तुमच्या इवल्याश्या आरश्यात अफाट सूर्याला पकडा

28
2013
May
बंगलोर, भारत

‘यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते I
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते II’ (१८.१७)

तो म्हणतो, ‘तो ज्याची बुद्धी ही मायेच्या प्रभावापासून मुक्त आहे (अलिप्त-बुद्धी ), अश्या माणसाने जरी संपूर्ण जगाचा नाश केला तरीसुद्धा तो मुक्त राहतो आणि कोणत्याही पापापासून निर्लेप राहतो. असा माणूस त्याच्या कर्माने बांधल्या जाणार नाही.’

खरे तर अशी जागृत बुद्धी असलेला माणूस जो मायेपासून अलग आहे तो लोकांना मारणे यासारखी हिंसात्मक कृती करणारच नाही. आणि त्याने जरी असे केले तरी तो ती कृती त्याचे योद्ध्याचे कर्तव्य म्हणून करेल आणि तीव्र इच्छा व घृणा यातून करणार नाही. (इथे विवेकी माणसाच्या कृतीतील सुसंस्कृतपणा या गुणाचा संदर्भ आहे).

म्हणून हा तिसरा टप्पा आहे ज्यामध्ये अलिप्त-बुद्धी  (शुद्ध बुद्धी जी मायेला  जोडलेली नाहीये आणि तिच्यामुळे जी प्रभावित होत नाही अशी बुद्धी) असलेली व्यक्ती मायेला  ओळखू
शकते.

अशी व्यक्ती मायेच्या कार्याला थोपवायचा प्रयत्न करीत नाही आणि तिच्यामुळे विचलितसुद्धा होत नाही. अश्या अवस्थेत ती व्यक्ती मायेपासून निर्लेप राहते आणि तिच्यापासून ती मुक्त असते.

तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

खरे तर या अवस्थेमध्ये आपल्याला मायेच्या  नाना तऱ्हाचे साक्षी होण्यात आनंद मिळतो आणि त्याने आपले मनोरंजन होते. ते एक मौजेचे स्रोत्र बनते.

प्रगतीच्या तिसऱ्या टप्प्यात जेव्हा आपण फुलून येतो तेव्हा जिच्यामुळे आपण संसाराच्या जंजाळात आणि भ्रमाच्या गुंतागुंत यामध्ये अडकून पडतो हीच ती माया आपल्या मौजेचे आणि करमणुकीचे स्रोत्र बनते.

तर माया  बंधने आणि भ्रम निर्माण करते, आणि त्याच वेळेस माया आपल्याला आनंद आणि हर्ष हेसुद्धा देते. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो,

‘दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया I
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते II’ (७.१४)

तो म्हणतो, ‘हे अर्जुना! माझी योग माया  ही दिव्या गुणांनी युक्त आहे, आणि त्याच्यावर एखाद्याला विजय मिळवणे सोपे नाही. तिला पराभूत करणे अतिशय कठीण आहे. केवळ माझ्यामध्ये आश्रय घेतल्याने आणि मला संपूर्णतः शरण आल्याने तू तिला पराभूत करू शकतो.’

ही संपूर्ण सृष्टी मायेने झाकलेली आहे. ज्याप्रमाणे वायूचा संचार सर्वत्र असतो त्याप्रमाणे संपूर्ण जग हे मायेच्या परिवेष्टनामध्ये आहे. प्रत्येक माणसाच्या मनावर मायेचे आवरण आहे. प्रत्येकजण हा मायेमध्ये खोलवर गुंतलेला आहे. प्रत्येकजणांचे मन हे मायेच्या कोणत्या न कोणत्या प्रभावाखाली आहे.

इथे बसलेल्या तुम्हा सर्वांच्या मनात अनेक विविध विचार आहेत. तुमच्या मनात काय काय चालले आहे याचे केवळ अवलोकन करा! आर देवा! (हशा) हीच तर माया  आहे.

तर या संपूर्ण सृष्टीला मायेचे आवरण आहे.

परंतु एक सच्च्या भक्ताला नेहमी असे वाटते, ‘हे भगवान शंकरा, माझे मन हे कायम तुझ्या भक्तीमध्ये गुंग आहे आणि तुझ्या विचारात बुडालेले आहे. माझ्या मनाने तुला संपूर्णपणे घेरलेले आहे. दिवस आणि रात्र मला तुझी आणि फक्त तुझीच आठवण असते.’

आता हे कसे काय शक्य आहे? आपले मर्यादित मन इतक्या प्रचंड आणि सर्वव्यापी परमेश्वराला कसे काय परिवेष्टित करून धरू शकते? देवाला आपल्या मर्यादित मनाने कसे बांधायचे? हे शक्य आहे?

होय, हे त्याचप्रकारे शक्य आहे ज्याप्रकारे एका मोठ्या हत्तीला (हत्तीच्या प्रतिमेला) आरश्यामध्ये पकडता येते.

तुम्ही सूर्याला संपूर्णपणे आरश्यामध्ये नाही का पकडू शकत? सूर्य इतका प्रचंड आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याला व्यवस्थितपणे आरश्यामध्ये पकडू शकता, हो ना? त्याचप्रमाणे तुमच्या मनाकडे या दिव्यत्वाला संपूर्णपणे पकडण्याची क्षमता आहे.

म्हणूनच असे म्हणतात की तुमचे मन जर पवित्र असेल तर तुम्ही स्वतः देवच आहात! तुम्ही ब्रह्म आहात. परंतु असे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमच्या हृदयाचा आरसा हा स्वच्छ आणि पावन असेल तेव्हा तुम्ही दिव्यत्वाला स्वतःच्या आत निरखू शकता. जर आरसा (मायेमुळे)  झाकलेला असेल किंवा घाण असेल तर मग काम बनणार नाही.

एक संत असा आहे ज्याचे मन आणि हृदय हे आरश्याप्रमाणे लख्ख (नकारात्मकतेपासून मुक्त) असते. एक गुरु असा असतो जो स्वच्छ आरश्याप्रमाणे पवित्र आणि पारदर्शी असतो.

म्हणून तुमचे मन हे शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे म्हणजे मग (चैतन्याची) पूर्णता तुमच्यात फुलून येईल.मग तुम्ही सूर्य आणि चंद्र यांना आपल्या आरश्यात पकडू शकाल.

तर, ज्याप्रमाणे एका भल्या मोठ्या हत्तीला एक आरसा पूर्णपणे पकडू शकतो त्याचप्रमाणे तुमचे मनसुद्धा दिव्यत्वाला पकडू शकते. परंतु मनाला मायेचे निवासस्थान होऊ देऊ नका; खरे तर तिथे देवाचे अधिष्ठान असले पाहिजे. मायेमध्ये गडप होणारे हेच ते मन आहे जे देवाला संपूर्णपणे शरणसुद्धा जाऊ शकते. 

असे सुंदर ज्ञान केवळ ऐकल्यामुळे मन उंचावते आणि ते इतके उंचावते आणि पावन होते, हो ना? सर्व तीव्र इच्छा आणि घृणा यापासून मन त्वरित शुद्ध होते.

आपण आपल्या चेहऱ्यावरील हास्य का गमावून बसतो? याचे कारण आहे तीव्र इच्छा आणि घृणा, आणि आपली मायेमधील गुंतागुंत. जेव्हा आपल्या मनातील अवकाश हे तीव्र इच्छा आणि घृणा यांनी भरून जाते तेव्हा आनंद संपूर्णपणे हरवून जातो.

‘अरे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही! हा मनुष्य चांगला नाही! तो माणूस बरोबर नाही!’ अशा विचारांमध्ये आपण इतके अडकून जातो, मी तर म्हणेन की आता तर तुम्हीसुद्धा बरोबर नाही!अश्या विचारांमध्ये तुमची सर्व उर्जा नष्ट होते.

जेव्हा तुम्ही तुमची सर्व सकारात्मक उर्जा अश्या विचारांवर व्यर्थ घालवता तेव्हा तुम्ही तर निरोपयोगी होऊन जाता; काही करण्यायोग्य नाही. जेव्हा तुमचा जीवनातील सर्व उत्साह हरवून जातो तर मग बाकी उरले काय?

असे अडकून पडल्यामुळे तुमचे प्रेम, हास्य आणि उत्साह हे सर्व काही हरवून जाते. जेव्हा तुम्ही तुमचा उत्साह गमावून बसता तेव्हा तुम्ही इतर सर्व काही हरवून बसता. मग तुम्ही केवळ एके ठिकाणी पडून राहाल आणि काहीही करणार नाही. हे सर्व का घडते? याचे कारण आहे माया. ही माया फार कोड्यात पडणारी आहे. ती तर कोणालाही पकडते आणि वाट्टेल तसे नाचायला लावते! आणि जो बिचारा अडकल्या जातो तो आपला नाचत राहतो.

मायेमुळे समस्त जग त्रस्त आहे. म्हणून याच्यामुळे, अनेक लोक टीका करतात आणि मायेच्या खेळाच्या विरोधी होतात. परंतु भगवान कृष्ण म्हणतो, ‘ही माया  दिव्या गुणांनी युक्त आहे, आणि ती माझ्यातून निर्माण झालेली आहे. म्हणून तू तिचा मान राख आणि तिचा आदर ठेव.’

केवळ भगवान कृष्ण अशी गोष्ट म्हणू शकतो, आणि इतर कोणी नाही. हे तर असे झाले की सिनेमाचा दिग्दर्शक केवळ असे म्हणू शकतो, ‘सगळे काही माझ्या मालकीचे आहे. नायक आणि खलनायक दोघेही माझे आहेत.’ खलनायक त्याचा आहे असे नायक म्हणू शकतो का? नाही, हे अश्याप्रकारे काम चालत नाही. सिनेमाच्या नायकाला खलनायकाला खलनायक म्हणूनच वागवले पाहिजे. परंतु, ‘नायक आणि खलनायक दोघे माझे आहेत. या सिनेमामध्ये काम करण्यास मी त्यांना दाम मोजले आहे. म्हणून त्या दोघांमधील भांडण हे मी लिहून काढले आहे आणि याचा अंत हासुद्धा मी लिहिलेला आहे’, असे बोलण्याचा हाक केवळ सिनेमाच्या दिग्दर्शकाला आहे.

याचसाठी म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘ही माया  माझ्यापासून निर्माण झालेली आहे. तो मी आहे जो तिचा प्रसार करीत आहे, आणि मी दिव्य आशीर्वादानेच तुम्ही तिला पराजित करू शकता. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केलात तरी तुम्ही तुमच्या एकट्याच्या प्रयासाने तिच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. केवळ माझ्यामध्ये आश्रय घेतला तरच तुम्ही हा मायेचा  महासागर पार करू शकता.’

म्हणून केवळ स्वतःच्या आत खोलवर गेल्यानेच तुम्ही मायेला पराभूत करू शकता.