21 April 2012

जर तुम्ही ध्यान केले असेल तर फुलासारखे हलके वाटायला पाहिजे.

ध्यानाची रहस्ये - दिवस
२१ एप्रिल २०१२

ध्यान हा एक प्रवास आहे गोंगाटापासून ते शांततेकडे, हलचालीकडून स्थब्धतेकडे, मर्यादित ओळखीपासून ते अनंत अवकाशाकडे.

काल मी असे म्हणालो होतो कि पाच पद्धतीतून ध्यान होऊ शकते , त्याची परत एक उजळणी करूयात.
पहिली पद्धत म्हणजे शारीरिक कसरत, योगा, ताई-ची हे यात येतात. शरीर ताणून आणि वाकवून, मनाला एक प्रकारची जागरूकता प्राप्त होते, त्याला तुम्ही ध्यान म्हणू शकता.

दुसऱ्या प्रकारात श्वास नियंत्रण आणि प्राणायाम याने मन शांत आणि स्थिर होते.

तिसरी पद्धत म्हणजे पंच इंद्रिये आणि जाणिवांच्या माध्यमातून, निर्विकार मन, विचार स्तब्धता, शांतता, आणि आंतरिक सुखाचा अनुभव घेऊ शकतो.

तुम्ही जर लहान बालकांचे निरीक्षण केले, तो एखादी गोळी किंवा कैंडी खात असेल तर तो पूर्णपणे त्यात समरस होऊन ती खाण्यात इतका गर्क झालेला असतो कि तुम्ही जर त्याला विचारलेत “ तुझें नाव काय?” तर तो त्याचे उत्तर देऊ शकत नाही कारण तो प्रश्न त्याच्या पर्यंत पोहोचताच नाही इतका तो त्यात गर्क झालेला असतो. तर पंचेन्द्रीयांच्या सेवनात गर्क झालेला माणूस ध्यानाचा अनुभव घेऊ शकतो.

एखाद्या सुटीच्या दिवशी, जमिनीवर पडून फक्त आकाशाकडे एक टक बघत राहिलात तर एक वेळ अशी येईल कि मन अगदी स्थिर होऊन तुम्ही निर्विचार होऊन जाऊन तुम्ही कोठे आहात याचे भान राहणार नाही पण तुमचे अस्तित्व जाणवत राहील. अशा अनुभवात तुम्हाला सर्वत्र केंद्र-बिंदू दिसेल पण त्याच्या कक्षांची जाणीव राहणार नाही. मर्यादारहित जाणीवेचा असा अनुभव हा मोकळ्या जागेकडे बघताना पण येऊ शकतो कारण मन पण पोकळी आहे, जाणीव पण पोकळी आहे.

जेंव्हा तुम्ही तल्लीन होऊन संगीत ऐकत असता तेंव्हा एक असा क्षण येतो कि तुम्ही पटकन त्यातून बाहेर येता. त्या क्षणाला तुम्हाला संगीत ऐकू येत नाही, पण तुम्हाला तुमची जाणीव असते आणि त्याच वेळी तुम्हाला कोणतीच मर्यादा पण नसते. योगाच्या भाषेतयाला “लय योग” म्हणतात, म्हणजे त्यात विरघळून जायचे. ते मग तुम्हाला ध्यानाकडे नेते.

एखादी आश्चर्य कारक गोष्ट पण तुम्हाला त्या स्थितीत घेऊन जाऊ शकते. जेंव्हा तुम्ही आश्चर्य-चकित होता, तेंव्हा मन जाणवत नाही, कोणतेच विचार पण नसतात, फक्त तुम्ही असता.
स्पर्श, वास, चव, दृष्टी आणि श्रुती हे सर्व तुम्हाला ध्यानाची अनुभूती देवू शकतात जर तुम्ही ते योग्य तऱ्हेने अनुभवलेत तर. तसा अनुभव घ्यायला काही कौशल्याची गरज असते.

भावनांच्या अनुभूतीमधून पण तुम्ही ध्यानाकडे जाऊ शकता, फक्त सकारात्मक नव्हे तर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीतून तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. एखाद्या झटक्यातून पण तुम्ही तो अनुभव घेऊ शकता, पण ते काहीसे धोकादायक आहे.

तुम्हाला असा पण अनुभव असेल कि जेंव्हा तुम्ही फारच निराश होऊन असे म्हणता “ बस झाले, मी आता हे सर्व सोडून देणार आहे.” जेंव्हा तुम्ही खूप रागावता तेंव्हा काय म्हणता “ बस! खूप झाले!” याचा अर्थ असा कि “ मी याच्या पेक्षा काही जास्त घेऊ शकत नाही”.

अशा क्षणाला, तुम्ही जर नैराश्य, उदासीनता किंवा हिंसाचार या कडे वळला नाही तर असे अनुभवाला येईल कि काही क्षण तुम्ही निर्विकार होऊ शकता. म्हणजेच जेंव्हा भीतीसारख्या नकारात्मक किंवा सकारात्मक भावना जागृत होतात तेंव्हा मन स्थिर होऊन काही काल निर्विकार होते. आणि मग ध्यानाची अनुभूती येऊ शकते.

त्या पुढचीपायरी म्हणजे बौद्धिक उत्तेजना, जी ज्ञान आणि जाणीवेतून तुम्हाला ध्यानाकडे नेऊ शकते. यालाच “ज्ञान योग” म्हणतात.

तुम्ही जर कधी अवकाश संग्रहालयाला भेट दिली असेल तर, जेंव्हा तिथून बाहेर येता तेंव्हा जाणीवेच्या एका वेगळ्याच स्तरावर असल्याचा अनुभव घेतला असेल.तो एक वेगळाच संदर्भ असतो, कारण तुम्ही स्वतःला या संपूर्ण विश्वाच्या संदर्भातून एका वेगळ्या दृष्टीने बघत असता. तुम्ही कोण आहात? तुम्ही काय आहात? तुम्ही कोठे आहात? या अगाध आणि अनंत अशा विश्वाच्या संदर्भात तुम्ही कसे आहात?
तुम्ही जर मात्र विज्ञान शिकला असाल, तर तुम्हाला सर्व गोष्टी या एक अणु, एक लाट, किंवा फक्त उर्जा असे दिसायला लागते. आणि मग जर तुम्ही वेदांत किंवा ध्यानाची कला किंवा योग शिकायला लागलात तर तुम्हाला त्यात कमालीचे साधर्म्य दिसून येईल. या सर्वांची भाषा एकच आहे याची जाणीव होईल.

आदी शंकराचार्य म्हणतात कि “तुम्ही जे बघताय ते अस्तित्वातच नाहीये.”

आजच्या काळातील एक थोर शास्त्रज्ञ डॉ. हान्स पीटर दर असे म्हणतात कि “ मी पदार्थ विज्ञान हे गेली ३५ वर्ष शिकल्यानंतर असे लक्षात आले कि ते अस्तित्वात नाही. जे काही अस्तित्वात नाही अशी गोष्ट मी शिकण्याचा प्रयत्न करीत होतो. म्हणजेच ज्ञानातून पण तुम्ही ध्यानाचा अनुभव घेऊ शकता.

मी काही तुम्हाला ध्यानाचे फायदे सांगत बसणार नाही, तुम्ही ते गुगल वरून शोधून काढा. अनेक लोकांनी त्यावर संशोधन करून ध्यानाचे फायदे शोधून काढले आहेत. कोणत्याही ध्यानाला काही फायदे असतात. पण आपल्याला तर ध्यानाच्या रहस्याबद्धल माहिती पाहिजे. आम्हाला जास्ती उत्कंठा आहे ती ध्यानाची रहस्ये काय आहेत त्याची?!
पण जेंव्हा आपण रहस्य बघत आहोत तेंव्हा पूर्वेकडील विचारसरणी आणि पश्चिमेकडील विचारसरणी यात फरक आहे. मला तो फरक खूप आश्चर्य चकित करतो कारण पश्चिमेकडील देशात कोणतीही लज्जास्पद गोष्ट हि गुप्त ठेवली जाते तर पूर्वेकडे कोणतीही पवित्र गोष्ट हि गुप्त ठेवली जाते.

जर तुम्ही म्हणाल कि कोणती तरी गोष्ट हि खूप गुप्त आहे तर ती निश्चितच खूप पवित्र असली पाहिजे, अशी पूर्वेकडे विचारसरणी आहे. पूर्वेकडे कोणतीही लज्जास्पद गोष्ट कधीही गुप्त न राहता ती कबुल केली जाते. त्यात लपवून ठेवण्यासारखे काही नसते. पण मग गुप्त असे काय ठेवायचे तर मंत्र हे गुप्त असतात, ते तसे गुप्त का असतात? असे म्हटले जाते कि मंत्र हे बियांसारखे असतात, ते नेहमी गुप्तपणे अंकुरतात. तुम्ही जेंव्हा बी पेरता तेंव्हा त्यांच्यावर जमिनीचे पांघरूण घालता, मगच ते अंकुर धरतात आणि मग त्यांचे मोठे वृक्ष होतात. अर्थात तुम्ही जे मोड आलेले कडधान्य खाता ते वेगळे.

अशी पौराणिक कल्पना आहे कि मंत्र एक असा ध्वनी आहे कि जो मनात गुप्त ठेवल्याने तो वाढतो आणि मग तो आतल्या आत गुंजन करू लागतो. तुम्ही जर एखादी गोष्ट जर गुप्त ठेवली तर ती तुमच्या अंतर-मनात ती खूप खोलवर राहते. एखादी गोष्ट कबुल करण्याचे हेच कारण आहे.

तुम्ही ती गोष्ट उघडपणे कबुल का करता? तर ती तुमच्या अंतर-मनात खोलवर जाऊ नये म्हणून. तुमच्या हातून घडलेली एखादी चूक किंवा गुन्हा एकदा का कबुल केला तर तो तुमच्या मनात न राहता बाहेर निघून गेल्यावर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. पण मंत्र जो कोणी खूप ध्यान मग्न व्यक्तीने दिला तर तो मनात खूप खोलवर जायला मदत करतो.

विद्यार्थ्याला मंत्र देताना असे सांगितले जाते कि” हा तुमचा वैयक्तिक मंत्र आहे तो फक्त तुमच्याजवळ ठेवा आणि मग तो वाढूद्यात.”

येथे त्या मंत्राचा आवाज महत्वाचा नसून त्याची कंपने महत्वाची आहेत. त्या मंत्राची कंपने हि त्याचा अर्थ समजून घेण्यापेक्षा जास्ती महत्वाची असतात.

त्या मंत्राचा आवाज हा सर्वांना माहित असलेला असू शकतो.

जुन्या काळी हा मंत्र द्यायचा कार्यक्रम चार दिवस चालायचा. मुलाला दीक्षा देताना ते सर्व नातेवाईक आणि मित्र-मंडळींना बोलावीत असत. मुलाची घोड्यावर बसवून मिरवणूक काढीत असत. अशी हि पूर्वीची पद्धत होती.

आध्यात्मिक प्रवास हा एक पवित्र , वैयक्तिक आणि अभिमानाचा असतो. तुम्हाला पवित्र दीक्षा मिळतीय आणि ती पवित्र आहे म्हणून अभिमानास्पद आहे.

ध्यान हे एक संक्रमण आहे. ध्यान हे आपोआप होत असते, तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही फक्त त्यासाठी पूरक असे वातावरण निर्मिती करू शकता.
कोठेतरी किशोर अवस्थेमध्ये मन चंचल व्हायला सुरवात होते. किशोर वयात शरीरातील काही संयुगे कार्यरत झाल्यानंतर तो पर्यंत स्थिर असणारे मन चंचल व्हायला लागते. लहान मुलांचे मन नेहमी स्थिर असते, आणि मग केंव्हा तरी संयुगामुळे त्यात बदल होऊन ते चंचल होते.

पूर्वीच्या काळी किशोरअवस्थेच्या आधीच ते योगा आणि ध्यानाचे शिक्षण देत असत.म्हणजे जेंव्हा मन चंचल व्हायला लागते, तो पर्यंत त्या किशोरला ते कसे हाताळायचे याचे शिक्षण मिळालेले असायचे. त्यासाठी ८ किंवा ९ वर्षे हे योग्य वय आहे. शारीरिक संयुगे कार्यरत व्हायच्या अगोदर मिळालेले हे योगाचे आणि ध्यानाचे शिक्षण फार महत्वाचे असल्यामुळे मग जेंव्हा शरीर तयार होते तेंव्हा मन पण तयार असते.

हा काळ खूप योग्य असला तरी, तुम्ही ध्यान केंव्हाही शिकू शकता.पण ८ किंवा ९ वर्षे हे सर्वात योग्य वय आहे.

आज पण ८ किंवा ९ वर्षाचे मुलांचे मन फार चंचल असते, त्यांच्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. अन्न, वातावरण, जीवन-पद्धती या सर्वांचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. पण हे सर्व परिणाम फार सामान्य आहेत. 

असे समजून घेऊ यात कि ध्यान हे उर्जेला उत्थान देऊन, बाहेर सर्वदूर पसरायला मदत करते. मनाला उत्थान देऊन बाहेर सर्वदूर पसरायला मदत करते.ध्वनी पण ध्यान करयला मदत करते. ध्वनी जसे तुम्हाला उन्नत करतो तसेच तो तुम्हाला कोमेजून पण टाकतो. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? मी तुम्हाला एक उदाहरण देतो.

जेंव्हा तुम्हाला वेदना होतात तेंव्हा कसा ध्वनी शरीरातून येतो ? तुम्ही म्हणता “हा”.

या संपूर्ण जगात अगदी मंगोलिया पासून ते तिय्रा डेल फुजो पर्यंत, तुम्ही कोठेही जा आणि कोणाला हि अगदी लहान मुलाला पण विचारा कि तुम्हाला वेदना झाल्यावर कोणता ध्वनी येतो? ते म्हणतील “हा”. जेंव्हा वेदना होतात तेंव्हा कोणीही ‘हो” म्हणणार नाही.

जेंव्हा आश्चर्य वाटते तेंव्हा “हो” असा ध्वनी येतो.

आता जेंव्हा तुम्ही “हा” म्हणता तेंव्हा प्राण कोठे असतो? तुम्हाला तो शरीराच्या खालील भागात जाणवेल.
आता जेंव्हा तुम्ही “हो” म्हणता तेंव्हा तुम्हाला प्राण शरीराच्या मधील भागात जाणवेल. जेंव्हा तुम्ही आश्चर्य चकित होता आणि म्हणता कि “ हो, मला तर हे माहीतच नव्हते.”

जेंव्हा फारच आश्चर्य वाटते तेंव्हा आपण म्हणतो “वाव!”, तेंव्हा प्राण हा जास्त वरती म्हणजे घशाच्या बह्गत किंवा अजूनही वरती असतो. तेंव्हा प्राण शक्ती पण अधिक असते.
आणि मग जेंव्हा तुम्ही हसायला लागता , तेंव्हा कसा आवाज येतो? “हे हे हे हे”. प्रत्येक खऱ्या हास्यात “हे हे” असा आवाज असतो.

जेंव्हा तुम्ही “हे” म्हणता तेंव्हा काय होते? एक खरा विस्तार होतो. असे पहा कि जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा तुम्ही त्या आनंदाबरोबर विस्ताराचा पण तुम्ही अनुभव घेता. आणि जेंव्हा तुम्ही दुखी असता तेंव्हा तुम्हाला कोमेजून गेल्याचा किंवा संकोचल्याचा अनुभव येतो. तुमच्यात असे काही आहे कि जे आनंदी असताना विस्तार पावते आणि दुखी असतात कोमेजून जाते. पण त्या विस्ताराकडे किंवा कोमेजण्याकडे आम्ही कधीच लक्ष देत नाही. आमचे लक्ष कायम बाहेरच असते.

आपण बाहेर कारण शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही खरे कारण नव्हे. आपण कर्णाकडे कधीच लक्ष दिले नाही. पपन आपल्या अंतरंगात असे काही आहे कि जे विस्तार पावते आणि कोमेजते.

पूर्वीच्या काळचे एक ऋषी गौद्पाद्चार्य असे म्हणाले आहेत कि “ तुमच्या अंतरंगात असे काही आहे कि जे विस्तार पावते आणि ते समजून घेणे खूप महत्वाचे आहे.”

या तुमच्या अंतर-चेतनेची , अंतर-उर्जेची छोटीशी झलक, तुमच्या चेहऱ्यावर असे हास्य देऊ शकते कि ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मग कोणीही तुमचा आनंद हिरावून घेऊ शकणार नाही. जेंव्हा हि जाणीव कि तुमच्या अंतरंगात अशी काही गोष्ट आहे कि जी सतत विस्तार पावत आहे, तेंव्हा तुमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळेल.

आणि हा विस्तार नेहमीच हास्य, आनंद आणि “हे’ ह्या ध्वनीशी निगडीत असतो.

जर कोणाच्या हास्यात “हा” असेल तर ते निश्चितच खल-नायकाचे हास्य असते.
“हा,हा,हा,हा,बघ मी तुला सांगितले होते. तू अपयशी झालास कारण तू माझे ऐकले नाहीस. बघ काय झाले ते!”
नुसते हास्य ऐकून ते कोणत्या प्रकारचे आहे हे तुम्ही सांगू शकता. ते कटू-हास्य आहे कि चीड आणणारे आहे कि हेकट हास्य आहे .

राग आल्यावर पण माणसे हसतात पण ते वेगळे हास्य असते. त्याचा आवाज वेगळा असतो. लहान बालकासारखे निरागस हास्यात “हे” असा आवाज असतो.

आज आपण दोन प्रकारच्या आवाजांवर ध्यान करणार आहोत. पूर्ण जोर आणि शक्ती लाऊन सहा वेळा आपण “हो” म्हणणार आहोत आणि सातवा शब्द “हे” म्हणणार आहोत. आपल्या शरीरात सात उर्जा निर्माण करणाऱ्या जागा आहेत कि ज्या अंत-स्ताव यंत्रणेशी निगडीत आहेत. आणि त्या अत्यंत पवित्र जागा आहेत.
हे काही मंत्र ध्यान समजू नका, तसे ते नाहीये. हे एक निर्देशित ध्यान आहे. निर्देशित ध्यानाने तुम्हाला ध्यानाची एक झलक बघायला मिळेल. तुम्हाला जेंव्हा स्वतःहून ध्यान करायचे असेल तर तुम्ही सहज समाधी हे मंत्र ध्यान करू शकता.

अर्थातच जेंव्हा तुम्ही सी.डी. लाऊन निर्देशित ध्यान अधून मधून करू शकता, रोज नव्हे. पण मंत्रध्यान तुम्ही रोज आणि कोठेही करू शकता. मंत्र घ्या, बसा आणि मग ध्यान करीत रहा.

मग तयार व्हा!

सहजपणे बसा, मणका ताठ आणि शरीर आरामात असू द्यात.

काही लोक शरीर ताठ ठेऊन ध्यानाला बसतात. आणि मग पूर्ण वेळ ते शरीराकडेच लक्ष देऊन असतात, मग त्यांना राग येतो कारण ताठ शरीराकडे लक्ष द्यायच्या नादात ते एवढे गुंतून जातात कि त्यांचे ध्यान होताच नाही. जेंव्हा तुमचे ध्यान पूर्ण होते तेंव्हा तुम्हाला फुलासारखे , आतून खुपच मुलायम, सुंदर, नाजूक, आणि सुखकारक वाटायला पाहिजे. पण जेंव्हा तुम्ही शरीरात ताठरपणा, मनात राग  आणि सर्व काही उलटे वाटायला लागेत तेंव्हा लक्षात घ्या कि ध्यान झाले नाहीये.

आता असा विचार करू नका कि” मला आतून खूप मुलायम आणि हलके वाटायला पाहिजे, कारण गुरुजींनी सांगितले ते व्हायलाच पाहिजे”. ते तसे होणार नाही कारण ते होण्याची प्रतीक्षा ते होऊ देणार नाही. म्हणून मी म्हटले होते कि हि एक नाजूक प्रक्रिया आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट घडण्याची अपेक्षा ना ठेवता, साक्षी भाव ठेऊन ध्यान करा!

अनुभव येतात, ते बदलतात  आणि जातात. हरएक दिवशी वेगवेगळे अनुभव येतील, काही हरकत नाही पण ध्यानाची पद्धत योग्य पाहिजे. पद्धत म्हणजे काय तर शरीरी फार ताठ पण नको आणि त्याच वेळी फार ढिले पण नको.

तुम्ही जर शरीर फार ढिले सोडून सुरवात केली तर त्याचा काही उपयोग नाही.तुम्ही जर शांतपणे लोळत, पाय वर करून असा विचार करीत असाल कि तुम्ही ध्यान करताय तर तुम्ही स्वतःला मुर्ख बनवताय. ते तसे कामाचे नाही. जसे दूरदर्शन बघताना हातात बटाटाचे काप खात बसता तसे बसून काही उपयाग नाही. मग तुम्ही म्हणाल गुरुजी म्हणाले होते कि खाणे पण ध्यान होऊ शकते, तर ते तसे नाहीये!

तुमचा मणका ताठ पाहिजे पण शरीर सहजपणे आरामात असूद्यात, आणि खांदे आरामात ठेऊन सुरवात करा. फार ताठ नाही पण खांदे आरामात ठेऊन मान आणि डोके सरळ पाहिजे. मग डोळे मिटून सुरवात करा.

ध्यान करताना डोके जर खाली गेले तरी काही हरकत नाही. डोके खाली किंवा बाजूला गेले तरी हरकत नाही पण स्थितीत सुरवात करू नका.
उत्तम उदाहरण म्हणजे जसा कोट हंगरवर टांगला जातो तसे. त्याप्रमाणे शरीर टांगलेले असावे पण मणका ताठ असावा.

<मग गुरुजी जमलेल्या समुदायाला ध्यान मार्गदर्शन करतात>

प्रश्न: हे १० मिनिटांचे ध्यान मला ८ ते १० तासांच्या झोपेपेक्षा जास्त उर्जा देऊन गेले , असे कसे?
श्री श्री रविशंकर: हे असेच असते.
ध्यान एक वेगळी उर्जा देते, अन्न तुम्हाला एक वेगळी उर्जा देते, झोप पण वेगळीच उर्जा देते, व्यायामाची उर्जा वेगळी असते, ज्ञानाची उर्जा वेगळी असते पण ध्यानाची उर्जा या सर्वात उत्तम असते.

प्रश्न: जेंव्हा आपण ध्यान करतो तेंव्हा त्या प्रत्येक ध्यानात अथांगता आणि शांतीचे काही क्षण अनुभवू शकतो का?
श्री श्री रविशंकर: असे काही सांगता येत नाही. हा अनुभव केंव्हाही, कोठेही येऊ शकतो किंवा कदाचित येणार पण नाही.
काहीवेळा तुम्ही चुकीचे अन्न खाल्ले असेल तर किंवा तुम्ही फारच त्रस्त असाल तर अनुभूती येणार नाही. पण काही हरकत नाही, ध्यानात बसणे हे महत्वाचे आहे. अगदीच काही जमले नाही तर वीस मिनिटे किंवा अर्धा तास फक्त बसा तेंव्हा तुमच्या असे लक्षात येईल कि न बसण्यापेक्षा हे खुपच चांगले आहे.
जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा तुम्ही सहजपणे ध्यानासाठी बसू शकता. पण जेंव्हा तुम्ही त्रस्त असता तेंव्हा तुम्हाला शांत होण्यासाठी ध्यान आवश्यक असताना सुद्धा तुम्ही ते करू शकत नाही. आणि तेंव्हा ते न करण्यासाठी तुमचा प्रतिकार चालू असतो.

प्रश्न: काहीवेळा ध्यान झाल्यानंतर मला काम सुरु करण्यासाठी खूप प्रयास घ्यावे लागतात. काहीवेळा तर मी त्रस्त होऊन प्रतिक्रिया दिल्यानंतर मला त्याचा पश्चाताप होतो. मला ध्यानानंतर कसे सहजतेने कार्यरत व्हावे याचे मार्गदर्शन करा.
श्री श्री रविशंकर: योगासने, प्राणायाम, व्यायाम आणि गाणी , जप या सर्वांचा फायदा होऊन तुम्ही सहजपणे आंतरिक शांतता आणि बाह्य व्यवहार यांचा समन्वय होऊ शकतो.

प्रश्न: मी असे ऐकले आहे कि अनेक वर्षे ध्यान केल्याने त्याचा शरीरावर त्याचप्रमाणे संयुगांच्या रचनेवर पण योग्य परिणाम होतो.
श्री श्री रविशंकर: अर्थातच, मनाचा शरीरावर परिणाम होत असतोच. परत गुगल वापरून शोधून काढा. ध्यानाचा शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो यावर  अनेक शास्त्रीय संशोधने झाली आहेत.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही असे म्हणालात कि प्रार्थना हा देवाशी संवाद असतो आणि ध्यान हे देवाचे ऐकणे असते. मी ध्यानामध्ये माझ्या प्रश्नांची आणि प्रार्थनांची उत्तरे ऐकण्यासाठी काय करावे?
श्री श्री रविशंकर: आराम करा! तुम्ही अशा काही इच्छा, आकांक्षा मनात ठेऊन ध्यान करू शकणार नाही. जेंव्हा तुम्ही त्या सर्व सोडून द्याल तेंव्हाच ध्यान करू शकाल. सर्व इच्छा आणि प्रार्थना सोडून द्या.