तुम्ही उपयुक्त आहात की निरुपयोगी?

15
2013
Jul
माँट्रियल, कॅनडा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, सेवेमध्ये असे काय आहे ज्यामुळे लोक ऑफिसामधील कामापेक्षा सेवा अधिक उत्साहाने करतात?

श्री श्री : असे पहा, आपल्याला कार्यरत राहायचे आहे आणि म्हणून आपण काहीतरी करीत असतो. कोणतेही काम करताना आपण त्यातून स्वतःसाठी काहीतरी फळाची अपेक्षा करतो. पण ज्या कार्यातून आपल्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नसते आणि केवळ जीवनात काहीतरी उपयुक्त करावे म्हणून आपण जे कार्य करतो, त्याला सेवा म्हणतात. ज्या कृत्यातून फळाची अपेक्षा नसते आणि तरीही ते कृत्य केल्याने इतरांना फायदा होतो आणि करणाऱ्याला आनंद मिळतो, ती सेवा होय.

प्रश्न: सिद्धी कशासाठी असतात?

श्री श्री : आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची गरज उत्पन्न होण्यापूर्वीच ती गोष्ट सहजतेने प्राप्त होते, तेव्हा त्या प्रक्रियेला सिद्धी म्हणतात.

समजा तुम्हाला लग्न करायचे आहे आणि सत्तर वर्षे वय झाल्यावर सुद्धा तुम्हाला कुणी जीवनसाथी लाभला नाही, तर तुम्ही काय कराल? याचा अर्थ हा की तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही. उलट लग्नाचा विचार तुम्ही करण्यापूर्वीच दहा व्यक्ती येवून “माझ्याशी लग्न करा ना,” अशी विनंती करू लागल्या तर याचा अर्थ तुमच्यापाशी सिद्धी आहे.

भारतीय भाषेमध्ये एक म्हण आहे, तुमचे दात असताना चणे मिळत नव्हते आणि चणे मिळाले तोवर दात शाबूत राहिले नाहीत!

असा प्रकार म्हणजेच सिद्धीचा अभाव आहे. तुम्हाला काही मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि त्या गोष्टीची उपयुक्तता संपलेली असावी.

याचप्रमाणे, तुम्हाला काहीतरी हवेहवे असावे आणि ते मिळाले तरी ते पुरेसे नसावे, हादेखील सिद्धीचा अभाव आहे. समजा तुम्हाला इथून कॅलिफोर्नियाला जायचे आहे. त्यासाठी पंधराशे डॉलर्सची आवश्यकता आहे. पण तुमच्याकडे एकूण तेराशे डॉलर्सच जमले, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही. म्हणजे गरज उत्पन्न होण्याआधी गरजेपेक्षा अधिक काही मिळून जाते, तेव्हा त्याला सिद्धी म्हणावे.

आपल्याला जे हवे असेल ते सहज मिळायला हवे. ते उशिरा अथवा कमी प्रमाणात मिळाले, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजेच, जे हवे ते आणि हवे तेवढे वेळेमध्ये प्राप्त झाले तर तुमच्यापाशी सिद्धी आहे म्हणावे.

गरजेपेक्षा अधिक आणि गरज उत्पन्न होण्यापूर्वी वस्तू मिळून जाणे, म्हणजे सिद्धी.

पण हे गरजेपेक्षाच अधिक हवे. तुमच्या हव्यासेपेक्षा अधिक नाही.

प्रश्न: गुरुदेव, केवळ तुमच्या सहवासात आल्यानेच इतके सुंदर आणि अदभूत वाटते. आपल्याला या सर्व ध्यान साधनेची आवश्यकता का आहे? आणि सर्व साधना नियमित करणे महत्वाचे आहे का?

श्री श्री : हो, अर्थातच. याचा अर्थ तुमच्याकडे करण्या सारखे काहीतरी आहे आणि माझ्याकडेही आहे!

याचे चार स्तर आहेत. पहिला स्तर सान्निध्य. म्हणजे दैवी उपस्थितीची जाणीव होणे.

दुसरा स्तर आहे, सामिप्य, ज्यात गुरु किंवा ईश्वराशी जवळीक जाणवते. सामिप्याची जाणीव तुमच्या अंतःकरणातून व्हायला हवी. ही जाणीव तुमच्यामध्ये कुणी घडवून आणू शकत नाही, ती स्वतःमधूनच उत्पन्न व्हावी लागते.

तिसरा स्तर आहे सारुप्य. म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे. अर्थात, जेथे तुझ्यात आणि माझ्यात कोणताही भेद वा अंतर रहात नाही.

आणि शेवटचा स्तर आहे सायुज्य, ज्यात आपण ईश्वरामध्ये विलीन होऊन जातो.

प्रश्न: गुरुदेव, जर आर्ट ऑफ लिव्हिंगचा संबंध केवळ अध्यात्मिकतेशीच आहे आणि धर्मांशी नाही, तर मग आपण कृष्ण आणि इतर हिंदू देवतांची भजने का गातो?

श्री श्री : गायन हा अध्यात्मिकतेचाच एक भाग आहे. आपण ज्या पुरातन नामांची भजने गातो, ती खरे तर मंत्रासारखी आहेत. त्यां नामजपामध्ये ज्या शक्ती लहरी आहेत, त्यांचा आपल्या अस्तित्वावर प्रभाव पडतो. या गायनामध्ये एक साह्जीकता आहे. ॐ नमः शिवाय हा एक मंत्र आहे. आणि मंत्र जप हा अध्यात्मिकतेचाच एक भाग आहे.

तुम्ही जन्मलात तेव्हापासून नामकरण, लग्नविधी, मृत्युपश्चातचा विधी हे सर्व तुमच्या धर्मानुसार होत असतात. पण अध्यात्मिकता तुम्हाला एका उच्च पातळीवर घेऊन जाते. म्हणूनच योग साधना, ध्यान इत्यादी एका विशिष्ठ परंपरेतून उदभवले असले तरी ते निव्वळ धार्मिक विधी न राहता जगण्याची रीत होऊन जातात.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जे स्वतः हिंदू होते, त्यांना कुणीतरी हिंदू धर्माची व्याख्या काय असा प्रश्न केला. ते उत्तरले, “ हिंदुत्वाची व्याख्या करणे अशक्य आहे. ती तर जगण्याची एक रीत आहे केवळ !”

जगात इतके सारे धर्म अस्तित्वात असल्यामुळे जगण्याच्या विशिष्ठ रीतीनाच धर्मांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. नाहीतर हिंदुत्व हा धर्म नाहीच, ती तर जगण्याची एक रीत आहे.

आपण गातो, त्या गायनाने आणि जपाने आपल्या अस्तित्वावर, मनावर आणि चेतनेवर एक विशिष्ठ प्रभाव पडतो. हे स्वर आणि मंत्र जेवढे अधिक पुरातन असतील, तेवढा त्यांचा प्रभाव अधिक खोलवर होत असतो. म्हणूनच ॐ चा जप करणे अतिशय महत्वाचे मानतात.

गीतात कृष्ण आहे की इतर कुणाचे नाव आहे, हे महत्वाचे नाही. त्या मंत्र उच्चाराचा प्रभाव महत्वाचा आहे.

प्रश्न: गुरुदेव, ज्या प्रमाणे भाषणाचे विविध प्रकार असतात, तसेच मौनाचेही प्रकार आहेत का?

श्री श्री : तुम्ही सांगा, रिक्तपणाचे विविध प्रकार असतात का? मौन हे मौन आहे आणि रिकामे ते रिकामेच आहे. एक रिकामे भांडे कोणत्या प्रकारे रिकामे आहे असे तुम्ही विचारणार नाही. पण तेच भांडे भरलेले असेल तर विचाराल की ते कशाने भरले आहे!

भाषणाचे चार प्रकार आहेत. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.

वैखरी हा भाषणाचा ढोबळ प्रकार. आपण आता जे जसे बोलत आहोत, ते वैखरी.

पश्यन्ति हे वैखरी पेक्षा अधिक तरल भाषण असते. या भाषणात भाषा व शब्द नसतात. पश्यन्ति मध्ये, शक्तीलहरींमधूनच जे काय सांगितले ते तुम्हाला कळते पूर्ण कल्पना येते. त्या विचारांना शब्दरूप देण्याची आवश्यकता नसते.

एक लहान मूल तुम्हाला “मी तुमच्यावर प्रेम करतो” असे सांगत नाही. ते तुमच्याकडे पाहते आणि तुम्हाला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. प्रेम आणि भावना या शब्दांवाचुनच कळवता येतात. शब्दांवाचून सारे कळणे हीच पश्यन्ति आहे.

मध्यमा हे याहूनही अधिक तरल रूप आहे. जे व्यक्त करण्यापूर्वीच कळते ते मध्यमा. व्यक्तव्याच्या रूपात येण्याआधीच ते आपल्या अस्तित्वात उपजत असते आणि कोणत्याही माध्यमाशिवाय समजता येते. पश्यन्ति मध्ये भाषा नसली तरी समजण्यासाठी एका माध्यमाची आवश्यकता असते. पण मध्यमामध्ये अशा माध्यमाची गरज नसते.

परा हे अति तरल आणि अतिसूक्ष्म संभाषण आहे. यात भाषा नाही, शब्द नाहीत, माध्यम नाही. परा म्हणजे आपल्या अस्तित्व चेतानेमाधुनच उभारून येणारे ज्ञान.

तर अशा प्रकारे परा, मध्यमा, पश्यन्ति आणि वैखरी हे संभाषणाचे चार प्रकार आहेत.

“प्रुफ ऑफ हेवन” नावाच्या एका पुस्तकामध्ये लेखकाने तो कोम्यामध्ये असतानाचे अनुभव वर्णलेले आहेत भाषेशिवायचे संभाषण कसे असते याचे अनुभव त्याने विषद केले आहेत. शिवाय ईश्वराचे नाव ॐ आहे असे तो म्हणतो.

तुम्ही या पुस्तकाबद्धल वाचले आहे का? खूप कुतूहलपूर्ण आहे हे पुस्तक.

पुस्तकाचा लेखक अमेरिकेमधील एक न्युरोसर्जन आहे. तो एकदा आजारी पडून कोमामध्ये गेला. सगळ्यांची समजूत झाली की तो त्यातून बाहेर येणारच नाही. पण तो बाहेर आला आणि त्या दरम्यानच्या आपल्या अनुभवांबद्धल त्याने ‘प्रुफ ऑफ हेवन’ (स्वर्गाचा दाखला) हे पुस्तक लिहिले. कोमात शरिर असताना तो अस्तित्वाच्या पुढच्या अदभूत पातळीवर पोचला त्याचे हे वर्णन आहे.

हे अनुभव अत्यंत आश्चर्यजनक आहेत. शिवाय वेदान्तामध्ये आणि पुराणातील अनेक ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे, तेच त्याने अनुभवलेले दिसते. जसेच्या तसे, इत्यंभूत! मी अनेक वर्षांपासून जे सांगत आलो आहे, तेच तो वर्णतो. म्हणतो, की पलीकडे दिव्य प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाचे नाव ॐ आहे. तो प्रकाश सर्व व्यापी आहे, प्रेमाने आणि करुणेने परिपूर्ण आहे. तो प्रकाश दिव्य प्रेमच आहे.

लेखक पुढे सांगतो की तो एका अशा वृक्षामधून गेला ज्याची मुळे वरती आहेत आणि फांद्या आत, खाली आहेत. भगवंत गीतेमध्ये असा उल्लेख आहे; पलीकडच्या जगात जाण्यासाठी मुळामधून जावे लागते. लेखक याच मुळांबद्धल लिहितो.

पुढे तो सोनेरी अंड्याबद्धल सांगतो, ज्याला आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये हिरण्यगर्भ असे संबोधले जाते. लेखक म्हणतो की या विश्वाचा मध्यबिंदू आत्मन आहे आणि सोनेरी अंडे (हिरण्यगर्भ) हे त्याचे कवच आहे. भगवत गीतेमध्ये अगदी असेच वर्णन वाचता येते.

याशिवाय लेखक ज्ञान संपर्क पदधती बद्धल सांगतो. तो म्हणतो, संभाषण हे शब्द आणि भाषा विरहित होते. हेच तर आपण संभाषणाच्या चार प्रकारांमध्ये पाहिले. लेखकाचे हे सर्व अनुभव वाचण्याजोगे आहेत.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, जेव्हा आपल्या आप्तांपैकी कुणी भय, संकल्पना आणि विचारांमध्ये गुरफटून गेलेला दिसतो, तेव्हा बुद्धीच्या पातळीवरून त्याला बाहेर काढून हृदयाच्या पातळीवर कसे आणावे?

श्री श्री : तुम्ही काळजी करू नका. असे लोक स्वतःच त्यातून बाहेर येतील. हा स्थळ काळाचा परिणाम असतो. हिंदीमध्ये एक काव्य पंक्ती आहे : या जगामध्ये सर्व काही आहे, या जगात अनेकाविध नजराणे आहेत. पण ज्याचेपाशी सत्कर्म नाही, त्याला त्यातले काहीही मिळत नाही!