तुम्ही सदाबहार आहात !!

25
2012
Dec
बैड एंटोगस्त, जर्मनी
जगातील सर्वजण इथे जमले आहेत, हे खूप चांगले आहे.

हे आपल्या परिवाराचे पुनर्मिलन आहे. जगातील सर्वजण मिळून आपण इथे ख्रिसमस साजरा करीत आहोत.

हे इथले ख्रिसमस चे झाड तुम्हाला सांगत आहे कि, ‘ तुम्ही माझ्या सारखे व्हा, सदाबहार, प्रकाशमय, भरपूर भेट वस्तू घेवून’.

तुम्ही इथे प्रत्येक जण क्रिसमस च्या झाडा सारखे, लखलखणाऱ्या भरपूर भेट वस्तू घेवून, प्रकाशमय आणि सदाबहार!

पुढील वर्षी आणखी बरेच जण या अध्यात्मिक मार्गावर दिसतील आणि हा मार्ग आणखीनच बहरेल. २०१३ मध्ये आम्ही दोन प्रकारच्या नवीन क्रिया शिकविणार आहोत ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि छान आहेत.

प्रश्न: या नवीन काळा बद्दल काही सांगू शकाल का? स्त्रियांची या मध्ये मोठी भूमिका असेल का?

श्री श्री: या जगामध्ये स्त्रियांना खूप मोठी भूमिका करावी लागेल. सध्याची त्यांची भूमिका मोठीच आहे, पण या पुढे याच्या पेक्षा जास्त मोठी असेल.

तुम्हाला माहीत आहे २१ डिसेंबर विषयी लोक किती चिंता ग्रस्त होते.

लोकांनी तर अशी अफवा उठवली कि २१ डिसेंबर ला हे विश्व संपुष्टात येणार.

काही जणांनी तर तळघरात अन्नाचा साठा करून ठेवला. काही जणांनी आपले घर देश सोडून कुठेतरी पर्वतावर वास्तव्य केले. हे विश्व संपणार आहे हा विचार करून बरेचजण आश्रमात आले कारण त्यांना वाटले कि आपण इथेच सुरक्षित राहू शकतो.

मी आधी पासूनच सांगत आलो आहे कि हि अफवा आहे. या जगामध्ये अशी काही लोक आहेत ज्यांना अशी अफवा उठवायला मजा येते. त्यांना काही गोष्टी विकायच्या असतात म्हणून ते अशा अफवा पसरवतात. अशा प्रकारच्या अफवा एकून लोक बाजारात जावून रोजच्या लागणाऱ्या गोष्टींचा साठा करतात. ह्या सर्व युक्त्या आहेत.

मी म्हणाले होतो कि असे काही होणार नाही. आज २५ तारीख आहे आणि काहीही झाले नाही, सर्व काही ब्यवस्थित चालले आहे. असे फक्त अमेरिकन चित्रपटातच होते आणि दाखविण्यात येते कि हे जग संपुष्टात आले.

आपण एकच गोष्ट केली पाहिजे, आपल्याला जे काही देवाने दिले आहे त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत. आणि भविष्यात आपल्याला जे काही मिळणार आहे ते मिळेलच. याचा आपल्याला विश्वास असायला हवा.

आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

तुम्हाला जेव्हा सेवा करावयाची असेल, त्यावेळेस तुम्ही विचार केला पाहिजे कि, ‘मला अजून सेवा करायला हवी, मी अजून काही सेवा केली नाही’. 

तुम्ही जर असा विचार केला कि, ‘ मी खूप सेवा केली आहे आणि मला त्या नुसार त्याचा मोबदला मिळाला नाही’, तर दु:खी होण्याचे हे एक रहस्य आहे. तुम्हाला जर दु:खी व्हायचे असेल तर तुम्ही मागणी करा, ‘ मला जे मिळायला हवे ते मला मिळाले नाही’.

तुमच्याकडे जे नाही त्याची मागणी केल्याने तुम्ही दु:खी होता.

आपण जर असा विचार केला कि, ‘ मी आता पर्यंत खूप काही केले आहे, आता आणखीन जास्त करायची गरज नाही’ तरी पण आपण दु:खी होतो. खरंतर ही एका निराश, क्रोधित आणि दु:खी मनाची चिन्ह आहेत.

तुम्हाला जे काही करायचे आहे, त्या वेळेस तुम्ही असा विचार करा, ‘ मला कशा पद्धतीने आणखीन जास्त सेवा करता येईल? हे विश्व सुंदर कसे बनविता येईल? मी कोणत्या पद्धतीने हातभार लावू शकेन? अशी आपली विचार सरणी हवी.

आणि ज्या वेळेस तुम्ही मोबदल्याचा विचार कराल, तुम्ही कृतज्ञता दर्शवत विचार केला पाहिजे कि, ‘ मला जे काही हवे आहे ते मला मिळाले आहे आणि भविष्यात जे काही लागेल ते मला मिळणारच आहे. मला जे काही मिळणार आहे ते निर्सगा कडूनच मिळणार आहे!’

हा आत्मविश्वास तुम्हाला आनंद देतो आणि ‘ मला या विश्वा साठी काही तरी जास्त करायचे आहे’ ही मनोवृत्ती तुम्हाला त्या दिशेने जाण्याची स्फूर्ती देते.