गुरु आणि अध्यात्मिक मार्ग

09
2012
Oct
बंगलोर, भारत

प्रश्न : गुरुदेव, उपनिषदांमध्ये, समित पाणी (गुरूला वाळलेल्या काड्या देऊ करण्याच्या प्रथेचा) चा उल्लेख आम्हाला नेहमी सापडतो. गुरुदेव, कृपा करून याचे काय महत्व आहे ते सांगाल का?

श्री श्री : समित म्हणजे अग्नीमध्ये जाळण्यासाठी तयार असलेली काडी. इथे तयार असणे हे प्रतिक आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला ज्ञान दिले जाईल तेव्हा ते त्वरित ग्रहण करा.

समित पाणी याला अनेक अर्थ आहेत. 'सावध असणे' हा एक अर्थ आहे.

'शंभर टक्के मेहनत देण्यासाठी तयार असणे' हा दुसरा अर्थ आहे.

तुम्हाला माहिती आहे जेव्हा समित (वाळलेली काडी ) ला अग्नीमध्ये टाकले जाते तेव्हा ती पूर्णपणे जाळून जाते कोणतीही राख मागे न सोडता. म्हणून, समित पाणी याचा अर्थ असा होतो ,'ज्ञानकण टिपून घेण्यासाठी सज्ज राहा आणि शिकलेल्याप्रमाणे जगा. तुमचे शंभर टक्के योगदान द्या'. 

'गुरूकडे स्थिरपणे जा', असा देखील समित याचा अर्थ होतो.

विद्यार्थ्याकडे स्थिरता आणि सहनशक्ती हे दोन्ही असणे गरजेचे आहे. थोडीसुद्धा अडचण आली, अन म्हणून तो विद्यार्थी जर पळून गेला तर तो विद्यार्थी काहीही अभ्यासू शकणार नाही.

नेहमी वैद्यकीय कोलेज किंवा अभियांत्रिकी कोलेजच्या प्रथम वर्षात असे घडते. मुलांना अभ्यासापासून सुटका करून कुठेतरी पळून जायचे असते. असे तुमच्याबरोबर झाले आहे कि नाही?

किती अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना असे वाटले आहे? हे असे वाटते कारण अभ्यासक्रम कठीण आहे असे भासते. परंतु तुम्हाला त्यातून जावेच लागते. अशा कठीण प्रसंगी तुम्हाला उभे रहावेच लागते.

म्हणून समित पाणी म्हणजे संयमशीलता आणि सोशिकता राखणे होय.

पूर्वीच्या काळी असे म्हणत, 'रिकाम्या हाताने जाऊ नकोस. जेव्हा तू गुरुदेवांकडे जाशील तेव्हा काहीतरी बरोबर घेऊन जा.'

गुरु तुम्हाला ज्ञान देणार आहेत,मग तुम्ही काय करू शकता तर त्याच्या बदल्यात छोटीशी काठी द्या. बदल्यात काहीतरी द्या कारण ज्ञान हे देवाण-घेवाण केल्यानेच पसरते. काहीतरी येते आणि काहीतरी जाते.

तर या प्रकारे समित पाणी चे अनेक अर्थ आहेत.

उमेद, उत्साह आणि निष्ठा याने अभ्यास करण्यास सुरवात करणे आणि ज्ञान ग्रहण करण्यास सदैव तयार असणे,कणखर बनण्यास तयार असणे.

'जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी कोणतीही मौजमजा नाही. आणि जर तुम्ही मौजमजेचे शोधक आहात तर तुमच्याकरिता कोणतेही ज्ञान नाही', अशी एक म्हण आहे. म्हणून एका विद्यार्थ्याला मेहनत ही करावीच लागेल.

याचा अर्थ तुम्हाला मौजमजा करायची आहे तर मग तुम्ही विद्यार्थी नाही होऊ शकत. 

इंग्रजीमध्ये एक शब्द आहे 'स्टुडीयस' (studious) त्याचा अर्थ आहे पूर्णपणे केंद्रित असणे आणि मौजमजा आणि आरामाच्या गोष्टींकडे न धावणे, आणि आपल्या आरामाच्या कक्षेपलीकडे जाणे.

प्रश्न : गुरुदेव,पुराणामध्ये असे नेहमी वाचण्यात येते की इंद्राने काही पाप केले. अग्नी, वरुण, वायू अथवा दुसऱ्या देवाने पाप केल्याचे वाचण्यात येत नाही. गणपतीच्या कथे प्रमाणे, याचे काही तरी महत्व असेल किंवा यातून सुद्धा काही शिकण्यासारखे असेल. याचा अध्यात्मिक अर्थ कृपा करून समजावू शकाल काय?

श्री श्री : इंद्र हा आहे झुंडशाहीची मानसिकता. आपण जमावाचे मानसशास्त्र कशाला म्हणतो? एका घोळक्याचे स्वतःचे मन असते. त्या जमावाला इंद्र संबोधिले आहे.

इंद्राला एक हजार डोळे आहेत असे म्हणतात. एक हजार डोळे याचा अर्थ असा नाही की एका व्यक्तीला शरीरभर डोळे आहेत. इथे पाचशे लोकांच्या जमावाला उल्लेखिले आहे. मग असा जमाव निर्माण करतो एक चेतना, एक मानसिकता आणि हाच तर आहे इंद्र.

म्हणूनच जेव्हा साक्षात्कारी मनुष्य जन्माला येतो तेव्हा इंद्र इतका रागावतो, कारण मग जमावाची मानसिकता तग धरून राहू शकत नाही.साक्षात्कारी आणि जागरूक मनुष्य झुंडशाहीच्या मानसिकतेला वाढू देत नाही. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

तो लोकांच्या मनात समंजसपणा घालतो. तो सगळ्यांना सांगतो,'अरे! तुमच्या मनाने विचार करा! तुमच्यापैकी प्रत्येकाने विचार करा!'

म्हणूनच जेव्हा कधी कोणी ऋषी किंवा साधू तपस्येला बसत तेव्हा इंद्र भयभीत व्हायचा. 

जमाव,सामुहिक चेतना यालाच इंद्र म्हणतात. तो कोणी वर स्वर्गात बसलेला एक व्यक्ती नाहीये. इंद्र हा इथे आता या क्षणी आहे.

ज्याप्रमाणे पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आपल्याकडे आहेत; त्याचप्रमाणे इंद्र हा सामुहिक चैतन्य आहे.

झुंडशाहीमुळे नेहमी काय घडते;कोणीतरी म्हणेल,'अरे,आपल्या नेत्याचा अपमान झाला', आणि मग सगळे चालू पडतात. ते बसेसना आग लावतात,पुतळ्यांची तोडफोड करतात,इ.इ. आणि आपण काय करतो आहे हे जाणून न घेता जमाव ते काय करीत आहेत त्यातच कार्यरत राहतो.माणसे, जीव आणि मालमत्तेचे नुकसान करीत जमावाचा धुडगूस चालूच राहतो; हो की नाही?

तर अशी असते झुंडशाहीची मानसिकता. जिथे ज्ञान, सदसद्विवेकबुद्धी आणि जागरुकता असते तिथे झुंडशाहीची मानसिकता उभी राहू शकत नाही.

प्रश्न : गुरुदेव, अनेक साक्षात्कारी गुरु, ज्यांनी खूप लोकांना बरे केले, त्यांना भरपूर तीव्र दुःख सहन करावे लागले,हे असे का?

श्री श्री : हे पहा,आत्मा किंवा मन यांना यातना होत नाही. जी बंधने आहेत ती केवळ शरीरालाच आहेत. जर तुम्ही तुमच्या शरीराला फार जास्त ओढाताण केली तर मग शरीराला नित्यनेमाचे परिपाठ करावे लागतील. मग शरीराला सर्दी पडसे आणि खोकला आणि असे आजार होतील.

एका संताचे शरीर हे श्रद्धा आणि प्रेम यांनी बनलेले असते. म्हणून जेव्हा श्रद्धा आणि प्रेम विघटन पावतात तेव्हा त्याचा परिणाम शरीरावरसुद्धा होतो.

प्राचीन काळी, संत आणि ज्ञानी माणसे ही नेहमी त्यांच्या जवळ असणाऱ्यांना शिव्या द्यायचे. हे असे होते कारण जेव्हा प्रिय व्यक्तीच्या मनात संताप किंवा वाईट विचार येत तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्यावर देखील होत. उदाहरणार्थ, तुमच्या घरात एक व्यक्ती बसून आहे आणि नुकसान करीत आहे याचा परिणाम रस्त्यावर नुकसान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यावर जास्त होईल.

जेव्हा रस्त्यावर कचरा असतो तेव्हा तुम्हाला इतका त्रास होत नाही जितका घरातील कचऱ्याचा होतो. असे आहे ना? त्याचप्रमाणे संतांचे जवळच्यांबरोबर वागणे होते!

म्हणूनच प्राचीन काळापासून सशक्त व्यक्तित्व (शील) याला अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. माणसाकडे षट संपत्ती असायला पाहिजे :

साम ( मनाचा शांतपणा आणि गंभीरपणा)
दाम (स्वयंवर नियंत्रण आणि स्वतःच्या वासनांवर नियंत्रण)
उपरती (तृप्तता)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (संयमशीलता किंवा केंद्रित मन)

हे सहा गुण असल्याशिवाय, मनुष्य मुमुक्षु (ज्याला मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे) बनू शकत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य मुमुक्षु बनत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्रदान केल्या जात नाही.

म्हणूनच माणसाकडे विवेक (चांगल्या आणि वाईट यामधील फरक कळण्याची समज), वैराग्य(उदासीनता), आणि षट संपत्ती हे असतील तर तो मुमुक्षु बनतो. यानंतरच त्याला शिष्याची, विद्यार्थ्याची किंवा भक्ताची उपाधी दिल्या जाते.

नाहीतर हे म्हणजे होडीमध्ये वेड्या माणसाने असण्यासारखे झाले. तो होडीमध्ये असताना वेडा झाला किंवा नाचू लागला तर तो बुडेल , होडी बुडेल आणि त्यावरचे सगळे लोक बुडतील.

म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले की शील,समाधान (इथे,संयमशीलता) आणि प्रज्ञा (दैवी ज्ञान) हे शिष्यमध्ये उपस्थित असले पाहिजे.

एका विद्यार्थ्यामध्ये अहिंसा,शील इ.इ. गुण असले पाहिजे. त्याला समाधी अवस्थेचा अनुभव असायला हवा. तेव्हाच तो प्रज्ञावान (ज्ञान आणि सद्सद्विवेकबुद्धी या ईश्वरीय देणग्या असलेला) बनू शकतो.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही आम्हाला उदासीन राहायला सांगता. तुमच्याबाबतीत मी उदासीन कसा काय राहू? माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि आपुलकी रोजच्या रोज वाढतच चालली आहे.

श्री श्री : ही आपुलकी जर तुम्हाला इतर नकोश्या गोष्टींपासून दूर राहण्यास मदत करत असेल तर ठीक आहे. त्याने जर तुम्ही केंद्रित होत असाल तर छान आहे. परंतु जर यामुळे मत्सर, क्रोध, लोभ आणि इतर नकारात्मक भावना निर्माण होत असतील, तर तुम्हाला तुमच्यावर मेहनत घ्यावी लागणार आहे. स्वतःमध्ये खोल जा, ध्यान करा आणि समजून घ्या.

कोणतीही आपुलकी जर तुमच्या स्वयंला वरच्या पातळीवर नेते किंवा उच्च ध्येयाकडे नेत असेल तर ती ठीक आहे. परंतु जर त्यामुळे तुम्ही खाली येत असाल तर तुम्हाला ज्ञानाकडे परतणे आवश्यक आहे.

आपण प्रत्येक कृती करताना आपल्या स्वतःच्या अंतर्मनात डोकाऊन पाहायला पाहिजे. जर आपण कोणावर दोषारोप करीत असेल तर त्याचा अर्थ असा की आपण त्याशिवाय राहू शकत नाही.

बहुतांश वेळा असे बघण्यात येते की जर कोणी वाईट असेल तर तुम्ही त्यापासून दूर होता. परंतु जेव्हा तुम्ही त्यांचा तिरस्कार करता तेव्हा त्याचा अर्थ असा की आतमध्ये काही जोडणी आहे ज्यापासून तुम्ही दूर हटू शकत नाही. तुम्हाला त्यांच्या सोबत राहायचे आहे,म्हणूनच तुम्ही त्यांचा तिरस्कार करणे सुरु करता.

मी तुम्हाला सांगतो मन हे इतके गुंतागुंतीचे आहे. म्हणून मी म्हणत राहतो की तुम्हाला मनोरंजनासाठी इतर कोणत्याही साधनांची गरज नाही. मन हेच उत्तम मनोरंजन आहे. तुमच्या मनात सगळे चँनल कायम चालूच असतात.

जो मनुष्य मनाच्या भोवऱ्यात अडकला त्याच्यावर संताप न करता त्याला केवळ दया मिळाली पाहिजे. नेहमी आपण काय करतो? जर कोणी नकारात्मक असेल किंवा तुमच्या विरुद्द असेल तर तुम्ही त्यांच्यावर रागावता.

तुम्ही विचार करता की ते स्वतंत्र आहेत.

मला याच्या उलट त्यांच्याबद्दल कीव वाटते कारण ते त्यांच्या स्वतःच्या मनाच्या भोवऱ्यामध्ये फसलेले आहेत. ते काय करीत आहेत हे त्यांचे त्यांना कळत नाहीये आणि त्यांच्या कृतींवरून हे स्वच्छ दिसत आहे.

आणि काही कुठे चुकीचे होत असेल तर अशी माणसे आनंदी होतात. एखादा सुंदर कार्यक्रम सुरु असेल आणि पावसाने येऊन व्यत्यय निर्माण केला तर ते म्हणतात,'बरे झाले! पाउस आला, निसर्गसुद्धा आपली नापसंती दर्शवित आहे'.

त्यांना याचा फारच आनंद वाटतो. हे तर चुकीचे आहे.

तुम्ही हे दुसऱ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. पाउस जरी पडत असला तरी लोक अजूनसुद्धा बसलेलेच आहेत आणि ध्यान करीत आहेत, किंवा सेवा करीत आहेत किंवा त्यांनी कार्यक्रम पुढे सुरूच ठेवला आहे. परंतु आतून संपूर्ण नकारात्मक असलेल्या व्यक्तीला जर काही काम करत नसेल तर केवळ असुरी आनंदच होतो.

हे फार मजेशीर आणि फार विचित्र आहे.

हे केवळ मनाची विकृती दर्शविते.जगात कुठेही कोणालाही चांगली गोष्ट झालेली त्यांना सहन होत नाही. म्हणून अशा लोकांची तुम्ही केवळ कीव करू शकता.

प्रश्न : गुरुदेव, जर आपले चप्पल बूट हरवले किंवा जर कोणी ते घेऊन गेले तर असे म्हणतात की ते आपले वाईट कर्मेदेखील घेऊन जातात हे खरे आहे काय?

श्री श्री : जर महागडे बूट असतील तर होय, निदान तसा विचार केल्याने थोडे बरे तरी वाटेल. तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. पण त्या स्वस्तातील चप्पल असतील तर....(श्री श्री त्यांचे डोके हलवतात)

हे पहा,मुख्य कल्पना होती लोकांना वर्तमान क्षणात रहाण्यास सांगणे.

भूतकाळात अडकून राहू नका आणि तक्रार करू नका आणि असे करून हा क्षण वाया घालवू नका. जे घडले ते घडले! संपले!

जर तुम्ही वाहतुकीच्या खोळंब्यात अडकलात, मग संपले! आता जेव्हा तुम्ही घरी पाहोचाल, तेव्हा बसून दोन तास हे बोलण्यात वाया घालवू नका की कसा तुम्ही दुसरा मार्ग घ्यायला पाहिजे होता. हा निरर्थक वेळेचा अपव्यय आहे.

आपल्या पूर्वजांना इतके डोके होते आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितले,"अरे! हे ग्रह ताऱ्यांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला असे झाले ". आता तुम्ही ग्रह ताऱ्यांवर तर रागावू शकत नाही. म्हणून तुम्ही आजूबाजूच्या लोकांवर संतप्त होण्याऐवजी म्हणता,"अरे,हे तर माझ्या कर्मामुळे,ग्रह ताऱ्यांमुळे झाले".

यामुळे तुमच्यात एक प्रकारची स्वीकृती आणि शांतपणा येतो आणि यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही कटुतेशिवाय पुढे जाता.

भारताची ही अतिशय सुंदर गोष्ट आहे.

भारतीय समाजात वाईट गोष्टी घडत असतील परंतु आपण त्यामुळे वाईट वाटून घेत नाही आणि त्याची तक्रार करत बसत नाही.

माझी इच्छा आहे की संपूर्ण जगाने हा धडा शिकवा.

हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे; आपल्या रक्तात आहे. जर समाजामध्ये काही वाईट घडले, तर आपल्यामध्ये सहनशक्ती आहे,आपण तक्रार न करता पुढे जातो.

हे फार रोचक आहे.

बहुदा लोक म्हणतात,"तू ५० वर्षापूर्वी माझ्याबरोबर असे वागलास आणि तू अजूनसुद्धा माझा शत्रू आहे". लोक वैर भाव आणि शत्रुत्व त्यांच्या मनात आणि हृदयात ठेवतात.

परंतु इथे, ही अतिशय आगळीवेगळी गोष्ट आहे. आपण वैर भाव आणि शत्रुत्वाला खतपाणी घालत नाही.

प्रश्न : तुम्ही म्हणता की समाजातील भ्रष्टाचार हा समाजाच्या अध्यात्मीक निर्देशांकाबरोबर जोडलेला आहे. परंतु असे की पश्चिमेकडे जिथे भारतापेक्षा अध्यात्म कमी आहे तरीसुद्धा भारतापेक्षा तिथे भ्रष्टाचार कमी आहे. चीनचा सुद्धा अध्यात्मिक निर्देशांक कमी आहे, तरीसुद्धा प्रगतीमध्ये ते भारतापेक्षा सुस्थितीत आहेत.

श्री श्री : भारत अजूनसुद्धा त्याच्या भूतकाळातील अध्यात्मिक स्वादावर जिवंत आहे. हे म्हणजे असे झाले,स्वयंपाक घरात अजूनपर्यंत अन्नाचा वास येतो आहे परंतु भांड्यांमध्ये अन्नच नाहीये. हेच तर झाले आहे.

तुम्ही स्वयंपाक घरात प्रवेश करता आणि तिथे भजे आणि वड्याचा वास येत आहे परंतु भांड्यात वडे आहेत असा विचार करू नका.

तर भारताकडे हेच तर आहे त्याच्या भूतकाळाकडून. परंतु गेल्या २० वर्षात समाज बेजबाबदारपणा,बंधुत्वाचा आणि प्रामाणिकपणाचा अभाव, खास करून राजकीय क्षेत्रात समाज एका अतिशय खालच्या पातळीवर झुकला आहे आणि याचा देशावर परिणाम होत आहे.

सर्वसामान्य माणूस जरी प्रामाणिक असला तरी नेतृत्व प्रामाणिक नाही म्हणूनच भ्रष्टाचाराने प्रवेश केला.

"यथा राजा तथा प्रजा" अशी म्हण आहे.
"यथा प्रजा तथा राजा " अशी म्हण नाहीये.

भ्रष्टाचार हा वरून सुरु होतो. म्हणून जेव्हा वरच्या पातळीवर भ्रष्टाचार असतो तेव्हा तो खालच्या पातळीपर्यंत फोफावत जातो.

खरे तर भारत अजूनपर्यंत सुस्थितीत आहे. याचे कारण आहे सगळ्या गोष्टी शहाणपणाच्या पातळीवर असण्याकरिता आणि लोकांना एकत्र ठेवण्याकरिता एक प्रकारचा अध्यात्मिक कल आहे. तो तसा नसता तर भारताचे केंव्हाच तुकडे तुकडे होऊन गेले असते.

प्रश्न : गुरुदेव, अध्यात्मिक मार्गात प्रगती करण्याकरिता, सकारात्मक गुण,जसे काही साधी राहणी आणि नैसर्गिकता, यांची जाणूनबुजून जोपासना करायला पाहिजे का की ते आपणहून वृद्धिगत होतात?

श्री श्री : नाही, चांगले गुण वाढवायचे प्रयत्न करायची अजिबात गरज नाही. चांगले गुण तुमच्यात आपणहून फुलून येतात.

ज्याप्रकारे एका कळीचे विनासायास फुल होते,त्याचप्रकारे तुमच्यात चांगले गुण नैसर्गिकरित्या फुलून येतात.

तुम्हाला केवळ त्यांच्यावरून झाकण वर उचलायचे आहे.

असे पहा,जर तुम्ही एका कळीला झाकून ठेवले तर ती उमलू शकते का? तुम्हाला त्याच्यावरचे झाकण काढायची गरज आहे आणि मग उमलायला सुरुवात होईल. चांगल्या गुणांनासुद्धा हा नियम लागू आहे. केवळ यत्न केल्याने चांगले गुण उमलून येत नाही. त्याकरिता खोल आरामाची म्हणजेच ध्यानाची गरज आहे. जेव्हा तुम्ही तणाव मुक्त, शिथिल आणि स्वयंमध्ये विश्राम करीत असता तेव्हा चांगले गुण तुमच्यामध्ये सहजपणे उमलून येतात.

प्रश्न : गुरुदेव, बऱ्याचवेळा नोकरीच्या ठिकाणी जेव्हा अनेक अपूर्ण कामे असतात तेव्हा मन अस्वस्थ होते आणि हरल्याची भावना निर्माण होते आणि काय घडते आहे हेच कळेनासे होते. अशा वेळी काय करावे?

श्री श्री : तुम्हाला करायच्या कामांची एक यादी बनवा आणि मग महत्वाच्या कामांना अग्रक्रम द्या.आणि यासगळ्या कामाच्या व्यापामध्ये ध्यानाला सर्वात अग्रक्रम द्या.

तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत अशी श्रद्धा ठेवा आणि या भावनेने थोडा वेळ ध्यानाला बसा.

भगवान कृष्णांनी वाचन दिले आहे की जो कोणी त्याचे मन आणि बुद्धी माझ्याकडे वळवेल,त्याच्यापासून मी कधीही दूर नाही आणि तो माझ्यापासून कधीही दूर नाही. म्हणून हे केवळ लक्षात असू द्या. दररोज थोडा वेळ ध्यान करण्याचा आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि मग देव निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रार्थनांना पूर्ण करेल. तेव्हा तर मग आपल्याला मागण्या करण्याचा हक्कच मिळेल. हे म्हणजे असे झाले तुम्ही योग्य गुण जमवता तेव्हा तुम्हाला त्यांचा मोबदला मिळतो. म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुम्ही गुण जमा करीत असता ज्यांचा तुम्हाला मोबदला मिळतो.

अनेकदा जेव्हा सत्संग करिता बाहेर जातो तेव्हा लोक माझ्याकडून हे धमकावून वसूल करतात!(हंशा) कार्यक्रम संपल्यानंतर मी जेव्हा आराम करायला माझ्या खोलीत जातो तेव्हा रात्री ११ किंवा १२ वाजता लोक माझ्याकडे दर्शना करिता येतात. ते मला सांगतात,"या लोकांनी इतकी सेवा केली आहे आणि आता ते तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत. गुरुदेव,कृपा करून यांना भेटा."

मग मी म्हणतो,"ठीक आहे,मी येतो".

मला काही पर्याय राहातच नाही,मला दर्शन द्यावेच लागते कारण त्यांनी इतकी सेवा केली आहे! (हंशा) तर आपण अशाप्रकारे आपले गुण वाढवीत राहायला पाहिजे.

याच प्रकारे एक साधक देवाला त्याच्या प्रार्थनेला फळ देण्यास भाग पडतो. देवाला काही पर्याय उरत नाही आणि त्याला भक्ताचे कार्य पूर्ण करावेच लागते. याच प्रकारे आपण या जगातसुद्धा जिंकू शकतो.

जर आपण चांगली कामेच करीत असू तर कोणी आपला कशाला तिरस्कार करेल? चांगले काही करणाऱ्याचा कोणी तिरस्कार करते का? हे असे कधीच घडणार नाही.

आपण नेहमी काय करतो, आपण आपल्या आरामाच्या कक्षेच्या आतच राहतो, आणि आपल्या सुखसोयींनी महत्व देतो आणि आपल्याला बरे वाटेल असे वागतो. मग कशाला कोणाला आपण आवडणार?

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही धर्माच्या १० लक्षणांबाबत बोललात. आम्ही ही लक्षणे कशाप्रकारे वाढीस लावावीत आणि या ग्रहावर धर्माची स्थापना कशी करावी यावर काही बोलाल का?

श्री श्री : तुम्ही जे करीत आहात तेच करून!

मनाची स्पष्टता नसणे आणि तणाव यामुळे अधर्म असतो. जेव्हा मन केंद्रित नसते आणि हृदयात सल असते तेव्हा अधर्म होतो.

म्हणून ज्ञान आणि सद्बुद्धी हे तुम्हाला धर्माच्या मार्गाला नेतील.

प्रश्न : गुरुदेव, कोणत्या कारणाने प्राण शरीराला सोडून जातात, आणि त्याने पुन्हा यावे कधी याचा निर्णय काय करते?

श्री श्री : ठीक आहे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे! तुम्ही तुमचा पोशाख का बदलता? तुमचा पोशाख कशामुळे बदलल्या जातो?

तुम्ही जन्मभर एकच शर्ट का नाही वापरत?

तुम्ही तुमचे कपडे बदलता कारण ते वापरून जीर्ण शीर्ण होतात किंवा तसेच काहीतरी, हो ना? मिळाले उत्तर!

प्रश्न : गुरुदेव, मेरू पर्वत कुठे आहे आणि मेरू पर्वताचे काय महत्व आहे?

श्री श्री : मेरू पर्वत हा उर्जेचा गूढ पर्वत आहे. मेरू पर्वताची भौतिक जागा अशी नाहीये. 

प्रश्न : गुरुदेव,मी २१ वर्षांचा आहे आणि अनेक ,मुली माझ्याकडे आकर्षित होतात. माझे शिक्षक म्हणाले की त्या माझ्यातील गुरु ऊर्जेकडे आकर्षित होतात. मी हे कसे काय हाताळावे? 

श्री श्री : कोणताही निर्णय घेण्याकरिता २१ हे फार लहान वय आहे.

तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत, परंतु एखादा पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला दोनेक वर्षे थांबावे लागेल, ठीक आहे!

असे बघा, जर कोणीही आकर्षित झाले नाही तर ती एक समस्या आहे. लोक तुमच्याकडे आकर्षित होताहेत आणि तुम्हाला ती समस्या वाटते. प्रत्येक वळणावर जीवनात आव्हान आहे.

जीवन जसे आहे तसे स्वीकारा आणि जसे आहे तसे आवडून घ्या!

म्हणून तुम्हाला दुसऱ्यांकडून जे लक्ष मिळत आहे आवडून घ्या, परंतु सध्या थोडे अंतर ठेवून राहा. त्यांना सांगा की तुम्ही अजून अपरिपक्व आहात आणि तुम्हाला अजून दोन ते तीन वर्षे लागतील.