने पहात आलो आहोत. 

साधारणपणे देशभक्ती कशी व्यक्त केली जाते? दुसऱ्या देशाला विरोध करणे किंवा त्यांना शत्रू मानणे म्हणजे देशप्रेम असा सर्वसाधारण समाज आहे.

भारतात जेंव्हा ब्रिटीश राज्य करीत होते तेंव्हा ब्रिटीशसत्तेविरुद्ध आवाज उठविणे म्हणजे देशप्रेम असा समज होता. हल्लीच्या काळात जर तुम्ही पाकिस्तान विरोधी बोललात तर तुम्ही देशप्रेमी असे समजले जाते. हे योग्य नाही.

तुमच्या देशप्रेमासाठी तुम्ही दुसऱ्याचा देशाचा विरोध करणे किंवा त्यांना खाली मान घालायला लावणे असे नाही.

तुम्ही जर अमेरिकेकडे बघितलेत असे लक्षात येईल कि जे स्वतःला देशभक्त म्हणवितात ते फक्त त्यांचा देशाचा अभिमान बाळगतात. त्यांचा दुसऱ्या देशांना विरोध नाहीये.

म्हणजे, देशभक्त हे केवळ त्यांच्या देशाला नव्हे तर साऱ्या जगाला आणि जग निर्माण करणाऱ्याला समर्पित असतात.

जे विश्वात्म्याला समर्पित असतात ते त्यांची देवभक्ती किंवा त्यांची देशभक्ती यात भेदभाव किंवा संघर्ष करीत नाहीत.

तुम्ही जेंव्हा तुमच्या कुटुंबाची काळजी घेता किंवा त्यांचे पालन पोषण करता याचा अर्थ असा नाही कि तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे शत्रू आहात. तुम्ही त्यांच्यावर पण प्रेम करता, त्यांचीपण काळजी घेता, होय कि नाही?

जेंव्हा एक आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करीत असेल तर ती इतर मुलांवरबाबत पण तिला प्रेम वाटू शकते. असे नसते कि जेंव्हा तिला तिच्या मुलांविषयी आपुलकी वाटत असेल तर तीला दुसऱ्या मुलांविषयी आपुलकी वाटू शकत नाही. तसे असेल तर ते खरे प्रेम किंवा आपुलकी नव्हे.

भक्ती किंवा समर्पण हि एक अशी गोष्ट आहे कि ती कोठेही असु देत त्याचा सुगंध हा फुलासारखा सर्वत्र दरवळतो.

हे फुल पहा, ते कोठेही ठेवले तरी त्याचा सुगंध हा सगळीकडे पसरतो. मोगऱ्याचे फुल तुम्ही स्वयंपाक घरात ठेवा किंवा नाहणी घरात ठेवा त्याचा सुगंध येणारच.

फुल असे कधीही म्हणणार नाही कि मी येथे सुगंध देईन, तेथे नाही.

त्याच प्रमाणे कोठेही तुम्ही भक्ती किंवा श्रद्धा ठेवा किंवा तिला कोणतीही दिशा द्या, ती तेथे पसरेल, वाढेल, आणि तिला फुले फळे पण येतील.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कामाविषयी पण भक्ती आणि समर्पण भावना ठेऊ शकता.

एक कन्नड संत कवीने एकदा असे म्हटले आहे कि “कयाकावे कैलास” , याचा अर्थ असा कि जो आपले काम मन लावून करतो तो कैलासाला पोहोचतो.

अनेक संस्कृत शास्त्रात पण हेच सांगितले आहे.

खरी पूजा म्हणजे लोकसेवा हि होय. पूजा आणि सेवा यात काही फरक नाहीये. का? कारण या दोन्हींचा पाया किंवा उगम म्हणजे समर्पण आणि त्याचा परिपक म्हणजे पण समर्पण होय. 

हेच अहंकाराला पण लागू होते. तुम्ही तुमचा अहंकार जिकडे न्याल त्या गोष्टीला तो चिकटून जातो.

तुम्ही जर तुमचा अहंकार “ब्रम्ह्न” कडे वळविला तर तुम्ही “अहं ब्रम्हास्मि” या स्थितीला पोहोचाल. ( अहं म्हणजे मी, छोट्या मर्यादित अहंकाराचे व्यक्तीकरण आणि ब्रम्हास्मि म्हणजे मी ब्रम्ह आहे. म्हणून स्वतःला ब्रम्हांडाबरोबर एकरूप करण्याने अहंकाराचे निराकरण होते).

जेंव्हा तुम्ही तुमचा अहंकार छोट्या आणि नगण्य गोष्टींमध्ये वापरू लागता तेंव्हा साहजिकच तुम्ही त्या छोट्या गोष्टींशी जोडले जाता आणि मग तुम्ही त्या छोट्या गोष्टींसारखे मर्यादित होऊन जाता. त्यामुळे तुम्हाला मग असे वाटायला लागते कि “ मी कोणीतरी आहे”, “मी मंत्री आहे”, किंवा “मी पापी आहे”, “मी बुद्धिमान आहे”, “मी मुर्ख आहे” वगैरे. मग ज्याला अहंकाराचा स्पर्श झाला आहे त्यामध्ये वृद्धी होईल. म्हणूनच, जसे अहंकार हा अमर्यादित प्रमाणात वाढू शकतो, तसेच भक्ती पण अमर्यादित पणे वाढू शकते. योग विद्या पण हेच सांगते.

असे म्हटले आहे कि “ तस्य भूमीषु विनियोगः” - (विभूती पद # ६, पतंजली योग सूत्र)

योग सिद्धी (योगामुळे प्राप्त होणाऱ्या असाधारण चमत्कारपूर्ण क्षमता) आणि वाढीव जाणीव किंवा चेतना , या नेहमी पृथ्वीतलावरील समाजाच्या उन्नतीकरिता वापरल्या पाहिजेत. 

प्रश्न: गुरुदेव, वेदिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे कि या आकाशगंगा, हे विश्व, यांसहित हे सर्व जग म्हणजे एक भ्रम आहे. हे काही माझ्या लक्षात येत नाहीये. तुम्ही हे जरा पुढे समजावून सांगाल काय ?

श्री श्री : होय, हे सारे स्पष्टच आहे. तुम्ही जर मात्रा भौतिक शास्त्र अभ्यासिले तर हे लक्षात येईल कि वस्तू मात्रांचे नाव आणि आकार हे स्थिर नसून ते सर्व एकाच बदलत्या परिमाणाचे भाग आहेत.

एका उर्जेपासून सर्व गोष्टी निर्माण झाल्या आहेत. वेदांतात पण हेच सांगितले आहे.

भ्रम म्हणजे काय तर, जे अस्तित्वात नाही असे नव्हे तर जे सतत बदलत असते ते. येथील सर्व वस्तू बदलत असतात आणि या बदलालाच माया असे नाव आहे. जे काही मोजले जाते त्याला पण माया असे म्हणतात. म्हणून माया म्हणजे भ्रम असे म्हणणे बरोबर नाही. 

आपल्या काळातील एक प्रसिद्ध प्रोफेसर डॉ. हान्स पीटर दुरर , हे काही दिवसांपूर्वी येथे आश्रमात आले होते. हे काय म्हणाले तुम्हाला माहित आहे काय?

ते म्हणाले,” गुरुदेव, मी गेली ३५ वर्षे वस्तूस्थिती अभ्यास केल्यावर असे लक्षात आले कि ते अस्तित्वात नाही. जे काही अस्तित्वात आहे ती फक्त उर्जा होय.

पुढे ते असे पण म्हणाले कि” मी जेंव्हा व्याख्यान देत असतो तेंव्हा मी पूर्वेकडील तत्वज्ञान सांगतो आहे कि काय असे मला नेहमी वाटत असते.

आजचे शात्रज्ञ जे सांगत आहेत ते पूर्वेकडील तत्वज्ञ हजारो वर्षापासून सांगत आले आहेत. म्हणून जसे दिसते तसे नसते.

हि कुपी एका भरीव वस्तू सारखी दिसत आहे, पण पदार्थ वैज्ञानिक म्हणतात कि “नाही , ते फक्त काही अणु आहेत.” पुढे जाऊन ते असे पण म्हणतील कि “हि फक्त एक उर्जा आहे”. 

वस्तू स्थिती नाहीये. आपली समज हि आपल्या ज्ञानेंद्रियद्वारे होते तर शास्त्रज्ञ हे त्याच्या पलीकडील वस्तू स्थिती समजावून घेतात.

असे पहा कि अणु हा साध्या डोळ्यांनी दिसत नाही. तुम्हाला अणु दिसत नाही , उर्जा पण दिसत नाही पण तुम्ही ती तेथे आहे हे तुम्हाला समजते.

म्हणजेच जग अस्तित्वात नाही महाजने काय तर जागे व्हा आणि डोळे उघडून बघा, सर्व भूतकाळ आज अस्तित्वात आहे काय? नाही, तर फक्त त्याच्या स्मृती आहेत.

काळाच्या ओघात घटना दिसेनाश्या होतात, म्हणून त्या अस्तित्वात नाहीत.

आता जे काही अस्तित्वात आहे , ते पुढच्या क्षणात नाहीसे होते. ज्या प्रमाणे प्रत्येक क्षणाला नदीत नवीन पाणी असते. तसेच निसर्ग सारखा बदलत असतो, आणि हे जे काही सारखे बदलत असते त्याला माया म्हणतात. ज्याला मोजमाप आहे ती पण माया होय.

म्हणून, प्रवाहित म्हणून ते अस्तित्वात असते पण प्रत्यक्षात मात्र नसते.

हे सर्व जग हे नाव आणि आकार आहे,पण नाव आणि आकार हे काही नेहमी सारखे नसतात- असा हा संदेश आहे.

नावे वेगळी असू शकतात.तुम्ही येथे एका गोष्टीला काही नाव दिले असेल, आणि त्याच देशात दुसऱ्या ठिकाणी त्याला काही दुसरे नाव असेल. आणि मग दुसऱ्या देशात त्याला अजून काही दुसरे नाव असेल. म्हणून नावे हि काही कायमची नसतात, तर ती सोयीप्रमाणे असतात. आकाराचे पण तसेच आहे.

प्रश्न: गुरुदेव, “सत्य हे बहु आयामी आहे” याचा अर्थ काय?

श्री श्री : होय, त्यातच सर्व काही आले.

असे पहा कि, या जागी येण्यासाठी कोणी म्हणेल कि “ प्रथम सरळ दिशेने जा आणि मग डावीकडे वळा”. मी म्हणेन कि हे बरोबर आहे.

दुसरा अशी दिशा सांगेल कि “प्रथम सरळ जा आणि मग उजवीकडे वळा”

मी म्हणेन कि हे पण बरोबर आहे.

तिसरा माणूस सांगेल कि “ फक्त सरळ जा , डावीकडे, उजवीकडे वळू नका”

मी म्हणेन कि हे पण बरोबर आहे.

मग तुम्ही म्हणाल कि “ फक्त एकच दिशा दर्शक बरोबर असू शकतो. तीन दिशा दर्शक बरोबर असू शकत नाहीत.” मग मी म्हणेन कि “ सत्य हे बहू आयामी आहे”.

हि जागा बहु आयामी आहे. या जागी येण्यासाठी अनेक सूचना असू शकतात, अनेक मार्गदर्शिका असू शकतात आणि त्या सर्व बरोबर आहेत.

प्रश्न: या निर्मितीचा काय उद्धेश आहे?

श्री श्री : कोणत्याही खेळाचा काय उद्धेश असतो? ( उत्तर: जिंकणे किंवा करमणूक)

होय, फक्त करमणूक, किंवा मजा , होय कि नाही? तोच तर आहे !

जेंव्हा ब्रम्ह एकटे होते, तेंव्हा त्यांना त्याचा कंटाळा आला, आणि मग त्यांनी विचार केला कि चला आता एकाचे अनेक होऊयात. आणि मग मनात हा विचर येताच ते एकाचे अनेक झाले.

तुम्ही एका मोठ्या आरशात सहस्रावधी छोटे छोटे आरसे पहिले आहेत काय? माणूस त्याच्या समोर उभा राहिला तर त्याला त्याच्या हजारो छबी बघायला मिळतात. आणि त्या हजारो आरशात पूर्ण छबी अवतरते. तुम्ही तुमचा पूर्ण चेहरा त्यात बघू शकता.

मग ते असे म्हणत नाही कि” तुमची पूर्ण छबी जर एका आरशात दिसत आहे तर ती दुसऱ्या आरशात पण कशी दिसते?” नाही! हा तर्क बरोबर नाही, होयना ?!

हे अगदी असेच आहे, एक परमात्मा आपल्या हजारो आणि लाखो प्रतिमा तयार करतो पण सत्य मात्र एकच असते.

प्रश्न: गुरुदेव, परत , परत जन्म न घेता मुक्ती मिळविण्यासाठी नियमित साधनेशिवाय अजून काही करता येईल काय?

श्री श्री : संतोष! समाधान!

प्रत्येक गोष्ट हि आनंदाने आणि संतोषाने करा.

तुम्ही आजचे काम केले आहे आणि तुम्ही संतुष्ट आहात. आणि उद्या तुम्ही जे काही काम करणार आहात ते संतोषाने करा.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा संतोषाने जगा कारण त्यामुळे तुमची जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होईल.

प्रश्न: गुरुदेव, मी तुमचे अष्टवक्र गीतेवरील पुस्तक वाचले आहे. त्यातील प्रत्येक शब्द मला खूप आनंद देऊन जातो. परंतु तुम्ही त्यात जे धर्म ( सामाजिक आणि नैतिक धर्म बाबतची कर्तव्ये), अर्थ ( भौतिक आणि आर्थिक उन्नतीविषयी वागणूक) आणि काम ( यौवन सुख) हि बंधनाची कारणे आहेत असे म्हणता ते अगदी खरे आहे. पण मी या बंधनातून मुक्त होऊ शकत नाहीये. मी पुरुषार्थ ( धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ( मुक्ती) या बाबतची) कर्तव्ये पूर्ण केली आहेत तरी पण मला असे वाटते कि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आवश्यक आहेत.

श्री श्री : असे पहा कि अष्ट वक्र गीता असे सांगते कि “ ना ग्राह्यं, ना त्याज्यम” तुम्ही त्याला चिकटून राहता कामा नये, तसेच ते सोडून देता कामा नये. फक्त पोकळ आणि रिकामे व्हा आणि जी गोष्ट जशी आहे तशी पाहायला शिका.

असे म्हटले आहे कि “ ये द्रिष्ट लाभ संतुष्टम्”

याचा अर्थ असा कि ‘ तुम्हाला जे काही मिळेल, जेवढे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट रहा’. संतोष हा खूप महत्वाचा आहे.

साधक हा संतुष्ट आणि क्रियेत गतिशील असा दोन्ही असायला पाहिजे.

मी नेहमीच संतोषच्या बाजूने असतो. पण जेंव्हा मी संतुष्ट असतो तेंव्हा माझ्या आजूबाजूचे लोक त्याला आत्मतुष्ट समजतात. म्हणून वेळो वेळी मी असे भासावितो कि जे काही होत आहे त्याबद्धल मी काही पूर्ण संतुष्ट नाही आणि मग त्यांना कधी इकडे, तर कधी तिकडे काही बाही गोष्टी करायला लावतो. त्यामागे एवढाच उद्धेश असतो कि तुम्ही आळशी आणि निरुध्योगी होऊ नये म्हणून.

म्हणून तुम्ही नेहमी कार्यरत रहा पण त्याच बरोबर मनात संतुष्ट रहा.हे फार महत्वाचे आहे.

काही लोक फार क्रियाशील असतात आणि सारखे काम करीत असता पण संतुष्ट मात्र नसतात. आणि काही लोक असे असतात कि थोडेसे संतुष्ट होतात आणि मग आळशी बनतात. त्यांच्यात कामात समर्पित व्हायची वृत्ती नसते. हे काही बरोबर नाही.

यासाठी आपण मध्यम मार्ग स्वीकारायला पाहिजे. आपल्याला दोन्ही गोष्टी बरोबर पाहिजेत- कामात गतिमानता आणि वृत्तीमध्ये संतोष. असे आपले स्वरूप असायला पाहिजे.

काही वेळा लोक आश्चर्य व्यक्त करतात, “ गुरुदेव असे का वागत आहेत?हे करा, ते करा, असे का सांगत आहेत? ते संतुष्ट होऊन आराम करायला का सांगत नाहीयेत?

पण मी सर्वत्र बारीक नजर ठेऊन असतो, आणि ज्याला जर काही करायची आवश्यकता असते त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतो.

जे खुपच अस्वस्थ असतात मी त्यांना शांत बसून विश्रांती घ्यायला सांगतो.आणि जे खुपच शांत असून मोकळेपणे नसतील त्यांना मी सांगतो कि “ चला लवकर, उठा! काहीतरी करा, हे करा, ते करा! ते पहा त्याने किती चांगले काम केले बघा, तुम्ही तर नुसते बसून राहिला आहात आणि काहीच करीत नाही आहात.” असे सांगून मी त्यांना कामाला उद्युक्त करतो. 

भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अगदी याच पद्धतीने सांगितले आहे.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात “ तू युद्ध करणार नाहीस? तू म्हणतोस तरी काय? लोक तुझ्याकडे बघून हसतील. असा अपमान सहन करण्यापेक्षा मरण बरे!

अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाला तयार करतात.

ते त्याला सांगतात ”भ्याडपणे जगण्याला काही अर्थ नाही.असे जगण्यापेक्षा मरण केंव्हाही चांगले. त्या नंतर ते अर्जुनाला सांगतात :

सर्व धर्म परीत्याज्य मामेकं शरणंव्रज|| 
अहं त्वं सर्व-पापेभ्यो मोक्ष्यास्यामी मा सुखः|| 

सर्व धर्माचा परित्याग करून मला शरण ये. मी तुझी सर्व पापातून सुटका करून तुला मोक्ष मिळवून देईन. तू स्वतः होऊन या पापातून मुक्त होऊ शकणार नाहीस. मी तुला सर्व पापातून मुक्ती देईन. तुझ्या पापांची चिंता करू नकोस, मी त्यांची योग्य ती विल्हेवाट लावीन. तू आनंदी रहा आणि असा अपराधी वाटून घेऊन नकोस.

आता तुमच्या लक्षात आले असेल कि ज्ञान हे अनेक स्तरावर असते आणि त्या प्रत्येक स्तराचा एक विशिष्ट हेतू असतो.