10 April 2012


धक्का शोषून घेण्यासाठी सुजाणपणा सर्वात उत्तम आहे
तैवान, दिनांक १० एप्रिल, २०१२

आपण या पृथ्वीवर येतो, ते एका लहान बाळाच्या रूपात. आपण सर्वाबरोबर हसणे, आनंद घेणे आणि आपलेपणा वाटणे हे अनुभवले.हो की नाही ? पण जसजसे आपण मोठे होत गेलो तसतसे ते हसू कुठेतरी हरवले, ती मित्रत्वाची भावना ते सर्वांसाठी वाटणारे प्रेम आपण कुठेतरी हरवून बसलो.
काय झाले नेमके ? हेच आपल्याला शोधून काढायचे आहे. आपण पुन्हा एकदा आतून लहान मुलासारखे होऊ शकतो कां ?
जीवन कसे असावे हे सांगताना आम्ही बहुतेक नारळाचे उदाहरण देतो. नारळाच्या भोवती तुसे असतात आणि त्यामुळे नारळ जेव्हा खाली पडतो तेव्हा तो फुटत नाही. त्यात धक्का शोषून घेणारी उशी असते. म्हणून जर आपले वागणे मैत्रीपूर्ण , सुजाण असेल आणि आपण तणावमुक्त असे जीवन जगात असू तर ते धक्का शोषकाचे काम करते. सुजाणपणा सर्वात चांगला धक्का शोषक आहे.
आपले शरीर नारळाच्या करवंटी सारखे असावे, टणक ... आणि मन आतल्या खोबऱ्या सारखे, पांढरे आणि मऊ. आणि आपल्या भावना त्यातल्या पाण्या सारखे गोड. ह्याच्या उलटे असेल तर गडबड होते. जर शरीर नरम आणि अशक्त असेल आणि मन क्व्चासारखे कठीण असेल तर मन भावनाशुन्य असेल . सगळ्या भावना शुष्क झाल्या तर जगणे एक ओझे बनून जाते. आणि यामुळेच बरेच लोक आत्महत्या करतात किंवा नैराश्यात बुडून जातात. हो की नाही ?
म्हणूनच आपल्याला स्वत:मध्ये, आपल्या समाजामध्ये आणि आपल्या कुटुंबात जिथे आपण मूल्ये महत्वाची मानतो तिथे हा बदल घडवून आणायला हवा.
आज दुपारी मी पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा ते मला सांगत होते की तैवानमध्ये पारंपारिक मूल्ये विसरली जात आहेत. मी त्यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या मूळ गोष्टींना धरून ठेवायला हवे. तैवानला मानवी मुल्यांचा एक मोठा इतिहास आहे. आणि ही मूल्ये जोपासायला हवी आणि जपायला हवी. विशेषत: कौटुंबिक मूल्ये खूप महत्वाची आहेत.व्यक्तिगत सचोटी खूपच महत्वाची आहे. तुम्हाला असे वाटत नाही कां ?
या सांस्कृतिक मूल्यांना बळकटी आणणे गरजेचे आहे त्याचबरोबर जोमदार प्रगती, जी तैवान करतच आहे. तैवान खुपच जोमदार आहे. आणि मी हेही सांगतो की तैवानमध्ये सर्वात उत्साही कार्यकर्ते आहेत. आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये तैवानचा एक गट असतो जो अगदी पूर्णपणे जोमात आणि उत्साहात असतो. आणि तैवानचे लोक जगात कुठेही गेले तरी नेहमी भेटवस्तू घेऊन जातात. हा देण्यातला आनंद खूप मोलाचा आहे आणि तो या संस्कृतीत मुळापासूनच आहे. प्रत्येक संस्कृतीतली अतिशय चांगली असलेली मूल्ये टिकवायला हवी. आणि जेव्हा आपण पूर्णपणे तणावमुक्त असतो आणि आपले मन शांत असते, तेव्हाच आपण हे सगळे करू शकतो. 
जेव्हा गौतम बुद्ध भारतात होते तेव्हा त्यांनी चाळीस वर्षे प्रवास केला. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की आपण तत्वज्ञान एका बाजूला ठेऊया आणि एक गोष्ट समजून घेऊया, की दु:ख आहे आणि दु:खमुक्त होण्याचा मार्ग आहे. दु:खापासून मुक्ती मिळवणे आणि आतूनच मुक्त होणे शक्य आहे.
हा संदेश जागतिक आहे आणि आज आपल्याला यांच संदेशाची गरज आहे. तणाव आणि हिंसा यापासून मुक्त असा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी ध्यान हाच मार्ग आहे.
बरेच वेळा आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मन सगळीकडे भरकटते. आणि त्यासाठीच सुदर्शन क्रिया, जी एक श्वसनाची प्रक्रिया आहे आणि योग हे दोन्ही मन शांत करायला आणि प्रसन्न वाटायला मदत करते.
जेव्हा तुमचे मन प्रसन्न आणि शांत असते आणि तुम्हाला स्वत:साठी काही नको असते तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांना आशीर्वाद देण्याचे, हे अप्रतिम सामर्थ्य मिळते. जेव्हा तुमचे मन पोकळ आणि रिक्त असते आणि कुणाला काही हवे असते आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद देता आणि ते तसेच घडेल.
आम्ही एक आशीर्वाद देण्याचे शिबीर सुरु केले आहे. तुम्ही हे ४-५ दिवसांचे शिबीर पूर्ण केले की तुम्ही लोकांना आशीर्वाद देऊ शकता.
मी जगातल्या एका जेष्ठ शास्त्रज्ञाशी बोललो. ते काय म्हणाले माहित आहे ? ते म्हणाले, “ मी पदार्थाचा तीस वर्षे अभ्यास केला आणि शेवटी मला काय कळले तर हेच की पदार्थ अस्तित्वातच नाहिये.”
ते क्वांटम पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ आहेत.आणि ते म्हणतात आजकाल ते जेव्हा व्याख्यान देतात तेव्हा लोक त्यांना विचारतात की ते बौद्ध धर्माबद्दल किंवा तसेच काहीतरी शिकवताहेत की काय ?” ते म्हणाले, “ आजकाल जेव्हा मी व्याख्यान देतो तेव्हा लोकांना वाटते की मी बौद्ध धर्माबद्दल किंवा वेदांताबद्दल बोलतोय.” वेदांत आणि बौद्ध धर्म दोन्हीमध्ये तेच सांगितले आहे. दोन्हीमध्ये त्या आतल्या चेतनेबद्दल बोलले जाते. फक्त जरा वेगळ्या निराळ्या पद्धतीने. बौद्ध धर्मातली रिक्तता म्हणजे वेदांताटली परिपूर्णता. येवढेच काय ते. 
म्हणजे पदार्थ आणि सगळेकाही केवळ तरंग आहेत आणि हे तरंग बदलत रहातात. आणि त्याने आपले सगळे जीवन बदलून जाऊ शकते. बदलू शकते किंवा आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्याला हवे ते मिळू शकते. म्हणजे जेव्हा तुमचे मन संपूर्ण समाधानाच्या स्थितीमध्ये असेल तेव्हा दुसऱ्यांनाही समाधान देऊ शकता.
म्हणून आज मला हे हवे आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या काळज्या आणि समस्या इथेच सोडून द्याव्या. मी तुमच्या काळज्या गोळा करून घ्यायला आलो आहे. मला फक्त हेच हवे आहे की तुम्ही आनंदी असावे.   
दररोज दहा मिनिटे ध्यान करा आणि पोकळ आणि रिक्त व्हा. स्वत:ची उन्नती प्रत्येकासाठी खूप महत्वाची आहे.  
बघा, आपण कोणीही असलो, कुठेही असलो तरी समाजासाठी थोडीतरी सेवा करता आली पाहिजे. आपले जीवन सर्वांसाठी द्या. आणि जर कधी तुम्ही अडचणीत किंवा त्रासात असलात तर तुम्ही एकटे आहात असे समजू नका. तुम्ही एकटे नाही आहात. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगातून हसत हसत बाहेर पडाल. होय ! आपल्याला आपले चित्त, मन आणि शरीर सामर्थ्यवान बनवायला हवे. आणि आपल्या भोवतालच्या लोकांबरोबरचे संबंध जास्त सलोख्याचे आणि मजबूत करायला हवे. हेच ‘ आर्ट ऑफ लिव्हिंग’ (जीवन जगण्याची कला) आहे. हिंसामुक्त समाज, रोगमुक्त समाज, संभ्रमरहित मन, अवरोधमुक्त बुद्धी, आघात मुक्त स्मृती आणि दिलगिरी मुक्त आत्मा. मला वाटतं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
तर मग आज तुम्ही तुमचे सगळे त्रास मला देऊन टाका आणि हसत हसत परत जा.
तैवान हा एक लहानसा आणि भक्कम अर्थव्यवस्था असलेला देश आहे. इथे असलेल्या आपण सर्वानी जर थोडे प्रयत्न केले तर तैवान आनंदी असण्याठी एक भक्कम देश बनेल.
गुन्हेगारी नसलेला, हिंसा नसलेला, दु:ख नसलेला, आत्महत्या नसलेला अशा तैवानची आपण कल्पना करू शकतो. मला असा तैवान बघायचा आहे. तैवान बद्दलचे माझे हे स्वप्न आहे. पुढील दोन वर्षात जर आपण असे काहीतरी मिळवू शकलो, तर तैवानमध्ये आदर्श परिस्थिती असेल आणि इतर देशांसाठी तो एक आदर्श होऊ शकेल. तुम्हाला माहित आहे कां ? भूतान हा जगातला सर्वात आनंदी देश आहे. तो एक बौद्ध देश आहे आणि तिथले लोक अगदी साधे आहेत. सर्वांचा अहिंसा आणि आनंदी रहाणे यावर विश्वास आहे. आनंदी असण्यात भूतानचा पहिला नंबर आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रात एक अधिवेशन झाले. भूतानच्या पंतप्रधानांनी मला आमंत्रण दिले होते. पण मी इथे येण्याचे कबूल केले होते, दक्षिण पूर्व आशिया, सिंगापूर, बाली आणि मग तैवान ... मी म्हटले मी माझा प्रवास तर मी रद्द करू शकत नाही पण मी तोच संदेश या सर्व देशात पोहचवणार आहे.  
 त्यामुळे मी आज विचार करतोय की आपले एक स्वप्न असायला हवे, आपण सर्वानी मिळून एकत्र विचार करुया की पुढच्या दोन वर्षात आपण सर्व लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो आणि त्याना कसे शिकवू शकतो की तणावापासून मुक्ती कशी मिळवायची आणि आनंदी कसे व्हायचे ? शाळांमध्ये, घरी, कॉलेजमध्ये आपण फक्त उत्सव करायचा.
जीवनाकडे एका व्याप्त दृष्टीकोनातून बघा. आपण ८० वर्षाचे आयुष्य जगणार आहोत तर मग तणावात, दु:खात जगायचे हे श्रेयस्कर आहे कां? या छोट्याशा आयुष्यात आपण आपला वेळ आनंदी रहाण्यात आणि दुसऱ्यांना आंनदी करण्यात घालवले पाहिजे.तुम्हाला असं वाटत नाही कां ? आज आपण सगळे हेच स्वप्न बाळगूया.  
दोन गोष्टी असतात. एक मोठे स्वप्न देशासाठी किंवा जगासाठी. दुसरे म्हणजे तुमच्या स्वत:च्या गरजा किंवा इच्छा. दोन्हीची प्राप्ती होऊ शकते. तुम्ही मोठ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा.आणि छोटी स्वप्ने माझ्यावर सोडून द्या. ठीक आहे ?
तर मग आज आपण एकत्र ध्यान केले आहे तर मग आपण एक वर मागून  घेऊ शकतो. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्या एका इच्छेचा विचार करा. इच्छेचा विचार करा आणि सोडून द्या आणि छान झोपा.
आता रोज वेळात वेळ काढून आणि ध्यान करा.आणि सेवा करण्यासाठी बांधील रहा.एका महिन्यात कमीत कमी चार तास सेवा.
तणावमुक्त आणि हिंसा मुक्त तैवान निर्माण करण्याचे आपले एक मोठे स्वप्न आहे. म्हणून आपण १५ ते २० लोकांचा गट करून लोकांना आनंदी होण्यास प्रोत्साहन देऊ शकतो. आपण तैवानमध्ये आनंदाची लहर निर्माण करुया
प्रश्न : आज मी माझी काळजी टोपलीत टाकून दिली तर उद्या मी उठल्यावर ती नाहीशी झालेली असेल कां ?
श्री श्री रविशंकर : आता तुम्ही तुमची काळजी टोपलीत टाकून दिली आहे आता ती तुमच्या मनात ठेऊ नका. किती काळ लागेल हे मी सांगू शकत नाही. कदाचित आज, उद्या, दहा दिवस किंवा बारा महिने पण नक्कीच काळजी संपेल.

प्रश्न : मी तुमच्यासारखा कसा होऊ शकतो ?
श्री श्री रविशंकर : जेव्हा तुम्ही लहान मूल होतात तेव्हा माझ्या सारखे होतात. मी एक लहान मूल आहे ज्याला मोठ व्हायचंच नाहिये. तुमच्यात अजूनही एक लहान मूल आहे. त्याला ओळखा . पोकळ आणि रिक्त व्हा.





The Art of living
© The Art of Living Foundation