20 April 2012

ध्यान हे आत्म्याचे पोषण आहे.

ध्यानाची रहस्ये- दिवस

२० एप्रिल २०१२-कॅलिफोर्निया

पुढचे तीन दिवस आपण ध्यानाचा शोध घेऊया.
या प्रवासाकरिता तुम्ही तयार आहात का? खुर्चीची पेटी बांधा आणि कंबर कसून तयार व्हा !
ध्यानाची मुख्य बैठक काय आहे ते तुम्हाला माहिती आहे? आरामशीर असणे, नैसर्गिक असणे. अनौपचारिक असणे आणि घराच्यासारखे आरामशीर असणे, हे ध्यानाकरिता आवश्यक आहे.
तुम्हाला घराच्यासारखे आरामशीर वाटते आहे असे मी समजतो,बरोबर? अर्थात,हे कॅलिफोर्निया आहे,इथे सगळ्यांना कायम घराच्यासारखे आरामशीरच वाटते. आपण बऱ्यापैकी अनौपचारिक आहोत,हो ना? कॅलिफोर्नियाची हीच तर खासियत आहे,एकदम आरामशीर आणि सहज!
तर ध्यानाच्या गरजेचा शोध आपण घेऊया. आपल्याला ध्यानाची काय आवश्यकता आहे आणि ध्यान करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत. त्याच्या फायद्यांमध्ये मी जाणार नाही; ते तुम्हाला माहिती आहेत असे मी समजतो. परंतु ध्यानाची गरज आणि पद्धती, आणि आपण कश्याप्रकारे यशस्वी ध्यान करू शकतो,  आपण सगळ्या शक्यता धुंडाळून बघू; ध्यानाचे वेगवेगळे प्रकार.
ध्यानाची काय आवश्यकता आहे ? आपण ध्यान का केले पाहिजे?
गरज प्रत्येक मनुष्याला आहे कारण संपणारा आनंद, कलुषित होणारे किंवा नकरात्मक भावना निर्माण करणार नाही असे विशुद्ध प्रेम शोधण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. हे अगदी साहजिक आहे, नाही का?
ध्यान आपल्याकरिता परके आहे का? अजिबात नाही! याचे कारण म्हणजे तुम्ही जन्माला यायच्या दोन महिने आधी ध्यानस्थ होता. तुम्ही तुमच्या आईच्या उदरात होता काहीही करता. तुम्हाला तूमचे अन्न चावायची देखील गरज नव्हती, अन्न थेट तुमच्या पोटात भरवले जात होते आणि तुम्ही गर्भजलात आनंदात तरंगत होता, कधी इथे लाथ मार तर कधी तिथे पण जास्तीत जास्त वेळ तुम्ही आनंदात, मजेत तरंगण्यात घालवत होतात. ते ध्यान होते. तुम्ही काहीच करत नव्हतात, तुमच्याकरिता सगळे काही केले जात होते. तर प्रत्येक माणसाचा हा नैसर्गिक कल आहे, संपूर्ण आरामात असण्याची प्रत्येक आत्म्याची तीव्र इच्छा असते.
तुम्हाला आरामाची गरज का असते हे माहिती आहे? कारण तुम्ही एका क्षणी तो आराम अनुभवला आहे. तो आराम पुन्हा अनुभवण्याची लालसा असणे स्वाभाविक आहे कारण तुम्ही ती संपूर्ण आरामाची अवस्था अनुभवली आहे.हेच आहे ध्यान.ध्यान म्हणजे संपूर्ण आराम. या जगाच्या, या विश्वाच्या रामरगाड्यात अडकण्याआधी तुम्ही चाखलेल्या अवस्थेला पुन्हा जाणे हे नैसर्गिक आहे कारण या विश्वामध्ये सगळे एका चाकोरीत बद्ध आहे, प्रत्येकाला आपल्या स्रोताकडे जायचे आहे आणि हाच या जगाचा स्वभाव आहे. सगळे परतून मागे जाते आणि सगळे चाकोरी बद्ध आहे,  केवळ तुम्ही वापरता ते प्लास्टिक सोडून.
बघा,जेव्हा शिशिर ऋतू येतो तेव्हा पानें गळून पडतात आणि परतून मातीत मिसळून जातात आणि निसर्गाची स्वतःची पुनःचक्राची पद्धत आहे. दिवसभरातील घटना आपल्या चित्ताला प्रभावित करते. ते प्रभाव त्याग करून आपण या ग्रहावर आलो त्या मूळ स्थितीत परत जाणे म्हणजेच ध्यान होय. पुन्हा ताजेतवाने होणे, जिवंत होणे म्हणजेच ध्यान. शांतता, तुमचा मूळ स्वभाव, त्याकडे परतून जाणे म्हणजे ध्यान. परम उल्हास आणि आनंद म्हणजे ध्यान.
उत्तेजना रहित आनंद म्हणजे ध्यान. काळजीविरहित रोमांच म्हणजे ध्यान. द्वेषविरहित प्रेम किंवा कोणत्याही परस्पर विरोधी मुल्याविरहित म्हणजे ध्यान.ध्यान हा आत्म्याचा आहार आहे, तर मग अन्नाकरिता हाव असणे नैसर्गिक आहे, नाही का? जेव्हा कधी तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही आपणहून उठून काहीतरी खायला घेता.जर तुम्हाला तहान लागली तर तुम्हाला पिण्याकरिता पाणी पाहिजे. त्याचप्रमाणे आत्मा हा ध्यानाकरिता भुकेलेला असतो आणि हि प्रवृत्ती प्रत्येकामध्ये आहे.म्हणूनच मी म्हणतो की या ग्रहावर अशी एकही व्यक्ती नाही जी शोधक नाही. एवढंच कि त्यांना ते माहिती नाही.त्यांना ते ओळखू येत नाही. आपण अशा अन्नाचा शोध घेतो जे उपलब्ध नाही, हीच समस्या आहे.
हे म्हणजे जेंव्हा गाडीमध्ये पेट्रोल भरणे जरुरी आहे तेंव्हा वाण्याकडे जाण्यासारखे आहे.. असे तर काम होणार नाही. "मला माझ्या गाडीत पेट्रोल भरून पाहिजे", असे म्हणत तुम्ही वाण्याच्या दुकानाभवती गोल फिरत राहिल्याने काम होणार नाही. काम होणार नाही कारण तुम्हाला पेट्रोल पंपावर जाणे आवश्यक आहे.
योग्य दिशा शोधणे जरुरी आहे आणि त्याचाच आपण शोध घेणार आहोत. ध्यान कोणत्या पद्धतीने आणि कसे करावे, आपण संपूर्ण आंतरिक आराम कसा काय अनुभवू शकतो.
याचे पाच मार्ग आहेत:
पहिला मार्ग आहे शारीरिक माध्यम; योग आणि शारीरिक व्यायाम. ठराविक लयबद्धतेमध्ये आपण आसने केली तर त्यामुळे काही थकवा येतो आणि मग मन ध्यानस्थ होऊन जाते.
हे बघणे अतिशय रोचक आहे.जर तुम्ही क्रियाशील असल तर तुम्ही ध्यान करू शकत नाही, त्याचप्रमाणे जर तुम्ही जास्त विश्रांती घेतली असेल तरीदेखील तुम्ही ध्यान करू शकणार नाही. शरीराला योग्य थकवा, पण तेवढादेखील थकवा नाही असे शरीराचे एकदम नाजूक संतुलन असते तेव्हा मन ध्यानस्थ होते किंवा तुमची संपूर्ण प्रणाली ध्यानस्थ होते. तर सर्वप्रथम शरीराद्वारे.
दुसरा मार्ग आहे प्राण अगर श्वासाद्वारे. श्वासाद्वारे तुम्ही ध्यानात जाऊ शकता. हे तर आपण सर्वाना माहिती आहे.सुदर्शन क्रिया हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्राणायाम आणि सुदर्शन क्रियेनंतर जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही विनाप्रयात्न ध्यानस्थ होता. तर मग श्वास तंत्र हा ध्यान करण्याचा एक मार्ग आहे.
तिसरा मार्ग आहे दृश्य, आवाज, चव, सुवास किंवा स्पर्श ही इंद्रियगोचर सुखे. पाच इंद्रिय सुखे जी पाच मूळ तत्वांशी जोडलेली आहेत.
जग हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच मूळ तत्वांनी बनलेले आहे. या पाच मूळ तत्वांच्या वेगळ्या संयोगापासून हे विश्व बनले आहे आणि हे पाच तत्व आपल्या पाच जाणीवांबरोबर जोडलेले आहे. तेज डोळ्यांशी निगडीत आहे, सुवास पृथ्वीबरोबर, चव आपबरोबर, आवाज आकाशाशी आणि स्पर्श वायुबरोबर निगडीत आहे.
तुम्हाला  माहिती आहे, जर तुम्ही पाण्यात किंवा जलतरण तलावात असाल तर तुम्हाला तेवढे स्पर्शज्ञान होत नाही. हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? जास्त नाही पण थोडेफार, असे होते कारण प्रत्येकामध्ये पाच मूळ तत्वे आहेत. पाण्यातदेखील वायू तत्व आहे, पण छोट्याशा प्रमाणावर. तर ही पाच मूळ तत्वे पाच इंद्रिय सुखांबरोबर जोडलेली आहेत. यातील कोणत्याही एका जाणीवेद्वारे तुम्ही त्यांच्या पलीकडे जाऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही खोल ध्यानस्थ अवस्थेत जाऊ शकता.
चौथा मार्ग आहे भावनांच्याद्वारे. भावनांच्याद्वारे तुम्ही ध्यानस्थ होऊ शकता.
पाचवा मार्ग आहे बुद्धीद्वारा. तुम्ही केवळ सा आणि जाणून घ्या की तुमचे शरीर अब्जावधी पेशींने बनलेले आहे. अरे! तुम्हाला काहीतरी होते आहे,  कशाला तरी चालना मिळते आहे.
जेव्हा तुम्ही अंतराळ संग्रहालयाला भेट देता तेव्हा तुमच्यात काहीतरी उतेजीत होते. जेव्हा तुम्ही अंतराळ संग्रहालयाच्या आत जाता आणि बाहेर येता तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळे वाटत नाही का? तुमच्यापैकी कितीजणांना असे वाटले?
कोणीतरी अंतराळ संग्रहालयाच्या आत जाते किंवा विश्वासंबंधित चित्रपट बघते तेव्हा खोल आतमध्ये काहीतरी होते, विस्तीर्ण अशी अनुभूती होते. अशा या अनुभवातून तुम्ही लगेच बाहेर येऊ शकत नाही,व्कोणावर ओरडा आरडा करू शकत नाही.व्हे जवळ जवळ अशक्यच होते कारण विश्वाची भव्यता बघितल्यावर जीवनाचे संदर्भ बदलतात.
तो जीवनाचा संदर्भ आहे. तुमचे जीवन काय आहे? हा पृथ्वी ग्रह काय आहे आणि हे तारामंडळ कुठे आहे? तुमच्यात काही बदल होतो. मी तर म्हणतो ही तर एक छोटीशी झलक आहे की बुद्धीद्वारा तुम्ही कसे पलीकडे जाऊ शकता,ध्यानस्थ होऊ शकता.
तर मग बुद्धीद्वारा, भावनांद्वारा,पाच इंद्रिय सुखांद्वारा, श्वास आणि सुदर्शन क्रियेद्वार आणि शरीराच्या शारीरिक वापराद्वारा आपण ध्यानस्थ होऊ शकतो.
मी काय सांगितले ते लक्षात ठेवा,ध्यान म्हणजे AC (Absolute Comfort)(संपूर्ण आराम). कोणाला आराम नको आहे? सगळ्यांच पाहिजे आहे. एवढेच की आपल्याला संपूर्ण आराम कसा करावा हे माहित नसते.
ध्यान हा हालचालीपासून स्तब्धतेपर्यंतचा आणि गोंगाटापासून मौनपर्यंतचा प्रवास आहे. चला तर मग हि एक गोष्ट आज समजून घेऊया आणि थोडे ध्यान करुया.
हे बघा,ध्यान करण्याकरिता तुम्हाला गंभीर होण्याची गरज नाही. ध्यान म्हणजे नैसर्गिक आणि स्वस्थ असणे होय. आपल्या स्वतःसोबत स्वस्थ आणि या विश्वात सगळ्यांसोबत स्वस्थ असणे. ठीक आहे!
<गुरुजी श्रोत्यांना ध्यानाचे मार्गदर्शन करतात>
प्रश्न : देवाबद्दल आपला काय दृष्टीकोनआहे?
श्री श्री रविशंकर : प्रत्येक दृष्टिकोनामध्ये देव आहे!
आपल्याला वाटते की देव म्हणजे कोणीतरी कुठेतरी स्वर्गात बसलेला आहे. नाही! देव म्हणजे प्रेम आणि हे संपूर्ण विश्व प्रेमातूनच बनलेले आहे. हे भेदभाव करत नाही. हे कोणत्याही क्षणी सगळयांकरिता उपलब्ध आहे. त्या उर्जेला तुम्ही देव म्हणू शकता. तो कोणत्याही स्पष्टीकरणाच्या आणि आकलनाच्या पलीकडे आहे.
प्रश्न : ध्यान करतान माझ्या डोक्यातील गोंगाटाला शांत कसे करायचे?
श्री श्री रविशंकर : त्याकरिता तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता.
सर्वप्रथम त्याचा स्वीकार करा आणि त्याच्याशी संघर्ष करू नका. जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर संघर्ष करता आणि तुम्हाला वाटते की हे आवाज असता कामा नये आणि तुम्हाला यापासून सुटका पाहिजे. जेवढे जास्त तुम्हाला या आवाजांपासून सुटका पाहिजे तेवढे जास्त ते तुम्हाला चिटकून राहतील. तुमचे मन किंवा चेतनेचे तत्व आहे कि प्रतिकार केल्याने प्रश्न सुटत नाही, तर तो अजून मोठा होतो. सगळ्यात आधी सोडून द्या आणि प्रतिकार करू नका.
दुसरे म्हणजे मी आधी उल्लेख केलेले ध्यान करण्याचे पाच मार्ग. श्वासामुळे तुमची आवाजापासून सुटका होईल. योग्य आहाराचादेखील ध्यानावर परिणाम होईल. व्यायाम, अंगस्थिती आणि चांगल्या भावना,  योग्य समजूत, या सर्वांची ध्यान करताना मदत होईल.
प्रश्न : प्रिय गुरुजी, माझे ध्यान फारच सुंदर झाले, मी जागृत होतो पण शरीरात कोणतीही जाणीव नव्हती. केवळ "मी" होतो आणि माझ्या शरीराला झटका मिळाला आणि मी परतलो. काय झाले?
श्री श्री रविशंकर : छान झाले, तुम्हाला आंतरिक स्थितीची, तुम्ही जी चेतना आहात त्याची झलक मिळाली.हे सामान्य आहे आणि चांगले आहे. पण आता उद्या बसून असाच अनुभव यावा म्हणून प्रयत्न करू नका. 'काल अनुभवलेली स्थिती मला आजपण अनुभवायची आहे. कालची सुंदर संवेदना मला आजदेखील अनुभवायची आहे.' नाही,याची पुनरावृत्ती होत नाही. रोज एक नवीन खजिना तुमच्याकडे येईल. तर तो फक्त घ्या आणि पुर्वानुभावात अडकून राहू नका. या अनुभवांपेक्षा तुम्ही खूप मोठे आहात.
प्रश्न : ध्यान करताना, माझे मन शांत होते परंतु मी मनाच्या पलीकडे जाऊ शकलो नाही. मी अति प्रयत्न तर करीत नाही ना?
श्री श्री रविशंकर : होय,  तुम्ही मनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या स्वतःकरिता, असे काही करू नका, सोडून द्या. ठीक आहे.
जेव्हा तुम्ही मालीश घेता तेव्हा काय करता? तुम्ही स्वतःला मालीशवाल्याच्या हवाली करता. मालीशवाला त्याचे काम करतो आणि तुम्ही काहीच करत नाही. ध्यानात देखील तसेच आहे, तुम्ही काहीच करायचे नसते, निसर्गाला तुमची काळजी घेऊ द्या, आत्म्याला त्याचे काम करू द्या.
प्रश्न : थोडा वेळ ध्यान केल्यानंतर मला माझ्या प्रतिक्रियांचा साचा लक्षात येतो, उदाहरणार्थ बचावात्मक आणि संताप. मी माझ्या वेगळ्या प्रतीक्रीयेकारिता काय करू?
श्री श्री रविशंकर : आता तुमच्या प्रतिक्रियेचा जो साचा आहे त्याला झटकून टाका,सोडून द्या. माझा साचा असा आहे,व्मी नेहमी संतप्तच असतो असे जर तुम्ही ओळखू लागलात तर तुम्ही भूतकाळ किंवा कोणत्यातरी साच्यामध्ये अडकून पडल. म्हणून सोडून द्या. ते काल होते आणि माझ्या अवकाशामध्ये आले, तर काय झाले.
कधी आकाशात काळे ढग दिसतात,पण ते अवकाश त्यांना आपले मानून,घट्ट धरून बसत नाही. ते त्या ढगांना येऊन निघून जाण्याची परवानगी देते. त्याचप्रमाणे कधी सुखद तर कधी दुखद भावना येतात. तुम्ही त्यांना सोडून दिले पाहिजे. हि पहिली पायरी आहे. त्यांना येऊ दे आणि जाऊ दे.
 प्रश्न : मी असे ऐकले आहे की बरीच वर्षे ध्यान केल्याने ती व्यक्ती आयुष्यभर कायम ध्यानस्थ राहते. तुम्ही हे समजावू शकाल का?
श्री श्री रविशंकर : हो! तुम्ही कोणतेही काम करा परंतु ती आंतरिक शांतता सतत असते. तुम्ही चालत असाल, बोलत असाल, बडबडत असाल, बातम्या बघत असाल तरीदेखील तो धीरगंभीरपणा कायम असेल. तुम्हाला त्याची इतकी सवय होऊन जाते. तो कधीच तुम्हाला सोडून जात नाही.
'मला असा अनुभव कधी येणार' असे आता म्हणत राहू नका. तसे कधीही होऊ शकते. आपल्याला काय! असा दृष्टीकोन असला पाहिजे.'ठीक आहे.असू दे.' असे म्हणणे सर्वात योग्य राहील.
भारतात मध्यम युगात कबीर नावाचा संत होऊन गेला,त्याची फार सुंदर कविता आहे. तो म्हणतो की तो सतत देवाच्या शोधात इथे तिथे फिरत होता,देव कुठे आहे?देव कुठे आहे?.तो म्हणतो,'जेव्हा मी देवाच्या शोध घ्यायला गेलो तेव्हा मला देव मिळाला नाही,पण जेव्हा मी सगळे सोडून स्वस्थ झालो तर देव माझ्या पाठीशी आहे. देव माझ्या मागे 'कबीर,कबीर,कबीर!' हाका मारत धावतो आहे. जेव्हा त्याने देवाच्या मागे धावणे बंद केले तेव्हा देवच त्याच्या मागे धावायला लागला. हे खरे आहे! तुम्हाला किती खोलवर आराम करता यायला पाहिजे,किती आतपर्यंत स्वस्थ व्हायला पाहिजे केवळ हे माहित असायला पहिजे. कोणतेही यत्न नाही, कारण यत्न करून आपल्याला जे मिळते ते भौतिक आणि मर्यादित असते. जर तुम्हाला अध्यात्मिक पातळीवर काही हवे आहे ,काहीतरी उच्चतर मग यत्नांची भाषा इथे चालणार नाही. सगळे प्रयत्न सोडून द्या,कोणतेच प्रयत्न नाही केले तरच तुम्ही काहीतरी उच्चकोटीचे मिळवू शकाल. 
संपूर्ण अस्तित्वापैकी भौतिक पातळी केवळ १/१० आहे आणि उरलेली ९/१० हि अध्यात्मिक पातळी आहे.
असे बघा तुम्ही प्रयत्नांनी प्रेम जोपासू शकत नाही,तुम्हाला करुणा वाटायला प्रयास करावे लागत नाही, लागतात का? तुम्ही असे म्हणता का,'मी करुणा वाटायला किती कष्ट घेतले'? तुमचे कष्ट घेणेच अडथळा बनते. तर स्वस्थ व्हा आणि तुम्ही कनवाळू व्हाल. तुमचे आनंदित राहण्याकरिता कष्ट घेणे हीच अडचण बनते आनंदी होण्यास. तर प्रयत्न, कष्ट, मेहनत ही भौतिक जगाची भाषा आहे.
जर तुम्ही जर कष्ट घेतले नाही तर तुम्ही पैसा कमवू शकत नाही,अभ्यास केला नाही तर चांगले मार्क मिळत नाही. प्रयत्न केल्याशिवाय पदवी मिळत नाही. तर या भौतिक जगात सगळ्याकरिता प्रयास करावे लागतात. घर बांधायला मेहनत लागते. ते काही बसल्या बसल्या नुसते विचार करून होत नाही. परंतु अध्यात्मात काही मिळवण्याकरिता याच्या बरोबर विरुद्ध करावे लागते-ते म्हणजे अजिबात प्रयत्न नाही,प्रयास नाही! काही क्षण बसून कोणतेही प्रयत्न न करणे.
मला माहिती आहे तुम्ही मला सांगाल की काहीही न करणे फार अवघड आहे.शांत होणे कठीण आहे. पण असे केवळ दिसते. दोन दिवस इथे घालावा आणि तुम्ही बघाल हे किती साधे आणि सोपे आहे!
प्रश्न : अध्यात्मिक आणि मानसिक समजुती करिता चेतनेचा हा स्तर सोडून वेगवेगळ्या स्तरांवर कसे जावे? या भौतिक जगाच्या पलीकडे जाण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे?
श्री श्री रविशंकर : मी सांगितलेला पाचवा मार्ग ज्ञान हा आहे!
तुम्हाला सगळे इथे सोडून जाण्याची गरज नाही.इथे राहून,इथल्या कोलाहलाच्या मधोमध ते सौंदर्य ओळखा,ते किती सुंदर आहे,अद्भूत आहे,चित्तवेधक आहे,ते आता या क्षणी इथे आहे! पण ते आता आणि इथे असलेले उद्या.ठरलं!