27
2012............................... Germany
April
आपल्या मनापासून कधीही कोणाबरोबर वैरभाव ठेवू नका
जर्मनीमधील सत्संग
२७ एप्रिल २०१२
तुम्ही नाचा, गायन करा आणि
ज्ञानामध्ये वस्ती करा. ज्ञानाचा अर्थ म्हणजे केवळ माहिती, पुस्तकांमधून
मिळणारे पुस्तकी ज्ञान नव्हे, ते ज्ञान नाही.
ज्ञान म्हणजे जे सत्य आहे त्याचा जसाच्या तसा अनुभव
घेणे. जेव्हा ज्ञान आपल्या चेतनेच्या आत खोलवर स्थापित होते तेव्हा त्याला सद्बुद्धी
म्हणतात. सद्बुद्धी म्हणजे आपल्या आत खोल व्यवस्थित प्रस्थापित झालेले ज्ञान होय. याने
तुम्ही विवेकी होता, ज्ञानी होता.
प्रत्येकाकडे विवेक असतो. कोणाकडे कमी असतो तर
काहीजणांकडे जास्त. जीवनात तुम्हाला कामी विवेकाकडून जास्त विवेककडे नेणे हा काळाचा
प्रश्न आहे.
शब्द निरर्थक वाटतात, तरीदेखील आपण कितीतरी वेळा
ते वापरतो कारण आपल्याला तशी गरज पडते. आपण दवाखान्यात जातो आणि विचारतो "कसे
आहात?" तुम्हाला माहिती आहे की ती व्यक्ती बरी नाही, तरी देखील आपण विचारतो, "कसे आहात?" आणि ती व्यक्तीदेखील ,"ठीक आहे" असे उत्तर देते. त्याव्यक्तीला माहिती आहे की ती ठीक नाही तरी
ती म्हणते "ठीक आहे". त्याचप्रमाणे मला दिसते आहे कि तुम्ही सगळे आनंदात
आहे आणि तरीसुद्धा मी विचारतो,"कसे आहात तुम्ही?".
मला दिसते आहे तुमच्या चेहऱ्यांवरून आनंद ओसंडून वाहत आहे. हे वेगळ्या
पातळीवर संवाद सुरु करण्याचे निमित्त आहे.
ज्ञानी व्यक्ती प्रथम हृदयाने, माणुसकीने आणि शेवटी बाह्य पातळीवर संवाद साधतो. जे अज्ञानी असतात ते बाह्य
संवादावर अवलंबून असतात. आई आणि मुलामध्ये, मूल जे बोलते त्याला
महत्व नसते कारण बाळाने अजून भाषा शिकलेली नाही. परंतु ती आई त्या बाळाबरोबर खोल पातळीवर
संवाद साधते. तुम्ही भाषा शिकायच्यादेखील आधी आपल्या आईबरोबर संवाद करू लागता आणि तुमची
आई तुमच्याबरोबर संवाद करते. हा गहन पातळीवरचा संवाद असतो.
त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्या कुत्र्या किंवा
मांजरीबरोबर संवाद करता तेव्हा तुम्ही एका सूक्ष्म गहन पातळीवरून करत असता. ती भाषा
नाही. नंतर तुम्ही त्याच्या डोक्यात भाषा टाकण्याचा बराच प्रयत्न करता. त्यांना भाषेची
गरज नाही. तुम्ही आवाज करा आणि ते तुमच्याकडे येतील.तुम्हाला 'ये, ये, ये' असे म्हणण्याची जरुर नाही. केवळ आवाज करा आणि ते तुमच्याकडे येतील. तुम्हाला
समजण्याकरिता त्यांना भाषा लागत नाही.
अशा प्रकारे झाडे, वारा, ही संपूर्ण रचना तुमच्याशी जोडलेली आहे; सगळे प्राणी तुमच्याबरोबर संवाद करीत आहेत. काही संवाद सूक्ष्म पातळीवर, तर काही खोल गहन पातळीवर.
'वाचाराम्भानार्ह विकारो नामधेय' अशी संस्कृतमध्ये जुनी म्हण आहे. याचा अर्थ असा कि शब्दांमुळे सत्याचा विपर्यास
होतो. संवाद तर आधीपासून होतोच आहे. शब्दांद्वारे तुम्ही त्याची थोडीफार मोडतोड करीत
आहात.
माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही कि शब्द अजिबात
वापरू नका, त्यांची गरज आहे. परंतु शब्दांच्या खाली जी भावना असणे गरजेचे आहे ती असली
पाहिजे. तूम्ही कोणाला, 'माझे तुझ्यावर
प्रेम आहे!' असे सांगू शकता पण त्या शब्दात ती भावना असायला पाहिजे.
केवळ 'अरे,माझे तुझ्यावर प्रेम आहे,' असे वरपांगी म्हणू नका.
तर जो ज्ञानी आहे तो सूक्ष्म पातळीवर संवाद साधतो,आणि शब्दांचा उपयोग केवळ त्याला पूरक म्हणून करतो. पण जे अज्ञानी आहेत तो बाह्य
संवादावर अवलंबून राहतात. यामुळेच जीवनात गैरसमज निर्माण होतात.
गैरसमज का होतात?
कारण अंतरंग जोडलेले नसते म्हणून. तुम्ही काहीतरी बोलता आणि समोरचे त्याचा
भलताच अर्थ लावतात.
तुम्ही तुमच्या जीवनाचे सिंहावलोकन करून पहा. तुम्ही
पारख करीत होता, परीक्षण करीत होता. अमक्या आणि तमक्या'
व्यक्तीबद्दल वाईट विचार करीत होतात, आणि पराकोटीचा
राग होता. थोड्या अवधीनंतर, थोड्या महिन्यांनंतर किंवा एखाद वर्षानंतर, 'अरे मी एवढी काळजी का केली! हे सगळे निरर्थक होते.
मी स्वतःचा नाहक त्रागा केला', असे स्वतःलाच हसत म्हणता.
एकदा एक महिला माझ्याकडे आली आणि म्हणाली, 'माझे नाते खुपच बिघडले आहे, माझा
प्रियकर माझ्यावर इतका रागावला आहे कि तो मला सोडून चालला आहे आणि मी फारच दुखीः आहे.'
ती रडतच चालली होती. तिच महिला दोन महिन्यानंतर आली आणि म्हणाली, 'ते नाते संपले ते खुपच चांगले झाले. मी आंधळी झाले
होते. त्या माणसाने मला अडकवले होते. आता ते नाते संपुष्टात आले आणि मी खूप आनंदी आहे.'
तर,बऱ्याच वेळा
आपल्याला काय हवे आणि आपण काय मागत आहोत ते आपल्याला माहित नसते. म्हणूनच अगदी सतत
नाही तरी वेळोवेळी मागे वळून पहा आणि मन कुठे जाते आहे आणि त्याची ओढ कोणीकडे आहे याचे
निरीक्षण करा.
वेळोवेळी जर तुम्ही अवलोकन करून मनाचे निरीक्षण
केले तर तुम्हाला खूप समाधान आणि मुक्तता वाटेल. एक समाधान असेल की आपण आपल्या भूतकाळापासून
काही शिकलो आणि दुसरे म्हणजे जे काही घडले ते काही तरी कारणामुळे घडले. त्यामुळे तुम्ही
अनुभवाने श्रीमंत झालात, ज्ञानी झालात आणि तुम्हाला एक
गहनता मिळाली.
तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते?
जर झालेल्या घटना आपण मागे वळून बघितल्या नाहीत, तर मग आपले त्याच त्याच चुका करणे चालू राहते आणि आपण काहीच शिकत नाही.
जैन धर्मामध्ये 'प्रतीक्रमण' परंपरा आहे. त्याचा अर्थ आहे
मागे जाणे, मागची कर्मे पुसून टाकणे आणि त्यापासून
शिकून पुढे जाणे.
जैन साधू रोज तासनतास बसून आत्मनिरीक्षण करतात.
खरे पाहता त्यांना ते करण्याची काहीच गरज नाही कारण ते जास्त काही करत नाही.
हे अशा लोकांनी करणे जरुरी आहे जे कामाच्या व्यापात, जगाच्या धावपळीत अडकलेले आहेत. त्यांनी रोज निदान दहा मिनिटे बसून सिंहावलोकन
करावे -मी काय केले? मी माझ्या आयुष्यात
काय शिकलो? आजचा दिवस कसा होता? जे झाले
त्या पासून मी काय शिकलो?
तुम्ही जे शिकलात त्याला परतून घट्ट कवटाळून बसू
नका. काही वेळेस तुम्हाला वाटते तुम्ही जे शिकलात ते बरोबर नसू शकते. म्हणूनच रिकामे
आणि पोकळ असणे फार महत्वाचे आहे. ते सर्व पूर्व संकल्पना तोडून मुक्त करते.
प्रश्न : प्रिय गुरुजी, रक्तदान करणे चांगले असते काय?
श्री श्री रविशंकर : होय, रक्तदान करणे चांगले आहे. तुमची झीज २४ तासात भरून निघते. तुमचे शरीर हे रक्त
बनवण्याचे यंत्र आहे. रक्तदान केल्याने अनेक जीव वाचतील.
प्रश्न : प्रिय गुरुजी,कृपया तालपत्र नाडी वाचन याबद्दल काही बोलाल का?
श्री श्री रविशंकर : प्राचीन
भारतात, ऋषींच्या शाळा आणि विश्वविद्यालये असायची
जिथे ते परमानासी होण्याचे प्रशिक्षण द्यायचे. परमानासी म्हणजे जो भविष्य बघू शकतो.
तर लोक बारा ते तेरा वर्षे राहायचे आणि ध्यान करायचे, 'आत खोल जायचे आणि मग गुरु त्यांना विशिष्ट कार्य द्यायचे.
ते म्हणायचे, 'सन २०१५च्या या विशिष्ट दिवशी, या निश्चित वेळेला कोणी जन्म घेईल. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आकडेमोड करून भविष्यवाणी
करा की त्यांचे आयुष्य कसे असेल.'
याने दोन गोष्टी होतात-ज्योतिषशास्त्रानुसार आकडेमोड
आणि अवकाश आणि काळ यात अंतर्दृष्टी. ते हि युक्ती वापरायचे.
परंतु हे सगळे विद्यार्थ्यांनी लिहिलेले होते म्हणून
ते शंभर टक्के बरोबर असणार नाही. विद्यार्थ्यांकडून चुका होतात. ते सत्तर ते ऐंशी टक्के
बरोबर असतील. त्यातले काही तर भविष्यात अजिबात सत्य होणार नाही, असे होऊ शकते.
दुसरे म्हणजे ते केवळ शक्यता वर्तवतात म्हणजे असे
होऊ शकते असे वर्तवतात. जर तुम्ही मध्यस्थ आहात आणि अध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर
चालत असाल तर तुम्ही तुमचे भाग्य बदलत राहता कारण तुम्ही तुमच्या जीवनात जास्तीत जास्त
सकारात्मकता आणत असता.
या महिन्याच्या(एप्रिल२०१२ च्या) तीन तारखेला काय
झाले ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. चीनहून एक साधू आला होता. तो त्रिकालदर्शी होता.
त्याच्याकडे दररोज दोन ते तीन हजार लोक जातात.
त्याने आपल्या संयोजकांना संपर्क केला तेंव्हा
मी इंडोनेशियाला होतो आणि तो म्हणाला कि त्याला यायचे आहे आणि गुरुजींचे आशीर्वाद घ्यायचे
आहेत. तो म्हणाला, 'ज्ञानोदय होण्याकरिता
धर्म हि आडकाठी होऊ शकत नाही. मी बौद्ध आहे पण त्याने काही फरक पडत नाही.मला माहिती
आहे कि गुरुजी या जगात अवतीर्ण झालेले आहेत आणि पुष्कळ लोकांचे भले होणार आहे. मला
त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. ते फार फार काळानंतर, हजारो वर्षानंतर
आलेले आहेत. त्यांच्या अशीर्वादांची मला खूप गरज आहे.'
तो फार चांगला माणूस आहे, एक भली आत्मा आहे. तो आला, थोडावेळ मुकपणे बसला, आशीर्वाद घेतले आणि पुढच्या विमानाने परत निघून गेला.
भक्तांपैकी एक फार चिकित्सक होता, तो म्हणाला,'तुम्ही आर्ट ऑफ लिविंगचे आणि गुरुजींचे
काय होणार याचे भविष्य सांगा'.
तो म्हणाला, 'नाही, मी ते सांगू शकत नाही. जे मुक्त आहेत त्याबाबत मी काही भविष्य वर्तवू
शकत नाही. जर मन अडकलेले असेल तरच मी वर्तवू शकतो. ज्याला मन नाही त्याबद्दल मी भविष्य
वर्तवू शकत नाही.'
मी पण विचार केला होता कि बघू या काय घडणार आहे
ते.
तो म्हणाला, 'जिथे मन नाही तिथे केवळ अवकाश असते, मी भाकीत करू शकत
नाही. गुरुजी केवळ अवकाश आहेत, त्यांचे भाकीत मी नाही करू शकत.'
जर तुम्ही जप ,ध्यान आणि
प्राणायाम केले तर तुमचे इच्छास्वातंत्र्य वाढेल आणि तुमचे स्वातंत्र्य वाढेल.
ते म्हणतात, 'तुम्हाला या अडचणी येतील,काळजी घ्या.'
जसे डॉक्टर सांगतात, 'तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, तुम्ही
काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यायाम करायला पाहिजे.'
तसेच तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही जपायला
पाहिजे.
तुमच्या वैद्यकीय समस्यांनुसार त्यांचे भाकीत असते,आणि ते काही उपाय सुचवितात-जर असे केले तर तुम्हाला काहीच त्रास उरणार नाही.
ज्योतिषीदेखील त्याचप्रमाणे सांगतात, 'तुमचा गुरूग्रह तुमच्या आठव्या घरात दाखल होणार आहे
आणि त्याने तुमचे मन दोलायमान होणार आहे. सगळ्यांवरची श्रद्धा उडेल. तुमच्यात आत्मविश्वास
उरणार नाही, कोणावर आणि कोणत्याही कामावर श्रद्धा राहणार नाही
आणि तुम्ही काळजीत पडाल. हे सगळे एक वर्ष चालेल, पण येत्या चार
पाच महिन्यात याची तीव्रता जास्त असेल. तर ध्यान, प्राणायाम, प्रार्थना नियमितपणे करा आणि यातून तुमची सुटका होईल. अशा वेळेस कोणताही निर्णय
करू नका.'
तर हे होते एक छोटेसे भाकीत मनाच्या प्रवृत्तींबद्दल
आणि ते कसे चालते याबाबत !!
प्रश्न : माझा प्रश्न आहे, मला कसे
कळणार कि या ग्रहावर मी काय आहे? मी कोणता व्यवसाय
करावा? माझा काही वेळेस गोंधळ उडतो. माझ्यात बरेच कलागुण आहेत
पण मला माझ्या क्षमतेबाबत असुरक्षित वाटते. आता मला वाटते आहे, 'प्रश्नकर्ता कोण आहे?' पुन्हा
मला कळत नाही. मला न कळण्याचा कंटाळा आला आहे.
श्री श्री रविशंकर : आता
जर मी उत्तर दिले तर 'कोण ऐकते आहे?' असे तुम्ही बुचकळ्यात पडाल. स्वतःचे अति आत्मपरीक्षण करू नये. याचेपण वेड लागते.
"कोण विचारते आहे? कोण साक्षीदार आहे? जर मी साक्षीदार आहे तर मी कोण आहे? बोलणारे कोण
?'असा सतत विचार करू नये.
आत्मपरीक्षण चांगले आहे. आत्मपरीक्षण करणे जरुरी
आहे पण जर अतिरेक केला तर त्याने अकारण गोंधळ आणि चलबिचल निर्माण होते. हे तेव्हाच
करावे जेव्हा तुम्ही शिबीर करीत असाल किंवा तुम्ही काही वेळ काढला असेल. तेव्हा तुम्ही
विचारू शकता, 'मी कोण आहे?
हे विश्व काय आहे?'
दिवसाचे चोवीस तास तुम्ही आत्मनिरीक्षण करू शकत
नाही. नाहीतर मग तुम्ही काही काम करण्या अगर या जगात जगण्या लायक उरणार नाही.
हे स्नान करण्यासारखे आहे. दिवसाचे चोवीस तास तर
तुम्ही अंघोळ करीत राहू शकत नाही. मग तुम्हाला तर पाण्यातला मासा व्हायला लागेल! जर
तुम्ही प्रत्येक पायरीवर चौकशी आणि परीक्षण करीत राहिलात तर तुम्ही पाण्यातील माश्यासारखे
बनाल.
तुमचे काम करा. काय काम करीत आहात ते महत्वाचे
नाही. तुम्ही कोणतेतरी काम करा कारण तुम्हाला स्वतःचा चरितार्थ चालवायचा आहे. चरितार्थ
चालवण्यास तुम्ही कोणतेही काम करा, असे काम करा ज्याने
काही मिळकत मिळेल.
चरितार्थाचे काम आणि तुमचे मनोरंजन व छंद हे सेवेच्या
कामपेक्षा वेगळे आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही सगळे मिळून एकच करतो म्हणालात तर ते
फार मोठे आव्हान होईल. जर तुम्ही तुमच्या चरितार्थाच्या कामाला छंद कराल, बरेच लोक अशी
चूक करतात आणि आपणहून स्वतःची हकालपट्टी ओढवून घेतात!
जर तुम्हाला तुमच्या करमणूकीला काम बनवायचे असेल, तर मग तुम्ही पुरेसा पैसा कमावू शकत नाही आणि तुम्हाला कायम कमतरता भासत राहील.
तुम्हाला पैसा कमी पडेल. तुमच्याकडे निर्णयक्षमता आणि तारतम्य असणे आवश्यक आहे.
जेव्हा तुमच्या अंगावर जबाबदारी असते, कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, मुलांची काळजी, काम निवडायचे आहे, असे काम जे स्थिर आहे आणि जे तुम्हाला
पुरेसा पैसा आणि वेळ देतो. एकदा का हे झाले मग पुन्हा विचार करू नका. परंतु तुम्हाला
यापेक्षा जास्त चांगले काही मिळाले तर मग ते घ्या, काही समस्या
नाही.
मग,थोडा वेळ काढा
आणि समाजसेवा करा. जर तुम्ही तुमचे सगळे आयुष्य केवळ दोन वेळचे जेवण मिळवण्यात व्यतीत
करीत असाल तर असे जीवन निरर्थक आणि शुल्लक आहे.
तुम्ही काय कराल?
कमव, कमव कमावणार आणि ऑडी नाही तर बेन्झ गाडी विकात
घ्याल. मग तुम्ही घर बांधाल आणि सोनेनाणे विकत घ्याल आणि झाले! याने तुम्हाला समाधान
मिळणार नाही. थोडा वेळ काढा आणि समाजसेवा करा. इथे या आणि आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे
सदस्य बना.
एकट्याने तुम्ही जास्त काही करू शकणार नाही. तुमच्यासारखे
दहा वा पंधरा जण एक गट बनवून एक प्रकल्प हाती घेऊ शकता. अशी मुले आहेत ज्यांना तुमच्या
मदतीची आवश्यकता आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर घरात एक बरणी ठेवा आणि तुम्हाला जसे
जमेल तसे त्यात थोडे थोडे पैसे टाकत चला. याचा उपयोग एखाद्या सामाजिक कारणाला मदत करण्याकरिता
करता येईल.
जर्मनीतील आणि युरोपच्या दुसऱ्या देशांमधील कितीतरी
लोक शाळांना मदत पुरवीत आहेत. आम्ही भारतात आता १८५ शाळा चालवीत आहोत. जवळ जवळ २५,००० बालकांना चांगले अन्न, चांगले शिक्षण, आणि वैद्यकीय मदत मिळते आहे कारण लोक रोज एक युरो दान करीत आहेत.
याप्रमाणे तुम्ही काहीतरी सामाजिक कार्यात भाग
घ्या. त्याने तुम्हाला समाधान मिळते, 'मी या कारणाला पाठींबा देतो आहे. मी या प्रकल्पाचा भाग आहे.'
जर तुम्ही एक प्रकल्प राबवू शकत असाल तर छानच आहे.
जर नाही तर निदान त्याचा भाग तरी व्हा. तुम्ही इमारतीतील एक वीट होऊ शकता. एका विटेचा
वाटा घ्या. त्याने तुम्हाला समाधान मिळेल.
मग तुम्ही वेळ काढा जसा तुम्ही आता काढला आहे(शिबिरार्थीकडे
इशारा करीत), ध्यान करण्यासाठी आणि नवचैतन्यासाठी. जेव्हा तुम्ही परताल तेव्हा तुम्हाला
एकदम टवटवीत वाटेल. तुमच्यापैकी कितीजणांना परत गेल्यावर टवटवी वाटते? हा तुमचा अनुभव आहे.
वर्षातून दोनदा मानसिक कायाकल्प आणि चेतनेचा कायाकल्प
होणे चांगले आहे. हे फार महत्वाचे आहे.
हे करा आणि थोड्या कालावधीत, चाळीस, पन्नास किंवा साठ वर्षाने निवृत्त व्हा आणि ज्ञानामध्ये
स्वतःला संपूर्णपणे झोकून द्या. उच्च ज्ञान, उच्च सुजाणता किंवा
सामाजिक कारणाकरिता स्वतःला समर्पित करा. समाजात काही चांगले कार्य करा. आणि जीवन निघून
जाईल! एक दिवशी तुम्ही निघून जाल(चुटकी वाजवत),तुम्हाला कळणार
देखील नाही! बाकीचे तुमचे शव नेण्याची तयारी करतील. झाले! संपले!
एक दिवस, ते सद्भावना
सभा ठेवतील(हात जोडून)म्हणतील, 'त्यांच्या
आत्म्याला शांती मिळो.' तोपर्यंत तुम्हाला शांतता आधीच मिळालेली
असेल! त्यांची सदिच्छा बऱ्याच उशिराने येईल.
एकदा शरीर सोडले कि आपण शांतच असतो, मग काही मजा नाही. जिवंतपणी शांतता मिळवायला हवी आणि आजूबाजूच्या लोकांच्या
उपयोगी पडले पाहिजे. काय म्हणता? बरोबर ना? हेच ज्ञान आहे. ज्ञानामुळे आताच्या आता आनंद मिळतो.
मी असे नाही म्हणत,'तुम्ही काही तरी दहा दिवस, दहा वर्षे करा आणि मग एक दिवस
तुम्ही आनंदी होणार.' हे असे आहे का? नाही.
आपल्याकडे दोन शास्त्रे आहेत-So
Hum(सोहम) आणि So
What(मग काय). सगळे बदलते.
या जगात सगळे सतत बदलत असते. दोस्त दुश्मन बनतात
आणि दुश्मन दोस्त होतात. हेच जगात चालत असते. नाही का?
'मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही'
म्हणणारे लोक नंतर 'मी तुझ्याबरोबर राही शकत नाही'
म्हणतात.
हे नेहमीच घडते. एकदा नाही तर दोनदा, तीनदा, चारदा होते.
एकदा एक महिला प्रेम कसे यशस्वी करावे यावर एक
परिसंवाद घेत होती. ती सात वेळा विभक्त झालेली होती! मी म्हणालो, 'ती महिला एकदम लायक होती कारण काय अडचणी येतात याचे
तिला सातवेळा ज्ञान मिळाले होते आणि आता ती ते सगळ्यांना देऊ करत होती!'
बघा, जेव्हा जगात
तुम्ही मित्राच्या शोधात जाता तेव्हा तुम्हाला एक चांगला मित्र मिळत नाही. पण जेव्हा
तुम्ही तुमच्या 'स्व'च्या आत शोध घेता, तुमच्या आतील त्या श्रेष्ठ 'स्व'बरोबर मैत्री करता, तुमच्या आतील चैतन्यासोबत तेव्हा
तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यातून मित्रत्व नैसर्गिकपणे बाहेर येते.
जेव्हा तुम्ही मैत्रीपूर्ण असता तेव्हा संपूर्ण
जग तुमचे मित्र बनते. सगळे तुमच्या दिशेने वळतात. तुमचे सर्वात कट्टर शत्रू तुमच्या
समोर तुमचे मित्र होतात आणि तुमच्यापासून दूर गेल्यावर त्यांना पुन्हा शत्रुत्वाची
भावना वाटू लागेल.
तुमच्या मनापासून तुम्ही कोणाबरोबर वैरभावनेला
चालना देऊ नका. माझे तर हेच धोरण आहे. माझ्या बाजूने, मला कोणी शत्रू नाही.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी एक संस्कृत श्लोक
शिकलो. तो असा होता,'अजातशत्रू आजारास्वर्वर्ती'
त्याचा अर्थ,'मी कधीच वृद्ध होणार नाही
कारण मी माझ्या आत विसावा घेतो. मी जवळ जवळ दहा ते बारा वर्षाचा होतो. दहा हजार श्लोकांपैकी
हाच माझ्या लक्षात राहिला. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत विसावता तेव्हा तुमचे वय वाढत
नाही. वय होणे म्हणजे थकणे, निरुत्साही, काही चांगले नाही वा सगळे निराशाजनक आहे असे वाटणे;
मनात नकारात्मक संवाद ,'अरे मला हे सगळे माहिती आहे. मी हे सगळे
बघितले आहे'-असा दृष्टीकोन असणे. ताजेतवाने किंवा जिवंतपणा न
वाटणे.
'अजरा'चा
अर्थ जुना किंवा गलितगात्र न होणे. तुम्हाला माहिती आहे उत्साही आणि क्रियाशील म्हातारी
माणसे आहेत.
मी तैवानला होतो आणि आमचा जवळजवळ ८००० जणांचा मोठा
सत्संग होता. लोक एवढे आनंदी होते. त्यानंतर जेव्हा मी माझ्या ठिकाणावर परत आलो तर
८० वर्षाचे सद्गृहस्थ आले. ते अतिशय उत्साही होते. ते म्हणाले, 'हे किती महान आहे! मला काही कार्य करायचे आहे. मला
या ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. मेनलॅन्ड चीनमध्ये कितीतरी करोडो लोक कर्करोग आणि दुसऱ्या
आजारांनी ग्रस्त आहेत. गुरुजी, मला तुम्हाला मेनलॅन्ड चीनमध्ये घेऊन जायचे आहे. मी आयोजन करेन आणि मी हे करेनच'.
तो ८० वर्षांच्या वर आहे आणि कुठेही प्रवास करण्याची
त्याची तयारी आहे. तो क्षीण दिसतो पण हिमत किती आहे! तो सोबत त्याच्या मित्राला घेऊन
आला होता. तो देखील त्याच्याच वयाचा होता. ते दोघे म्हणाले, 'आम्ही सैनिक आहोत!' ते मला पहिल्यांदाच
भेटत होते.
त्याचप्रमाणे जपानमध्ये ७८ वर्षाचा ज्येष्ठ गृहस्थ
होता जो उत्साहाने सळसळत होता. त्याने माझ्याकरिता चर्चा सत्राचे आयोजन केले आणि बऱ्याच
लोकांना बोलावले. त्याने असे नाही म्हटले, 'अरे,मी तर म्हातारा आहे, मी काही
करू शकत नाही.' नाही, असे काही नाही पण
उलट त्याला इतका उत्साह संचारला.
त्याने जाहीर केले, 'संपूर्ण जपानला या ज्ञानाची गरज आहे.' तो चांगला कर्तृत्ववान सद्गृहस्थ आहे.
जपानमध्ये दर वर्षी तीस हजार लोक आत्महत्या करतात.
हे मोठ्या प्रमाणावर आहे. आज कशाची गरज आहे तर आनंदाच्या लहरीची. जपानचे स्थूल एतद्देशीय
उत्पादन सर्वात जास्त आहे. विमानतळावरून घरी जाण्याकरीता पन्नास डॉलरचा जकात कर भरावा
लागतो. याची तुम्ही कल्पना करू शकता? तुम्ही दोन फेऱ्या
मारा आणि तुमचे दोनशे डॉलर्स खर्च होतात. अंतर एवढे जास्त आहे. तेथील राहणीमान फार
महागडे आहे. अमेरिकनांना जपानमध्ये राहणे फार महाग वाटते. लोक पैसा कमावत आहेत परंतु
तिथे आनंद नाहीये.
हे केवळ जपानमध्ये नाहीये. आनंदाचा अभाव हे लक्षण
आज खूप देशांमध्ये दिसून येते. ते हास्य करीत नाहीत, ते हसत नाहीत
आणि त्यांना मनःशांती नाहीये. आपण आनंदाची लहर निर्माण करण्याची गरज आहे आणि ते केवळ
ज्ञानाद्वारे, जीवनाविषयीचा दृष्टीकोन मोठा केल्याने शक्य आहे.
हीच तर आहे जीवन जगण्याची कला(दी आर्ट ऑफ लिविंग). दी आर्ट ऑफ लिविंग हे (जीवन जगण्याची
कला ही) काही अत्याग्रही मत नाही. ते संकल्पनांचा संच किंवा काही रिवाज नाही. जीवन
जगण्याची कला(दी आर्ट ऑफ लिविंग) म्हणजे जीवनाविषयीचा दृष्टीकोन विशाल करणे आणि जीवनला
उत्सव बनवणे हे होय. दी आर्ट ऑफ लिविंगचा हाच मुख्य हेतू आहे.
'देवाची खरी भक्ती म्हणजे माणसांच्या
हृदयात आनंद निर्माण करणे' असा एक संस्कृत श्लोक आहे.
येनकेनप्रकारेण यस्य कस्यापि देहिनः|संतोषम जनायेत प्राज्ञा तादेवेश्वरापुजानाम-माणसांच्या
हृदयातील आनंद हीच देवाची खरी पूजा आहे. केवढे मोठे ज्ञान, किती चांगल्या शब्दात भूतकाळात सांगितले गेले आहे. म्हणूनच ते कालातीत ज्ञान
आहे.
ते कोणी लिहिले तेदेखील माहिती नाही. लिहीणार्याने
खाली स्वतःची स्वाक्षरीदेखील केली नाही, पण त्याने
जीवांची अनमोल रत्ने देऊ केली. ते दी आर्ट ऑफ लिविंग आहे; जुन्या
परंपरेचा बहुमान करणे, भविष्याकरिता आधुनिक विज्ञानाकडे बघणे, आणि दोन्ही बरोबर घेऊन पुढे जाणे.
विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात कधीही कलह नाही.
ते नेहमी एकत्र जातात .धर्म आणि विज्ञान यांच्यातील संघर्ष हा बऱ्याच काळापासून आहे, पण अध्यात्म आणि अनुभवावर आधारित असलेला भाग नाही.म्हणूनच मी म्हणतो कि आपण
वैज्ञानिक मनाने आणि प्राचीन हृदयाने बघावे, एक नवीन मन आणि प्रेमळ
हृदय.
आपल्याला याची गरज आहे. तुम्हाला नाही वाटत?
मी म्हणतो, हे जग केवढे
रोचक आहे! तर या जगात राहा, मजा करा पण यात अडकू अगर बुडून जाऊ
नका. स्वतःला थोडेसे अलिप्त ठेवा. बाह्य घटनापासून स्वतःला थोडे निर्लेप ठेवा. स्वतःच्या
आत्म्याला वाचवा,स्वतःच्या मनाला वाचवा,स्वतःच्या चेतनेला वाचवा आणि स्वतःच्या उल्हासाला जपा. जगाच्या घटनांमध्ये
याचा घोळ होऊ देऊ नका. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतो आहे ते?
कोणा व्यक्तीमुळे अगर कोणत्या प्रसंगामुळे तुमचे
स्वातंत्र्य, तुमचा उल्हास आणि तुमची मनःशांती हरवून
बसू नका. हे आहे दी आर्ट ऑफ लिविंग.
हे भले मोठे काम आहे. हे एक आव्हान आहे. हे सोपे
नाही. मी असे नाही म्हणत की हे सोपे आहे. हे फुलांचा बिछाना अगर लोणी आहे असे नाही!
मी तुम्हाला सांगतो जीवन म्हणजे फुलासारखे कोमल किंवा लोण्यासारखे मउ नाही. इतकी आव्हाने
आहेत परंतु ज्ञान आणि बुद्धिमता आपल्याला आव्हाने पेलाण्याकरिता सज्ज करते.
अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्हाला वाटू लागते कि
जीवनात आव्हाने अजिबात असता कामा नये. तेव्हा मग आव्हाने खूप मोठी भासू लागतात. जीवनात
आव्हाने असतातच परंतु त्यांच्याबरोबर दोन हात करण्यास ज्ञान आपल्याला सज्ज करते.