अंर्तमनातील कमालीचे परिवर्तन

22
2012
Sep
आचेन, जर्मनी








तर, आजचा विषय आहे IT – नवे परिमाण

तुम्हाला माहीत आहे का? माझ्यासाठी IT म्हणजे अंर्तमनातील परिवर्तन, आणि तुम्ही जर IIT म्हणाल तर त्याचा अर्थ आहे अंर्तमनातील कमालीचे परिवर्तन.

आपण आपले शरीर, मन, श्वास याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असतो. पण सर्व तंत्रशास्त्र त्याच्या मध्येच सामावलेले आहे.

आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि आपली चेतना जी शरीर चालविते, शरीर विकसित करण्यासाठी मदत करते त्याच्या कडेच आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. मग पहा जीवनात कसे नवीन परिमाण खुलतात ते.

ह्या चेतनेमुळे आज जगात तंत्रविज्ञान अस्तित्वात आहे.

कुणाच्यातरी मनात एक कल्पना येते, त्याच कल्पनेचे रुपांतरण तंत्र शास्त्रात होते. पण या कल्पना येतात कुठून? या कल्पनांना अस्तित्वात आणायला कोण मदत करतो? त्यालाच चेतना म्हणतात.

आज आपल्याकडे भ्रमण-ध्वनी (मोबाईल) आहे, पण २०-३० वर्षापूर्वी आपल्याला याची कल्पना सुध्दा नव्हती.

भ्रमणध्वनी कसा तयार करावा अशी कल्पना कुणाच्या तरी चेतने मध्ये आली आणि त्याच चेतने मुळे पुढे जावून विकसित झाली. हो कि नाही?!

हीच चेतना जी जबाबदार आहे सर्व सृजनशीलते साठी, जगातील सर्व वैज्ञानिक शोध, सर्व प्रकारच्या संगीत, कला, फॅशन आणि सर्व काही, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

ज्या चेतने मुळे वैज्ञानिक शोध होतात, कला आणि शिल्प विद्या विकसित होतात तीच चेतना आनंदाचे मोठे भांडार आहे.

तीच चेतना स्वास्थ्य, सुख, प्रेम आणि करुणा आविष्कृत करु शकते. तर हि चेतना जी आपल्या मेंदू आणि शरीराच्या विविध भागात काम करत असते, तिच्या मध्ये खूप कामे करण्याची कार्यक्षमता आहे. चेतना ज्या पद्धतीने कारुण्य, प्रेम, शांती आणि आनंद अभिव्यक्त करू शकते, त्याच प्रमाणे ती त्या निर्माण करू शकते, समजू शकते.

पहा मोबाईल मध्ये किती विविध सुविधा आहेत. त्याच्या मध्ये कॅमेरा आहे (गुरुदेव प्रेक्षकांचा फोटो काढतात). त्या मध्ये ट्विटर आहे. माझे ट्विटर अकाऊंट माहीत आहे का? @SriSriSpeaks.

तर हे आहे ट्विटर अकाऊंट, मग याच्यामध्ये SMS सुविधा आहे, टेलिफोन बुक आहे आणि संगीत आहे (गुरुदेव मोबाईल वर भजन लावतात).

आता हे बंद कसे करायचे मला माहीत पाहिजे (मोबाईल वर भजन च्या संर्दभात बोलतात). मला आता कळले कि बंद करायचे कुठले बटन आहे.

आपल्या मनाचे पण तसेच आहे, एकदा विचार करायला सुरुवात केली कि ते विचार करत राहते, आपल्यालाच माहीत नसते कुठे थांबायचे. बरोबर आहे कि नाही?!

मोबाईलचा किती प्रकारे वापर करता येतो, त्यामध्ये घड्याळ सुध्दा आहे.

ज्या प्रमाणे मोबाईलचा विविध प्रकारे उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीचा आणि जीवनाचा उपयोग करता येतो.

आपल्या चेतनेचा उपयोग आयुष्याच्या विविध परिस्थितीमध्ये केला जावू शकतो. हि एकच परिस्थिती अस्तित्वात आहे असे नाही.

तुम्ही जर तुमच्या चेतनेचा वापर फक्त कला आणि संगीता साठी उपयोग केला तर आयुष्य परिपूर्ण झाले असे नाही, किंवा फक्त शास्त्र आणि युक्तिवाद या साठी उपयोग केला तरी पण आयुष्य परिपूर्ण झाले असे नाही. तुम्ही जर आयुष्य म्हणजे मजा आहे असे समजले तरी आयुष्य परिपूर्ण नाही.

ज्याप्रमाणे मोबाईलच्या बटनाने आपण त्यावरील सर्व कार्ये चालू बंद करू शकतो त्याच प्रमाणे निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमता बंद चालू करण्याची क्षमता आपल्या चेतने मध्ये आहे.

आपल्या मध्ये कुठेतरी साधेपणा हा लपलेला असतो. निरागसपणा आणि साधेपणा आपल्यामध्ये जन्मताच असतो पण आपण जस जसे मोठे होत जातो तस तसे तो आपण कुठेतरी हरवत जातो.

आपण जसे मोठे होतो तसे आपले स्मितहास्य हरवते, आपला स्वभाव बदलतो. हो कि नाही?

म्हणून मी म्हणतो कि संवेदनशीलता आणि हळवेपणा दोन्ही महत्वाचे आहे.

मनुष्याने तर्कबुद्धी ने विचार करण्याची गरज आहे. कुणीतरी म्हटले म्हणून एखाद्या गोष्टीचा स्वीकार करू नये. आपण आपल्या बुद्धीचा वापर करावा. हे मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे. तर्क दृष्ट्या अयोग्य असेल तर त्या गोष्टीचा आपण स्वीकार करू नये.

तर्क हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण त्याच्या मुळे संवेदनशीलता निर्माण होतो.

आता संवेदनशीलता पुरेशी नाही, तुमच्या कडे हळवेपणा पण असला पाहिजे. हळवेपणा हा आपल्या हृदयाचा एक भाग आहे. तुम्ही तर्क दृष्टीने बरोबर असाल पण तुम्हाला दुसऱ्यांचा दृष्टीकोन समजता आला पाहिजे. बऱ्याच वेळा लोक जे काही बोलतात त्याचे प्रमाणे ते वागतात. ते बरोबर असतील पण ते काही लोकांना दुखावत असतात.

जो मनुष्य रागीट आहे तो त्याचा राग तर्कबुद्धी ने समजावतो, पण त्यांना कळत नाही कि ह्या कारणामुळे किती जण दुखावतात. दुसरेच नाही पण त्याचा स्वत:ला पण त्रास होतो. तर हा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संवेदनशीलता.

तुम्हाला माहीत आहे कि एखादी व्यक्ती मुर्ख आहे, तुम्ही जर त्यांना सारखे मुर्ख म्हणालात किंवा त्याच्यावर सारखे ओरडलात किवा रागवलात तर त्याने काही होणार नाही. त्याच्या बाबतीत तुम्हाला संवेदनशील रहावे लागेल.

तुम्हाला माहीत आहे, एकदा एका कार्यक्रमात एक स्त्री एका व्यक्तीला रागवत होती कारण त्या व्यक्तीने त्याचे काम व्यवस्थितरित्या केले नव्हते. मग मी त्या स्त्रीला बोलविले आणि विचारले कि, “ तुम्हाला काय वाटते, तुमच्या रागावण्याने तो व्यक्ती बदलेल?”

ती स्त्री म्हणाली, “नाही”.

मी म्हणालो, “ नुसते त्या व्यक्तीवर ओरडून काय फायदा? त्या मध्ये तुम्ही तुमची प्रतिमा खराब करून घेता. ज्या क्षणी तुम्ही कुणावर रागावता, जरी तुम्हाला त्यांना काही चांगल्या सूचना करावयाच्या असतील तरी ते त्याच्या कडे दुर्लक्ष करतात. तुमच्या ओरडण्याचा हेतू त्या व्यक्ती मध्ये समज आणण्याचा असतो आणि जर तो हेतूच साध्य होत नसेल तर ओरडून काय फायदा?”

मग ती स्त्री म्हणाली, “ गुरुदेव, तुम्ही बरोबर आहात! मी आयुष्यभर हेच करत आले आणि मीच माझ्या भोवती शत्रू निर्माण केले.’

मी म्हणालो’ “ त्यासाठीच, तुम्ही एक गाढव घोड्या सारखे धावेल अशी अपेक्षा करू नका.’

तुम्ही जर गाढवावर बसून तो घोड्या सारखा धावेल अशी अपेक्षा कराल तर ते अशक्य आहे. म्हणून गाढव गाढव आहे आणि घोडा घोडा आहे ह्या वस्तुस्थितीचा स्वीकार करा. मग क्रोध कुठे आहे? हि संवेदनशीलता आहे – दुसऱ्याच्या भावनांचा आणि त्यांच्या गरजेचा संवेदनशीलतेने विचार करणे हि एक आपल्या हृदयाचा सद्गुण आहे.

काही व्यक्ती खुपच संवेदनशील असतात. ते त्यांचा युक्तिवाद विसरून जातात. ते खुपच भावनात्मक होतात. हे पण चांगले नाही. तुम्हाला संवेदनशीलता आणि हळवेपणा या मध्ये समतोल राखता आला पाहिजे. काय म्हणता तुम्ही? मी बरोबर आहे का? (

(प्रेक्षक : हो)

संवेदनशील आणि हळवे असणे हा आपल्या चेतने च्या शास्त्रातला महत्वाचा भाग आहे. नंतर येतो धीरगंभीरपणा. प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी काही सेंकद, काही मिनिटे गंभीर होतात. ज्यावेळेस तुम्ही गंभीर होता त्यावेळेस तुम्ही शांत होता आणि तुम्हाला मौन जाणवते आणि तुम्ही आध्यात्मिक आहात असे वाटते. गंभीर आणि मौनचा कुठेतरी तुम्हाला समज येतो.

आपल्या बऱ्याच मोबाईल मध्ये आपण हे कार्य बंद करून ठेवले आहे किंवा त्याचा जास्त वापर केला गेला नाही. आपल्या चेतने ने ह्या कार्याला स्पर्श सुद्धा केला नाही आणि इथेच आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्या मदतीला येते, जे तुम्हाला स्मितहास्य करायला शिकविते आणि सेवा सुद्धा.

तुम्हाला माहीत आहे का, एक छोटे बाळ दिवसातून ४०० वेळा स्मितहास्य करतात, युवक १७ वेळा आणि आपण मोठे सगळेजण स्मितहास्य करायचे विसरून गेलो आहोत. हेच तर आर्ट ऑफ लिव्हिंग तुमच्या साठी घेवून येते, स्मितहास्य करत रहा! हसत रहा सेवा करत रहा. संवेदनशील आणि हळवे रहा, शांतता आणि मौन चा अनुभव घ्या.

प्रश्न: गुरुदेव, शिस्त आणि स्वातंत्र्य या मध्ये समतोल कसा ठेवावा?

श्री श्री: या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिस्ती मुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळते.

तुम्हाला लहानपणी रोज सकाळ संध्याकाळ दात घासण्याची शिस्त लावली गेली. त्यामुळे तुम्हाला दात दुखणे आणि किडणे या पासून स्वातंत्र्य मिळाले. हो कि नाही?!

तुम्हाला जर जेवण्याची शिस्त असेल तर तुम्हाला कोलेस्त्रोल किंवा बाकी आजारापासून स्वातंत्र्य मिळेल.

प्रश्न: सर्व काही शांत झाल्यांनतर काय होईल? मृत्यूनंतर च्या शांतते पासून ते कसे वेगळे आहे?

श्री श्री: खूप फरक आहे! मौन हे सर्व निर्मिती क्षमतेची ती जननी आहे. सुंदरता, प्रेम, अंर्तज्ञान, अविष्कार, काव्य ह्या सर्व गोष्टीची जननी मौनच आहे, मौन मधूनच सर्व काही व्यक्त होते.

सुदर्शन क्रिया हि पण मौन मधूनच निर्माण झाली आहे.

मला माहीत आहे तुम्ही सर्वानी सुदर्शन क्रियाचा अनुभव घेतला आहे, आणि तुम्हाला त्याचे महत्व पण माहीत आहे.

या दिवसात मी दौऱ्यावर होतो, दक्षिण भारत ते दक्षिण आफ्रिका, मग दक्षिण अमेरिका, त्यानंतर उत्तर अमेरिका आणि आता युरोप. मी हा सर्व प्रवास एका महिन्याच्या कालावधीत केला आहे. मी ब्राझील आणि अर्जेटिना येथील जेल मध्ये भेट दिली. अर्जेटिना जेल मध्ये ५२०० कैदी आहेत ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे आणि ते सुदर्शन क्रिया करतात, त्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, एक ही असा कैदी नव्हता कि त्याचे डोळे कोरडे होते. त्यांच्या जीवनात खूप परिवर्तन झाल्याचे जाणवत होते.

ते म्हणाले, ‘ आधी आम्ही जेलच्या बाहेर होतो पण आम्हाला स्वातंत्र्य नव्हते, आता आम्ही जेल मध्ये आहोत पण स्वतंत्र आणि आनंदी आहोत. ह्या कोर्सने आमचे पूर्ण जीवन बदलून टाकले आहे.’

तुम्हाला माहीत आहे, जेल मध्ये भेट देताना माझ्या बरोबर तेथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण होते आणि ते म्हणाले, ‘ गुरुदेव, इथे जे काही होत आहे ते खरच अविश्वसनीय आहे. आमची इच्छा आहे कि असा बदल सर्व जेल मध्ये होवो.’

ह्या बदलाकडे लक्षात घेवूनच मला तेथील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली. ‘मी एका दिवसात या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी बनलो आहे, मी विनोद केला.

मी हे का सांगत आहे, कारण आपण एक अहिंसा मुक्त समाज निर्माण करू शकतो. माझा दृष्टीकोन हे एक अहिंसा मुक्त समाज, रोग मुक्त शरीर, संमोह विरहीत मन, निरोधन मुक्त बुद्धी, आघात विरहीत स्मृती आणि दु:ख विरहीत आत्मा बघण्याचा आहे.

सध्या पहा जगात काय वेडेपणा चालला आहे. कारण कुणीतरी एक चित्रफीत बनविली आहे, त्याच्या साठी सर्व देशात हिंसा चालू आहे. हा वेडेपणा नाही का?

कारण त्यांना अहिंसेचे शिक्षण, ज्ञान दिले गेले नाही, जे खूप महत्वाचे आहे.

प्रश्न: आजच्या घटकेला सुध्दा गुरुचे अनुगमन करणे योग्य आहे का?

श्री श्री: तुम्हाला हा प्रश्न का सुचला? हा प्रश्न विचारून तुम्ही स्व:ताला जाळ्यात अडकवून घेतले आहे. मी जर उत्तर दिले आणि तुम्ही जर ते एकले, याचा अर्थ तुम्ही गुरुचे अनुगमन करता.

मी जर म्हणालो, ‘ नाही, काही गरज नाही’, तर तुम्ही म्हणाल, ‘ ठीक आहे मी नाही कुठल्या गुरुचे अनुगमन करणार’, याचा अर्थ तुम्ही गुरुचे अनुगमन करता.

मी जर म्हणालो, ‘हो’, तरी पण तुम्ही गुरुचे अनुगमन केले हे सिद्ध होईल.

म्हणून मी म्हणतो. ‘नाही!’

हा प्रश्न खूप मनोरंजक आहे. बरोबर आहे?

हे पहा, फुटबॉल खेळायचा असेल तर प्रशिक्षक हा आवश्यक आहे. प्रत्येक फुटबॉल खेळाडूसाठी प्रशिक्षकाची गरज असते. कोणत्याही खेळासाठी, संगीताचे शिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षकाची गरज असतेच. तुम्ही शाळेत जात असताना ज्या विषयात तुम्हाला कमी गुण मिळत असतील तर त्या विषयासाठी तुम्हाला शिक्षकाची गरज असते. त्याच प्रमाणे आध्यात्मिक मार्गावर किंवा ध्यान करताना सुरुवातीला मार्गदर्शनाची गरज असते, हो कि नाही! त्यासाठी गुरुची गरज असते. पण तुम्हाला जर आवश्यकता वाटत नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

प्रश्न: मी केलेल्या चुकीमुळे मला अपराधी असल्या सारखे वाटते, माझी या पासून सुटका कशी होईल?

श्री श्री: ध्यान!!

प्रश्न: युरोप मध्ये सध्या कोणती मोठी समस्या आहे जी सोडविण्याची गरज आहे?

श्री श्री: मी युरोप बद्दल असे एकले आहे कि येथील ३०% ते ४०% जनता खिन्न, उदासीन होत आहे. किती तरी लोक Prozac सारख्या औषधीच्या आहारी जात आहेत आणि लहान मुले स्वमग्नता मध्ये हरवत चालले आहेत. हा खूप गांर्भियाचा प्रश्न आहे. आपण याकडे लक्ष दिले पाहिजे.

त्यासाठीच तर ध्यान, सुदर्शन क्रिया आहे. आनंदी आणि आरोग्य कसे रहावे या बद्दलच्या कार्यशाळा आहेत. हे सर्व जर आपण आत्मसात केले तर आपण नक्कीच आनंदी समाज निर्माण करू शकतो.

मला खात्री आहे ह्या मुळे आपण एक आनंदाची लाट निर्माण करू शकतो.

प्रश्न: मी रोज व्यायाम करतो, म्हणून माझे श्वासांवर नियंत्रण आहे. दि आर्ट ऑफ लिविंग च्या कोर्स मध्ये असे काय विशेष आहे? मला वाटते कि या कोर्सेस मधून मला जे काही मिळणार आहे ते माझ्या रोजच्या व्यायामातून मला मिळेल. मला हा कोर्स केल्याने काय मिळेल सांगाल का.

श्री श्री: हा कोर्स तुम्हाला खूप मार्गाने मदत करू शकतो म्हणून तर तो खूप लोकप्रिय आहे. जगात कोट्यावधी लोक हा कोर्स करतात म्हणजे त्यात काही तरी तथ्य असले पाहिजे.

मी तुम्हाला सांगतो हा कोर्स खूप सखोल आहे आणि एकदम साधा सरळ सोपा आहे.

हा कोर्स म्हणजे फक्त व्यायाम नाही. व्यायामाबरोबर अध्यात्मिक उर्जेचा उद्धार करणारा आहे. हे सत्य आहे तुम्ही जेव्हा हा कोर्स करून बाहेर पडाल त्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य, प्रसन्नता असेल आणि तुम्ही तृप्त असाल; तुमच्या आयुष्याला नवी परिमाण मिळेल.

तुम्हाला माहीत आहे आपल्या मनामध्ये दुसऱ्या बद्दल काही विचार, ग्रह असतात. आपण या विचारांपासून मुक्त झाले पाहिजे. आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात.

पहा, आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यातील अन्न स्वीकार करतो, तसेच संगीताच्या बाबतीत. पण ज्ञान किंवा दुसऱ्या लोकांच्या ज्ञानाविषयी आपण स्वीकार करू शकत नाही. 

आपण या विचारांवर मात केली पाहिजे आणि जाणले पाहिजे कि सर्व माझेच आहेत, सर्व जग एक कुटुंबच आहे.