श्री श्री रविशंकर यांचा गुरुपौर्णिमा संदेश

22
2013
Jul
माँन्ट रियल, कँनडा

ओम नमःप्रणवअर्थाय शुद्ध ज्ञान एकअमूर्तये निर्मल प्रशान्ताय श्री दक्षिणामूर्तये नमः|| (

(जे सदैव शुद्ध आणि शांत असून, जे प्रत्यक्ष सात्विक ज्ञानाचा अवतार असून, जे सर्वार्थाने सर्वोच्च असा ओम सूचक अर्थ असलेल्या दक्षिणमूर्तीला माझा नमस्कार असो.)

कोणे एकेकाळी एक गुरु समुदायामध्ये बसले होते आणि अनेक लोक तेथे येऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते. ते बराच वेळ शांत बसले होते पण जेंव्हा कोणी त्यांच्याकडे येऊन काही विचारात असे तेंव्हा ते म्हणत, ' अरे, तुम्ही खूप नशीबवान आहात!'

असे असताना एक विद्यार्थी गुरुदेवांकडे आला आणि म्हणाला ' मी माझ्या परीक्षेत नापास झालो आहे.' गुरुदेव म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!'

दुसरा मनुष्य म्हणाला, ' गुरुदेव, मी माझी नोकरी गमावली आहे.' त्यावर गुरु म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!

तिसरा मनुष्य म्हणाला, ' माझे कोणतेच मित्र माझ्याशी बोलत नाहीत, ते सर्व माझे शत्रू झाले आहेत' त्यावर गुरु म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!

अजून एक सद्गृहस्थ म्हणाले, 'माझी बायको मला सोडून गेली आहे' त्यावर गुरु म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!

अशातर्हेने कोणी काहीही प्रश्न घेऊन आला तरी त्यावर गुरुदेव म्हणत होते, ' तू खूप नशीबवान आहेस! आणि आश्चर्य म्हणजे अचानकपणे त्यांच्याबाबतीत काहीतरी घडून ते एकदम आनंदी होऊन तेथून निघून जात होते.

मग एक सद्गृहस्थ आले आणि म्हणाले, ' गुरुदेव, मी खूप नशीबवान आहे, कारण माझ्या आयुष्यात तुम्ही आहात. त्याबद्धल मी खूप ऋणी आहे.' असे म्हणताच गुरुदेव क्रोधीत झाले आणि त्यांनी त्याला एक थप्पड दिली!

तेथे बसलेले एक गृहस्थ हा सर्व प्रकार पाहून चक्रावून गेले! ते म्हणाले, ' मी जे बघितले त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. जो मी ऋणी आहे असे म्हणतो त्याला एक थप्पड मिळते आणि जे त्यांच्याकडे रडत येत आहेत त्यांना ते सांगत आहेत कि ते नशीबवान आहेत!'. त्यांना तर काही समजत नव्हते. साधारणपणे जे काही चालले आहे त्याबद्धल ते गुरूला विचारू शकत नव्हते म्हणून त्यांनी मग तेथे बसलेल्या इतर भक्तांना विचारले, ' हा काय प्रकार चालला आहे हे मला कृपा करून सांगाल काय. कारण तुम्ही येथे बराच वेळ बसला आहात. या गुरूंना काय म्हणायचे आहे हे मला समजत नाहीये. ते पूर्णपणे तर्क विसंगत आहे.

नेहमीप्रमाणे प्रत्येक भक्ताचे आपले असे एक वेगळे स्पष्टीकरण होते. म्हणून मग त्यातले एक ज्येष्ठ भक्त म्हणाले. ' होय, ते म्हणाले ते योग्यच आहे.'

बंगलोर आश्रमात एका वयस्कर गृहस्थाने सांगितलेला प्रसंग मला आठवत आहे.ते मला म्हणाले होते कि त्यावेळी म्हणजे १९४२ मध्ये बंगलोरमध्ये फक्त एक सर्जन होते आणि हे सर्जन त्यांच्या वैद्यकीय परीक्षेत सातवेळा नापास झाले होते.

त्यावेळेला जेंव्हा कोणावर अंतर्पुच्छचे शल्यकर्म केले जायचे तेंव्हा एक ठराविक नस जर कापली गेली तर रोगी मारून जायचे. आपण कोणती नस कापायचो हे त्यांना काळात नव्हते. त्यावेळी या गृहस्थांनी ( सात वेळा नापास झालेल्या) ती नस कोणती हे शोधून काढले त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आणि लोक त्यांचा आदर करू लागले. काही दिवसांनी त्यांना एक आंतर राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. पण ते वैद्यकीय परीक्षेत सात वेळा नापास झाले होते!

याचा अर्थ असा कि जर कोणी परीक्षेत नापास झाले तर ते अधिक अभ्यास करीत असत. 

जेंव्हा तुम्ही एकदा अभ्यास करून परीक्षेला बसलात आणि योगायोगाने पास झालात तर तुम्ही शिकलेले सर्व विसरून जाता.पण जेंव्हा तुम्ही नापास होता तेंव्हा परत अभ्यासकरून तुम्ही त्यात निष्णात होता. तुम्ही जर गणितात नापास झालात तर घोकंपट्टी करून ते सर्व तोंडपाठ करता.

याचा अर्थ असा कि जेंव्हा कोणी नापास झाले तर ते चांगले का तर ते अजून अभ्यास करून चांगले डॉक्टर किंवा चांगले इंजिनियर (हसतात) होतात. याचा अर्थ असा कि तोच अभ्यास करायला त्यांना अधिक श्रम करायला लागतात.

म्हणून एक ज्येष्ठ भक्त म्हणाले,' त्या विद्यार्थ्याला तो खूप नशीबवान आहेस असे म्हणाले कारण तो आता जास्त अभ्यास करीत आहे.' जे सद्गृहस्थ म्हणाले कि 'माझी नोकरी गमावली आहे' , ते ज्येष्ठ भक्त पुढे सांगू लागले ' होय, गुरुदेव योग्य तेच म्हणाले. जेंव्हा तुम्ही नोकरी करीत असता तेंव्हा तुम्ही स्वतः विषयी विचार करीत नाही. आता जेंव्हा तुम्ही नोकरी गमावली आहे तेंव्हा तुम्ही शांतपणे विचार करून तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे आहे याचा विचार करू शकता. तुम्हाला आयुष्याविषयी विचार करायला सवड मिळेल! जे नोकरी करीत असतात ते वेळ मिळत नाही म्हणून नेहमी तक्रार करीत असतात. आता तुमच्याकडे वेळ आहे !!

आयुष्यात वेळ मिळणे यालापण मोठे नशीब लागते. स्वतः वर विचार करायला, देवत्वाविषयी विचार करायला, सत्याचा शोध घ्यायला वेळ मिळणे हे निश्चितच मोठे नशीब आहे.

जे सद्गृहस्थ म्हणाले कि त्यांची बायको त्यांना सोडून गेली, त्यांच्या बाबतीत गुरुदेव योग्य तेच म्हणाले! आज पर्यंत ते अत्यंत असंवेदनशीलपणे आयुष्य कंठीत होते.आपल्या बायकोला कश्याची गरज आहे हे बघण्याची त्यांनागरज वाटली नाही.

कोणी तुमच्यापासून दूर गेल्यावर त्यांची खरी किंमत समजते. मग तुम्ही तुमच्या चुकांकडे गंभीरपणे बघायला लागता.काही गोष्टी तुम्ही अधिक चांगल्यापद्धतीने हाताळू शकला असता याची तुम्हाला जाणीव होते.

म्हणून ते सद्गृहस्थ आता स्त्री विषयक प्रश्नाकडे जास्ती संवेदनशील झाल्यामुळे नशीबवान ठरले होते.

तुम्ही जर एका स्त्रीच्या उन्नतीकडे लक्ष द्यायला लागलात, तिच्या भावनांकडे लक्ष द्यायला लागलात, तिच्या मानसिक आणि शारीरिक गरजांकडे लक्ष द्यायला लागलात तर ती तुम्हाला का सोडून जाईल? तुम्ही निश्तितच काहीतरी अयोग्य केले असले पाहिजे.तुम्ही स्त्री विषयी संवेदनशील असायला पाहिजे याची तिने तुम्हाला जाणीव करून दिली. त्यांना हे समजले आणि मग ते आनंदी झाले.

आणि या प्रमाणे, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर , जेंव्हा तुम्ही काही गमावता तेंव्हा तुम्ही दुखी होता पण हेच प्रत्येक दुखः तुम्हाला जागृत करीत असते.

मानवी चेतनेचे तीन स्तर असतात.

पहिला म्हणजे आळस. आपण हिंदीत ज्याला "घोर जडता" म्हणतो म्हणजे असंवेदनशील.निष्क्रियतेच्या या स्थितीत तुम्हाला कश्याची जाणीव नसते.या स्थितीत जेंव्हा तुम्हाला आयुष्यातील दुःखाची जाणीव व्हायला लागते, तेंव्हा ती विवेक आणि वैराग्य जागृत व्हायला लागतात. जेंव्हा तुमच्या आयुष्यात वैराग्य जागृत होते तेंव्हा तुम्ही नशीबवान असता!

जेंव्हा तुमचे सर्व मित्र तुम्हाला सोडून गेले असतील तर त्यांनी तुम्हाला तुमच्याविषयी,तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, आणि सत्य काय आहे यावर चिंतन करायला वेळ दिला आहे होय कि नाही? म्हणून तुम्ही खूप नशीबवान आहात.

सर्व आयुष्य कष्टदाई आहे याची जाणीव होणे हि पहिली पायरी होय. आयुष्य कष्टदाई आहे. आयुष्य दुखीः आहे. म्हणून लोक धार्मिक होतात . हि झाली एक पायरी.

पुढची पायरी म्हणजे आयुष्य आनंदमय आहे याची जाणीव होणे! प्रथम तुम्हाला अशी जाणीव होते कि हे सर्व कष्टदाई आहे.नंतर या सर्व दुखःप्रद गोष्टींपासून पुढची पायरी म्हणजे, ' दुखः कोठे आहे? चला, जागे व्हा'! अशा स्थितीत गुरूचा आयुष्यात प्रवेश होतो. गुरूची उपस्थिती किंवा जेंव्हा गुरु-तत्वाचा उदय होतो सर्व दुखः निवारण होते आणि आयुष्यात आनंदाचा प्रवेश होतो. पूर्ण आनंद ! आयुष्य म्हणजे आनंद! आयुष्य हि एक लीला आहे! असे प्रत्ययास यायला लागते.

आता, शेवटचा माणूस जो म्हणाला होता कि, ' मी खूप नशीबवान आहे 'त्याला थप्पड का मिळाली?

ज्येष्ठ भक्त म्हणाले,' गुरुदेवांनी त्याला थप्पड दिली कारण तो आत्म केंद्रित झाला होता, ' मी " नशीबवान आहे. थप्पड मिळताच त्याच्या जाणीव झाली कि ' तुम्ही अस्तित्वात नाही असे समजून जगा'. सहसा लोक अस्तित्वात असतात पण आयुष्य जगत नाहीत. आयुष्याशिवाय जगणे म्हणजे अज्ञान होय. आपण अस्तित्वात नाही असे समजून जगणे म्हणजे आत्म-प्रबोधन होय. ती एक थप्पड मिळताच तो जागा झाला.

त्या शेवटच्या गृहस्थाला ती थप्पड मिळताच तो संदेश समजून तो आनंदी झाला!

उपकृत होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उपकृत होण्यासाठी दोघांची गरज असते आणि गुरु म्हणाले, ' अरे, जागा हो , तू आणि मी काय दोन आहोत काय ? आपण तर एकच आहोत. येथे मी नाही आणि तू नाही. येथे तर एकच दैवत्व अस्तित्वात आहे आणि हे सर्व एक नाटक, एक लीला आहे. त्याचा आनंद उपभोग! तुम्हाला जेंव्हा याची जाणीव होते तेंव्हा आयुष्यातून दुखः नाहीसे होते. प्रत्येक आव्हान हि एक संधी असते, आणि प्रत्येक संधी हि दैवात्वाकडे जायची एक पायरी असते. हाच या गोष्टीचा सारांश आहे. 

अजून एक गोष्ट.

आपल्या हाताची सर्व बोटे वेगळी असतात. कोणतीही दोन बोटे एकसारखी नसतात.

असेच एकदा सर्व बोटांमध्ये असा वाद उत्पन्न झाला कि सर्वात महान कोण आहे.

अंगठा म्हणाला, ' असे पहा कि मीच महान आहे.मी सर्वात जड असून जेंव्हा कोणी विजयी होतो तेंव्हा मला उंचावून विजयाची निशाणी म्हणून दाखवितात. त्यांना जर एखाद्या गोष्टीसाठी परवानगी द्यायची असेल तरी मला उंचावून दाखविले जाते.ते असे करतात कारण मी महान आहे. मी सर्वात सशक्त आहे.माझ्यात खरी शक्ती आहे! अगदी अशिक्षित असला तरी तो माझा उपयोग सही सारखा करतो.' अशा तर्हेने अंगठा म्हनला कि तोच महान आहे.

तर्जनी म्हणाली,' अरे, जेंव्हा लोकांना दिशा दाखवायची असते , तेंव्हा ते माझा उपयोग करतात. ज्यांच्या कडे शहाणपण आहे ते मार्गदर्शन करतात. मीच आयुष्याला दिशा दाखवितो आणि म्हणून मीच महान आहे.

नंतर मधले बोट म्हणाले,'मला वाटते कि तुम्ही सर्वजण आंधळे आहात! कोणाचाही हात पकडा आणि बघा कि कोण सर्वात उंच आहे.मीच सर्वात उंच आहे! तुम्ही विनाकारण वाद का घालीत आहात. असा वाद घालणे म्हणजे भर दुपारी सूर्य आहे कि नाही असा वाद घालण्यासारखे आहे.

त्यावर अनामिका म्हणाली,' मला तुमच्या सर्वांचे हसू येत आहे.लोक त्यांचे अलंकार कोठे घालतात? अंगठ्याला कोणी अलंकार घालीत नाहीत. अंगठी नेहमी अनामिकेतच शोभून दिसते.मीच सर्वात महान आहे. जगातील लोकांना हे ओळखिले आहे कि मीच सर्वात महान आहे.

हे ऐकून करंगळी हसत सुटली! बाकीच्या बोटांनी तिला विचारले कि, ' तू का हसत आहेस?' 

त्यावर ती म्हणाली,' जेंव्हा कोणी मोठी व्यक्ती येते तेंव्हा सर्वात पुढे कोण असते?( जेंव्हा नमस्कारासाठी किंवा प्रार्थनेसाठी हात जोडले जातात तेंव्हा करंगळी सर्वात पुढे असते.) जेंव्हा कोणी देवळात प्रार्थनेसाठी जाते, तेंव्हा सर्वात पुढे कोण असते?जो महान असतो तोच देवाच्या पुढे जातो!म्हणून मी देवाच्या जवळ आहे. जो देवाच्या जवळ असतो तोच महान हो ! म्हणून मीच महान आहे!

अशा तर्हेने प्रत्येक बोटापाशी महान होण्यासाठी काहीतरी कारण होते.

म्हणून, तुमच्यातील महानता ओळखा आणि दुसऱ्यालोकातील मोठेपणा ओळखा. मग तेथे तुम्ही उरणार नाही आणि तेथे दुसरे कोणी उरणार नाही आणि तेच नमस्ते होय! तोच पूर्णानंद होय.

भगवान गौतम बुद्धांनी या जडतेपासून तुम्हाला त्यात दुखः दडले आहे हे दाखविले आणि या दुख्खापासून तुम्हाला अशा जागी नेले कि जेथे सर्व आनंद भरून राहिला आहे यालाच वेदांत म्हणतात ( एक तत्वज्ञानाची परंपरा जेथे असे आत्म प्रबोधन सांगितले आहे कि जे मिळाल्यानंतर एखाद्याला अंतिम सत्याची जाणीव होते.) मी म्हणजे कोणी नाही तर शून्यत्व आहे आणि मीच सर्वकाही आहे म्हणजे पूर्णता आहे; ध्यान आणि उत्सव , हे सर्व एकत्र असते! आणि आजचा दिवस हा ध्यान आणि उत्सव हे दोन्ही साजरे करण्याचा आहे (पूर्णत्व)!